MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
चंद्रपूर औष्णिक केंद्रात ९ वा संच
०१. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅटचा ९ व्या क्रमांकाचा संच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकदृष्टय़ा सुरू करण्यात येणार आहे. नववा संच सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट होणार आहे. हा सर्वात मोठा वीज प्रकल्प राहणार आहे.

०२. आशिया खंडातील क्रमांक दोनचे विजनिर्मिती केंद्र, अशी या महाऔष्णिक विद्युत केंद्राची ओळख होती. कालांतराने ती पुसली गेली. दरम्यान, ५०० मेगावॅटचा आठव्या क्रमांकाचा संच ५ जुलैला व्यावसायिकदृष्टय़ा सुरू झाला. आता नवव्या क्रमांकाचा संचही तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे.

०३. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र एकमेव आहे ज्या केंद्राचे स्वत:चे इरई धरण आहे. या धरणातूनच या वीज केंद्राला नियमित पाणी पुरवठा होतो, तसेच वेकोलिच्या कोळसा खाणीही या केंद्राच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे कोळशा व पाण्याची टंचाई या केंद्राला कधीच जाणवली नाही.
न्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती न्यायाधीश
०१. अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये ४७ वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्तीकेली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.

०२. भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२ पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

०३. गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत. दामोदर गुजराती यांनी १९६० मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती. तसेच 1965 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.
कॅसिनी यान प्रवासाच्या अंतिम टप्प्यात
०१. शनी व त्याची कडी व चंद्र यांचा अभ्यास केल्यानंतर आता नासाचे कॅसिनी यान त्याच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात जाणार आहे. आता ते शनि ग्रह व त्याच्या कडय़ांची अधिक जवळून निरीक्षणे करणार आहे. या ऐतिहासिक वैज्ञानिक सफरीची सांगता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण त्याआधी दोन टप्प्यांचा कार्यक्रम हे यान पूर्ण करणार आहे.

०२. ३० नोव्हेंबरला कॅसिनी यान शनिच्या कडय़ाच्या कक्षांमध्ये जाणार असून, त्याला एफ रिंग ऑर्बिट्स असे म्हणतात. कॅसिनी यान एफ रिंगपासून ७८०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. एफ रिंग कक्षांमध्ये ही कडी व शनिचे लहान चंद्र अधिक स्पष्टपणे दिसणार आहेत. गेल्या वेळी २००४ मध्ये हे यान शनिजवळ गेल्यानंतर कडय़ांच्या अगदी जवळ गेले होते.

०३. कॅसिनीचा अंतिम टप्पा हा ग्रँड फायनल म्हणून ओळखला जात असून तो पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल. शनिच्या टायटन या चंद्राच्या अगदी जवळून हे यान मार्गस्थ होईल व शनि तसेच त्याच्या कडय़ांमधील जागेतून हे यान जाणार असून, त्यात २४०० किलोमीटरचा आतापर्यंत न पाहिला गेलेला भाग बघितला जाणार आहे.

०४. कडय़ांवरील धुळीच्या आकाराचे कण तपासले जाणार आहेत. शनिची अशी मापने प्रथमच केली जाणार आहेत. एफ रिंगचा अभ्यास महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात यान वेगळय़ा कक्षेतून प्रवास करणार आहे. २०१६ पासून कॅसिनी यानाची कक्षा बदलण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केले आहेत.
*बलुच भाषेत संकेतस्थळ व मोबाईल ऍप*
०१. बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने (एआयआर)आखली आहे. येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.

०२. बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे.

०३. बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती.

०४. सध्या 'ऑल इंडिया रेडिओ'चे १०८ देशांमध्ये प्रसारण होते. २७ भाषांमध्ये विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांत १५ परदेशी भाषांचा अंतर्भाव आहे.
*भारतीय नौदलात मोरमुगाओचे जलावतारण*
०१. भारतीय नौदलाच्या मोरमुगाओ या दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेचा अनावरण सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. मोरमुगाओची बांधणी नौदलाच्या मुंबईच्या माझगाव येथील गोदीत करण्यात आली आहे. मोरमुगाओ ही १५ बी प्रकल्पातील दुसरी युद्धनौका असून ही भारतीय नौदलातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे.

०२. नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा व त्यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईच्या समुद्रात मोरमुगाओचा जलावतरण सोहळा पार पडला. प्राथमिक चाचण्यांनंतर मोरमुगाओ पुढील दोन वर्षांत ही नौदलात सहभागी होणार आहे.

०३. मारूमुगाओचे पाण्यातील आकारमान ७३०० टन असून ही युद्धनौका ३० नॉट इतक्या वेगाने प्रवास करू शकते. या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवर हवेत मारा करणारी आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे तैनात असतील.

०४. या युद्धनौकेवरून पाणबुडीविरोधी युद्धतंत्राने सुसज्ज असलेली हेलिकॉप्टर्सही वाहून नेता येतील. आगामी काळात या विनाशिकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका ५६ किमी प्रतीतास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे.

