MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत

अंतर्गत शक्ती
याला निर्माणकारी शक्ती असे म्हणतात.
याच्या परिणामस्वरूप अभिसरण शक्ती कार्यरत असतात.

याचे दोन प्रकार पडतात.
०१. मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती
०२. शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या शक्ती

या प्रकरणात आपण मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत.



महाद्विप व पर्वतांची निर्मिती या मंद गतीच्या शक्तीने होते.या शक्तीला भूप्रक्षोभ म्हणतात. भूप्रोक्षोभ प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या भूरुपानुसार त्याचे दोन गटात विभागणी होते.
०१. महाद्विपिय निर्माणकारी हालचाली (भूखंड निर्माणकारी)
०२. पर्वत निर्माणकारी हालचाली (गिरीजनक निर्माणकारी हालचाली)



भूखंड निर्माण करणारी
'इपिरोजेनी' नावाच्या ग्रीक शब्दापासून निर्मिती झाली.(उभ्या दिशेने व्याप)

या शक्तींमुळे पृथ्वीवर पठार आणि मैदानांची निर्मिती होते.

यांच्या मध्ये दोन प्रकार पडतात.


ऊर्ध्वगामी शक्ती दिशा पृथ्वी केंद्रापासून भूपृष्ठाकडे

या प्रकारच्या हालचालीमुळे महाद्विप दोन प्रकारे उंचावतो.

०१. प्रोत्थान (उभार) (उच्चयन)
काही वेळेस भूखंडाचा एखादा भूभा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/powers-operating-and-affectiong-onth.html
व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत 'रालोआ'चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसप्रणित 'यूपीए'चे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींचा पराभव केला आहे. महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.

अर्थतज्ज्ञ राजीव कुमार निती आयोगाचे नवे उपाध्यक्ष
निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली आहे.

अभिनेता अक्षय कुमार 'यूपी'चा स्वच्छतादूत
अभिनेता अक्षय कुमारची 'टॉयलेट एक प्रेम कहाणी' या चित्रपटाची कथा स्वच्छतेवर आधारित आहे. याची दखल घेत अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी जाहीर केले.

बढत्यांमधील आरक्षण रद्द
सरकारी कर्मचाऱ्यांना बढत्यांमध्ये सरसकट ३३ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा १७ वर्षांपूर्वीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अवैध ठरवून रद्दबातल केला.

'जेएनएनयूआरएम'मध्ये महाराष्ट्राची बाजी
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानात (जेएनएनयूआरएम) महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत बाजी मारली आहे.

बोल्टच्या १०० मीटरची शर्यतीची अखेर ब्राँझने
वेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याला आपल्या १०० मीटर शर्यतीच्या कारकिर्दीची अखेर ब्राँझपदकाने करावी लागली. अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने सुवर्ण आणि ख्रिस्तीयन कोलोमनने रौप्यपदक पटकाविले.

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात २० वर्षानंतर हिंदू खासदार
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये २० वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रिपदी निवड झाली आहे

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची अधिकृत माघार
पॅरिस येथे २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचा इरादा अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना कळवला आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca06and07august2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
आकस्मिक शक्ती (शीघ्रगतीने)
भूकंप
वर्चेस्टर यांच्या मते भूकंप म्हणजे, "पृथ्वीच्या पृष्ठभागातील खडकांचे संतुलन क्षणिक बिघडणे होय."

पृथ्वीच्या पृष्ठभागास सरासरी दर तीन मिनिटाला एक भूकंप होतो. बहुतेक भूकंप हे सागरपातळीशी होतात. भूकंपाची नोंद 'सिस्मोग्राफ' यंत्रावर होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल मध्ये मोजतात.

भूकंपाची कारणे
०१. ज्वालामुखी विस्फोट
१८८३ मध्ये आग्नेय आशियातील जावा-सुमात्रा जवळील क्राकाटोंआ

०२. प्रस्तरभंग
तणाव व हालचाली मधून
भारतात १९४३ साली बिहारमध्ये व १५ ऑगस्ट १९५० मधील आसाम भूकंप.

०३. स्फटिकीकरण / स्फटीकीभवन

०४. समस्थायीस्त्वाचे असमायोजन किंवा संतुलन मूलक सिद्धांत
१८८९ मध्ये त्याठिकाणाचा 'डटन' येथे हा सिद्धांत मांडला.

