MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
*कर्कविरोधी औषधाला कृत्रिम पर्याय*
०१. चीनमधील तिबेटच्या उंच पठारी प्रदेशात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या 'वाइल्ड कॅटरपिलर फंगस' नावाच्या औषधीला चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम पर्याय शोधून काढला आहे. या औषधीत कर्करोगविरोधी गुणधर्म असून शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासही ती उपयोगी आहे.

०२. चीनमधील क्विंघाय-तिबेट पठारी प्रदेशात 'वाइल्ड कॅटरपिलर फंगस' नैसर्गिकरीत्या आढळते. त्याला स्थानिक भाषेत 'विंटर वर्म' किंवा 'समर ग्रास' या अर्थाच्या नावाने ओळखले जाते.

०३. 'ऑफिओकॉर्डिसेप्स सायनेन्सिस' नावाची बुरशीची प्रजाती घोस्ट मॉथ नावाच्या पतंगाच्या अळ्यांमध्ये परजीवी म्हणून वाढते. नंतर अळी मरून त्याचा सुरवंटासारखा दिसणारा फळसदृश भाग तयार होतो. त्यालाच 'वाइल्ड कॅटरपिलर फंगस' म्हणतात.

०४. तिबेटमध्ये त्याचा स्थानिक औषधींमध्ये पूर्वापार वापर होत आला आहे. आधुनिक विज्ञानाला त्याच्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढून किंमतही भलतीच वाढली. अगदी डोंगराळ प्रदेशातील लहान गावांतही त्याला सोन्याच्या बरोबरीने किंमत मिळते.

०५. मात्र या औषधीच्या वाढीचा वेग अतिशय मंद असून तिची व्यापारी उद्देशाने शेती करणे आजवर शक्य झालेले नाही. त्यामुळे औषध उत्पादन कंपन्यांना कच्च्या मालाच्या पुरवठय़ासाठी या प्रदेशात अल्प प्रमाणात मिळणाऱ्या औषधीवरच अवलंबून राहावे लागते. औषधीसाठी प्रमाणाबाहेर जमीन खणल्याने स्थानिक पर्यावरणही धोक्यात आले आहे.

०६. मात्र गेल्या ११ वर्षांच्या संशोधनाअंती चिनी शास्त्रज्ञांनी या दुर्मीळ औषधीला कृत्रिम पर्याय निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी कॅटरपिलर फंगसमधील अनावश्यक भाग काढून टाकून 'कॉर्डिसेप्स सायनेन्सिस' किंवा 'हिर्सुटेला सायनेन्सिस' हा उपयुक्त भाग वेगळा काढला आणि त्याची वाढ केली.

०७. अशा प्रकारे कृत्रिमरीत्या तयार केलेली औषधी व नैसर्गिक औषधी याच्या डीएनएमध्ये ९७ टक्केसाम्य आढळले. तसेच मूळ औषधी गुणधर्मही सारखेच राहिले. अशा प्रकारे किण्वन (फरमेंटेशन) प्रक्रियेद्वारे कॅटरपिलर फंगसची भुकटी तयार करण्यास चिनी सरकारने तांत्रिक व आर्थिक साहाय्य पुरवले.

०८. प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती केलेल्या औषधातून २० दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे वर्षांला २०० टन औषधी तयार करण्याचे या प्रकल्पांतर्गत उद्दिष्ट आहे.
* मरियप्पन थांगवेलू
०१. सहसा पॅरालिम्पिकमध्ये आपले खेळाडू फारसे चमकत नाहीत. मात्र थांगवेलू याने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णझेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

०२. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

०३. तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्य़ातील पेरियावादागाम्पती या खेडेगावातील रहिवासी. त्याच्यासह चार मुले व एक कन्या यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याच्या आईलाच करावी लागत असे. पाच अपत्यांना व पत्नीला वाऱ्यावर सोडून त्याचे वडील बेपत्ता झाले. वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मरियप्पनच्या आईने जिद्दीने या सर्वाना वाढविले.

