MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Lieutenant General Dhiraj Seth has been appointed as the next Chief of the Army Staff of the Indian Army. He will assume office on the afternoon of June 30, 2026, succeeding the current Chief of Army Staff, General Upendra Dwivedi
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते?
Anonymous Quiz
63%
महर्षी धोंडो केशव कर्वे
18%
विनोबा भावे
16%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3%
यशवंतराव चव्हाण
"डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस" आणि "गुलामांचे राष्ट्र" हे ग्रंथ कोणाचे आहेत?
Anonymous Quiz
9%
महात्मा फुले
15%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
40%
गोपाळ गणेश आगरकर
36%
बाळ गंगाधर टिळक
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेच्या बंधनामुळे आता उच्च न्यायालयात निश्चितच जास्त विलंब होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कदाचित येणारी तारीख ही अंतिम सुनावणीची असेल आणि त्यानंतर लवकरच BMC JE चा निकाल जाहीर करण्यात येईल.

प्रतीक्षेचा बांध आता तुटण्याच्या मार्गावर आहे. ⏳
#MJPUpdate
20 जूनपर्यंत MJP चा निकाल लागेल. ✅🔜

Join @mpsc_learner
आज PMC, MJP मध्ये जे घडलं ते पहिल्यांदाच घडलेलं नाही आणि दुर्दैवाने पुढेही घडू शकतं. पण प्रश्न हा आहे की त्याविरोधात आपण काय करत आहोत? उत्तर बहुतेक वेळा "काहीच नाही" असंच असतं.

आपलं यात नुकसान होत नाही म्हणून गप्प बसू नका. "माझ्यासोबत तर असं झालेलं नाही" म्हणूनही शांत राहू नका. आज जे होतकरू विद्यार्थ्यांसोबत घडत आहे, तेच उद्या तुमच्यासोबतही घडू शकतं. आज दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत असेल, तर उद्या तुमच्या स्वप्नांवरही येऊ शकते.

निकाल लागला की काही दिवस संताप व्यक्त करायचा, ग्रुपवर चर्चा करायची, आरोप-प्रत्यारोप करायचे आणि मग विषय विसरून जायचा. यामुळे व्यवस्था बदलत नाही. उलट विद्यार्थ्यांचा विरोध काही दिवसांचा असतो हे संबंधितांना माहिती असतं.

आज स्वतःसाठी आवाज उठवला, तर उद्या तुमच्यावर अन्याय होणार नाही याची शक्यता वाढते. पण आज इतरांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केलं, तर उद्या तुमच्यावर अन्याय झाल्यावर तुमच्यासाठीही कोणी उभं राहणार नाही.

जोपर्यंत विद्यार्थी संघटित होत नाहीत, अधिकृत स्तरावर पाठपुरावा करत नाहीत, निवेदने देत नाहीत आणि गरज पडल्यास मैदानात उतरून प्रश्न विचारत नाहीत, तोपर्यंत अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील.

फक्त अन्याय झाल्यावर राग व्यक्त करून उपयोग नाही; त्या अन्यायाविरुद्ध सातत्याने उभं राहण्याची तयारी असावी लागते. नाहीतर आज PMC, MJP मध्ये जे झालं ते उद्या दुसऱ्या भरतीत होईल, परवा आणखी एका निकालात होईल आणि आपण पुन्हा त्याच चर्चा करत बसू.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
ज्या मुलांची एका-दोन गुणांनी पोस्ट गेली आहे, आवाजही बहुतेक तेच उठवत आहेत. बाकीचे अनेक जण "आपलं काय जातंय?" या भूमिकेत शांत आहेत. पण लक्षात ठेवा, हाच दिवस उद्या तुमच्यावरही येऊ शकतो. आज जो विद्यार्थी एका गुणाने मागे पडला आहे, त्याच्या जागी उद्या तुम्हीही असू शकता. त्यामुळे हा फक्त काही विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे.
मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट-क तांत्रिक 254 पदांचे मागणीपत्र MPSC कडे🔥🔥

नवीन पदे गट-क मध्ये ॲड होण्यास सुरुवात झाली आहे.

अशा अनेक कारणामुळे गट-क ची जाहिरात येण्यास विलंब होत आहे.

लवकरच परीक्षा योजना जाहीर होईल आणि त्यानंतर जाहिरात 🔥🔥🔥
India is ranked 127th out of 163 countries in the 2026 Global Peace Index (GPI)
Ministry of Education, Govt Of India

#Telegram Restricted For 2 Days

● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात

● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले

● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार

⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम (RR) अंतिम झाल्यानंतर भरतीबाबत निर्णय घेण्यात येईल

RR लवकर मंजूर होणे गरजेचे आहे.