MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
काझुओ इशिगुरो यांना साहित्याचे नोबेल
जपानी वंशाचे इंग्रजी लेखक काझुओ इशिगुरो यांना साहित्यासाठी २०१७ नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.

जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

रेनर वेईस, बॅरी सी. बॅरीश, कीप एस. थॉर्न यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

मंगला बनसोडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर (सातारा) यांना जाहीर झाला आहे.

एसबीआयचे नवे अध्यक्ष रजनीश कुमार
देशातील सर्वात मोठ्या बँकेला नवा अध्यक्ष मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली.

वैश्विक उद्योजकता शिखर परिषद २०१७ हैदराबादमध्ये आयोजित होणार

भारत आणि जिबूती यांच्यात करार
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या जिबूती देशाच्या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांनी नियमित विदेशी कार्यालय स्तरावरील सल्लामसलत स्थापित करण्यासाठी एक करार केला.

सौम्या स्वामीनाथन यांची WHO उप-महासंचालक पदावर नियुक्ती
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) चे महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) उप-महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... ....................http://www.mpscacademy.com/2017/10/ca-05and06oct2017.html
Download Our Free MPSC Online Exam App
एमपीएससी अकॅडमी आपल्यासाठी हे एक विशेष अँड्रॉइड ऍप्लिकेशन घेऊन येत आहे. या ऍप्लिकेशन च्या माध्यमातून विद्यार्थी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा ऑनलाइन सराव करू शकतात.
या सर्व सराव परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या आहेत.

या माध्यमातून MPSC Academy तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर दिनांक ८ सप्टेंबर २०१७ पासून दर रविवारी साप्ताहिक सराव परीक्षा घेतली जाईल.
दर शनिवारी मागील आठवड्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी MPSC Academy वेबसाईटवर तसेच Facebook पेजवर प्रकाशित करण्यात येईल.

Download & Install Androd App & Give us a Review

https://play.google.com/store/apps/details?id=com.softlinklabs.mpsconlineexam
साप्ताहिक सराव परीक्षा १ प्रकाशित
सुरु दिनांक : ०८ ऑक्टोबर २०१७
अंतिम दिनांक : १४ ऑक्टोबर २०१७
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी १४ ऑक्टोबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशनसाठी प्ले स्टोर वर 'MPSC Online Exam' असे सर्च करावे किंवा पुढील लिंकला भेटद्यावी. https://play.google.com/store/apps/details?id=com.softlinklabs.mpsconlineexam

वेबसाईटवर सोडविण्यासाठी पुढील लिंकला भेट द्यावी http://www.mpscacademy.com/2017/10/weekly-test_8.html
दिग्दर्शक कुंदन शहा यांचे मुंबईत निधन
'नुक्कड' आणि 'वागले की दुनिया' अशा लोकप्रिय मालिका आणि 'जाने भी दो यारो', 'कभी हा कभी ना' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे शनिवारी वयाच्या ६९व्या वर्षी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले.

मुकेश अंबानी ठरले दहाव्यांदा देशातील सर्वाधिक श्रीमंत
'फोर्ब्स' नियतकालिकाने जाहीर केलेल्या २०१७ मधील भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग १० व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती ३८ अब्ज डॉलर म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये झाली आहे.

राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्‍लीत 'भारत जल सप्‍ताह २०१७' चे उद्घाटन करण्यात येणार आहे.

वुशु विश्वविजेता स्पर्धाचे सुवर्णपदक पूजा कादीयन हिने जिंकले

आण्विक शस्त्रास्त्रे नष्ट करावीत, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस (आयसीएन) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

१४ व्या युरोपिय संघ-भारत शिखर परिषदेत तीन करार
६ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत १४ वी युरोपीय संघ-भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेत युरोपीय संघाचे प्रतिनिधीत्व डोनाल्ड टस्क (युरोपीय परिषदेचे अध्यक्ष), आणि जीन क्लॉड जंकर (युरोपीय आयोगाचे अध्यक्ष) यांनी केले तर भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/10/ca07and08oct2017.html
मोहन जोशी यांना विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर
मराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारताने ८५ वा वायुसेना दिवस साजरा केला
आज ८ ऑक्टोबरला भारतीय वायुसेनाने (IAF) ८५ वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने एयर फोर्स स्टेशन हिंदन (गाझियाबाद) येथे IAF ची परेडचे आयोजन करण्यात आले.

उपराष्ट्रपतींनी 'राष्ट्र सेवा पुरस्कार' चे वाटप केले
७ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्र सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

चौथी 'सभ्यता संवाद' परिषद नवी दिल्लीत आयोजित
८ ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान नवी दिल्लीत चौथी 'सभ्यता संवाद' परिषद आयोजित करण्यात आली आहे. 'तंत्रज्ञान आणि सभ्यता' या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात आली आहे.

पहिला 'BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव - २०१७' दिल्लीत आयोजित
दिल्लीत १० ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०१७ या काळात पहिल्यांदाच वार्षिक 'BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव - २०१७' चे आयोजन केले जाणार आहे.

अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्र या विषयातील 'बिहॅव्हरीअल इकॉनॉमिक्स'मधील योगदानाबद्दल २०१७ चे अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/10/ca9and10oct2017.html
बैलगाडा शर्यतीबाबत उच्च न्यायालयाची बंदी कायम

अनुपम खेर यांची 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी नियुक्ती
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्लीत तिसरी आंतरराष्ट्रीय योग परिषद आयोजित
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत दोन दिवसीय 'निरोगीपणासाठी आंतरराष्ट्रीय योग परिषद' चे उद्घाटन झाले.

देशात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' सप्ताह पाळला जात आहे
महिला व बालविकास मंत्रालयाकडून देशभरात १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१७ या काळात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' सप्ताह पाळला जात आहे.

डॉ. बिंदेश्वर पाठक यांना लोक प्रशासनात उत्कृष्टतेचा राष्ट्रीय पुरस्कार

सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेला मूलभूत हक्कांमध्ये सामील केले
१० ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि घटनापीठाने एकमताने 'गोपनीयतेचा हक्क' याला मानवी मूलभूत हक्कांमध्ये सामील करत ऐतिहासिक आदेश दिला.

नोबेल पुरस्कार २०१७ संपूर्ण .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/10/ca11and12oct2017.html
भारतीय सैन्य दल (Indian Army) तर्फे ७२ धार्मिक शिक्षक पदांची भरती [शेवटचा दिनांक :८ नोव्हेंबर २०१७]

पदाचे नाव :धार्मिक शिक्षक

एकूण पदे : ७२

वयोमर्यादा : २७ ते ३४ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ८ नोव्हेंबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/indian-army.html
इंडो तिबेटन बॉर्डर फोर्स (ITBP) तर्फे ६२ हेडकॉन्स्टेबल पदांची भरती [शेवटचा दिनांक : १३ नोव्हेंबर २०१७]

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल

एकूण पदे : ६२

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹१००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, माजी सैनिक यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ नोव्हेंबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/itbp.html
ठाणे जिल्हा आरोग्य विभाग तर्फे १६ लसीकरण फिल्ड मॉनिटर पदांची भरती [शेवटचा दिनांक : २३ ऑक्टोबर २०१७]

पदाचे नाव : लसीकरण फिल्ड मॉनिटर

एकूण पदे : १६

किमान शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : २५ ते ५० वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २३ ऑक्टोबर २०१७

अर्ज पाठविण्याचा पत्ता: District Health Offices, Zilla Parishad, Thane

http://www.mpscacademy.com/2017/10/blog-post_13.html
भालचंद्र देशमुख यांना मरणोत्तर उत्तम प्रशासक पुरस्कार

ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी आणि भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने १२ ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'कसोटी स्पर्धा' आणि 'एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) लीग' या नव्या स्वरुपांना मंजूर केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या 'युनेस्को'तून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने आज जाहीर केला. 'युनेस्को' इस्राईलविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

१२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान जपानच्या ससेबो येथे ‘पॅसेज (PASSEX)’ हा भारत-जपान संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.

स्पेसएक्सचे प्रक्षेपक पुन्हा एकदा महासागरात उतरण्यास यशस्वी
महागड्या प्रक्षेपकाच्या भागांचे पुनर्वापरासाठी चाललेल्या कंपनीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, स्पेसएक्स कंपनीने पूर्वी अवकाशात झेपावलेल्या प्रक्षेपकाला पुन्हा एकदा प्रक्षेपित केले, जे महासागरात उतरण्यास यशस्वी ठरले.

'ग्लोबल हंगर इंडेक्स २०१७' अनुसार, भारत १०० व्या स्थानी आहे. ११९ देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत १०० व्या स्थानी असून ते आशियामध्ये केवळ अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पुढे आहे.
Read Detailed Current events. Click on Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/13and14oct2017.html
गायींना लवकरच मिळणार 'हेल्थ कार्ड'
गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या 'पशुधन संजीवनी' योजनेंतर्गत १५ लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे.

१३ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित दोन दिवसीय ४८ वी राज्यपालांची परिषद संपन्न झाली.

IIT मद्रास येथे जगातील सर्वात मोठे कम्बशन रिसर्च सेंटर उघडण्यात आले
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास येथे 'नॅशनल सेंटर फॉर कम्बशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (NCCRD)' हे कम्बशन (ज्वलन) विषयावरील जगातील सर्वात मोठे संशोधन केंद्र उघडण्यात आले आहे.

१६ ऑक्टोबर २०१७ रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून भारतीय नौदलात देशातच विकसित पाणबुडी-विरोधी युद्धसामुग्रीने सुसज्जित 'INS किल्तन' जहाज नियुक्त केले जाणार आहे.

चेन्नईमधील अन्ना विद्यापीठाच्या परिसरात आयोजित 'भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF)' दरम्यान जीवशास्त्राविषयी सर्वात मोठा वर्ग घेण्याचा नवा गिनीज विश्वविक्रम बनविण्यात आला.

कर्नाटक गायक टी. एम. क्रिष्णा यांना वर्ष २०१५ आणि २०१६ साठी ३० व्या इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

१३ ऑक्टोबर २०१७ रोजी पुणे येथे भारत-श्रीलंका यांच्यात 'मित्र शक्ती २०१७' संयुक्त सरावाला सुरूवात झालेली आहे. हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत चालणार आहे.

