*भारताकडून एल-आर सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी*
०१. हवाई सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने नवीन लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या केली आहे. हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.
०२. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मोबाइल प्रक्षेपकावरून एकात्मिक चाचणी क्षेत्रातून चंडीपूर येथे ही चाचणी सकाळी सव्वादहा वाजता करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, या क्षेपणास्त्राच्या अनेक चाचण्या केल्या जाणार आहेत असे सांगितले.
०३. या क्षेपणास्त्राव्यतिरिक्त मल्टी फंक्शनल अँड थ्रेट अॅलर्ट रडार या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे. ही यंत्रणा क्षेपणास्त्र दिशादर्शन, मार्ग व शोधन यासाठी वापरली जाते. ३० जून ते १ जुलै २०१६ या तीन दिवसांत या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी तीनदा घेण्यात आली होती. डीआरडीओ व इस्रायल यांनी हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. या क्षेपणास्त्राने शेवटच्या मिनिटाला लक्ष्यभेद केला.
०४. भारतीय नौदलाने एलआर-सॅम या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. आयएनएस कोलकातावरून ३० डिसेंबर २०१५ रोजी ही चाचणी करण्यात आली. ही क्षेपणास्त्रे लष्कराच्या तीनही सेनादलांत चाचणीनंतर तैनात केली आहे. बेल, एल अँड टी, बीडीएल, टाटा या समूहांनी खासगी क्षेत्रातील भागीदार म्हणून त्यात काम केले आहे.
०५. बालासोर जिल्हय़ात २.५ किमी त्रिज्येच्या परिसरातील ३६५२ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.

*प्लूटोवरील बर्फाचे रहस्य उलगडले*
०१. प्लूटो बटू ग्रहावरील हृदयाच्या आकाराचा नायट्रोजन हिमनदीचा भाग कसा तयार झाला असावा याचे कोडे वैज्ञानिकांनी उलगडले आहे. नासाच्या प्लुटो न्यू होरायझन्स यानाने गेल्या वर्षी बर्फाळ प्लुटो ग्रहाचे निरीक्षण केले होते.
०२. फ्रान्समधील एका प्रयोगशाळेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्लूटो हा वेगळा ग्रह आहे. तेथे नायट्रोजनचे संघनन विषुववृत्तावर अत्यंत कमी उंचीच्या भागात झाले आहे. त्यामुळे स्पुटनिक प्लॅनम भागात बर्फाचे अनेक थर साठलेले आहेत. प्लूटोवरील इतर घटकांचे वितरण व वातावरणातील त्यांच्या प्रमाणाचा विचार करण्यात आला आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावरील बर्फ व नायट्रोजन अस्थिर असून जेव्हा त्याचे संप्लवन होते, तेव्हा तपमान उणे २३५ अंश असते. यात विरळ वातावरणाचा थर बर्फाच्या विवरात तयार झाला आहे.
०३. न्यू होरायझन्स यानाने प्लूटोजवळून जुलैत प्रवास केला असून त्यात संबंधित विवरातील घन नायट्रोजन हा खूप वस्तुमानाचा असल्याचे म्हटले आहे, स्पुटनिक प्लानम भागात त्याचे प्रमाण जास्त आहे. मिथेनचे धुके उत्तर अर्धगोलार्धात असून विषुववृत्तावरही ते सापडते. कार्बन मोनॉक्साइडचा बर्फ स्पुटनिक प्लानम या भागात सापडतो.
०४. वैज्ञानिकांनी प्लूटो या बटू ग्रहाचे अंकीय प्रारूप तयार केले असून नायट्रोजन, मिथेन व कार्बन डायॉक्साइड यांसारख्या चक्रांचे त्यात सादृश्यीकरण करण्यात आले. प्लूटोवर घन व वायू यांचा समतोल बघितला, तर त्याला स्पुटनिक प्लानममध्ये अडकलेले बर्फ कारणीभूत आहे.

