MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तर्फे विवीध अभियंता पदांची भरती

पदाचे नाव :वैज्ञानिक अभियंता

एकूण पदे : ८०

वयोमर्यादा :३५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹१००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ ऑक्टोबर २०१७

For Apply Online Visit this Link http://jobs.mpscacademy.com/2017/09/isro.html
सागरी लाटांचे क्षरणकार्य
०१. जलदाब क्रिया
लाटेतील पाण्याचा दाब पडल्याने किनाऱ्याची संधी प्रसरण पावते.

०२. अपघर्षण
खालचा पृष्ठभाग घासला जातो.

०३. सन्निघर्षण
खडक वाहत असतानाच लाटेत घर्षण होऊन एकावर एक आदळून खडकांची विरघळून झीज होते.


लाटांच्या क्षरण कार्यातून निर्माण होणारी भूरूपे
०१. आखात व भूशिरे
उदा.भारतात खंबायात आखत

०२. लघुनिवेशीका (coves)
कठीण मृदू कठीण मृदू कठीण
उदा.England South Beach

०३. समुद्रकडा
समुद्रकडा निर्माण होण्यासाठी एक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/marine-waves.html
राज्यात सागरमाला प्रकल्प राबविण्यास मंजूरी
०१. देशाच्या किनारपट्टीलगतच्या भागाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या सागरमाला कार्यक्रमाला राज्य शासनाची मान्यता देण्याबरोबरच राज्यातील प्रकल्पांसाठी ५०% निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

भारतातर्फे 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत
अमित मसुरकर दिग्दर्शित 'न्यूटन' या चित्रपटाची निवड २०१८ मध्ये होणाऱ्या अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी झाली आहे. भारतातर्फे हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असेल.

मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यमयांच्या कार्यकाळात वाढ
केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत पदावर कायम राहतील. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दूसरा विस्टाडोम डब्बा रेल्वे मंत्रालयाने सेवेत रुजू केला
पश्चिम घाटमार्गाचे मनोरम दृश्य दाखविण्याकरिता मुंबई-गोवा मार्गावरील जन शताब्दी एक्स्प्रेसमध्ये दूसरा विस्टाडोम डब्बा जोडण्यासाठी हा डब्बा रेल्वे मंत्रालयाने सेवेत सामावून घेतला.

हिमाचल प्रदेश शासनाने पर्यटन स्थळांसाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली
हिमाचल प्रदेश शासनाने २१ सप्टेंबर २०१७ रोजी पर्यटन स्थळांसाठी आपली पहिली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली.

एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवची हॅटट्रिक
चायनामन गोलंदाज म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या कुलदीप यादवने ऐतिहासिक ईडन गार्डनवर हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केला. त्यामुले भारताने ऑस्ट्रेलियाला २०२ धावांत गुंडाळले.

भारताच्या सायकलपटू डेबोराह हेरॉल्डने आशियाई इंडोअर खेळांमध्ये तीन रौप्य जिंकले
डेबोराह हेरॉल्ड या भारतीय सायकलपटूने तुर्कमेनिस्तानच्या अश्गबात येथे खेळण्यात आलेल्या २०१७ आशियाई इंडोअर आणि मार्शल आर्ट्स खेळांमध्ये तीन रौप्यपदके जिंकली.

इराणने 'खोरामशाहर' नामक नवीन क्षेपणास्त्र विकसित केले
इराणने लष्करी संरक्षणास बळकट करण्याच्या उद्देशाने 'खोरामशाहर' नामक नवीन क्षेपणास्त्र विकसित केले. नवे क्षेपणास्त्र २००० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca23and24sept2017.html
भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र.
भारतीय एकूण भूमीच्या ४३% भागावर मैदान आहे. ३०% भागावर पर्वत आहे.आणि २७% भाग पठाराने व्याप्त आहे.

भारतीय उपखंड
०१. पामीर पठाराच्या आग्नेयेस काराकोरम हिमालय.

०२. पामीर पठाराच्या नैऋत्येस हिंदूकुश सुलेमान तीर्थ या पर्वतरांगामुळे दक्षिण आशियाचा भाग वेगळा झाला.आणि या भागासच भारतीय उपखंड असे संबोधले जाते.