यावर्षी १३ ऑक्टोबरला 'होम सेफ होम: रिड्युसींग एक्सपोजर, रिड्युसींग डिसप्लेसमेंट' या संकल्पनेखाली आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस (International Day for Disaster Reduction) साजरा झाला.

ऑड्रे एझोले UNESCO च्या पुढील प्रमुख

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस १५ ऑक्टोबर
दरवर्षी १५ ऑक्टोबर या तारखेला 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस' साजरा करण्यात येतो. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca16and17oct2017.html
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन
गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले.

तामिळ लेखक आणि दलित कार्यकर्ते प्रा. कांचा इलैया लिखित 'सामाजिक स्मग्लुरलू कोमातोल्लू' पुस्तक प्रसिद्ध झाले.

प्रथम भारत-रशिया संयुक्त त्रिदलीय सराव - भारत आणि रशिया यांच्या तीनही संरक्षण सेवा दलांचा 'इंद्र-२०१७' हा पहिलाच संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०१७ या काळात रशियामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

जॉर्ज सॉंडर्स यांच्या 'लिंकन इन दी बार्डो'स यावर्षीचे 'बुकर'

उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी दिली आहे. विद्यापीठातील 'साउथ एशिया इन्स्टिट्यूट'साठी या देणगीचा वापर करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटचे नामकरण आता 'लक्ष्मी मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूट' असे करण्यात आले आहे.

सौरमालिकेमध्ये आहे आणखी एक ग्रह!

गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध

१७ ऑक्टोबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस' (International Day for The Eradication of Poverty) आयोजित केला जातो. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca17and18oct2017.html
आयआयटीची ३४ व्या स्थानावर झेप
आशियातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने ३४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी मुंबई आयआयटी ३५ व्या स्थानावर होती.

दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2017 रोजी नवी दिल्‍लीमधील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्‍था (AIIA)’ राष्ट्राला समर्पित केली.

'आय एम दॅट वुमन' या ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ
17 ऑक्टोबर 2017 रोजी महिला व बालविकास मंत्रालयाने ‘आय एम दॅट वुमन’ नावाने एक ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ केला.

सुदानमधील सेवेतील 50 भारतीय शांतीरक्षक UN पदकाने सन्मानित
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती मोहीमेंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात असलेल्या 50 भारतीय शांतीरक्षकांना संयुक्त राष्ट्रसंघाचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रख्यात भारतीय वंशाचे अमेरिकावासी वकील अजय राजू यांना अमेरिकेत त्यांच्या कल्याणकारी कामांसाठी ‘अमेरिकन बजार फिलॅनथ्रोपी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत (UNHRC) सेवा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने गुप्त मतदानातून 15 सदस्य देशांची निवड केली आहे.

जयपुर विमानतळाला वार्षिक 2-5 दशलक्ष प्रवासी हाताळणार्‍या विमानतळांच्या श्रेणीत जागतिक स्तरावर पहिला तर श्रीनगरला दूसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca19and20oct2017.html
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC) तर्फे विवीध २०५ पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३० ऑक्टोबर २०१७]

एकूण पदे : २०५

परीक्षा शुल्क : ₹४७२ ते ₹७७८

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० ऑक्टोबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/thane-dcc.html
रिजर्व बॅंक ऑफ इंडिया (RBI) तर्फे ६२३ सहाय्यक पदांची भरती [शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०१७]

पदाचे नाव :असिस्टंट (सहाय्यक)

एकूण पदे : ६२३

किमान शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणतीही पदवी

वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹४५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/rbi.html
१४ ऑक्टोबर २०१७ ते २२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा २' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
आसाम राज्य शासनाचे नवीन पर्यटन धोरण
आसाम राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने राज्याचे नवे पर्यटन धोरण-२०१७ जाहीर केले. नवे धोरण जानेवारी २०१८ ते २०२२ पर्यंत लागू असेल.

भारतात दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस पाळला जातो. या दिवशी पोलीस स्मारकावर पुष्पांजली अर्पित केली गेली आणि वीरांना श्रद्धांजली दिली गेली.

भारताचे महाधिवक्ता (Solicitor General) रणजित कुमार यांनी आपल्या महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला आहे.रणजित कुमार यांनी आपला राजीनामा विधी व न्याय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला.

जसिंडा आर्डर्न (महिला) यांची न्युझीलँडच्या पुढील पंतप्रधान पदासाठी निवड झाली आहे आणि यासोबतच न्युझीलँडला सर्वात तरुण पंतप्रधान लाभणार.

२६ ऑक्टोबर २०१७ रोजी भारतात प्रथमच 'आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद' (International conference on consumer protection) आयोजित केली जाणार आहे. २४ देशांची ही परिषद नवी दिल्लीत होणार आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

UNFPA चा 'जागतिक लोकसंख्या अहवाल २०१७' प्रसिद्ध

'लॅन्सेट' नियतकालिकाने प्रदूषणामुळे जगभरात होणार्‍या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असून प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/10/ca21and22oct2017.html