MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
530 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
मा. गिरीश महाजन साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करत मा. सचिव WRD Dept यांना फोन लावून , WRD सेवा प्रवेश, बिंदूनामवली या संदर्भात माहिती घेतली, आणि लवकरात लवकर जाहिरात कशी प्रसिद्ध होईल यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यासोबत साहेबांनी मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर सदरील विषय घालण्याची आपणास हमी दिली आहे.

आजच्या भेटीनंतर WRD संदर्भात डिपार्टमेंट माननीय मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार त्वरित कारवाई करून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करेल ही अपेक्षा ठेवू या.

👏Thanks भाऊ ( मा. मंत्री गिरीश महाजन साहेब) Team U Win Academy आपली आभारी आहे.❤️❤️👏👏
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मा. गिरीश महाजन साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करत मा. सचिव WRD Dept यांना फोन लावून , WRD सेवा प्रवेश, बिंदूनामवली या संदर्भात माहिती घेतली, आणि लवकरात लवकर जाहिरात कशी प्रसिद्ध होईल यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे…
Team Uwin 💥💥🔥🔥
Special Thanks To Swapnil Sir U Win Academy 🙏🔥

MPSC Learners कडून U win academy टीमचे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
PWD हे सर्वांचंच Dream डिपार्टमेंट आहे. ✅💯
💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 चॅनल वर 🔴 उद्या Civil साठी एक मोठी अपडेट देणार आहे. 💥✅ Confirming...✍️
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा खूप संथ गतीने होत असतात.

PWD मध्ये जागा राहणार आहेत, पण त्या परीक्षेपूर्वीच जाहिर झाल्या पाहिजेत. पेपर झाल्यानंतर जागा वाढवल्याचा फारसा फायदा होणार नाही.

WCD ची जाहिरात सर्वप्रथम येणार आहे. त्यानंतर इतर विभागांच्या जागा टप्प्याटप्प्याने त्यात समाविष्ट होत जातील.

PWD WRD. या जागा उशिरा समाविष्ट होण्याची शक्यता आहे — एकतर पेपरपूर्वी किंवा पेपर दिल्यानंतर.

PWD च्या जागा चांगल्या प्रमाणात पाहायला मिळू शकतात.

PWD JE बाबत सध्या एवढेच म्हणता येईल की जागा दोन अंकी येऊ शकतात, अन्यथा येणारही नाहीत. त्यामुळे यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जागा तर येणारच आहेत. हे मेगा भरतीचे वर्ष आहे. त्यामुळे PWD विभागाकडून Group C च्या जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे "बेहती गंगा में हाथ धोना" आपल्यालाच आहे. CEA च्या अधिक जागांसाठी विभागाकडून आयोगाकडे मागणीपत्र जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल की PWD JE आणि CEA च्या जास्तीत जास्त जागा आयोगाकडे पाठवाव्यात. अन्यथा वित्त विभागाची नेहमीची नाटकं सुरूच राहतील.

मला तुम्हाला कोणतीही खोटी आश्वासने द्यायची नाहीत. आपल्या चॅनलवर प्रत्येक वेळी शक्य तितकी अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न असतो. उगीच हवाबाजी करून कोणाच्या भावनांशी खेळायचे नाही. अनेक मुलं वर्षानुवर्षे मेहनत करत आहेत; त्यांच्या मनावर अशा गोष्टींचा काय परिणाम होतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. आपण सर्वजण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, हेही मला माहिती आहे.

एवढंच सांगायचं आहे की पुढचा काळ सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. त्यामुळे मेहनतीत कोणतीही कमी पडू देऊ नका. नकारात्मक बातम्यांनी खचून जाऊ नका. सकारात्मक राहा आणि तयारी सुरू ठेवा.

माझ्याकडून हे शेवटचे अपडेट असेल. काही जण म्हणतील की चॅनल वाढवण्यासाठी काहीही मेसेज टाकतो, पण तसं अजिबात नाही. एक सकारात्मक गोष्ट तुमच्या मनाला आधार देईल, म्हणून ही माहिती शेअर केली.

PWD हे अनेकांचं ड्रीम डिपार्टमेंट आहे. त्यामुळे तयारी सुरू ठेवा. सध्या खूप नकारात्मक बातम्या ऐकायला मिळत आहेत, पण इथून शक्य तितक्या सकारात्मक आणि रचनात्मक गोष्टीच शेअर केल्या जातील. नकारात्मक बातम्या आल्याच, तरी त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका.