०४. मरियप्पन हा केवळ पाच वर्षांचा असताना त्याला अपघात झाला. तो शाळेत जात असताना एका बसचालकाने त्याला उडविले. या अपघातात मरियप्पन याला उजवा पाय गमवावा लागला. त्याला कायमचे अपंगत्व आले.

०५. त्याच्या आईने या संकटासही धैर्याने तोंड दिले. नंतर तिने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

०६. शाळेत असताना मरियप्पन अन्य मुलांबरोबर व्हॉलीबॉल खेळत असे. व्हॉलीबॉलमध्ये स्मॅशिंगचा फटका मारत असताना तो खूप उंच उडी मारत असे. हे त्याच्या शाळेतील शारीरिक शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी मरियप्पन याला उंच उडीचा सराव करण्याचा सल्ला दिला. त्याने हा सल्ला मानला आणि उंच उडीचा सराव सुरू केला.

०७. दिव्यांगत्व येऊनही त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले एवढेच नव्हे तर त्याने व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी चांगल्या गुणांमध्ये प्राप्त केली.

०८. हे शिक्षण सुरू असताना त्याने उंच उडीच्या सरावात खंड पडू दिला नाही. दिव्यांग असले म्हणून निराश न होता संकटांना आत्मविश्वासाने सामोरे गेले तर अनपेक्षित यश मिळविता येते हे त्याने दाखवून दिले.

०९. शिक्षण व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. जर इच्छाशक्ती असेल तर या दोन्ही क्षेत्रांवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते याचा परिपाठ त्याने घालून दिला आहे. पॅरालिम्पिक क्रीडाप्रकारात करिअर करतानाही त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.

१०. कोणत्याही परदेशी प्रशिक्षकाची मदत न घेता व कोणत्याही जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध नसताना त्याने रिओ येथे तिरंगा ध्वज फडकाविला. सवलती व सुविधा नसल्याची कोणतीही तक्रार न करता त्याने हे यश मिळविले आहे.
चंद्रपूर औष्णिक केंद्रात ९ वा संच
०१. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅटचा ९ व्या क्रमांकाचा संच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकदृष्टय़ा सुरू करण्यात येणार आहे. नववा संच सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट होणार आहे. हा सर्वात मोठा वीज प्रकल्प राहणार आहे.

०२. आशिया खंडातील क्रमांक दोनचे विजनिर्मिती केंद्र, अशी या महाऔष्णिक विद्युत केंद्राची ओळख होती. कालांतराने ती पुसली गेली. दरम्यान, ५०० मेगावॅटचा आठव्या क्रमांकाचा संच ५ जुलैला व्यावसायिकदृष्टय़ा सुरू झाला. आता नवव्या क्रमांकाचा संचही तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे.

०३. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र एकमेव आहे ज्या केंद्राचे स्वत:चे इरई धरण आहे. या धरणातूनच या वीज केंद्राला नियमित पाणी पुरवठा होतो, तसेच वेकोलिच्या कोळसा खाणीही या केंद्राच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे कोळशा व पाण्याची टंचाई या केंद्राला कधीच जाणवली नाही.
न्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती न्यायाधीश
०१. अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये ४७ वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्तीकेली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.

०२. भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२ पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

०३. गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत. दामोदर गुजराती यांनी १९६० मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती. तसेच 1965 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.
कॅसिनी यान प्रवासाच्या अंतिम टप्प्यात
०१. शनी व त्याची कडी व चंद्र यांचा अभ्यास केल्यानंतर आता नासाचे कॅसिनी यान त्याच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात जाणार आहे. आता ते शनि ग्रह व त्याच्या कडय़ांची अधिक जवळून निरीक्षणे करणार आहे. या ऐतिहासिक वैज्ञानिक सफरीची सांगता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण त्याआधी दोन टप्प्यांचा कार्यक्रम हे यान पूर्ण करणार आहे.