*कनिष्ठ नेमबाजीत भारताचा धडाका कायम*
०१. भारतीय नेमबाजांनी दिमाखदार प्रदर्शन कायम राखत कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी चार पदकांची कमाई केली.
०२. ऋषीराज बारोतने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. १९ वर्षीय ऋतुराजने अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्युकास स्युकोमलवर २५-२३ अशा फरकाने मागे टाकत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या सर्जेय इव्हलेव्हसकीने कांस्यपदक मिळवले.
०३. मंगळवारी चार पदकांवर नाव कोरत भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे. भारताच्या खात्यावर सहा सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्यपदके यांच्यासह एकूण १८ पदके आहेत. २१ पदकांसह रशिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
०४. प्रतीक बोरसे, अर्जुन बाबुटा आणि प्रशांत या त्रिकुटाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या त्रिकुटाने १८४९.९ गुण मिळवले. सिंगापूरच्या संघाने रौप्य तर जपानच्या संघाने कांस्यपदकाची कमाई केली.
०५. अनमोल, निशांत भारद्वाज आणि अर्जुन दास या त्रिकुटाने ५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यांनी १६०० गुणांची कमाई केली.
०६. १० मीटर एअर रायफल प्रकारात मुलींमध्ये दिलरीन गिल, गीतालक्ष्मी दीक्षित आणि आशी रस्तोगी या त्रिकुटाने कांस्यपदक पटकावले.

*स्मार्ट सिटी योजनेत आणखी २७ शहरे समाविष्ट*
०१. सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या पुढील टप्प्यात निवडण्यात आलेल्या शहरांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यादीमध्ये एकूण २७ शहरे आहेत. त्यामध्ये राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे.
०२. औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे या पाच शहरांची स्मार्टसिटीच्या पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.
०३. या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या अन्य शहरांमध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि उज्जैन, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर, राजस्थानमधील अजमेर आणि कोटा, आंध्र प्रदेशातील तिरुपती, गुजरातमधील बडोदा, उत्तर प्रदेशातील कानपूर, वाराणसी आणि आग्रा कर्नाटकमधील हुबळी-धारवाड, मंगळुरू, शिवमोगा आणि तुमाकुरू यासह इतर राज्यांतील शहरांचा समावेश आहे.
०४. स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची निवड झाली होती.

*वृक्षारोपणात महाराष्ट्राची लिम्का बुकमध्ये नोंद*
०१. महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत १ जुलै रोजी २ कोटी ८० लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.
०२. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. तसेच यामध्ये १ जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
०३. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले आहे.

*ओबामांनी फेटाळले सौदीवरील कारवाईचे विधेयक*
०१. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना सौदी अरेबियावर खटला भरण्यास परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेटाळले आहे.
०२. जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम अॅक्ट बिल रिपब्लीकनांचे बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले होते, पण त्या विधेयकास मान्यता दिले तर दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन होऊ शकते व अमेरिकेचे परदेशातील हितसंबंध धोक्यात येऊ शकतात, असे ओबामा यांनी काल सांगितले.

*महात्मा फुलेंना 'भारतरत्न' देण्याची शिफारस*
०१. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची अधिकृत शिफारस निवृत्त न्यायाधीश के. ईश्व्रय्या यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने केल्याचे समजते. अशीच शिफारस यापूर्वी महाराष्ट्र सरकारनेही केलेली आहे.
०२. महात्मा फुले यांच्याबरोबरच बी.पी. मंडल यांनाही भारतरत्न देण्याची शिफारस आयोगाची आहे. इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारया मंडल आयोगाचे बी.पी. मंडल हे अध्यक्ष होते. अशी शिफारस आयोगाच्या अखत्यारित येत नसल्याने ती केंद्र सरकारवर बंधनकारक नाह. पण त्यामुळे या जुन्या मागणीला बळ मिळणार आहे.
०३. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.

