MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
साक्षरता अभियान
राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम (१९७८)
(National Adult Education Programme)

उद्देश : १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुढील ५ वर्षात पोहोचविणे.


राष्ट्रीय साक्षरता मिशन (५ मे १९८८)
उद्देश : १५ ते ३५ या वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षर बनवणे.

तत्व : एकाने एकाला शिकवावे.

कार्यात्मक साक्षरता म्हणजे फक्त Reading, Writing & Arithmetic एवढेच न शिकता.सामाजिक विकासाप्रती लोकांना जागृत करणे होय.

१९९५ पर्यंत ८ कोटी निरक्षकांना साक्षर करणे.


साक्षर भारत
८ सप्टेंबर २००९ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना
साक्षर भारत हा कार्यक्रम (डॉ.मनमोहन सिंग)

या मध्ये स्त्री साक्षरतेवर भर तसेच पंचायत राज व्यवस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर.

यामध्ये ३७२ जिल्हे,४४४१ तालुके व १,६१,९९३ ग्रामपंचायती सहभागी.

अकराव्या योजनेचे उद्दिष्टे ८० % साक्षरता .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/national-education-commissions-part3.html
शिवाजीराव पाटील यांचे निधन
माजी मंत्री व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील (वय ९२) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथील लीलावती रुग्णालयामध्ये निधन झाले. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होत.

शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला.

स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते कॉंग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्‍याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकारमंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली.

1982 मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

12 वर्षे मंत्रिपद भूषविलेले शिवाजीराव पाटील 1960 ते 1967 या काळात विधान परिषदेचे सदस्य होते. 1967 ते 198 .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca23and24july2017.html
राष्ट्रीय शिक्षण धोरण १९६८
(National Policy of Education 1968)
कोठारी आयोगाच्या शिफारसी लागू करून शिक्षण यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी १९६८ मध्ये पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाले.

यांत खालील ठराव मंजूर झाले.
०१. मोफत व सक्तीचे शिक्षण (कलम ४५)

०२. शिक्षक प्रशिक्षण व इतर - शिक्षक अत्यंत महत्वाचा घटक आहे. शिक्षकांना मानाचे पद मिळावे योग्य मोबदला व प्रशिक्षण द्यावे.

०३. भाषाविकास - प्रादेशिक भाषांचा प्रभावी वापर करावा. तसेच तीन भाषांचे सूत्र वापरावे. (प्रादेशिक, हिंदी व इंग्रजी)

०४. सर्वाना शिक्षणाच्या समान संधी द्याव्या

०५. प्रादेशिक असमतोल दूर करावा

०६. शाळा व समाज विविध उपक्रमातून जवळ आणले पाहिजेत.
उदा.राष्ट्रीय सेवा योजना

०७. विज्ञान, शिक्षण व संशोधनाला स .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/national-education-commissions-part2.html
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विवीध ३७ पदांची भरती
एकूण पदे :३७

वयोमर्यादा : २७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹५००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :९ ऑगस्ट २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/07/blog-post_25.html
विविध बँकांमध्ये IBPS तर्फे विवीध १५३३७ पदांची भरती
एकूण पदे :१५३३७

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० जानेवारी २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/07/ibps.html
अल्मा-अटा घोषणा (अल्मार्टां)
आरोग्य खूप काळ दुय्यम विषय समजला जायचा
६ ते १२ डिसेंबर १९७८ ला कझाकस्तान मधील अल्मार्टां येथील प्राथमिक आरोग्य सेवाबाबत एक परिषद भरली.

या परिषदेमध्ये २ महत्वाच्या संकल्पना
०१. लोकांना आरोग्यसेवा पुरविणे. ही राष्ट्राची जबाबदारी आहे.
०२. लोकांच्या आरोग्याच्या गरजा व सेवा या लोकांच्याच नियंत्रणात असल्या पाहिजे.

तसेच या घोषणेत जागतिक शांततेसाठी तसेच शाश्वत विकासासाठी सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे असे म्हंटले गेले.

जगातील सर्व अर्थव्यवस्था व WHO चे ध्येय २००० पर्यंत सर्वाना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या लाभ कारक ठरेल असे आरोग्यसंपन्न जीवन देणे आहे.

अल्मा आर्टा घोषणेच्या अगोदर आरोग्यावरील खर्चास अनुउत्पाद्क खर्च मानले जाई पण १९७८ नंतर आरोग्यास आर्थिक व सामाजिक विकासाचा महत्वाचा घटक समजले जाउ लागते.



