MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत २९६ पदांसाठी कर सहाय्यक परीक्षा जाहीर
पदाचे नाव :कर सहाय्यक [Tax Assistant]

एकूण पदे :२९६

किमान शैक्षणिक पात्रता :
१.कोणताही पदवीधर
२. मराठी टंकलेखन ३० श.प्र. मिनिट व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र. मिनिट

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३, माजी सैनिक ₹२३

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ६ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/mpsc.html
स्वराज्य पक्षाची स्थापना
स्थापना : १ जानेवारी १९२३
स्थळ : अलाहाबाद
अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू)
सचिव : मोतीलाल नेहरू
सहकार्य : न.चि. केळकर

०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले. राजकारणाच्या पटावर ते १९२८ मध्ये परत आले.

०२. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला. पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही.

०३. गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्याने काँग्रेसमधील तरुणवर्गाने बाहेर पडून या पक्षाची स्थापना केली.

०४. मोन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अंतर्गत होऊ घातलेल्या निवडनुकीवर बहिष्कार घालावा असे रा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/swarajya-party.html
Entry Of Europeans In India (युरोपियनांचे भारतातील आगमन आणि चार EIC) - History

https://www.youtube.com/watch?v=_VMNzR0xQsE
भारत आणि सिंगापूरच्या नौदलाचा संयुक्त सराव
भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.

सिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी ८१ भाग घेत आहे.

दोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.

नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल.

सिंगापूर नौदलाचे अनेक युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. त्याचबरोबर यामध्ये सिंगापूरचे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca19and20may2017.html
शेतकरी व गांधीजींची चळवळ
सन १८५७ ते १९२१ हया ६४ वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले. शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले.
हया असंतोषाची मुख्य तीन कारणे आहेत.
०१. वाढता जमीन सारा
०२. आर्थिक मंदी
०३. दुष्काळाचे संकट.

शेतकर्‍यांवर खरा अन्यास सुरु झाला तो जमीनदारांच्या जुलूमाने आणि ब्रिटिशांच्या अवाजवी जमीनसारा वसुलीने. हयामुळे शेतकर्‍यास जिणे कठीण होत गेले व शेवटी शेतकर्‍यांनी विरोध दर्शविण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे असे ठरविले. त्यांना संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडली नाही
हया संघटित शेतकर्‍यांचे लढे पुर्ण भारतातून घडू लागले. त्यांतील सर्वात प्रसिध्द लढे म्हणजे
०१. संथालांनी सावकारांविरोधी केलेला लढा
०२. दक्षिणेतील सावकारीविरोधी दंगल
०३. बंगालमध्ये जमीनदारांविरोधी कुळांनी केलेला विरोध
०४. पंजाबमध्ये सावकारांविरुध्द शेतकर्‍यांनी केलेला उठाव

अशा रितीने २० व्या शतका .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... ....................
http://www.mpscacademy.com/2017/03/gandhi-agriicultural-movements.html
British French Carnatic Wars (इंग्रज फ्रेंच कर्नाटक युद्धे) - History - MPSC Career Academy
https://www.youtube.com/watch?v=oRhu0692WIk
सायमन कमिशन
१९२७च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहिर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.

हा एक सात सदस्यीय आयोग होता. दर दहा वर्षांनी भारतीयांना जो सुधारणांचा हप्ता द्यायचा होता. त्यातील तिसरा हप्ता म्हणजे सायमन कमिशन (१९२७) होय.

याचे प्रमुख सर जॉन सायमन हे लिबरल पक्षाचे नेते होते. ८ नोव्हेंबर १९२७ रोजी सायमन आयोगाची स्थापना करण्यात आली. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन आयोगाने भारतात प्रवेश केला. ६ मे १९३० रोजी सायमन आयोगाने आपला अहवाल सादर केला.


कमिशन नेमण्याची कारणे
हिंदी लोकांनी १९१९ च्या कायद्यावर बहिष्कार टाकून असहाकर चळवळ सुरु केली होती. म्हणून भारतीयांचे सहाकार्य मिळविण्यासाठी नियूक्ती.