द. आशियात भारत,पाकिस्तान,बांगलादेश,नेपाळ,भूटान,मालदीव,श्रीलंका या देशांचा समावेश होतो.आणि त्यापैकी ब्रिटिशकालीन भारताचे क्षेत्रफळ ४२,२७,३१८ चौ.कि.मी. होते.
(भारत ३२,८७,२६३ चौ.कि.मी. ,पाकिस्तान ७,९६,०५५ चौ.कि.मी., बांगलादेश १,४४,०२० चौ.कि.मी. )

ही भूमी द.आशियाच्या एकूण भूमीच्या ३/४ (तीन चतुर्थांश) आहे. त्यामुळे द.आशियाई भूमीस भारतीय उपखं .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/indian-subcontinent.html
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन
पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. साधू यांच्या अखेरच्या इच्छेनुसार जेजे रुग्णालयात देहदान करण्यात येणार आहे

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत तिसर्‍या क्रमांकावर
'वर्ल्ड न्यूक्लियर इंडस्ट्री स्टेटस रीपोर्ट २०१७' अहवालानुसार, अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत ६ अणुभट्ट्यासह जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. चीन हा या यादीत २० अणुभट्ट्यासह प्रथम क्रमांकावर आहे

मॅराडोना लिखित 'टच्ड बाय गॉड: हाऊ वी वोन द मेक्सिको 86 वर्ल्ड कप' पुस्तक प्रकाशित

पंतप्रधानांच्या हस्ते 'सर्वांसाठी वीज' योजनेच्या शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर २०१७ रोजी 'सर्वांसाठी वीज (Power for all)' योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

२०००-२०१५ दरम्यान भारतात बालमृत्यू दरात घट वैद्यकीय क्षेत्रातले नियतकालिक 'लॅन्सेट' ने नवजातांच्या मृत्युदरासंदर्भात त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मेरी कोम IOC अॅथलिट्स फोरम येथील AIBA प्रतिनिधी
भारतीय महिला मुष्टियोद्धा मेरी कोम ही आगामी IOC अॅथलिट्स फोरमसाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडळ (AIBA) प्रतिनिधी म्हणून निवडण्यात येणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

जर्मनीची सूत्रे पुन्हा मर्केल यांच्याकडेच
जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानानंतर विद्यमान चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावरच नागरिकांनी विश्‍वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅन्सलरपदाचा मर्केल यांचा हा चौथा कार्यकाल असणार आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca25and26sept2017.html
भारताच्या सीमा एकूण ७ देशांना लागून आहेत.


भारताच्या २९ राज्यपैकी १७ राज्य हे दुसऱ्या देशांच्या सीमांना लागून आहेत.

सीमांचे भूसीमा व जलसीमा असे दोन प्रकार आहेत.



भूसीमा
भारताच्या भूसीमेची एकूण लांबी १५२०० किमी आहे.

भारताच्या शेजारील राष्ट्रे व भूसीमा
देश
सीमा लांबी (किमी)
प्रमाण
बांग्लादेश
४०९६
२६.९५%
चीन
३९१७
२५.७७%
पाकिस्तान
३३१०
२१.७८%
नेपाळ
१७५२
१३.५३%
म्यानमार
१४५८
९.५९%
भूटान
५८७
३.८६%
अफगाणिस्तान
८०
०.५२%

देशांचे सीमांची नावे
०१. भारत - अफगाणिस्तान
ड्यूरड रेषा (१८९ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/indian-borders-and-coast.html
विवेक देबरॉय यांची आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीति आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


एसबीआयकडून 'मिनिमम बॅलन्स'ची मर्यादा शिथिल

ISRO च्या मंगळ मोहिमेला तीन वर्ष पूर्ण झालेत
ISRO ने नियोजित केलेल्या मार्स ऑरबिटर मिशन (MOM) ला मंगळाच्या परिभ्रमण कक्षेत तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळ ग्रहावरची ही मोहीम ISRO ची तुलनेने कमी खर्चाची मोहीम ठरलेली आहे.

कांडला बंदराचे नवे नाव आता दिनदयाल बंदर

मुंबईत 'INS तारासा' जहाज भारतीय नौदलात सामील
२६ सप्टेंबर २०१७ रोजी 'INS तारासा' हे वॉटर जेट FAC जहाज भारतीय नौदलात सामील करण्यात आले. या जहाजाचे तळ मुंबईमध्ये असेल. 'INS तारासा' पश्चिमी नौदलाच्या आदेशाखाली असेल आणि ले. कमांडंट प्रविण कुमार या जहाजाचे कप्तान असतील.


