MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
*परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार भारताचा रहिवासी परवाना*
1. भारतामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना 'भारतीय रहिवासी' म्हणून दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे.
2. ठराविक मर्यादेपर्यंत गुंतवणूक केल्यास त्यांना व्हिसा, मालमत्ता खरेदी हक्क, कुटुंबियांना रोजगार इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
3. याविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विस्तृत धोरण तयार करण्यात आले आहे.
4. परदेशातून अधिकाधिक निधी आकर्षित करुन मेक इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
5. याअंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांसाठी व्हिसाचे नियम सुलभ केले जाणार असून त्यांच्या कुटुंबियांनादेखील नोकऱ्या/रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
6. तसेच याकरिता नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. सुरुवातीला गुंतवणूकदारांना दहा वर्षांकरिता रहिवासी परवाना दिला जाईल. त्यानंतर ही मर्यादा वाढविली जाऊ शकते.
*'नासा'ने शोधले सर्वांत दूरवरील आकाशगंगा*
1. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 11.1 अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेला आकाशगंगांचा पुंजका आढळला आहे.
2. शास्त्रज्ञांना आढळलेल्या या आतापर्यंत सर्वांत लांबवरच्या आकाशगंगा आहेत.
3. 'नासा'च्या चंद्रा एक्‍स रे ऑब्झर्व्हेटरी आणि इतर काही दुर्बिणींच्या मदतीने आकाशगंगांचा हा पुंजका सापडला आहे.
4. तसेच या पुंजक्‍यातील आकाशगंगा 70 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
5. दुर्बिणीने पकडलेली प्रकाशकिरणे ही आकाशगंगेच्या जन्मानंतर लगेचचीच असल्याचाही अंदाज आहे. या पुंजक्‍याच्या सखोल अभ्यासानंतर विश्‍वाच्या उत्क्रांतीबद्दल नवी माहिती मिळण्याची दाट शक्‍यता असल्याचे 'नासा'ने म्हटले आहे.
6. आकाशगंगेच्या या पुंजक्‍याला 'सीएलजे 1001+0220' असे नाव देण्यात आले आहे.
7. 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार, या पुंजक्‍याच्या केंद्रस्थानी 11 प्रचंड आकाशगंगा असून, त्यातील नऊ आकाशगंगांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नवे तारे जन्म घेत आहेत. हे प्रमाण दरवर्षी तीन हजार सूर्य निर्माण होण्यासारखे आहे.
8. आकाशगंगांच्या इतर पुंजक्‍यांच्या मानाने केंद्रस्थानी तारे निर्माण होण्याचे हे प्रमाण प्रचंड आहे.
देशातील दहा हागणदारीमुक्त शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचचा समावेश केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या दहा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा समावेश असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या शहरांसह हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या दहा शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा (जि.कोल्हापूर), वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), पाचगणी (जि.सातारा) या पाच शहरांचा समावेश आहे. राज्यस्तरीय यंत्रणेकडून याबाबतच्या कार्यवाहीचे मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेकडून तपासणी झाल्यानंतर ही शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतरच्या टप्प्यात राज्यातील दहा शहरांची या संस्थेकडून तपासणी सुरु आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त होणार आहेत. राज्यात नगरविकास विभागाकडून या अभियानाची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने पुढील वर्षांत पूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
* दिलशानची क्रिकेटमधून निवृत्ती
०१. मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज ते धडाकेबाज सलामीवर असे संक्रमण, ‘दिलस्कूप’ या अनोख्या फटक्याचा जनक, भागीदाऱ्या फोडण्यात पटाईत चतुर फिरकीपटू आणि अफलातून क्षेत्ररक्षक अशा खऱ्या अर्थाने अष्टपैलू तिलकरत्ने दिलशानच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला.

०२. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी ट्वेन्टी-२० लढत हा माझ्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असे दिलशानने जाहीर केले होते.



* सेरेना विल्यम्सचे अव्वल स्थान संपुष्टात
०१. जेतेपदे आणि विक्रम यांवर मक्तेदारी राखणाऱ्या सेरेना विल्यम्सला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकोव्हाच्या सनसनाटी विजयाने सेरेनाचे २३वे ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न संपुष्टात आणले.

०२. तसेच कॅरोलिन वोझ्नियाकीला नमवत अंतिम फेरी गाठणाऱ्या अँजेलिक कर्बरचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान पक्के झाले आहे.

