MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
१ जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक
केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे १ जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे.

केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत १२ अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल.


महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०१७ पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे अश्या प्रत्येक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca29and30june2017.html
कालावधी : १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
अध्यक्ष : इंद्रकुमार गुजराल (१९९७-१९९८)
अटलबिहारी वाजपेयी (१९९८ नंतर)
उपाध्यक्ष : मधू दंडवते (१९९८ पर्यंत)
जसवंतसिंग (१९९८-१९९९)
के.सी. पंत (१९९९ नंतर)
प्रतिमान : अमर्त्य सेन
विकासदर : ५.५% (उद्दिष्ट ६.५%)
खर्च : ९४१०४० कोटी (प्रस्तावित ८९५२०० कोटी)


वैशिष्ट्ये
न्यायपूर्वक वितरण, समानता पूर्वक विकास हे या योजनेचे घोषवाक्य होते.

आखणीच्या वेळी एच. डी. देवगौडा हे अध्यक्ष होते तर उपाध्यक्ष मधू दंडवते होते.वाजपेयी अध्यक्ष असतांना जसवंत सिंग हे उपाध्यक्ष होते.

एन. डी. सी ने या योजनेची कागदपत्रे १० .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/Ninth-Five-Year-Plan.html
भारताचे नवे महान्यायवादीपदी के. के. वेणुगोपाल यांची निवडके. के. वेणुगोपाल यांना भारताचे १५ वे महान्यायवादी (Attorney General of India) म्हणून नेमण्यात आले आहे. ही नियुक्ती मुकुल रोहतगी यांच्या जागी करण्यात आली आहे.

वेणूगोपाल हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि संवैधानिक तज्ञ आहेत. ते पद्मभूषण, पद्म विभूषण (२०१५) सन्मान प्राप्त आहेत.

भारतीय संविधानातील कलम ७६ अन्वये महान्यायवादी पदाची नियुक्ती केली जाते. महान्यायवादी यांना भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये ऐकण्याचा अधिकार आहे तसेच संसदेच्या कार्यवाहीम .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca01and02july2017.html
कालावधी : १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
अध्यक्ष : अटलबिहारी वाजपेयी
डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : के.सी. पंत (२००४ पर्यंत)
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रतिमान : पार्थ सारथी
घोषवाक्य - समानता व सामाजिक न्याय
विकासदर : ७.७% (उद्दिष्ट ७.९%)
खर्च : १६१८४६० कोटी (प्रस्तावित १५२५६३९ कोटी)


वैशिष्ट्ये
१ सप्टेंबर २००१ ला एनडीसीने १०व्या योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली.

या योजनेतील एकूण राजकोषीय तूट जी.डी.पी च्या ४.७% तर महसूली तूट २.९% राहणार आहे.

२००२ ते २००७ या दरम्यान जीडीपीत सरासरी वार्षिक ८% दराने वाढ घडवून आणण्याचे ठरविण्यात आले. कृषी क्षेत्रा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/10th-Five-Year-Plan.html
कालावधी : १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : मॉन्टेकसिंह अहलुवालिया
योजनेचे शिर्षक : वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे
विकासदर : ७.९ % (उद्दिष्ट ९%)
खर्च : २७०००० कोटी


वैशिष्ट्ये
दिनांक १९ डिसेंबर २००७ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मान्यता दिली.

गुंतवणूक आराखडा ३६,४४,७१८ कोटी रु. ठरविण्यात आला. त्यात केंद्राचा वाटा २१,५६,५७१ कोटी (५९.२%) आणि राज्याचा वाटा -१४,८८,१४७ कोटी (४०.८%) होता. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/11th-Five-Year-Plan.html
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती
अचल कुमार ज्योती यांची भारताचे पुढील म्हणजेच २१ वे मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी निवड करण्यात आली आहे. ज्योती ६ जुलै २०१७ रोजी नसीम झैदी यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

६४ वर्षीय ज्योती सध्या भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून ओ. पी. रावत यांच्या बरोबर कार्य करीत आहेत. ज्योती हे गुजरात संवर्गातील IAS अधिकारी आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त पदाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंतचा असतो, जे आधी होईल ते. त्यांना केवळ संसदेद्वारे महाभियोगाच्या माध्यमातू .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca03and04july2017.html
शासकीय अर्थसंकल्प / अंदाजपत्रक
इंग्रजीत Budget हा शब्द फ्रेंच Bougette या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. Budget हा शब्द सर्वप्रथम इंग्लंडमध्येच वापरण्यात आला.

पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमाखर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवावयाच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसींचा ज्या कागदपत्रात समावेश असतो त्यास Budget किंवा अर्थसंकल्प असे म्हणतात.

१७३३ मध्ये इंग्लंडमध्ये बजेट हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला.पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदेमंडळा पुढे विचारार्थ ठेवावयाच्या प्राथमिक स्वरूपातील योजनाचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रात केलेला आहे त्यास बजेट असे म्हणतात.
७ एप्रिल १८६० रोजी पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला.

स्वातंत्र्यापूर्वी अंतरिम सरकारमधील अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी मांडला.

स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के.षन्मुखम शेट्टी यांनी मांडला.

भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जाॅन मथाई यांनी मांडला

तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांनी इ.स.१९५५-५६ पासुन अर्थसंकल्पाची हिंदी प्रत सादर करण्यास सुरू .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/Indian-Union-Budget.html
यावरून अर्थसंकल्पाचे पुढील तीन प्रकार पडतात.
०१. संतुलित अर्थसंकल्प : अंदाजित उत्पन्न = अंदाजित खर्च

०२. शिलकी / अधिक्याचा अर्थसंकल्प : अंदाजित उत्पन्न > अंदाजित खर्च

०३. तुटीचा अर्थसकल्प : अंदाजित उत्पन्न < अंदाजित खर्च

भारतासारख्या विकसनशील देषात तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. कारण त्यामुळे विकासाला गती मिळते.अर्थसंकल्पीय तुट ही संकल्पना मागे पडल्याने यांस राजकोषीय तुट असे म्हणतात.

तुटीच्या अर्थभरण्याचे स्त्रोत
०१. परकीय मदत
०२. परकीय कर्ज
०३. RBI कडुन कर्ज काढणे
०४. व्यापारी बॅंकाकडुन कर्ज
०५. नवीन चलन निर्मिती

तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम
०१. सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते.
०२. चलनवाढ (भाववाढ)
०३. सक्तीची बचत (निश्चित उत्पन्न असणाऱ्या लोकांचा वस्तु व सेवांचा उपभोग कमी होतो अर्थात सक्तीची बचत होते.)
०४. खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल
०५. बँकांची पतनिर्मिती वाढते.

निष्कर्ष-
०१. तुटीच्या अर्थभरण्याचा मर्यादीत .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/government-budget.html
भारत, थायलंड यांच्या सैन्यांमधील युद्धाभ्यासाला सुरुवात
४ जुलै २०१७ रोजी भारत आणि थायलंड यांनी "एक्झरसाइज मैत्री-१७" या संयुक्त सैनिकी युद्धाभ्यासाला सुरुवात झाली आहे.

हा सराव २ आठवडे चालणार आहे. या सराव हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील बक्लोह येथे सुरू आहे

१९९० सालच्या "अॅक्ट इजी" धोरणांतर्गत दोन्ही देशांमधील संबंधांना वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत



इस्राइलच्या फुलाला 'मोदी' हे नाव देण्यात आले
इस्राइलमध्ये आढळणार्‍या फुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून 'मोदी' असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान तीन दिवसांच्या इस्राइल दौर्‍यावर आहेत.

इस्रायलच्या 'क्रायसंथूमुन' जातीच्या .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca05and06july2017.html
जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतुने शासनाने जनतेकडुन सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय.

Tax हा शब्द (Taxo) या लॅटीन शब्दापासुन तयार झालेला आहे.

कर आकारण्याचे प्रमुख चार उद्देश असतात यांना 4R असे म्हणतात.

