MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
538 photos
127 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
📌 PMC कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) निकालाबाबत नवीन अपडेट
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षेचा निकाल अद्याप आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे. निवडणूक विभागाकडून स्पष्ट भूमिका न मिळाल्याने महापालिकेने आता थेट भारत निवडणूक आयोगाकडे (ECI) मार्गदर्शन मागण्याचा निर्णय घेतला आहे.
१६९ जागांसाठी झालेल्या या भरतीचा निकाल लवकर जाहीर करण्याची उमेदवारांची मागणी असून, आता सर्वांचे लक्ष ECI च्या निर्णयाकडे लागले आहे. ✅
#PMCJE #ResultUpdate #PunePMC #JuniorEngineer
📌शपथ आणि राजीनामा

𝟏. राष्ट्रपती -
शपथ- सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
राजीनामा- उपराष्ट्रपती

𝟐. उपराष्ट्रपती -
शपथ- राष्ट्रपती
राजीनामा- राष्ट्रपती

𝟑. पंतप्रधान-
शपथ-राष्ट्रपती
राजीनामा-राष्ट्रपती

𝟒. मुख्य न्यायाधीश-
शपथ-राष्ट्रपती
राजीनामा-राष्ट्रपती

𝟓. लोकसभा अध्यक्ष-
शपथ- लोकसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत
राजीनामा- लोकसभा उपाध्यक्षाला

𝟔. राज्यपाल-
शपथ- उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
राजीनामा-राष्ट्रपती

𝟕. मुख्यमंत्री-
शपथ-राज्यपाल
राजीनामा- राज्यपाल

𝟖. विधानसभा अध्यक्ष-
शपथ-विधानसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत
राजीनामा-विधानसभा उपाध्यक्षाला..
👏3❤2👌1
उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा... 💐💐
🥰2
#NEW_OMR PATTERN..
♦️आता OMR मध्ये Subject code,परीक्षा नाव,आणी परीक्षा नंबर चे initial टाकायची गरज नाही.. गट ब मुख्य पासून change झाले आहे..
MPSC Pre 🌚🔥
😁12🤯5❤2
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

सामान्य अध्ययन (GS) पेपर

Join 👉 @mpsc_learner
Toughest paper till date MPSC 🔥

आतुरता फक्त आता जागावाढीची 200+ 🤩 अपेक्षित. Cut off कमी लागणार असं चित्र दिसतंय.

उम्मीद पे दुनिया कायम है ✨

तयारी सुरू ठेवा, जागावाढ झालीच पाहिजे! 🥶🚀


Join @mpsc_learner
❤7😁1🤯1
MPSC पूर्व परीक्षा झाली, पण सध्या आपल्या समोर कोणतेही तातडीचे टार्गेट नाही. हाच योग्य वेळ आहे प्रलंबित जाहिरातींसाठी प्रयत्न करण्याचा. निवेदने देणे, मेल कॅम्पेन राबवणे, तसेच WCD, WRD, PWD मधील जास्तीत जास्त पदांची मागणी MPSC कडे पोहोचवणे गरजेचे आहे.
सर्वात आधी WRD चा आकृतिबंध लवकरात लवकर मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला व्यापक निवेदन मोहीम सुरू करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यातून टीम तयार करून लोकप्रतिनिधींना निवेदने द्यावीत, जेणेकरून येत्या पावसाळी अधिवेशनात आपला मुद्दा प्रभावीपणे मांडला जाईल.
फक्त ग्रुपवर चर्चा करून काही साध्य होणार नाही. प्रत्येकाने ग्राउंडवर उतरून काम करणे गरजेचे आहे. जर आपण आत्ताच प्रयत्न केले नाहीत आणि पुढे MPSC मार्फत जागा कमी आल्या, तर त्यावेळी पश्चात्ताप करून काहीही उपयोग होणार नाही.
ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. आज केलेले प्रयत्नच उद्याच्या जागावाढीचा पाया ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, वेळ द्यावा आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.
नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आज कृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. ही शेवटची संधी गमावू नका. 💯🔥
👍4❤1😢1💯1🤝1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
BMC JE Case – 22 June ⚖️ PMC JE result - June first week✅ CSMC ची परीक्षा July First week✅ TMC June नंतर ✅ Mahatransco AE Result June end ⚡⏳ MJP Result 10 June ✅ MPSC नवीन Syllabus/Pattern July मध्ये WCD आकृतिबंध Soon ✅ WRD RR Soon Join @mpsc_learner
जून महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक प्रलंबित कामे या महिन्यात पूर्ण होतील, तसेच नवीन कामांनाही याच महिन्यात गती देऊन मार्गी लावावे लागेल. वेळ न दवडता प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. 💯🔥
🔥2
RCB कडून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि Consistency (सातत्य) म्हणजे काय, हे शिकण्यासारखे आहे.