बोर समिती (आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती)
अध्यक्ष : श्री जोसेफ बोर
स्थापना : १९४३
अहवाल : १९४६

शिफारसीवैश्विक आरोग्य सुविधा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/national-helath-programmes.html
भारताचा कारगिल विजय दिवस
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.

६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते.

मागील दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.

तसेच या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला.

कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca25and26july2017.html
राष्ट्रीय आरोग्य धोरण १९८३
या कृतीदलाच्या शिफारशींवर आधारित १९८३ चे राष्ट्रीय आरोग्य धोरण जागतिक स्तरावरील सुधारणांना विचारात घेऊन भारताच्या आरोग्य धोरणांना सुधारणा सुचविल्या.



राष्ट्रीय आरोग्य धोरण २०००
उद्देश : सर्वाना आरोग्य सेवा देणे. व आरोग्यसेवेचे वैश्विकरण करणे.

इतर उद्दिष्टे
०१. आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करणे.
०२. देशातील पारंपारिक उपचारपद्धतीचा विकास व वापर वाढवणे.
०३. अन्नसुलभता व आरोग्य विषयक ज्ञान देणे.

काही प्रमुख लक्ष्य
०१. पोलिओ उच्चाटन २००५
०२. कृष्ठरोग उच्चाटन २००५
०३. काला आजार २०१०
०४. हत्तीपाय उच्चाटन २०१५

शासनाचा आरोग्यावरील खर्च २०१० पर्यंत २ % पर्यंत निधी.



राष्ट्रीय आरोग्य अभियान
१ मे २०१३

उद्दिष्टे
०१. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे.
०२. आरोग्य यंत्रणेतील व सेवेतील त्रुटी दूर करणे.
०३. आरोग्य क्षेत्रातील विकेंद्रीकरण सुकर करणे.
०४. पेयजल स्वच्छता शिक्षण,पोषण यां .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/national-helath-programmes-part2.html
राज्य महिला धोरण २०१४
उद्दिष्टे
०१. महाराष्ट्रातील महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टीकोन रुजवणे.

०२. पुरुषप्रधान मानसिकता बदलणे.

०३. स्त्री आणि पुरुष यांचे परस्परसंबंध अधिक चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करणे.

०४. महिलांना त्यांच्या अग्रक्रमानुसार आयुष्य जगता यावे यासाठी सर्व क्षेत्रामध्ये समान संधी मिळवून देणे.व त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करता येण्यासाठी आवश्यक ते पोषक वातावरण व साधने उपलब्ध करून देणे.

०५. धर्म,वंश,जात,सत्ता,प्रदेश या कारणामुळे वाढलेल्या हिंसाचाराच्या प्रभावी मुकाबला करण्यासाठी स्त्रियांना पाठबळ देणे. किंबहुना अशा प्रकारच्या हिंसा होणारच नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे.

०६. कलम ४ नुसार स्त्री पुरुष जन्मदर समा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/maharashtra-state-women-policy-2014.html
प्रेरणादायी 'कलाम स्मारका'चे मोदींकडून अनावरण
दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभालेल्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी केले. कलाम २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते.

कलाम यांच्या पैकरांबु या मूळ गावी येथे हे स्मारक बांधले आहे. या स्मारकाचे प्रवेशद्वार इंडिया गेटच्या धर्तीवर तयार केले आहे. स्मारकाच्या मागील भागात राष्ट्रपती भवनाच्या प्रतिमा उभारली आहे.

लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) व केंद्र सरकारच्या अन्य खात्यांनी हे वैशिष्टपूर्ण स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.

'विविधतेत एकता' या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात 'अग्नी' क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत.

तसेच डॉ.कलाम यांचा वीणा वाजवितानाच्या रूपातील पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. असून यात क .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca27and28july2017.html
हे धोरण १९९१ साली लागू करण्यात आले होते. भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग या आर्थिक धोरणाचे प्रणेते मानले जातात.

या धोरणाचाच LPG मॉडेल असे म्हटले जाते. याचे विस्तृत रूप Liberalization, Privatization, Globalization असे होते. याचाच अर्थ उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण असे होते.

उदारीकरण
उदारीकरणाची व्याप्ती आणि फायदे.भांडवल -
भारत सरकार FDI ला टप्प्याटप्याने मान्यता देत आहे. त्यामुळे भारतातील भांडवलाचा प्रश्न नाहीसा होतो, उत्पादनात वाढ होत आहे.