०५. प्रत्यास्थ / प्रतिस्कंदन सिद्धांत.
डॉ. रीड यांनी मांडला.
गाळाच्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात संचयनामुळे तेवढा भाग खचला जातो.
१९६७ मध्ये कोयनाचे भूकंप.

०६. पृथ्वीचे आकुंचन
डॅना नावाच्या शास्त्रज्ञानाने मांडला ( .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/power-affecting-on-earth.html
भारतामधील पहिले खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प हैदराबादमध्ये
कल्याणी राफेल अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स (KRAS) या भारतामधील पहिल्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उप-प्रणाली निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे.

भारतातील पहिली हेली-टॅक्सी सेवा बंगळूरुमध्ये
नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये हेली-टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे हेलिकॉप्टरद्वारे शहरात टॅक्सीसेवा प्रदान करणारे बेंगळुरू हे देशातील पहिले शहर बनले आहे.

मोहम्मद मुस्तफा SIDBI चे नवे चेअरमन
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) चे नवे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून मोहम्मद मुस्तफा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.

श्रीशांतवरील आजन्म बंदी न्यायालयाने हटविली
इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) सामन्यांमध्ये 'स्पॉट फिक्‍सिंग' केल्याच्या आरोपावरून आजन्म बंदी घातलेला एस. श्रीशांतवरील बंदी हटविण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला दिला.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मो फराहने १०००० मीटरचे सुवर्णपदक जिंकले
मोहम्मद फराह या धावकाने लंडन (इंग्लंड) मध्ये आयोजित 'IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१७' स्पर्धेत पुरुषांच्या १०००० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

विजेंदर सिंगने WBO ओरिएंटल, एशिया पॅसिफिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले
विजेंदर सिंगने WBO ओरिएंटल सुपर मिडिलवेटचे विजेतेपद जिंकले. याशिवाय त्याने WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडिलवेटचेही विजेतेपद जिंकले.

कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून हसन रोहानी यांनी दुसर्‍यांदा शपथ घेतली
इराणचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी पुन्हा एकदा आपल्या दुसर्‍या कार्याकाळासाठी पदाची शपथ घेतली आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca07and08august2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
वॉरसेस्टर यांच्या मते "ज्वालामुखी सामान्यत: एक गोल किंवा जवळ जवळ गोलाकार छिद्र् असून यातून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त वायू, द्रव्य, लाव्हारस आणि खडकांचे तुकडे बाहेर पडतात."

ज्वालामुखी क्रियेतून बाहेर पडणारे पदार्थ.
घन पदार्थ
०१. राख - Ash

०२. टफ - राखेच्या संघटीत तुकडयास

०३. स्कोरिया
हरभऱ्याच्या आकाराच्या खडकांच्या तुकड्यांना स्कोरिया असे म्हणतात.

०४. ब्रेसिया
स्कोरियाच्या संघटीत रुपासच ब्रेसिया असे म्हणतात.

०५. झमक (प्युमिक)
ब्रेसियाला जर बुडबुड्याचा आकार प्राप्त झाला असेल तर अशा खडकांच्या संघटीत रुपास झमक किंवा प्युमिक असे म्हणतात.

०६. लेपिली
सुपारीसारख्या मोठ्या तुकड्यांना लेपिली (लेपिली) म्हणतात.

०७. ज्वालामुखी बॉंब (Volcano Bomb)
काही मी व्यासाच्या खडकांच्या तुकड्यांना ज्वालामुखी बॉंब म्हणतात.

द्रव पदार्थ
ज्वालामुखी चिखल

लाव्हा
०१. ऍसिड लाव्हा - यात जवळपास ६० ते ७०% सिली .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/powers-affecting-on-earth.html
'छोडो भारत' चळवळीला ७५ वर्ष पूर्ण
९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'चले जाव' चा नारा लावण्यात आला.

भारत छोडो चळवळ (Quit India Movement), ज्याला 'भारत ऑगस्ट चळवळ' म्हणून देखील ओळखतात, ही अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई सत्रात ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू करण्यात आलेली नागरी असहकार चळवळ होती.

समितीचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले होते. या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबई मधील गोवालिया टॅंक मैदानावरच्या त्यांच्या भारत छोडो भाषणात 'करो या मरो (Do or Die)' चा नारा दिला.

भारत छोडो आंदोलनातील आक्रमक स्वरूप मिळण्यास प्राथमिक घटक म्हणजे सर स्टाफोर्ड क्रिप्सच्या परती विरोधात बापूंचा निषेध हा होता.



गृहमंत्रालयाने संपूर्ण आसामला AFSPA अंतर्गत 'अस्थिर' क्षेत्र घोषित केले
गृहमंत्रालयाने संपूर्ण आसाम राज्याला सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत एक महिन्यासाठी 'अस्थिर' क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याशिवाय, आसामलगतचा मेघालयाचा सीमावर्ती भाग आणि अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांनादेखी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca09and10august2017.html
दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृतरित्या ही घोषणा केली. विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दीपक मिश्रा हे त्यांची जागा घेतील.

दीपक मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना याच वर्षी मे महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणानंतर ते प्रकाशझोतात आले होते.

तसेच ६३ वर्षीय दीपक मिश्रा यांची सर्वसामान्यांमध्ये 'प्रो सिटीझन जज' अशी ओळख ................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca11and12aug2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
बहिर्गत शक्ती याला पृष्ठजात शक्ती असे म्हणतात. या पृथ्वीच्या पृष्ठभागात संतुलन निर्माण करतात.
बहिर्गत शक्तीच्या कार्याचे स्वरूप
A) अनाच्छादन
B) समतलीकरण

समतलीकरण (श्रेणीयन) GRADATION
श्रेणीयन मध्ये तीन प्रकारच्या प्रक्रिया आहेत.
पहिल्य प्रक्रियेत भूपृष्ठाचे अपक्षय आणि अपक्षरण होते.

अपक्षय - खडकाचे जागच्या जागी फुटणे
अपक्षरण- वाहत असताना एकावर एक आदळून बारीक तुकडे होणे.
क्षरण - खडकाची विस्तृत अशी झीज होणे.

दुसऱ्या प्रक्रियेत अपक्षय व अपक्षरणातून निर्माण .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/powers-affecting-on-earth-external-powers.html
CBFC चे नवे चेअरमन प्रसून जोशी
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) च्या चेअरमन (अध्यक्ष) पदावर लेखक व गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जेष्ठ निर्माते पहलज निहलानी यांच्या जागेवर झाली आहे.

११ ऑगस्ट २०१७ पासून तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती झाली आहे.

CBFC हे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ च्या कलम ३(१) अंतर्गत केंद्र सरकारकडून CBFC चेअरमन पदाची नेमणूक केली जाते.

जगातील सर्वात वयोवृद्ध मनुष्य 'इस्राइल क्रिस्टल' यांचे निधन
जगातील सर्वात वयोवृद्ध मनुष्य 'इस्राइल क्रिस्टल' यांचे निधन झाले. त्यांनी वयाची ११३ वर्ष पूर्ण केले होते आणि ११४ व्या वाढदिवसासाठी फक्त एक महिना उरला होता.

क्रिस्टल हे दोन्ही जागतिक महायुद्ध आणि औश्वित्झच्या एकाग्रता शिबिराचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यांची गेल्या वर्षी गिनीज .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca13and14august2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत

विस्तृत झीज किंवा बृहदक्षरण
सामुहिक विदारण (शिला पदार्थांची हालचाल)
Mass Wasting, Mass Movement.

विदारणातून सुट्या कणांची निर्मिती होते व हे सुटे कण समूहाने गुरुत्वाकर्षणाने पुढे पुढे सरकतात. बाह्यकारकांसह गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव विस्तृत झिजेचे प्रकार.

'शार्प' याने १९३८ मध्ये विस्तृत झीजेबद्दल अभ्यास करून त्याचे चार प्रकार सांगितले.
०१. मंद प्रवहन (Slow Flowage )
०२. जलद प्रवहन (Rapid Flowage)
०३. मोठ्या प्रमाणावर जलद प्रवहन (Large Scale Rapid Slide)
०४. अवतलन रूप (Subsidence Form)

मंद प्रवहन
या क्रियेत विदारणात सुटे झालेले कण अतिशय मंद गतिने समूहाने पुढे सरकतात.