०३. दहाव्या मानांकित प्लिसकोव्हाने कारकीर्दीतील पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळताना सेरेनावर सरळ सेट्समध्ये ६-२, ७-६ (७-५) असा विजय मिळवला.

०४. महिला टेनिसमध्ये सलग १८६ आठवडे क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्याचा मान सेरेना आणि स्टेफी ग्राफ यांच्या नावावर संयुक्तपणे आहे.



* पॅरालिम्पिकमध्ये भारताची चमकदार कामगिरी
०१. रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या निराशाजनक कामगिरीला दूर करत पॅरालिम्पिकपटूंनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली.

०२. उंच उडी प्रकारात मरियप्पन थंगवेलू याने १.८९ मीटर उडी मारत सुवर्ण तर वरूण भाटीनेही याच प्रकारात १. ८६ मीटर उडी मारत कांस्य पदक पटकावले. अमेरिकेच्या सॅम ग्रेवीनेही १.८६ मीटर उडी मारून रौप्य पदक पटकावले.

०३. पॅरालिम्पिकमध्ये भारताने तब्बल १२ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये हेजवर्ग पॅरालिम्पिकमध्ये तर भालाफेकपटू देव झाजरिया याने २००४ च्या अथेन्स सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. थंगवेलू हा तिसरा भारतीय सुवर्णपदक विजेता ठरला आहे.

०४. भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत १० पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.



* राष्ट्रीय स्मारक स्थळी प्लास्टिकवर बंदी
०१. राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात प्लॅस्टिक वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. २ ऑक्टोंबरपासून गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आणि स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

०२. या निर्णयानंतर राष्ट्रीय स्मारक परिसराच्या १०० मीटरच्या परिसरात प्लॅस्टिकचा वापरावर बंदी करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक नष्ट होत नसल्यामुळे यापूर्वीच ५० मायक्रोनच्या प्लॅस्टिक बॅग तसेच अन्य उत्पादनावर सरकारने बंदी आणली आहे.

०३. २०१४ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले होते.

०४. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आता ताजमहाल, लाल किल्ला, चारमिनार याठिकाणी भ्रमंती करणाऱ्यांनी प्लॅस्टिक बॅग अथवा पॉलिथीन वापरावर आवर घालावी लागेल.



* विमानात सॅमसंग नोट ७ वापरावर बंदी

०१. सॅमसंग नोट ७ मध्ये चार्जिंग दरम्यान स्फोट झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात हवाई प्रवासादरम्यान सॅमसंग नोट ७ वर निर्बंध घालण्यात आलेत. हवाई वाहतूक संचालनालयाने यासंदर्भात लेखी परिपत्रक काढून याविषयीची माहिती दिली आहे.

०२. परिपत्रकानुसार चेक इन लगेजमध्ये सॅमसंग नोट ७ नेण्यावर बंदी असेल. मात्र हँडबॅगमध्ये नोट ७ ठेवता येईल. मात्र संपूर्ण प्रवासादरम्यान मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक असेल असे हवाई वाहतूक संचालनालयाचे प्रमुख बी एस भुल्लर यांनी सांगितले.

०३. या नियमाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.

०४. अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ऍडमिनीस्ट्रेशनने काही दिवसांपूर्वी सॅमसंग नोट ७ वर निर्बंध घातले होते. नोट ७ मध्ये स्फोट होण्याच्या घटनांमुळे हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले होते. विमान प्रवासादरम्यान हा फोन ऑन करु नये किंवा चार्जिंगला ठेऊ नये असेही निर्देश देण्यात आले होते.

०५. ऑगस्टमध्ये सॅमसंगने गॅलेक्सी नोट ७ फोन बाजारात आणला होता. जगभरात चार्जिंग दरम्यान नोट ७ मध्ये स्फोट झाल्याच्या ३५ तक्रारी आल्या होत्या. यानंतर सॅमसंगने सुमारे २५ लाख फोन्स बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेतला होता.
* विद्या बालन समाजवादी पेन्शन योजनेच्या सदिच्छादूत
०१. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शुक्रवारी विद्या बालनची समाजवादी पेंशन योजनेची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा केली. लखनऊमध्ये पार पडलेल्या समारंभात यावेळी विद्या बालनसोबत अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि उत्तप्रदेश खासदार डिंपल यादव देखील उपस्थित होत्या.