०१. Revenue ( महसुल )
शासनाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत

०२. Redistribution (पुनर्वाटणी)

०३. Repricing (किंमतीमध्ये बदल करणे)
शासन तंबाखु दारू सारख्या बाबींवर जास्त कर आकारते ज्यामुळे त्याच्या किंमती वाढतात.

०४. Representation (प्रतिनिधीत्व)
सध्या हा मुद्दा लागु नाही.


करांचे वैशिष्टये
०१. कर हे सक्तीचे देणे असते.
०२. वापर सार्वजनिक हितासाठी. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/tax-system.html
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध २७ पदांची भरती
एकूण पदे :२७

वयोमर्यादा : २९ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १९ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/07/blog-post_7.html
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात विविध १३८ पदांची भरती
एकूण पदे :१३८

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹३००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹१५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २७ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/07/blog-post_20.html
अप्रत्यक्ष कर
केंद्रीय उत्पादन शुल्क / केंद्रीय अबकारी कर
कायदा : Central Excise Act १९९४ नुसार देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तुंवर हा कर आकारला जाउ शकतो.

सध्या २४० वस्तुच अशा आहेत की ज्यांच्यावर उत्पादन शुल्क आकारला जात नाही.

२०१४-१५ ला २०७११० कोटी (१० टक्के) इतके कर उत्पन्न अपेक्षित (राज्य सरकार दारू व मादक पदार्थांवर कर आकारते)


सीमा शुल्क (Custom Duty)
कायदा : Customs Act १९६२ नुसार आयात-निर्यात मालावर लावला जाणारा कर.

आयात करास Teriff असे म्हणतात. याचा उद्देष देषी उदयोगांना संरक्षण देणे हा असतो.

निर्यात वृध्दीसाठी निर्यात शुल्क सतत कमी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/tax-system_1.html
भारताचा परकीय व्यापार
दोन भागांत वर्गीकरण

अंतर्गत व्यापार (Internal Trade)
०१. घाउक व्यापार
०२. किरकोळ व्यापार

आंतरराष्ट्रीय व्यापार
०१. आयात व्यापार
०२. निर्यात व्यापार
०३. पुनर्निर्यात व्यापार



परकीय चलन भांडार (Foreign Exchange Reserve)
कोणत्याही अर्थव्यवस्थेत कोणत्याही वेळी विदेशी चलनाची जी व्यवस्था असते. त्यास परकिय चलन भांडार असे म्हणतात. ही एक व्यापक संकल्पना असुन यामध्ये
०१. विदेषी मुद्रा भांडार (RBI कडे)
०२. RBI स्वर्ण भांडार (Gold Reserve)
०३. SDR (Special Drawing Right) प्रत्येक देशाचा IMF मधील वाटा.
०४. RIP (Reserve Tranche Position) IMF कडील .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/International-Trade.html
बंगालच्या उपसागरात भारत-अमेरिका मलबार सरावाला सुरुवात
७ जुलै २०१७ रोजी भारत आणि अमेरिका यांच्या नौदलांतील 'मलबार' या संयुक्त सरावाला सुरुवात झाली आहे. हा सराव १७ जुलै २०१७ पर्यंत चालणार आहे.

जपान देखील या सरावाचा कायम भागीदार बनला आहे. या सरावात देशाच्या सागरी क्षेत्रात आणि समुद्रात प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच मानवतावादी कार्यांसह युद्धसरावांचा तज्ञांकडून अनुभव घेतला जाणार आहे.



भारत आणि इस्राइल यांच्यात सात सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४-६ जुलै २०१७ या काळात इस्राइलचा दौरा पूर्ण केला आहे.

दोन्ही देशांनी 'जल व कृषी विषयक धोरणात्मक भागीदारी' स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. शिवाय या भागीदारीच्या व्यवस्थापनेसाठी संयुक्त कार्यदल उभे करण्यास मान्यता दर्शवली आहे.

या भागीदारीत जलसंवर्धन, सांडपाण्यावर उपचार, कृषी विषयक तसेच प्रगत जल तंत्रज्ञानाचा वापर करून गंगा आणि इतर नद्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल.

या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये वि .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca07and08july2017.html
स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून नेपाळमध्ये 'डिजिटल व्हिलेज'
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नेपाळमध्ये 'डिजिटल व्हिलेज' उपक्रमांतर्गत एका गावाचा कायापालट केला आहे. या गावातील सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास सुरवात झाली आहे.

काठमांडूपासून पूर्वेला २५ किलोमीटर अंतरावर जारीसिंगपौवा हे गाव आहे. या गावात 'डिजिटल व्हिलेज' उपक्रम राबविण्यात आला आहे. या गावात पैसे काढणे व भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे. या गावातील नागरिकांना ४३० डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे.