वित्तपुरवठा -
बँक क्षेत्रात सुधारणा करून बैंक व्यवसायात स्पर्धा निर्माण करण्यात आली आहे. तसेच बँकांना स्वयंनिर्णयाचे व नफ्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

उद्योगधंदे -
औद्योगिक क्षेत्रातील परवाना पद्धत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंद्याच्या वाढीस चालना मिळा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/new-economics-policy-1991.html
उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन
धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.

हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता.



विजयदुर्ग होणार आंतरराष्ट्रीय बंदर
विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे.

गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल.

त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल.



कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. धरम सिंह यांचे निधन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. धरम सिंह यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

एन. धरम सिंह हे कर्नाटकचे १७ वे मु .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca29to31july2017.html
बांधकाम क्षेत्रातील प्रिमीयम एफएसआय दर वाढणार
बांधकाम क्षेत्राला गती मिळावी म्हणून सरकारने मंजूर केलेला वाढीव बांधकामासाठीच्या प्रिमीयम एफएसआयचा (चटई क्षेत्र निर्देशांक) दर वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला दिला आहे.

सरकारने नुकताच हा दर निश्चित केला होता. मात्र तो टीडीआरपेक्षा (हस्तांतरणीय विकास हक्क) कमी असल्याने त्याचा विकासकामांसाठी आरक्षण टाकून भूखंड मिळण्यावर परिणाम होणार असल्याने महापालिकेने हा वाढीव दराचा प्रस्ताव तयार केला आहे.

महापालिका विकास आराखड्यात नागरी हितासाठी म्हणून अनेक भूखंडांवर आरक्षण टाकत असते. त्या भूखंडमालकांना पूर्वी नुकसानभरपाई म्हणून सरकारी रेडीरेकनरच्या दराप्रमाणे रोख रक्कम दिली जात असे.

मात्र ही रक्कम बाजारभावापेक्षा कमी असते. त्यामुळे भूखंडमालकांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी नुकसानभरपाई म्हणून टीडीआर देण्याचा निर्णय झाला. ही टीडीआरसंबधित जागा मालकाला योग्य त्या ठिकाणी कायदेशीरपणे एखाद्या बांधकाम विकसकाला विकता येतो.

पण आता सरकारने वाढीव बांधकामासाठी प्रिमीयम एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा दर बांधकामांच्या प्रकारानुसार प्रतिचौरस फुटासाठी बाजारभावाच्या 50 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.



औद्योगिक विकास धोरणात महाराष्ट्र अग्रेसर
राज्याचे औद्योगिक विकास धोरण देशात अग्रेसर आहे. अन्य राज्याच्या तुलनेने आपण खूप पुढे आहोत. जेव्हा प .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca01and02august2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
प्लास्टोसीन युगात १/५ भाग बर्फाच्छादित होता म्हणून त्यास "हिमयुग" म्हणतात.

टर्शरी युगानंतर काळातील भूरूपे सध्या अस्तित्वात आहेत.

भूस्वरूपे पृथ्वीतलावर युवा अवस्थेत आहेत.

जगतील सर्वात मोठी सागरी डोह मरिआना (piyacific) (११०३३ मी)

भूस्वरुपाचे उत्पतीनुसार तीन गटांत वर्गीकरण करण्यात येते.



प्रथम श्रेणीचे भूउठाव
०१. भूखंडे (महाद्विप )
०२. महासागर

भूखंड आणि महासागर यांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे झालेली आहे.

पृथ्वीच्या अंतर्गत भाग उंचावून भूखंडाची निर्मिती तर पृथ्वीचा अंतर्गत भाग खचून महासागराची निर्मिती झाली. भूमीखंड आ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/pruthvivareel-bhurupe.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
द्वितीय श्रेणीचे भूमिस्वरूपे
भूखंड आणि महासागर यांतील अंतर्गत शक्तीमुळे भूखंडावर आणि महासागरावर काही भूस्वरूपाची निर्मिती झाली यांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात येते.

भूखंडावरील भूमीस्वरूपे
०१. पर्वत
०२. पठार
०३. मैदान

सागरावर भूमीस्वरूपे
०१. भूखंड मंच
०२. भूखंड उतार
०३. सागरी मैदान
०४. गर्त

पर्वत
९०० मी पेक्षा उंच असलेल्या उंचवट्यास पर्वत असे म्हणतात.

पर्वताचे वर्गीकरण .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/pruthvivareel-bhurupe-part2.html
झारखंडने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७' मंजुर केले
झारखंडच्या राज्य मंत्रिमंडळाने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७' ला त्यांची मंजुरी दिली आहे.