मात्र, आपल्या प्रयत्नांनाही गती द्या. पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकप्रतिनिधींना भेटा, आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि अधिवेशनात हे मुद्दे मांडण्याची विनंती करा. त्यामुळे प्रक्रिया अधिक वेगाने होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त जागा मिळण्याची शक्यता वाढेल.

आणखी काही माहिती मिळाल्यास नक्की कळवेन. मात्र, हे सर्व आपल्या प्रयत्नांवरही अवलंबून आहे. तुम्ही पुढाकार घेतलात तरच अपेक्षित परिणाम मिळू शकतील.
इतर काही अपडेट्स आहेत, पण सध्या त्यांची पूर्ण खात्री झाल्याशिवाय त्या शेअर करता येणार नाहीत. नाहीतर पुन्हा टेलिग्रामवरील चर्चाच होऊन राहतील.

वरील माहिती शेअर करण्यापूर्वीच काही जण ट्रोल करायला लागले, त्यामुळे कदाचित माझ्याकडून हेच शेवटचे अपडेट असेल.

बाकी, अभ्यास सुरू ठेवा. 💯

लक्षात ठेवा, अफवा आणि नकारात्मकतेपेक्षा तुमची तयारी जास्त महत्त्वाची आहे. योग्य वेळी योग्य माहिती मिळेलच. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि पूर्ण ताकदीने अभ्यास करत राहा. 🔥📚
👍1
Civil maharashtra टीम ग्राउंडवर नेमकं काय काम करत आहे, याची माहिती कदाचित फार कमी जणांना असेल. मात्र योग्य वेळ आल्यावर ते सर्व काम आणि त्याचे परिणाम स्वतःच सर्वांसमोर येतील.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, विविध स्तरांवर निवेदने देणे, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, आवश्यक तेथे उपस्थित राहणे आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणे हे काम पडद्यामागे निरंतर सुरू असते. ✍️

उद्देश प्रसिद्धी मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणे हा आहे. त्यामुळे अनेक गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत जाहीर केल्या जात नाहीत.

प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. योग्य वेळी कामही दिसेल आणि त्याचा परिणामही. 🎯

MPSC Learners कडून Civil Maharashtra टीमचे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «जागा तर येणारच आहेत. हे मेगा भरतीचे वर्ष आहे. त्यामुळे PWD विभागाकडून Group C च्या जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे "बेहती गंगा में हाथ धोना" आपल्यालाच आहे. CEA च्या अधिक जागांसाठी विभागाकडून आयोगाकडे मागणीपत्र जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी…»
आज होणाऱ्या गट " ब " पूर्व अराजपत्रित 2026 परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐
अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणते काव्य रचले?
Anonymous Quiz
12%
गोमांतक
71%
सागरप्राण तळमळला
8%
कमला
10%
जयस्तुते
Forwarded from Civil Maharashtra
🔴🔴 इंद्रनील भाऊ त्यांच्या निवासस्थानी आहेत. आसपासच्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब या...
MPSC आयोग अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने समिती गठीत केली आहे जर कोणी मंत्रालय मध्ये गेले तर समिती सदस्य यांना खासकरून Engineering परीक्षेमध्ये technical अभ्यासक्रम जास्त ठेवावा असे निवेदन द्या. कारण आपल्यावर नेहमी non technical syllabus जास्त ठेवून अन्याय होतो.
राज्यसेवा पूर्व परीक्षा बघतोच आपण.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Legends never truly leave us. Remembering Sushant Singh Rajput today and always.💐
Lieutenant General Dhiraj Seth has been appointed as the next Chief of the Army Staff of the Indian Army. He will assume office on the afternoon of June 30, 2026, succeeding the current Chief of Army Staff, General Upendra Dwivedi
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते?
Anonymous Quiz
63%
महर्षी धोंडो केशव कर्वे
18%
विनोबा भावे
16%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3%
यशवंतराव चव्हाण
"डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस" आणि "गुलामांचे राष्ट्र" हे ग्रंथ कोणाचे आहेत?
Anonymous Quiz
9%
महात्मा फुले
15%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
40%
गोपाळ गणेश आगरकर
36%
बाळ गंगाधर टिळक
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेच्या बंधनामुळे आता उच्च न्यायालयात निश्चितच जास्त विलंब होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कदाचित येणारी तारीख ही अंतिम सुनावणीची असेल आणि त्यानंतर लवकरच BMC JE चा निकाल जाहीर करण्यात येईल.

प्रतीक्षेचा बांध आता तुटण्याच्या मार्गावर आहे. ⏳
#MJPUpdate
20 जूनपर्यंत MJP चा निकाल लागेल. ✅🔜

Join @mpsc_learner