०५. या नौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. 'मारमुगाओ'वर ईस्त्राइलमध्ये विकसित झालेली मल्टी फंक्शन सर्व्हिलान्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून तिची ओळख झाली आहे.
*अर्जुन पुरस्कार प्रदान*
०१. क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. अजिंक्य रहाणेला या वर्षीचा तर रोहित शर्माला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

०२. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.
*सांस्कृतिक संचालकपदी संजय पाटील*
०१. सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकाची जबाबदारी संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच पाटील या पदाचा भार स्वीकारतील.

०२. अजय आंबेकर हे संचालकपदावरून गेल्यानंतर संचालकपदाचा प्रभारी कार्यभार शैलेश जाधव आणि संजय पाटील यांनी सांभाळला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाटील सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळतील.
*चीनने अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले*
०१. अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे चीनने प्रक्षेपण केले. २०२२ पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
*सौरभ वर्मा उपविजेता*
०१. भारताच्या सौरभ वर्माला बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत फ्रान्सच्या पाचव्या मानांकित लुकास कोव्र्हीने सरळ सेटमध्ये सौरभवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. लुकासने ४३ मिनिटांच्या लढतीत बिगरमानांकित सौरभचा २१-१९, २१-१९ असा पराभव केला.
*नेमबाजी विश्वचषकात भारताला तीन सुवर्णपदके*
०१. आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. शुभंकर प्रामाणिक, संभाजी पाटील यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले.

०२. शुभंकर प्रामाणिकने अझरबैजान येथे सुरू असलेल्या स्पर्धेत २०५.५ गुणांची कमाई करत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात बाजी मारली. चेक प्रजासत्ताकच्या फिलीप नेपेजचॅल (२०५.२) आणि रोमानियाच्या ड्रॅगोमीर लोर्डाचे (१८५.१) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

०३. या स्पर्धेत २७ देशांतील २७९ नेमबाजांनी सहभाग घेतला आहे. पात्रता फेरीत शुभांकरने ६१३.८ गुणांसह सहावे स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

०४. संभाजीने २५ मीटर स्टॅण्डर्ड पिस्तूल प्रकारात भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने ५६२ गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाच्या सेर्गेई इव्हग्लेव्हस्की (रौप्य) आणि जेम्स अ‍ॅशमोर (कांस्य) यांना पराभूत केले.

०५. सांघिक प्रकारातही संभाजीने गुरमीत आणि रितुराज सिंग यांच्यासह दिवसातील तिसरे सुवर्ण जिंकले. याच्यासह भारताने रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले.

०६. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गायत्री निथ्यानदम, सोनिका आणि आयुशी पोद्दार यांचा या संघात समावेश होता.
*हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला ए.पी.ए.क्यू.जी चे सदस्यत्व*
०१. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. हे सदस्यत्व ‘मतदानाच्या हक्कासह पूर्ण सदस्यत्व’ या वर्गातील आहे.

०२. एपीएक्युजीचे सदस्यत्व इंटरनॅशनल एअरोस्पेस क्वॉलिटी ग्रुप अंतर्गत प्राप्त करणारा भारत हा जगात सातवा देश आहे. इतर देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि जपानचा समावेश आहे, असे कंपनीने निवेदनाद्वारे कळविले आहे.

०३. एअरोस्पेस क्वॉलिटीमध्ये सुधारणा घडविण्याचे काम करणाऱ्या एअरोस्पेस क्वॉलिटीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एचएएल जागतिक पातळीवर पोहोचला आहे. आता एचएएल जागतिक पातळीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ शकेल तसेच सध्याचा आणि नवा दर्जा सुधारणे व त्याचा आढावा घेणे यातही त्याला भाग घेता येईल, असे एचएएलचे मुख्य कार्यकारी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी सांगितले.
*भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद*
०१. भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनने एक परिषद स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. चीनमधील हुनान प्रांतात या परिषदेचे मुख्यालय राहील. भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीन सरकारने स्थापन केलेली ही पहिली अधिकृत सरकारी संस्था ठरणार आहे.

०२. चायना कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ इंटरनॅशनल ट्रेड (सीसीपीआयटी) ही ती संस्था स्थापन केली जाणार आहे. तिचा कार्यकाळ २ वर्षांचा राहील. हुनानमधील सीसीपीआयटीच्या उप समितीचे चेअरमन हे जियान यांनी नव्या संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली.

०३. हुनानची प्रांतिक राजधानी चांगशा येथील सीसीपीआयटीच्या कार्यालयातूनच नव्या संस्थेचे कामकाज चालेल. नवी दिल्ली व हैदराबाद येथेही कार्यालये असतील. भारतात होणाऱ्या चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहित करणे तसेच समन्वय करणे ही कामे संस्था करील.

०४. भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय व्यापार ७0,७१ अब्ज डॉलरचा आहे. २0१५ मध्ये चीनची जागतिक आयात-निर्यात २४.५९ निखर्व युआन होती. गेल्याच महिन्यात भारत-चीन वित्तीय वाटाघाटी झाल्या. त्यावेळी चीनचे वित्त उपमंत्री शी योआबीन यांनी सांगितले होते की, गेल्या वर्षीपर्यंत चीनची भारतातील गुंतवणूक ४.0७ अब्ज डॉलर होती.