स्वराज्य पक्षाचे नेते मोतीलाल नेहरू यांनी १९१९ च्या कायद्यात सुधारणा करुन जबाबदार राज्यपध्दती .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/simon-commission.html
The Battle of Plassey is a very important battle in modern Indian history. Battle of Plassey laid foundation of British power in India

In this Lecture You Will Learn Following IMP Topics :-
(1) Entry Of Britishers into Bengal.
(2) The Background of Battle Of Plassey.
(3) The Black Hole Episode.
(4) The Treaty Of Alinagar.
(5) Clive's Plan.
(6) Scene Of Battel.
(7) Importance Of Plassey's Battle.

https://www.youtube.com/watch?v=zXaFGCZXFVA&t=1s
चालू घडामोडी २१ व २२ मे २०१७
मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावले
मुंबई इंडियन्स संघाने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघावर मात करून तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. हैदराबादमध्ये रंगलेल्या या सामन्यात मुंबईने पुण्यावर एका धावेने रोमांचक विजय साजरा केला.

केवळ १३० धावांचा आकडा धाव फलकावर असताना मुंबईने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला

इराणमध्ये रुहानी पुन्हा विजयी
जगाचे लक्ष लागलेल्या इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत सध्याचे अध्यक्ष हसन रुहानी हे विजयी झाले असून, त्यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. ते सुधारणावादी मानले जातात.

रुहानी यांना मोजणी झालेल्या ३.८९ कोटीपैकी २.२८ कोटी मते मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी हे कट्टर धर्मगुरू असून, त्यांना १.०१ कोटी मते मिळाली आहेत. ४ कोटी मतदारांनी कालच्या निवडणुकीत मतदान केले ही टक्केवारी ७० टक्के होती.

रुहानी यांच्यामुळे २०१५मध्ये इराणचा अणुकरार होऊ शकला होता. त्यातून इराणला काही र्निबधातून .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca21and22May2017.html
नेहरू रिपोर्ट लागू करण्यासाठी गांधींनी ब्रिटिशांना मुदत दिली. मुदतीचा कालावधी संपल्यानंतरही ब्रिटिशांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

यावेळी गांधींनी इंग्रजांशी तडजोड करण्यासाठी त्यांच्यासमोर संपूर्ण दारूबंदी, ५०% सारामाफी, राजकीय कैद्यांची मुक्तता, देशी मालास संरक्षण हे मुद्दे ठेवले.

यादरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी समुद्र किनाऱ्यावर उदरनिर्वाहासाठी जे मीठ तयार होत होते त्याच्यावरही कर लावला. म्हणून गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली.


सविनय कायदेभंग चळवळ
लाहोर ठरावानुसार गांधीजींच्या नेतृत्वाखाली १४ फेब्रुवारी १९३० रोजी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्यात आली. हिंसा न करता ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडणे आणि त्या संदर्भात शिक्षा भोगणे म्हणजे सविनय कायदेभंग होय.

चळवळीच्या कार्यक्रमाचे स्वरूप : मिठाचा सत्याग्रह .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/savinya-kaydebhang-and-salt-march.html
Making Of The Indian Constitution (घटनानिर्मिती ) - Political Science - MPSC Career Academy
In This Important Lecture You Will Learn The Process Making Of The Indian Constitution, Formation Of Constituent Assembly, Various Committees, Various Leaders, Drafting Committee And Time Duration For Total Process, Important Dates As Well.

https://www.youtube.com/watch?v=DFDUCnGFHVE&t=
०१. क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग याचा सामुदायिक परिणाम म्हणून ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत 'चलेजाव' ठराव मांडला.

०२. मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी ग्वालीयार टॅंक मैदान (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे कॉंग्रेसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. यावेळी गांधीजींनी 'करा किंवा मरा' हा संदेश दिला.

०३. या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना आझाद यांच्याकडे होते. ९ ऑगस्ट रोजी पहाटे इंग्रजाकडून नेत्यांची धरपकड करण्यात आली. गांधीजीना आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान करण्यात आले. व इतर कार्यकारिणीच्या सदस्यांना अहमदनगर तुरूंगात (नगर जिल्ह्यातील अष्टकोनी भुईकोट किल्ला) डांबण्यात आले.