मनाविरुद्ध किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतरण करण्यास प्रेरित करणे हा एक अजामीन गुन्हा असेल, असे हे विधेयक स्पष्ट करते.

कायद्याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा ५०००० रूपये दंड शिक्षा म्हणून दिली जाईल. जर अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचीत जातीजमाती समुदायातील व्यक्ती असल्यास शिक्षा चार वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंड असा होईल.



FICCI चे पुढील महासचिव संजय बारू
फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) चे पुढील महासचिव म्हणून पदासाठी संजय बारू यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड ए. दिदार सिंग यांच्या जागेवर करण्यात येत आहे. बारू १ सप्टेंबर २०१७ पासून महासचिवचा पदभार सांभाळतील.

FICCI ही भारतामधील व्यावसायिक संस्थांची .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca03and04juy2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत

अंतर्गत शक्ती
याला निर्माणकारी शक्ती असे म्हणतात.
याच्या परिणामस्वरूप अभिसरण शक्ती कार्यरत असतात.

याचे दोन प्रकार पडतात.
०१. मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती
०२. शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या शक्ती

या प्रकरणात आपण मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत.



महाद्विप व पर्वतांची निर्मिती या मंद गतीच्या शक्तीने होते.या शक्तीला भूप्रक्षोभ म्हणतात. भूप्रोक्षोभ प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या भूरुपानुसार त्याचे दोन गटात विभागणी होते.
०१. महाद्विपिय निर्माणकारी हालचाली (भूखंड निर्माणकारी)
०२. पर्वत निर्माणकारी हालचाली (गिरीजनक निर्माणकारी हालचाली)



भूखंड निर्माण करणारी
'इपिरोजेनी' नावाच्या ग्रीक शब्दापासून निर्मिती झाली.(उभ्या दिशेने व्याप)

या शक्तींमुळे पृथ्वीवर पठार आणि मैदानांची निर्मिती होते.

यांच्या मध्ये दोन प्रकार पडतात.


ऊर्ध्वगामी शक्ती दिशा पृथ्वी केंद्रापासून भूपृष्ठाकडे

या प्रकारच्या हालचालीमुळे महाद्विप दोन प्रकारे उंचावतो.

०१. प्रोत्थान (उभार) (उच्चयन)
काही वेळेस भूखंडाचा एखादा भूभा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/powers-operating-and-affectiong-onth.html
व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत 'रालोआ'चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसप्रणित 'यूपीए'चे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींचा पराभव केला आहे. महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.

अर्थतज्ज्ञ राजीव कुमार निती आयोगाचे नवे उपाध्यक्ष
निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली आहे.

अभिनेता अक्षय कुमार 'यूपी'चा स्वच्छतादूत
अभिनेता अक्षय कुमारची 'टॉयलेट एक प्रेम कहाणी' या चित्रपटाची कथा स्वच्छतेवर आधारित आहे. याची दखल घेत अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी जाहीर केले.

बढत्यांमधील आरक्षण रद्द
सरकारी कर्मचाऱ्यांना बढत्यांमध्ये सरसकट ३३ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा १७ वर्षांपूर्वीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अवैध ठरवून रद्दबातल केला.

'जेएनएनयूआरएम'मध्ये महाराष्ट्राची बाजी
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानात (जेएनएनयूआरएम) महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत बाजी मारली आहे.

बोल्टच्या १०० मीटरची शर्यतीची अखेर ब्राँझने
वेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याला आपल्या १०० मीटर शर्यतीच्या कारकिर्दीची अखेर ब्राँझपदकाने करावी लागली. अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने सुवर्ण आणि ख्रिस्तीयन कोलोमनने रौप्यपदक पटकाविले.

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात २० वर्षानंतर हिंदू खासदार
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये २० वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रिपदी निवड झाली आहे

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची अधिकृत माघार
पॅरिस येथे २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचा इरादा अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना कळवला आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca06and07august2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
आकस्मिक शक्ती (शीघ्रगतीने)
भूकंप
वर्चेस्टर यांच्या मते भूकंप म्हणजे, "पृथ्वीच्या पृष्ठभागातील खडकांचे संतुलन क्षणिक बिघडणे होय."

पृथ्वीच्या पृष्ठभागास सरासरी दर तीन मिनिटाला एक भूकंप होतो. बहुतेक भूकंप हे सागरपातळीशी होतात. भूकंपाची नोंद 'सिस्मोग्राफ' यंत्रावर होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल मध्ये मोजतात.