०२. समाजवादी पेंशन योजन अंतर्गत राज्यातील ५० लाखांहून अधिक महिलांना दरमहा ५०० रुपये सरकाकडून दिले जातात. मात्र, लाभ घेणाऱ्या महिलांना आपल्याला मिळणारा लाभ कोणामुळे मिळतो, याची कल्पना नसल्यामुळे विद्या बालनच्या माध्यमातून जनतेपर्यंत योजनेचा प्रसार केला जाणार असल्याची माहिती अखिलेश यांनी कार्यक्रमामध्ये दिली. या योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशमधील वेगवेगळ्या भागात विद्यावर काही व्हिडिओ चित्रित केले जाणार आहेत.

०३. विद्या बालन यापूर्वी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शौचालय बांधणीचा संदेश देताना दिसली होती.



* ऍसिड हल्ला पीडित तरुणी फॅशनवीक मध्ये सहभागी
०१. अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणींना धैर्याचा संदेश देण्यासाठी न्यूयॉर्कमधील फॅशनवीकमध्ये अशाच एका हल्ल्यात चेहरा विद्रुप झालेल्या रेश्मा कुरेशी या १९ वर्षांच्या युवतीला सहभागी करण्यात आले होते. एफटीएल मोडा या फॅशन उत्पादन कंपनीने हा अभिनव उपक्रम राबवला.

०२. रेश्माने मोठा गाऊन घातला होता तो भारतीय डिझायनर अर्चना कोच्चर यांनी तयार केला होता. तिचे रॅम्पवर आगमन होताच चांगला प्रतिसाद मिळाला.

०३. कुरेशी हिच्यावर तिच्या दिराने २००४ मध्ये अ‍ॅसिड हल्ला केला होता. तिने त्यात धैर्य खचू दिले नाही तर उलट भारतातील अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी ती धीराचा आवाज बनली. तिने यूटय़ूबवर मेक लव्ह नॉट स्कार्स या संस्थेमार्फत व्हिडिओ टाकल्या आहेत.

०४. तिने मुंबईतील तिच्या घरी चित्रीकरण केले असून ती मेक अप व ब्युटी टिप्स देते. महिलांविरोधातील गुन्ह्य़ांची चर्चाही तिने चित्रफितींमध्ये केली आहे.
*सामान्य नागरिक करू शकणार पद्मसाठी शिफारस*
०१. आता भारतातील सामान्य नागरिकही देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील. या पुरस्कार वितरणात पारदर्शकता यावी व यासाठी होणाऱ्या लॉबिंगला रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

०२. पुरस्कारासाठी अर्ज करतेवेळी आधार कार्ड सादर करण्याची मात्र सक्ती असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. आधार कार्डवरून संबंधित अर्जदाराची माहिती घेणे निवड समितीला सोपे जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

०३. देशासाठी योगदान दिलेल्या अपरिचित नागरिकांचा सन्मान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुरस्कार समाजातील एखाद्या वर्गापुरताच मर्यादित न राहता त्याची व्याप्ती वाढावी हा सरकारचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले.

०४. विशेष म्हणजे या निर्णयामुळे नागरिकांना एखाद्या व्यक्तीलाही नामांकित करता येईल. या निर्णयामुळे देशातील अनेक अज्ञात असामान्य कर्तृत्व समाजासमोर येईल. त्यांच्या कार्याची माहिती देशाला होईल.
*पॅरालिम्पिकमध्ये भारताची दिमाखदार कामगिरी*
०१. भारताच्या मरियप्पन थांगवेलूने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे.

०२. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी सुवर्णपदक जिंकले होते. प्रथमच एकाच क्रीडाप्रकारात भारताला सुवर्ण व कांस्य अशा दोन पदकांची कमाई झाली आहे. भारताचा शरदकुमार हादेखील याच क्रीडाप्रकारात सहभागी झाला होता. त्याने १.७७ मीटपर्यंत उडी मारली व सहावे स्थान मिळवले.

०३. भारताच्या संदीप व नरेंदर रणबीर यांना भालाफेकीत पदकाने हुलकावणी दिली. संदीपने ५४.३० मीटपर्यंत भालाफेक करीत चौथे स्थान घेतले. रणबीर याने ५३.७९ मीटपर्यंत भालाफेक केली व सहावा क्रमांक मिळविला.
*डॉ. तुलसीराम यांना 'राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार' जाहीर*
०१. डॉ. एच. व्ही. तुलसीराम. त्यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

०२. सहा वर्षे अमेरिकेत संशोधन केल्यानंतर तेथील प्राध्यापक व स्वत:च्या कुटुंबीयांचा तेथेच राहण्याचा आग्रह डावलून केवळ देशाने आपल्यावर खर्च केला आहे, त्यामुळे त्याचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने ते संशोधनासाठी भारतात परत आले. आज ते राष्ट्रीय रासायनिक संशोधन प्रयोगशाळेत कार्यरत असून ते तरुण संशोधकांना उत्तेजन देत आहेत.