०४. त्यामुळे ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ ठरली. यानंतर या चळवळीचे नेतृत्व स्थानिक व प्रांत पातळीवरील नेत्यांनी केले. तरीही त्यांचीही ब्रिटिशांनी धरपकड सुरु केली. म्हणून जनतेने भूमिगत चळवळीच्या आंदोलनाला जन्म दिला.

०५. १९४२ च्या या चलेजाव आंदोलनात 'हिंदू महासभा' हि एकमेव संघटना सहभागी झाली नाही.

भूमिगत आंदोलन
०१. जयप्रकाश नारायण, .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/leave-india-movement.html
Features Of The Constitution (राज्यघटनेची वैशिष्ट्ये) - Polity - MPSC Career Academy

In This Lecture You Will Learn Features Of The Constitution Of India.
Indeed, This Is An Important Topic Regarding All Types Of Competitive Examination. Specially MPSC Always Asks Question On This Topic.
Watch This Video & Make Notes.
Like This Video, Comment & Subscribe This Channel For More Videos.

https://www.youtube.com/watch?v=8rEo4iddgcs
'जीएसटी' विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. देशात १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. सोमवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

केंद्र सरकारने घटना दुरुस्तीने 'जीएसटी'चे विधेयक मंजूर केले असल्याने प्रत्येक राज्याला हा कायदा मंजूर करणे बंधनकारक होते.

महापालिकांना जकात, एल.बी.टी.चे २०१६-१७ चे उत्पन्न गृहीत धरून नुकसान भरपाईची रक्कम ठरवणार. प्रत्येक वर्षी या रकमेवर ८ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ दिली जाईल

राज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्रीकर, वाहनाव .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca23and24may2017.html
भारतीय अंतराळ संशोधन परिषदेत (ISRO) विविध ७४ पदांची भरती
एकूण पदे :७४

वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/isro.html
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे 'ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर' पदाच्या ५० जागांसाठी भरती
एकूण पदे :५०

किमान शैक्षणिक पात्रता :५५% गुणांसह (B.E./B.Tech/Diploma in Electricsl/Electronics)

वयोमर्यादा : ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १०००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST ₹ ५००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २५ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/blog-post_27.html
अन्न व नागरी पुरवठा विभागात 'पुरवठा अधिकारी' पदाच्या ८७ जागांची भरती
पदाचे नाव :पुरवठा अधिकारी

एकूण पदे :८७
नागपूर विभाग : ५०
अमरावती विभाग : ३७

किमान शैक्षणिक पात्रता : पदवीधर (MS-CIT आवश्यक)

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹३००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹१५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १२ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/blog-post_51.html
अर्थव्यवस्थेचे सामान्य प्रकार
भांडवलशाही अर्थव्यवस्था
सैद्धांतिक मांडणी : एडम स्मिथ (स्कॉटलंड)
१७७६ : द वेल्थ ऑफ नेशन ग्रंथ प्रकाशित
अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन देश, जपान ही राष्ट्रे भांडवलशाही राष्ट्रे मानली जातात.

या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम असतो. या अर्थव्यवस्थेत शासनाचा अल्प हस्तक्षेप असतो.

परचक्रापासून संरक्षण आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यांचे संस्थापन, एवढीच सरकारची मुख्य कार्ये असतात. सरकारने यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असा विचार समाजात प्रसृत असतो.


या अर्थव्यवस्थेत नफ्याला प्राधान्य असते. खाजगी मालकी असते व बाजारपेठेत स्पर्धेचे प्राब .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/economics-types.html
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
प्रशासकीय विभाग
जिल्हा विभाजन
नैसर्गिक सीमा
राजकीय सीमा
क्षेत्रफळ,
स्थान
विडिओ पाहिल्याबद्ल धन्यवाद आपली प्रतिक्रिया comment box मध्ये नोंदवा आणि हा विडिओ आपल्या मित्रां सोबत share करा.

This Is The First Lecture On Geography Of Maharashtra. In This Introductory Lecture You Will Learn Administrative Divisions Of Maharashtra State, Districts And Their Areas, Natural Borders Of The State, Area ETC

https://www.youtube.com/watch?v=OUqo_Qmqt8k