MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
#MJPUpdate
20 जूनपर्यंत MJP चा निकाल लागेल. ✅🔜

Join @mpsc_learner
आज PMC, MJP मध्ये जे घडलं ते पहिल्यांदाच घडलेलं नाही आणि दुर्दैवाने पुढेही घडू शकतं. पण प्रश्न हा आहे की त्याविरोधात आपण काय करत आहोत? उत्तर बहुतेक वेळा "काहीच नाही" असंच असतं.

आपलं यात नुकसान होत नाही म्हणून गप्प बसू नका. "माझ्यासोबत तर असं झालेलं नाही" म्हणूनही शांत राहू नका. आज जे होतकरू विद्यार्थ्यांसोबत घडत आहे, तेच उद्या तुमच्यासोबतही घडू शकतं. आज दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत असेल, तर उद्या तुमच्या स्वप्नांवरही येऊ शकते.

निकाल लागला की काही दिवस संताप व्यक्त करायचा, ग्रुपवर चर्चा करायची, आरोप-प्रत्यारोप करायचे आणि मग विषय विसरून जायचा. यामुळे व्यवस्था बदलत नाही. उलट विद्यार्थ्यांचा विरोध काही दिवसांचा असतो हे संबंधितांना माहिती असतं.

आज स्वतःसाठी आवाज उठवला, तर उद्या तुमच्यावर अन्याय होणार नाही याची शक्यता वाढते. पण आज इतरांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केलं, तर उद्या तुमच्यावर अन्याय झाल्यावर तुमच्यासाठीही कोणी उभं राहणार नाही.

जोपर्यंत विद्यार्थी संघटित होत नाहीत, अधिकृत स्तरावर पाठपुरावा करत नाहीत, निवेदने देत नाहीत आणि गरज पडल्यास मैदानात उतरून प्रश्न विचारत नाहीत, तोपर्यंत अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील.

फक्त अन्याय झाल्यावर राग व्यक्त करून उपयोग नाही; त्या अन्यायाविरुद्ध सातत्याने उभं राहण्याची तयारी असावी लागते. नाहीतर आज PMC, MJP मध्ये जे झालं ते उद्या दुसऱ्या भरतीत होईल, परवा आणखी एका निकालात होईल आणि आपण पुन्हा त्याच चर्चा करत बसू.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
ज्या मुलांची एका-दोन गुणांनी पोस्ट गेली आहे, आवाजही बहुतेक तेच उठवत आहेत. बाकीचे अनेक जण "आपलं काय जातंय?" या भूमिकेत शांत आहेत. पण लक्षात ठेवा, हाच दिवस उद्या तुमच्यावरही येऊ शकतो. आज जो विद्यार्थी एका गुणाने मागे पडला आहे, त्याच्या जागी उद्या तुम्हीही असू शकता. त्यामुळे हा फक्त काही विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे.
मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट-क तांत्रिक 254 पदांचे मागणीपत्र MPSC कडे🔥🔥

नवीन पदे गट-क मध्ये ॲड होण्यास सुरुवात झाली आहे.

अशा अनेक कारणामुळे गट-क ची जाहिरात येण्यास विलंब होत आहे.

लवकरच परीक्षा योजना जाहीर होईल आणि त्यानंतर जाहिरात 🔥🔥🔥
India is ranked 127th out of 163 countries in the 2026 Global Peace Index (GPI)
Ministry of Education, Govt Of India

#Telegram Restricted For 2 Days

● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात

● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले

● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार

⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम (RR) अंतिम झाल्यानंतर भरतीबाबत निर्णय घेण्यात येईल

RR लवकर मंजूर होणे गरजेचे आहे.
PMC विभागाला वाटलं असेल की मुलांना काही कळणार नाही, आणि कळलं तरी हे Civil चे विद्यार्थी काही करणार नाहीत. प्रत्येक वेळी शांत बसतील. पण आता तसं होणार नाही.

विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या उमेदवाराला BMC च्या निकालात -1 दाखवण्यात आलं होतं, त्याच उमेदवाराला PMC च्या निकालात 177 गुण कसे दिसतात? यामागचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे?

याहून मोठा प्रश्न म्हणजे निकालाची PDF तपासल्यानंतर तिच्या Properties मध्ये iLovePDF आणि Microsoft Excel चा वापर झाल्याचे तपशील दिसत आहेत. जर निकाल पूर्णपणे अंतिम आणि अधिकृत स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असेल, तर PDF वर अशा प्रकारच्या processing आणि editing च्या नोंदी का दिसतात? याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट खुलासा करावा.

तसेच, प्रसिद्ध करण्यात आलेल्या PDF मधील Digital Signature सुद्धा verify होत नाही. त्यामुळे उमेदवारांनी या दस्तऐवजाची authenticity नेमकी कशी तपासायची? अधिकृत निकाल असल्यास Digital Signature वैध आणि verify होणं अपेक्षित असतं. सध्या उपलब्ध PDF ही केवळ edit copy असल्यासारखी दिसत आहे, त्यामुळे याबाबतही संबंधित विभागाने स्पष्ट स्पष्टीकरण द्यावं.

हा मुद्दा आधीच अनेक न्यूज चॅनलपर्यंत पोहोचला आहे. आता तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण हा फक्त काही विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तर हजारो उमेदवारांच्या भविष्याचा आणि भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे.

जर सर्व काही नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने झालं असेल, तर सर्व शंकांचं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात कोणतीही अडचण नसावी. विद्यार्थी फक्त सत्य आणि पारदर्शकता मागत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, आपली उपस्थिती दाखवावी आणि हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. प्रश्न विचारणं हा प्रत्येक उमेदवाराचा अधिकार आहे.

✊ न्याय, पारदर्शकता आणि सत्यासाठी आवाज उठवा!
महत्त्वाचे Study PDF पाहायचे असतील किंवा Telegram वर काही आवश्यक काम असेल, तर Turbo VPN App वापरून Telegram वापरू शकता.

सध्या NEET परीक्षेमुळे 30 जूनपर्यंत Telegram चा सर्व्हर काही वेळा डाउन असल्यासारखा वाटू शकतो, त्यामुळे अडचण आल्यास VPN चा पर्याय वापरा. 👍🏻
🔴 MES 2026 🔴

Total = 2️⃣0️⃣ Post
PMC exam center madhe Mobile