०२. ३० नोव्हेंबरला कॅसिनी यान शनिच्या कडय़ाच्या कक्षांमध्ये जाणार असून, त्याला एफ रिंग ऑर्बिट्स असे म्हणतात. कॅसिनी यान एफ रिंगपासून ७८०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. एफ रिंग कक्षांमध्ये ही कडी व शनिचे लहान चंद्र अधिक स्पष्टपणे दिसणार आहेत. गेल्या वेळी २००४ मध्ये हे यान शनिजवळ गेल्यानंतर कडय़ांच्या अगदी जवळ गेले होते.

०३. कॅसिनीचा अंतिम टप्पा हा ग्रँड फायनल म्हणून ओळखला जात असून तो पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल. शनिच्या टायटन या चंद्राच्या अगदी जवळून हे यान मार्गस्थ होईल व शनि तसेच त्याच्या कडय़ांमधील जागेतून हे यान जाणार असून, त्यात २४०० किलोमीटरचा आतापर्यंत न पाहिला गेलेला भाग बघितला जाणार आहे.

०४. कडय़ांवरील धुळीच्या आकाराचे कण तपासले जाणार आहेत. शनिची अशी मापने प्रथमच केली जाणार आहेत. एफ रिंगचा अभ्यास महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात यान वेगळय़ा कक्षेतून प्रवास करणार आहे. २०१६ पासून कॅसिनी यानाची कक्षा बदलण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केले आहेत.
*बलुच भाषेत संकेतस्थळ व मोबाईल ऍप*
०१. बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने (एआयआर)आखली आहे. येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.

०२. बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे.

०३. बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती.

०४. सध्या 'ऑल इंडिया रेडिओ'चे १०८ देशांमध्ये प्रसारण होते. २७ भाषांमध्ये विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांत १५ परदेशी भाषांचा अंतर्भाव आहे.
*भारतीय नौदलात मोरमुगाओचे जलावतारण*
०१. भारतीय नौदलाच्या मोरमुगाओ या दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेचा अनावरण सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. मोरमुगाओची बांधणी नौदलाच्या मुंबईच्या माझगाव येथील गोदीत करण्यात आली आहे. मोरमुगाओ ही १५ बी प्रकल्पातील दुसरी युद्धनौका असून ही भारतीय नौदलातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे.

०२. नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा व त्यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईच्या समुद्रात मोरमुगाओचा जलावतरण सोहळा पार पडला. प्राथमिक चाचण्यांनंतर मोरमुगाओ पुढील दोन वर्षांत ही नौदलात सहभागी होणार आहे.

०३. मारूमुगाओचे पाण्यातील आकारमान ७३०० टन असून ही युद्धनौका ३० नॉट इतक्या वेगाने प्रवास करू शकते. या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवर हवेत मारा करणारी आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे तैनात असतील.

०४. या युद्धनौकेवरून पाणबुडीविरोधी युद्धतंत्राने सुसज्ज असलेली हेलिकॉप्टर्सही वाहून नेता येतील. आगामी काळात या विनाशिकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका ५६ किमी प्रतीतास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे.

०५. या नौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. 'मारमुगाओ'वर ईस्त्राइलमध्ये विकसित झालेली मल्टी फंक्शन सर्व्हिलान्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून तिची ओळख झाली आहे.
*अर्जुन पुरस्कार प्रदान*
०१. क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. अजिंक्य रहाणेला या वर्षीचा तर रोहित शर्माला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

०२. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.
*सांस्कृतिक संचालकपदी संजय पाटील*
०१. सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकाची जबाबदारी संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच पाटील या पदाचा भार स्वीकारतील.

०२. अजय आंबेकर हे संचालकपदावरून गेल्यानंतर संचालकपदाचा प्रभारी कार्यभार शैलेश जाधव आणि संजय पाटील यांनी सांभाळला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाटील सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळतील.
*चीनने अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले*
०१. अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे चीनने प्रक्षेपण केले. २०२२ पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.