दोन उपप्रकार
०१. सरपटन (Creep)
सूक्ष्म कण गुरुत्वाकर्षणाने .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/part2.html
धावपटू उसेन बोल्टची निवृत्ती
जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने क्रीडाजगतातून आपली निवृत्ती घेतली आहे. लंडनमधील 2017 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 4x100 मीटर रिले शर्यतीनंतर बोल्टने आपली निवृत्ती जाहीर केली.

बोल्टने आपल्या कारकि‍र्दीत 8 वेळा ऑलिम्पिक विजेता आणि 11 वेळा विजेता ठरला. त्याने एकूण 23 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.

बोल्ट हा 100 मी., 200 मी. आणि 4x100 मी. प्रकारात सलग तीन वेळा ऑलिम्पिक विजेता ठरणारा एकमेव खेळाडू आ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca15and16aug2017.html
स्वातंत्र्यदिनी 990 कर्मचार्‍यांना पोलिस पदक देण्यात आले
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2017 रोजी 990 कर्मचार्‍यांना पोलिस पदक (Police Medal for Gallantry) प्रदान करण्यात आले आहे.

यात एकाला शौर्यासाठी राष्ट्रपती पोलिस पदक (PPMG), 190 कर्मचार्‍यांना पोलिस पदक (PMG), 93 कर्मचार्‍यांना विशिष्ट सेवेसाठी पोलिस पदक (PPMDS) आणि 706 कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक (PMMS) प्रदान करण्यात आले आहेत.

एप्रिल 2017 मध्ये सुकमा येथे माओवादी हल्ल्यात शहीद झालेले छत्तीसगढ पोलिसांच्या विशेष दलाचे प्लॅटून कमांडर शंकर राव यांना मरणोपरांत राष्ट्रपती पोलिस पदक (PPMG) बहाल करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेला 'मिनामाटा करार' लागू झाला
16 ऑगस्ट 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाचा (UNEP) पाठिंबा असलेला पारा (mercury) संदर्भात 'मिनामाटा करार' हा वैश्विक करार जागतिक पातळीवर लागू झाला.

पारामुळे उद्भवणार्‍या संभाव्य मेंदूविषयक आणि आरोग्यास नुकसानीपासून लाखो लहान मुलांचे आणि अभ्रकांचे संरक्षण करण्याकरिता या करारांतर्गत प्र .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca17and18aug2017.html
प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरे
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.

तसेच या शहरांतील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

पर्यावरण विभागाच्या एकदिवसीय 'शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र' या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पोटे बोलत होते.

हवेच्या गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिकअसलेल्या शहरात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे.



सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल तलाक-ए-बिदत घटनाबाह्य
पतीने एकाच वेळी लागोपाठ तीन वेळा 'तलाक' म्हणून पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची हनाफी सुन्नी मुस्लीम समाजामधील 1400 वर्षांपासूनची प्रचलित प्रथा सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑग .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca21to24aug2017.html
भारताचे 'राष्‍ट्रीय क्रीडा पुरस्‍कार - २०१७' जाहीर
दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१७ जाहीर केले आहे. हे पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे वितरण २९ ऑगस्ट २०१७ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र आणि सरदार सिंह यांना दिला जाणार आहे. शिवाय ७ जणांना द्रोणाचार्य पुरस्कार तर १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. ध्यानचंद पुरस्कारासाठी ३ खेळाडूंना निवडण्यात आले आहेत.

'गोपनीयतेचा अधिकार' यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 'गोपनीयतेचा अधिकार' संदर्भात आपला निर्णय प्रदान करताना असे म्हटले आहे की, "व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेतील कलम २१ अन्वये व्यक्तिगत गोपनीयता हा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे."

आरबीआयकडून २०० रुपयांची नोट चलनात येणार५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली होती. त्यानंतर आता लवकरच २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे.

नंदन निलेकणी इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष
इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक आणि आधारकार्ड योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांनी अखेर इन्फोसिस संचालक मंडळाचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून गुरूवारी सूत्रे स्वीकारली.

