MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
इंडो तिबेटन बॉर्डर फोर्स (ITBP) तर्फे ६२ हेडकॉन्स्टेबल पदांची भरती [शेवटचा दिनांक : १३ नोव्हेंबर २०१७]

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल

एकूण पदे : ६२

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹१००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, माजी सैनिक यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ नोव्हेंबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/itbp.html
ठाणे जिल्हा आरोग्य विभाग तर्फे १६ लसीकरण फिल्ड मॉनिटर पदांची भरती [शेवटचा दिनांक : २३ ऑक्टोबर २०१७]

पदाचे नाव : लसीकरण फिल्ड मॉनिटर

एकूण पदे : १६

किमान शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : २५ ते ५० वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २३ ऑक्टोबर २०१७

अर्ज पाठविण्याचा पत्ता: District Health Offices, Zilla Parishad, Thane

http://www.mpscacademy.com/2017/10/blog-post_13.html
भालचंद्र देशमुख यांना मरणोत्तर उत्तम प्रशासक पुरस्कार

ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी आणि भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने १२ ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'कसोटी स्पर्धा' आणि 'एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) लीग' या नव्या स्वरुपांना मंजूर केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या 'युनेस्को'तून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने आज जाहीर केला. 'युनेस्को' इस्राईलविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

१२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान जपानच्या ससेबो येथे ‘पॅसेज (PASSEX)’ हा भारत-जपान संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.

स्पेसएक्सचे प्रक्षेपक पुन्हा एकदा महासागरात उतरण्यास यशस्वी
महागड्या प्रक्षेपकाच्या भागांचे पुनर्वापरासाठी चाललेल्या कंपनीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, स्पेसएक्स कंपनीने पूर्वी अवकाशात झेपावलेल्या प्रक्षेपकाला पुन्हा एकदा प्रक्षेपित केले, जे महासागरात उतरण्यास यशस्वी ठरले.

'ग्लोबल हंगर इंडेक्स २०१७' अनुसार, भारत १०० व्या स्थानी आहे. ११९ देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत १०० व्या स्थानी असून ते आशियामध्ये केवळ अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पुढे आहे.
Read Detailed Current events. Click on Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/13and14oct2017.html
गायींना लवकरच मिळणार 'हेल्थ कार्ड'
गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या 'पशुधन संजीवनी' योजनेंतर्गत १५ लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे.

१३ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित दोन दिवसीय ४८ वी राज्यपालांची परिषद संपन्न झाली.

IIT मद्रास येथे जगातील सर्वात मोठे कम्बशन रिसर्च सेंटर उघडण्यात आले
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास येथे 'नॅशनल सेंटर फॉर कम्बशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (NCCRD)' हे कम्बशन (ज्वलन) विषयावरील जगातील सर्वात मोठे संशोधन केंद्र उघडण्यात आले आहे.

१६ ऑक्टोबर २०१७ रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून भारतीय नौदलात देशातच विकसित पाणबुडी-विरोधी युद्धसामुग्रीने सुसज्जित 'INS किल्तन' जहाज नियुक्त केले जाणार आहे.

चेन्नईमधील अन्ना विद्यापीठाच्या परिसरात आयोजित 'भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF)' दरम्यान जीवशास्त्राविषयी सर्वात मोठा वर्ग घेण्याचा नवा गिनीज विश्वविक्रम बनविण्यात आला.

कर्नाटक गायक टी. एम. क्रिष्णा यांना वर्ष २०१५ आणि २०१६ साठी ३० व्या इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

१३ ऑक्टोबर २०१७ रोजी पुणे येथे भारत-श्रीलंका यांच्यात 'मित्र शक्ती २०१७' संयुक्त सरावाला सुरूवात झालेली आहे. हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत चालणार आहे.

यावर्षी १३ ऑक्टोबरला 'होम सेफ होम: रिड्युसींग एक्सपोजर, रिड्युसींग डिसप्लेसमेंट' या संकल्पनेखाली आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस (International Day for Disaster Reduction) साजरा झाला.

ऑड्रे एझोले UNESCO च्या पुढील प्रमुख

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस १५ ऑक्टोबर
दरवर्षी १५ ऑक्टोबर या तारखेला 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस' साजरा करण्यात येतो. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca16and17oct2017.html
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन
गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले.

तामिळ लेखक आणि दलित कार्यकर्ते प्रा. कांचा इलैया लिखित 'सामाजिक स्मग्लुरलू कोमातोल्लू' पुस्तक प्रसिद्ध झाले.

प्रथम भारत-रशिया संयुक्त त्रिदलीय सराव - भारत आणि रशिया यांच्या तीनही संरक्षण सेवा दलांचा 'इंद्र-२०१७' हा पहिलाच संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०१७ या काळात रशियामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

जॉर्ज सॉंडर्स यांच्या 'लिंकन इन दी बार्डो'स यावर्षीचे 'बुकर'

उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी दिली आहे. विद्यापीठातील 'साउथ एशिया इन्स्टिट्यूट'साठी या देणगीचा वापर करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटचे नामकरण आता 'लक्ष्मी मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूट' असे करण्यात आले आहे.