भूकंपाची कारणे
०१. ज्वालामुखी विस्फोट
१८८३ मध्ये आग्नेय आशियातील जावा-सुमात्रा जवळील क्राकाटोंआ

०२. प्रस्तरभंग
तणाव व हालचाली मधून
भारतात १९४३ साली बिहारमध्ये व १५ ऑगस्ट १९५० मधील आसाम भूकंप.

०३. स्फटिकीकरण / स्फटीकीभवन

०४. समस्थायीस्त्वाचे असमायोजन किंवा संतुलन मूलक सिद्धांत
१८८९ मध्ये त्याठिकाणाचा 'डटन' येथे हा सिद्धांत मांडला.

०५. प्रत्यास्थ / प्रतिस्कंदन सिद्धांत.
डॉ. रीड यांनी मांडला.
गाळाच्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात संचयनामुळे तेवढा भाग खचला जातो.
१९६७ मध्ये कोयनाचे भूकंप.

०६. पृथ्वीचे आकुंचन
डॅना नावाच्या शास्त्रज्ञानाने मांडला ( .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/power-affecting-on-earth.html
भारतामधील पहिले खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प हैदराबादमध्ये
कल्याणी राफेल अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स (KRAS) या भारतामधील पहिल्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उप-प्रणाली निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे.

भारतातील पहिली हेली-टॅक्सी सेवा बंगळूरुमध्ये
नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये हेली-टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे हेलिकॉप्टरद्वारे शहरात टॅक्सीसेवा प्रदान करणारे बेंगळुरू हे देशातील पहिले शहर बनले आहे.

मोहम्मद मुस्तफा SIDBI चे नवे चेअरमन
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) चे नवे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून मोहम्मद मुस्तफा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.

श्रीशांतवरील आजन्म बंदी न्यायालयाने हटविली
इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) सामन्यांमध्ये 'स्पॉट फिक्‍सिंग' केल्याच्या आरोपावरून आजन्म बंदी घातलेला एस. श्रीशांतवरील बंदी हटविण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला दिला.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मो फराहने १०००० मीटरचे सुवर्णपदक जिंकले
मोहम्मद फराह या धावकाने लंडन (इंग्लंड) मध्ये आयोजित 'IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१७' स्पर्धेत पुरुषांच्या १०००० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

विजेंदर सिंगने WBO ओरिएंटल, एशिया पॅसिफिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले
विजेंदर सिंगने WBO ओरिएंटल सुपर मिडिलवेटचे विजेतेपद जिंकले. याशिवाय त्याने WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडिलवेटचेही विजेतेपद जिंकले.

कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून हसन रोहानी यांनी दुसर्‍यांदा शपथ घेतली
इराणचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी पुन्हा एकदा आपल्या दुसर्‍या कार्याकाळासाठी पदाची शपथ घेतली आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca07and08august2017.html
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
वॉरसेस्टर यांच्या मते "ज्वालामुखी सामान्यत: एक गोल किंवा जवळ जवळ गोलाकार छिद्र् असून यातून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त वायू, द्रव्य, लाव्हारस आणि खडकांचे तुकडे बाहेर पडतात."

ज्वालामुखी क्रियेतून बाहेर पडणारे पदार्थ.
घन पदार्थ
०१. राख - Ash

०२. टफ - राखेच्या संघटीत तुकडयास

०३. स्कोरिया
हरभऱ्याच्या आकाराच्या खडकांच्या तुकड्यांना स्कोरिया असे म्हणतात.

०४. ब्रेसिया
स्कोरियाच्या संघटीत रुपासच ब्रेसिया असे म्हणतात.

०५. झमक (प्युमिक)
ब्रेसियाला जर बुडबुड्याचा आकार प्राप्त झाला असेल तर अशा खडकांच्या संघटीत रुपास झमक किंवा प्युमिक असे म्हणतात.

०६. लेपिली
सुपारीसारख्या मोठ्या तुकड्यांना लेपिली (लेपिली) म्हणतात.

०७. ज्वालामुखी बॉंब (Volcano Bomb)
काही मी व्यासाच्या खडकांच्या तुकड्यांना ज्वालामुखी बॉंब म्हणतात.

द्रव पदार्थ
ज्वालामुखी चिखल

लाव्हा
०१. ऍसिड लाव्हा - यात जवळपास ६० ते ७०% सिली .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/powers-affecting-on-earth.html