जागतिक पर्यटन दिवस: २७ सप्टेंबर
दरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन १९८० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca27and28sept2017.html
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले. त्यांना त्वचेचा कर्करोग झाला होता.

केंद्र सरकारमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्ष
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्रीय आरोग्य सेवेशिवाय इतर डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६५ वर्षे इतकी केली आहे. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

श्रीनगर, रायपूर येथील विमानतळांना सर्वश्रेष्ठ विमानतळाचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१७केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने विविध श्रेणीत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात दिले जाणारे 'शांती स्वरूप भटनागर' पुरस्कार प्राप्त करणार्‍यांची नावे जाहीर केली.

भारताचे पाच पुरुष बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल २५ मध्ये

'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूज हेफ्नर यांचे निधन
प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रौढांसाठीच्या प्रसिद्ध मासिकाचे संस्थापक ह्यूज हेफ्नर यांचे बुधवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

फॉर्च्युन नियतकालिकाने शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली
चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca29and30sept2017.html
भारतीय लोकसेवा आयोग (UPSC) तर्फे भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) च्या ५८८ जागांसाठी पूर्व परीक्षा जाहीर [
टेलीकम्युनिकेशन कन्सल्टन्सी इंडिया लिमिटेड (TCIL) तर्फे विवीध १०० पदांची भरती
भारतीय नौदल (Indian Navy) तर्फे विवीध ४३ पदांची भरती
या पदांसोबत इतर पदांचीही माहिती मिळविण्यासाठी आमचे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करा.

सर्व नोकरीविषयक जाहिराती, जाहिरातींचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचा प्लॅटफॉर्म, भरती परीक्षासाठीचा अभ्यासक्रम या सर्व बाबी एकाच ठिकाणी.
या सर्व वैशिष्ट्यांनि युक्त असलेले आमचे नवीन अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करा.

Get Updated Version of MPSC Academy's Maharashtra Job Updates Android Application.
Download From Below Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.jobupdates
ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम
राज्यातील ९ जिल्हे व १३ महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये ७ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यांपर्यंत मोहिमे अंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते वैश्विक वन्यजीव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार

आर. के. मिश्रा - सशस्त्र सेना बलाचे महानिदेशक

ऑक्सफर्ड महाविद्यालयाने ऑंग सॅन सु की यांचे चित्र हटवले
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या महाविद्यालयामधील मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेल्या ऑंग सॅन सु की यांच्या चित्राला हटविण्यात आले आहे.


जागतिक अधिवास दिवस २ ऑक्टोबर . .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/10/ca01and02october2017.html
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे सुरक्षा रक्षक ५०० पदांची भरती
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक

एकूण पदे : ५००

किमान शैक्षणिक पात्रता :बारावी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹२००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ ऑक्टोबर २०१७

http://www.mpscacademy.com/2017/10/blog-post.html
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (NHAI) तर्फे ४० डेप्युटी मॅनेजर पदांची भरती
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Technical)

एकूण पदे :४०

किमान शैक्षणिक पात्रता : i. स्थापत्य अभियांत्रीकी पदवी ii. GATE

वयोमर्यादा :३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २८ ऑक्टोबर २०१७
http://www.mpscacademy.com/2017/10/nhai.html
❤1
तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील यावर्षीचे नोबेल
वैद्यकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक जेफ्री सी हॉल, मायकेल रोसबॅश आणि मायकेल डब्ल्यू यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाले आहे.

मानवी शरीरामध्ये सुमारे २४ तासांपर्यंत चालत असलेल्या जैविक प्रक्रिया (सर्केडियन सिस्टीम्स) नियंत्रित करत असलेल्या 'मॉलिक्‍युलर मेकॅनिझम'संदर्भात या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे.

"वनस्पती, मानव वा प्राणी त्यांच्या शरीरांमधील जैविक प्रक्रिया पृथ्वीच्या परिवलनाशी कशा प्रकारे जुळवून घेतात, हे या संशोधनामुळे स्पष्ट होते. या शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी फळांवर बसणाऱ्या माशांचा (फ्रुट फ्लाईज) वापर केला होता.