सौरमालिकेमध्ये आहे आणखी एक ग्रह!

गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध

१७ ऑक्टोबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस' (International Day for The Eradication of Poverty) आयोजित केला जातो. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca17and18oct2017.html
आयआयटीची ३४ व्या स्थानावर झेप
आशियातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने ३४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी मुंबई आयआयटी ३५ व्या स्थानावर होती.

दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2017 रोजी नवी दिल्‍लीमधील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्‍था (AIIA)’ राष्ट्राला समर्पित केली.

'आय एम दॅट वुमन' या ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ
17 ऑक्टोबर 2017 रोजी महिला व बालविकास मंत्रालयाने ‘आय एम दॅट वुमन’ नावाने एक ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ केला.

सुदानमधील सेवेतील 50 भारतीय शांतीरक्षक UN पदकाने सन्मानित
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती मोहीमेंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात असलेल्या 50 भारतीय शांतीरक्षकांना संयुक्त राष्ट्रसंघाचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रख्यात भारतीय वंशाचे अमेरिकावासी वकील अजय राजू यांना अमेरिकेत त्यांच्या कल्याणकारी कामांसाठी ‘अमेरिकन बजार फिलॅनथ्रोपी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत (UNHRC) सेवा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने गुप्त मतदानातून 15 सदस्य देशांची निवड केली आहे.

जयपुर विमानतळाला वार्षिक 2-5 दशलक्ष प्रवासी हाताळणार्‍या विमानतळांच्या श्रेणीत जागतिक स्तरावर पहिला तर श्रीनगरला दूसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca19and20oct2017.html
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC) तर्फे विवीध २०५ पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३० ऑक्टोबर २०१७]

एकूण पदे : २०५

परीक्षा शुल्क : ₹४७२ ते ₹७७८

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० ऑक्टोबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/thane-dcc.html
रिजर्व बॅंक ऑफ इंडिया (RBI) तर्फे ६२३ सहाय्यक पदांची भरती [शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०१७]

पदाचे नाव :असिस्टंट (सहाय्यक)

एकूण पदे : ६२३

किमान शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणतीही पदवी

वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹४५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/rbi.html
१४ ऑक्टोबर २०१७ ते २२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा २' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
आसाम राज्य शासनाचे नवीन पर्यटन धोरण
आसाम राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने राज्याचे नवे पर्यटन धोरण-२०१७ जाहीर केले. नवे धोरण जानेवारी २०१८ ते २०२२ पर्यंत लागू असेल.

भारतात दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस पाळला जातो. या दिवशी पोलीस स्मारकावर पुष्पांजली अर्पित केली गेली आणि वीरांना श्रद्धांजली दिली गेली.

भारताचे महाधिवक्ता (Solicitor General) रणजित कुमार यांनी आपल्या महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला आहे.रणजित कुमार यांनी आपला राजीनामा विधी व न्याय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला.

जसिंडा आर्डर्न (महिला) यांची न्युझीलँडच्या पुढील पंतप्रधान पदासाठी निवड झाली आहे आणि यासोबतच न्युझीलँडला सर्वात तरुण पंतप्रधान लाभणार.

२६ ऑक्टोबर २०१७ रोजी भारतात प्रथमच 'आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद' (International conference on consumer protection) आयोजित केली जाणार आहे. २४ देशांची ही परिषद नवी दिल्लीत होणार आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

UNFPA चा 'जागतिक लोकसंख्या अहवाल २०१७' प्रसिद्ध

'लॅन्सेट' नियतकालिकाने प्रदूषणामुळे जगभरात होणार्‍या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असून प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca21and22oct2017.html
साप्ताहिक सराव परीक्षा ३ प्रकाशित
सुरु दिनांक : २२ ऑक्टोबर २०१७
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०१७
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी २९ ऑक्टोबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.
अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt
दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे मुंबईत निधन
'लीडर', 'हम हिंदुस्थानी' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.

घोघा व दाहेज दरम्यान RO-RO फेरी सेवेच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या हस्ते २२ ऑक्टोबर २०१७ रोजी गुजरातच्या भावनगर जिल्ह्यामधील घोघा (सौराष्ट्र) आणि दाहेज (दक्षिण गुजरात) या दरम्यान ६१५ कोटी रुपयांच्या 'रोल ऑन, रोल ऑफ (RO-RO)' फेरी (नौकेद्वारा प्रवास) सेवेच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.

भारताने आपले तिसरे हॉकी आशिया चषक जिंकले
भारतीय हॉकी संघाने ढाका (बांग्लादेश) मध्ये खेळल्या गेलेल्या 'हॉकी आशिया चषक २०१७' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताने ही स्पर्धा तिसर्‍यांदा जिंकलेली आहे. यापूर्वी २००३ आणि २००७ साली ही स्पर्धा जिंकली होती.

टीम इंडियाचा कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामन्यात आपल्या कारकिर्दीतले ३१ वे शतक पूर्ण करत सर्वाधिक शतकांचा किताब मिळवणार्‍या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.

जपानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शिन्जो आबे यांच्या सत्तारूढ युतीचा विजय झाला आहे. या विजयासोबतच आबे यांना जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले नेते म्हणून हा मान मिळू शकतो.