17 वर्षे त्यांनी एकाच स्वप्नासाठी संघर्ष केला. कित्येक वेळा फायनल खेळले, अनेकदा ट्रॉफीच्या अगदी जवळ जाऊनही थोडक्यात मागे राहिले. प्रत्येक वेळी टीका झाली, ट्रोलिंग झाले, पण त्यांनी ना जिद्द सोडली ना सातत्य.

यश लगेच मिळाले नाही, पण त्यांनी मेहनत करणे थांबवले नाही. आणि आज त्याच जिद्दीचा आणि Consistency चा परिणाम म्हणजे सलग 2 ट्रॉफी. 🏆🏆

स्पर्धा परीक्षा देखील अगदी अशीच आहे. कधी काही गुणांनी, कधी काही जागांनी, तर कधी अगदी शेवटच्या टप्प्यावर जाऊन यश हुकते. अनेक जण याच टप्प्यावर हार मानतात. पण जे जिद्द सोडत नाहीत आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात, त्यांच्यासाठी वेळ नक्की बदलते.

आज एखादी पोस्ट मिळाली नाही म्हणून स्वतःला कमी समजू नका. कदाचित तुमच्या यशाची वेळ अजून यायची असेल. योग्य वेळ आल्यावर आपण ज्याचे हक्कदार असतो ते सर्व मिळते. आणि मग एक यश दुसऱ्या यशाचा मार्ग मोकळा करत जाते.

जिद्द आणि Consistency या दोन गोष्टींची ताकद कमी लेखू नका. अनेकदा टॅलेंटपेक्षा सातत्य आणि हार न मानण्याची वृत्ती माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवते.

RCB ने 17 वर्षांच्या संघर्षानंतर हे सिद्ध करून दाखवले की, मेहनत कधीच वाया जात नाही. त्यामुळे कितीही वेळा अपयश आले तरी अभ्यास, मेहनत आणि स्वतःवरील विश्वास सोडू नका.

कारण शेवटी जिंकतात तेच, जे शेवटपर्यंत मैदान सोडत नाहीत. ❤️💪


Join @mpsc_learner
🔥7💯2👌1
5_6118158209954881192.pdf
1.3 MB
MPSC RajyasevaGS_2026 Question Paper Analysis.pdf
5_6118158209954881191.pdf
1.2 MB
MPSC Rajyaseva_CSAT2026 Question Paper Analysis.pdf
सर्व RCB चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ❤️🏆🔥

विराट कोहलीसाठी खूप आनंद वाटतोय. शेवटी आपल्या किंग कोहलीला त्याच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ मिळत आहे. ❤️👑

रजत पाटीदार, काय नशीब घेऊन आलायस भाऊ! 👏
जे 17 वर्षांत एकदाही घडलं नव्हतं, ते तू अवघ्या 2 वर्षांत 2 वेळा करून दाखवलंस.
❤2
📊 मागील वर्षांचे MES Cut Off पाहून घ्या.

Cut Off शेअर करण्यामागचा उद्देश फक्त यावर्षीचा संभाव्य Cut Off काय लागू शकतो याचा अंदाज यावा हा आहे.

सध्या 2026 साठी पदांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे जागा कमी राहिल्यास Cut Off जास्त जाण्याची शक्यता आहे. 📈 मात्र, पुढे जागावाढ झाल्यास 2025 प्रमाणे Cut Off पुन्हा कमीही पाहायला मिळू शकतो. 📉

✅ 2025 मध्ये Cut Off तुलनेने कमी लागला होता, कारण नंतर जागावाढ होऊन एकूण पदसंख्या जवळपास 296 पर्यंत पोहोचली होती.

⚠️ 2024 मध्ये मात्र जागा कमी असल्यामुळे Cut Off जास्त गेला होता.

🎯 सध्याच्या परिस्थितीत जागा कमी राहिल्यास Cut Off 95+ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मोठ्या प्रमाणात जागावाढ झाल्यास Cut Off 55+ च्या आसपासही पाहायला मिळू शकतो.

त्यामुळे Cut Off बाबत निश्चित निष्कर्ष काढण्याऐवजी, संभाव्य जागांची संख्या, जागावाढ आणि पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. 📌

MES जागावाढ झालिच पाहिजे! 🔥

Join @mpsc_learner
♦️ एमपीएससी परीक्षेत काठीण्य पातळीत वाढ.👍

जनरल स्टडीने काढला घाम;

३३ टक्के विद्यार्थ्यांची दांडी
😁2
मिळालेल्या विश्वसनीय (authentic) स्रोतांनुसार MJP जागावाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्यांचे MJP मध्ये चांगले गुण आहेत त्यांनी तातडीने फॉलो-अप घ्यावा आणि उच्चस्तरीय संपर्क साधावा. आपल्या हातात फक्त १० जूनपर्यंतच वेळ आहे, त्यामुळे सर्वांनी गंभीरपणे प्रयत्न करावेत.
MJP चा निकाल 10 जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. 🤞📋
अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, मात्र निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा असून 10 जूनपर्यंत result येऊ शकतो. ⏳✅

Join @mpsc_learner