*अमेरिका व भारतामध्ये 'दोस्ती हाऊस'*
०१. दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जातात. तशाचप्रकारे अमेरिकन आणि भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन विचारांची, माहितीची देवाण-घेवाण करावी यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. तसेच यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलात यूएस कौन्सुलेटमध्ये 'दोस्ती हाऊस' सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
०२. दोन्ही देशांतील व्यक्तींना एकत्र येण्यासाठी पूर्वी ज्या ठिकाणी अमेरिकन लायब्ररी होती त्या ठिकाणी हे 'दोस्ती हाऊस' तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी काही बदल करून तयार करण्यात आलेल्या या हाऊसमध्ये दोन्ही देशांतील नागरिक एकत्र येऊन शिकू शकतात, कला सादर करू शकतात.
०३. या पद्धतीने अमेरिकेने १६९ देशांत अशाप्रकारे ७०० जागा निर्माण केलेल्या आहेत. त्याच धरतीवर हे हाऊस उभारण्यात आले आहे. हाऊसमध्ये महत्त्वाची एक बाब म्हणजे लायब्ररी तयार करण्यात आली आहे. 'ट्रॅडिशनल लायब्ररी'त १० हजार पुस्तके, ७०० चित्रपट आणि १३० पिरीऑडिकल्स उपलब्ध आहेत.

*पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती*
०१. रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर काय असावेत, हे ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीवर (एमपीसी) सरकारने तीन सदस्यांची नेमणूक केली.रिझर्व्ह बँकेच्या नामित सदस्यांसह व्याजदर ठरविण्याचे काम हे सदस्य करतील.
०२. महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले. तसेच त्यानुसार, व्याजदर ठरविण्याचे आव्हान समितीसमोर असेल.
०३. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली या समितीवर प्रा. चेतन घाटे (भारतीय सांख्यिकी संस्था), पामी दुआ (संचालक, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) व प्रा. रवींद्र एच. ढोलकिया (आयआयएम अहमदाबाद) यांच्या नेमणुका सरकारने केल्या आहेत.

*मंगळयान मोहिमेला दोन वर्षे पूर्ण*
०१. मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या भारताच्या मंगळ मोहिमेला काल दोन वर्षे पूर्ण झाली असून अपेक्षेपेक्षा यानाने अधिक काळ काम दिले आहे. आता पुढील वर्षी या अवकाशयानाचा अंधारात असण्याचा काळ म्हणजे ग्रहण काळ कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
०२. मॉम मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याचा अपेक्षित कार्यकाल सहा महिने होता. त्यानंतर वर्षभर त्याच्या पाच पेलोडमधून मिळालेली माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने प्रसारित केली. ग्रहण काळात त्याला बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. जर ग्रहण काळ कमी केला तर ती बॅटरी जास्त काळ टिकू शकेल.
०३. ग्रहण काळाचा परिणाम अवकाशयानाच्या कार्यक्षमतेवर कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जाणार असून अजूनही यानात बऱ्यापैकी इंधन आहे. त्यामुळे ते इतके दिवस कार्यरत राहू शकले.
०४. मॉम म्हणजे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सोडले होते. त्यासाठी पीएसएलव्ही सी २५ हा प्रक्षेपकही वापरण्यात आला होता. खोल अंतराळातील ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले होते.
०५. मंगळयानाने पहिल्या दोन वर्षांत मिळवलेली माहिती जाहीर करण्यात आली असून भारताच्या या मोहिमेला अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा स्पेस पायोनियर पुरस्कार तसेच नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता.
०६. यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवावरील संप्लवन प्रक्रियेवर प्रकाश टाकला असून तेथील कार्बन डायॉक्साइड व पाण्याचे बर्फ यांचे थर उन्हाळ्यात नष्ट होत असतात. त्याबाबतच्या माहितीत मॉमच्या निरीक्षणांनी भर पडली आहे.

*सानिया मिर्जाला विजेतेपद*
०१. भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक टेनिस स्पध्रेत महिला दुहेरीत जेतेपदाला गवसणी घातली. सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
०२. सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत सानियाने तिची माजी जोडीदार मार्टिना हिंगीस व कोको व्हँडेवेगे जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव केला होता.
०३. मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पध्रेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४ मध्ये येथे अजिंक्यपद पटकावले होते. गतवर्षी सानियाने या स्पर्धेतून माघार घेतली होती
०४. सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या जेतेपदाचाही समावेश आहे. तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पध्रेतही बाजी मारली. सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.