संयुक्त राष्ट्रसंघ दिवस - २४ ऑक्टोबर
१९४८ पासून दरवर्षी २४ ऑक्टोबरला 'संयुक्त राष्ट्रसंघ दिवस' (United Nations Day) साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची सनद प्रभावी करण्यात आलेल्या घटनेला आज ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca23and24oct2017.html
ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल यांचे वयाच्या ७८व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आधी तंबाखूचे व्यापारी आणि नंतर गुटखा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती झाली.

लोककलांचे अभ्यासक रूस्तुम अचलखांब यांचे निधन
लोककलेचे अभ्यासक, लोककलावंत डाॅ. रूस्तुम अचलखांब यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले, त्या ८८ वर्षांच्या होत्या.

काश्मीरच्या मुद्द्यावर राजनैतिक उपाय शोधण्याच्या दिशेने पाऊल उचलताना, केंद्र सरकारने गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची वाटाघाटी करणारे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो - सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष खेळाडू रियल मॅड्रिड फुटबॉल क्लबमधील पुर्तगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याला २०१७ सालचा सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष खेळाडूचा किताब मिळाला.


चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा क्षी जिनपिंग

पोलिओ निर्मूलनासंबंधी जागरूकता फैलावण्यासाठी दरवर्षी २४ ऑक्टोबरला जगभरात जागतिक पोलिओ दिवस आयोजित केला जातो..................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca25and26oct2017.html
'बंदिनी', 'परमवीर', 'हॅलो इन्स्पेक्‍टर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचे वयाच्या ६७ व्य वर्षी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

पर्यटन मंत्रालयाच्या 'वारसा दत्तक योजने' अंतर्गत १४ स्मारकांच्या देखरेखीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दिल्लीत आयोजित 'पर्यटन पर्व' या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या 'स्मारक मित्र' म्हणून कार्यरत राहणार आहेत.

राजस्थान राज्य शासनाने विधानसभेत राजस्थान मागासवर्ग (राज्यात शैक्षणिक संस्थांमधील तसेच राज्य शासनाअंतर्गत सेवांमध्ये पद आणि नियुक्तीमध्ये जागांचे आरक्षण) विधेयक-२०१७ चा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला गेला आहे.

अमेरि‍केला मागे सारत भारत आता स्मार्टफोनसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. अजूनही चीन याबाबतीत अव्वल आहे.

जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे. असे ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीतून उघड झाले आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/blog-post_28.html
साप्ताहिक सराव परीक्षा ४ प्रकाशित

सुरु दिनांक : २२ ऑक्टोबर २०१७
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०१७

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
२२ ऑक्टोबर २०१७ ते २८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ३' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
प्रणब मुखर्जी लिखित 'द कोलिशन इयर्स १९९६-२०१२’ पुस्तक प्रसिद्ध

कोलकातामध्ये मध्ये खेळल्या गेलेल्या FIFA अन्डर-१७ विश्वचषक २०१७ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पेनचा पराभव करत स्पर्धा जिंकली. इंग्लंड संघाने जबरदस्त खेळ करताना पिछाडीवरुन बाजी मारताना स्पेनच्या हातून विश्वचषक हिसकावून घेतला.

विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा ४-० असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले .

फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक ब्रॅंड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याला $१४.५ दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह ७ वे स्थान प्राप्त झाले आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये १४ वी 'साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (SAARC) विधी परिषद २०१७' आयोजित करण्यात आली आहे.

२७ ऑक्टोबर २०१७ रोजी बुरुंडी हा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या सदस्यत्वामधून बाहेर पडणारा पहिला देश बनला आहे.

अमेरिकेच्या मंत्रिमंडळाच्या समितीने ६२ वर्षीय केन जस्‍टर यांची भारतामध्ये अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यास त्यांची मंजूरी दिली आहे ..................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca29and30oct2017.html
भारताने २९ ऑक्टोबर २०१७ रोजी अफगानिस्तानकडे गव्हाची पहिली खेप रवाना केली. विशेष म्हणजे ही खेप भारताकडून विकसित केलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे.

भारतीय बॅडमिंटनपटू किडांबी श्रीकांथने पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या 'फ्रेंच ओपन सुपर सीरीज २०१७' स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांथने जापानच्या केंता निशिमोतो याचा पराभव केला.

कानपूरच्या ग्रीनपार्क क्रीडामैदानावर खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या भारत-न्यूझीलँड क्रिकेट मालिकेत भारतीय संघ विजयी ठरले. संघाने ही मालिका २-१ ने जिंकले.

पाकिस्तानमध्ये २०१८ च्या एप्रिल महिन्यात 'एशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) एमर्जिंग नेशन्स कप २०१८' चे आयोजन केले जाणार आहे.

आइसलँडचे वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या आकस्मिक निवडणूकीत पुन्हा एकदा विजय प्राप्त केला आहे.

३० ऑक्टोबर २०१७ रोजी संयुक्त अरब अमीराती (UAE) ची राजधानी दुबईमध्ये दोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ करण्यात आला...................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca31oct2017.html