गावातील डिजिटल केंद्राचे उद्‌घाटन नेपाळ राष्ट्र बॅंकेचे गव्हर्नर चिरंजिवी नेपाळ आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले. या गावातील रस्त्यावर सौरऊर्जेवरील दिवेही लावण्यात आले आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेपाळमधी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca09and10july2017.html
व्याख्या
१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि भागाकार तीच संख्या असते

२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.

३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्ये .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/vibhajyatechya-kasotya.html
रुपयाची परिवर्तनीयता
जगातील चालणे परस्परांमध्ये विनिमयक्षम असतात. मात्र सरकार त्यावर काही बंधने टाकत असते.

मात्र जेव्हा एखादे चलन मुक्तपणे विनिमयक्षम असते. त्यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नसते. अशा चलनाला परिवर्तनीय चलन म्हटले जाते. यात विनिमय दर सरकार ठरवीत नाही तर दोन्ही चलनाची मागणी आणि परस्परांच्या संयोगाने बाजारात ठरविला जातो.

या सर्व व्यवहारांसाठी बाजारात ठरलेला Market Determined एकाच दर असेल. म्हणून या संपूर्ण व्यवस्थेला पूर्ण परिवर्तनीय व्यवस्था (Fully Convertible System) असे म्हणतात.

पूर्ण परिवर्तनीय व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारची बंधने घातल्यास ती अंशतः परिवर्तनीय व्यवस्था (Partially Convertible System) ठरते. यामध्ये चलन फक्त काही व्यवहारांसाठी मुक्तपणे परिवर्तनीय असते. यात एकापेक्षा अधिक विनिमय दरांचा वापर केला जा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/exchange-rate-of-rupee.html
लोकसभा सचिवालयात 'कनिष्ठ लिपिक'च्या ३१ पदांची भरती

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

एकूण पदे :३१

किमान शैक्षणिक पात्रता :
कोणतीही पदवी
हिंदी व इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनट

वयोमर्यादा :२७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, OBC, महिला, अपंग

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ९ ऑगस्ट २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/07/blog-post_11.html
किंमत चलनवाढ अशी स्थिती आहे की ज्यामध्ये पैशाचे मूल्य घटते आणि पातळीत वाढ होते. - क्रॉउथर

अधिक झालेला पैसा जेव्हा कमी वस्तूंचा पाठ्लाग करतो त्या स्थितीला चलनवाढ असे म्हणतात. - कोलबर्न

इंग्रजीत ज्याला (inflattion) म्हणतात. त्यालाच मराठीत चलनवाढ, चलनविस्तार, किंमतवाढ, भाववाढ, मुद्रास्फिती किंवा चलनफुगवटा असे अनेक शब्द वापरले जातात.

याचा साधा अर्थ म्हणजे वस्तू व सेवांच्या सामान्य किंमती पातळी मध्ये विशिष्ट कालावधीत झालेली वाढ.

दुसऱ्या भाषेत पैशाच्या मूल्यात झालेली घट म्हणजे वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी जास्त रक्कम मोजावी लागण्याची स्थिती.

चलनवाढ
एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूच्या किंमत पातळीत होणारी वाढ
चलनाची खरेदी शक्ती कमी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/Inflation.html
ए. आर. रहमान यांना वर्ल्ड साउंडट्रॅक पुरस्कार जाहीर
ऑस्करविजेता संगीतकार ए. आर. रहमान यांना वर्ल्ड साउंडट्रॅक पब्लिक चॉइस अवॉर्ड २०१७ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 'व्हाईसरॉयज हाऊस' या चित्रपटातील त्यांच्या संगीतासाठी दिला जाणार आहे.

हा पुरस्कार एक जनसामन्यांच्या आवडीतून देण्यात येणारा पुरस्कार आहे. गेल्या १२ महिन्यांतील सर्वोत्कृष्ट संगीतधुनींना निवडून जगभरातील चाहत्यांकडून पुरस्काराच्या विजेत्याला निवडण्यासाठी मतदान केले जाते.
‘व्हाईसरॉयज हाऊस’ हा चित्रपट ब्रिटिश चित्रप .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca11and12july2017.html