दरवर्षी सर्वप्रथम वैद्यकशास्त्र क्षेत्राम . .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/10/ca03and04oct2017.html
काझुओ इशिगुरो यांना साहित्याचे नोबेल
जपानी वंशाचे इंग्रजी लेखक काझुओ इशिगुरो यांना साहित्यासाठी २०१७ नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.

जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

रेनर वेईस, बॅरी सी. बॅरीश, कीप एस. थॉर्न यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

मंगला बनसोडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर (सातारा) यांना जाहीर झाला आहे.

एसबीआयचे नवे अध्यक्ष रजनीश कुमार
देशातील सर्वात मोठ्या बँकेला नवा अध्यक्ष मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली.

वैश्विक उद्योजकता शिखर परिषद २०१७ हैदराबादमध्ये आयोजित होणार

भारत आणि जिबूती यांच्यात करार
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या जिबूती देशाच्या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांनी नियमित विदेशी कार्यालय स्तरावरील सल्लामसलत स्थापित करण्यासाठी एक करार केला.

सौम्या स्वामीनाथन यांची WHO उप-महासंचालक पदावर नियुक्ती
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) चे महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) उप-महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... ....................http://www.mpscacademy.com/2017/10/ca-05and06oct2017.html
Download Our Free MPSC Online Exam App
एमपीएससी अकॅडमी आपल्यासाठी हे एक विशेष अँड्रॉइड ऍप्लिकेशन घेऊन येत आहे. या ऍप्लिकेशन च्या माध्यमातून विद्यार्थी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा ऑनलाइन सराव करू शकतात.
या सर्व सराव परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या आहेत.

या माध्यमातून MPSC Academy तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर दिनांक ८ सप्टेंबर २०१७ पासून दर रविवारी साप्ताहिक सराव परीक्षा घेतली जाईल.
दर शनिवारी मागील आठवड्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी MPSC Academy वेबसाईटवर तसेच Facebook पेजवर प्रकाशित करण्यात येईल.

Download & Install Androd App & Give us a Review

https://play.google.com/store/apps/details?id=com.softlinklabs.mpsconlineexam
साप्ताहिक सराव परीक्षा १ प्रकाशित
सुरु दिनांक : ०८ ऑक्टोबर २०१७
अंतिम दिनांक : १४ ऑक्टोबर २०१७
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी १४ ऑक्टोबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशनसाठी प्ले स्टोर वर 'MPSC Online Exam' असे सर्च करावे किंवा पुढील लिंकला भेटद्यावी. https://play.google.com/store/apps/details?id=com.softlinklabs.mpsconlineexam

वेबसाईटवर सोडविण्यासाठी पुढील लिंकला भेट द्यावी http://www.mpscacademy.com/2017/10/weekly-test_8.html
दिग्दर्शक कुंदन शहा यांचे मुंबईत निधन
'नुक्कड' आणि 'वागले की दुनिया' अशा लोकप्रिय मालिका आणि 'जाने भी दो यारो', 'कभी हा कभी ना' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे शनिवारी वयाच्या ६९व्या वर्षी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले.

मुकेश अंबानी ठरले दहाव्यांदा देशातील सर्वाधिक श्रीमंत
'फोर्ब्स' नियतकालिकाने जाहीर केलेल्या २०१७ मधील भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग १० व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती ३८ अब्ज डॉलर म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये झाली आहे.

राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्‍लीत 'भारत जल सप्‍ताह २०१७' चे उद्घाटन करण्यात येणार आहे.

वुशु विश्वविजेता स्पर्धाचे सुवर्णपदक पूजा कादीयन हिने जिंकले

आण्विक शस्त्रास्त्रे नष्ट करावीत, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस (आयसीएन) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

१४ व्या युरोपिय संघ-भारत शिखर परिषदेत तीन करार
६ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत १४ वी युरोपीय संघ-भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेत युरोपीय संघाचे प्रतिनिधीत्व डोनाल्ड टस्क (युरोपीय परिषदेचे अध्यक्ष), आणि जीन क्लॉड जंकर (युरोपीय आयोगाचे अध्यक्ष) यांनी केले तर भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/10/ca07and08oct2017.html