भारत नेपाळमध्ये आठ करार
भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामध्ये उभय देशांतील अमली पदार्थ तस्करीविरोधातील सहकार्याचाही समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधार शेरबहाद्दूर देऊबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दक्षिण चीनला 'हाटो' चक्रीवादळाचा तडाखा बसला
गेल्या ५३ वर्षात या वर्षी दक्षिण चीनमध्ये 'हाटो' चक्रीवादळाने सर्वाधिक जिवीतहानी आणि प्रदेशाला भारी नुकसान पोहचवलेले आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca25and26august2017.html
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्‍यात अपुरी पडली. या स्पर्धेत नोझोमी ओकुहराला सुवर्णपदक, सिंधूला रौप्य तर सायनाला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्य फेरीत साईना नेहवालला तीन गेमच्या लढतीत पराभूत केलेल्या नोझोमी ओकुहाराने हिनेच भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केले. सिंधूला तिने निर्णायक लढतीत १९-२१, २२-२०, २०-२२ अशी हार पत्करण्यास भाग पाडले.

पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन याने देखील पहिले विजेतेपद मिळविताना चीनच्या माजी विजेत्या लिन डॅनचा २२-२०, २१-१६ असा सहज पराभव केला. ही लढत ५४ मिनिटे चालली.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय पदक विजेते
साईना नेहवाल - रौप्यपदक, महिला एकेरी (२०१५)
पी. व्ही. सिंधू - ब्राँझपदक, महिला एकेरी (२०१३ आणि २०१४)
प्रकाश पदुकोण - ब्राँझ, पुरुष एकेरी (१९८३)
ज्वाला गुत्ता - अश्‍विनी पोनप्पा - ब्राँझ, महिला दुहेरी (२०११)

किदांबी श्रीकांतच्या पराभवामुळे जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील पदकांचा दुष्काळ तीन तपांनं .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca27and28aug2017.html
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा
भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ रोजी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिश्रा यांना शपथ दिली.

६४ वर्षीय न्या. मिश्रा यांनी न्या. जे. एस. खेहार यांच्या निवृत्तीनंतर हे पद सांभाळले आहे. ते पुढील १३ महिन्यांसाठी २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत हे पद धारण करतील.

भारताचे प्रधान न्यायाधीश (CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. भारतीय घटनेच्या कलम १४५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम १९६६ अन्वये, CJI सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात.

१९५० साली न्या. एच. जे. कानिया .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca29and30aug2017.html
राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार
संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद), हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना ट्रान्सफॉर्मिंग वूमन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला नगरपरिषदेची मंजुरी
शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (206 फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

भारत सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणारा देश
दुचाकी उत्पादनांच्या निर्मितीत भारताने चीनला मागे टाकले आहे.

भारताच्या नियंत्रक महालेखापरीक्षकपदी राजीव महर्षी
केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे. तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या 17 व माध्यमिकच्या 8 अशा एकूण 25 शिक्षकांचा समावेश आहे.

शाळांना स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्‍समध्ये सहभागी होणार
3 ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली.

उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र चाचणी घेतली
उत्तर कोरियाने राजधानी प्यांगयांगहून सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसेफिक महासागरात जाऊन कोसळळे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca01and02sept2017.html
मंत्रिमंडळ विस्तार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासोबत अनेक खात्यांमध्ये खांदेपालटही केला. ३ सप्टेंबर २०१७ रोजी नवी जबाबदारी घेतलेल्या व्यक्तींचा शपथविधी कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे.

त्यानुसार, निर्मला सितारामन यांच्याकडे संरक्षण तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाबरोबर कौशल्य विकास मंत्रालयाचा कार्यभार आला, तर मुख्तार अब्बास नकवींकडील अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाला कॅबिनेट दर्जा बहाल करण्यात आला आहे.

नितीन गडकरी यापुढे परिवहन व नौकानयन मंत्रालयाखेरीज उमा भारती यांच्याकडील जल संसाधन, नदी विकास तथा गंगा संरक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहतील. उमा भारती यापुढे फक्त स्वच्छता व पेयजल विभागाचे आणि नरेंद्रसिंग तोमर हे ग्रामविकास व खाण मंत्रालयाचे काम पाहतील.

रेल्वे मंत्रालयातून पदमुक्त झालेल्या सुरेश प्रभूंकडे आता उद्योग व वाणिज्य मंत्रालय सोपविले आहे. स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्र्यांमध्ये राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा, गिरीराजसिं .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca3and4sept2017.html