०३. डॉ. तुलसीराम यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून पीएच.डी. केली असून, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

०४. त्यांना याआधी एनसीएल रिसर्च फाऊंडेशन व 'सायन्टिस्ट ऑफ द इयर २०१६' हे पुरस्कार मिळाले आहेत.

०४. आयसोप्रेनॉइड नामक कार्बनीय घटकाच्या जैव संश्लेषणासाठी डॉ. तुलसीराम यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

०५. त्यांचा संशोधक गट सध्या नैसर्गिक घटकांच्या रासायनिक आणि जैविक पैलूंचा अभ्यास करीत आहे. यामध्ये त्या घटकांचे विलगीकरण, त्यांचे गुणधर्म, जैविक क्रिया आणि रासायनिक व जैविक विकरांशी संबंधित बदल यांचा अभ्यास अंतर्भूत आहे.

०६. शिवाय पारंपरिक भारतीय औषधी वनस्पतींमधून आयसोप्रेनॉइडच्या जैवसंश्लेषण प्रक्रियेदरम्यान विशिष्ट जनुकीय गुणधर्माबद्दल माहिती संकलनासाठीदेखील त्यांचा समूह काम करीत आहे.

०७. यादरम्यान, सजीव शरीरात निर्माण होणाऱ्या द्रव्य परिवर्तनाच्या अभ्यासावर त्यांचा मुख्य भर असेल. या अभ्यासाचा उपयोग जैविकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटकांच्या उत्पादनामध्ये अभिप्रेत आहे.

०८. जैव उत्प्रेरक, आयसोब्रेनॉइड पाथवेज या क्षेत्रात त्यांचे संशोधन असून ते नैसर्गिक उत्पादनांशी निगडित आहे. रासायनिक रचना वैविध्यपूर्ण असलेल्या नैसर्गिक पदार्थाचे जैविक संश्लेषण महत्त्वाचे असते, त्यामुळे त्यांच्यातील जैवरासायनिक क्रियांचा उलगडा होऊन नवीन विकरे व उत्प्रेरकांची कार्यपद्धती समजते.
०९. झेनोबायोटिक्स या शाखेत त्यांचे संशोधन असून भारतातील पारंपरिक औषधी वनस्पतींचे विश्लेषण त्यांनी केले आहे. त्यातून काही जैविक रेणूंचा शोध घेण्यात यश आले आहे.

१०. कुठल्याही नैसर्गिक उत्पादनाचे रसायनशास्त्र, जीवशास्त्र या दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर त्यांच्या आयसोप्रेनॉइड जैवविश्लेषणात क्रियाशील असलेले घटक समजतात. यातून नवीन औषधे तयार करता येऊ शकतात.

११. जैव कार्बनी रसायनशास्त्रात त्यांचा २२ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कारकीर्दीची सुरुवात पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतूनच केली. अमेरिकेत त्यांनी प्रा. सी. डेल. पोल्टर यांच्या नेतृत्वाखाली उटाह विद्यापीठात संशोधन केले. आयोवा विद्यापीठात त्यांना प्रा. ब्राइस प्लॅप यांचे मार्गदर्शन मिळाले.

१२. जैविक व व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे रेणू तयार करण्यासाठी त्यांनी काही उत्प्रेरकांचा वापर केला; त्यात यीस्ट किंवा इतर काही उपकारक जिवाणूंचा समावेश आहे.
*कर्कविरोधी औषधाला कृत्रिम पर्याय*
०१. चीनमधील तिबेटच्या उंच पठारी प्रदेशात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या 'वाइल्ड कॅटरपिलर फंगस' नावाच्या औषधीला चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम पर्याय शोधून काढला आहे. या औषधीत कर्करोगविरोधी गुणधर्म असून शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासही ती उपयोगी आहे.

०२. चीनमधील क्विंघाय-तिबेट पठारी प्रदेशात 'वाइल्ड कॅटरपिलर फंगस' नैसर्गिकरीत्या आढळते. त्याला स्थानिक भाषेत 'विंटर वर्म' किंवा 'समर ग्रास' या अर्थाच्या नावाने ओळखले जाते.

०३. 'ऑफिओकॉर्डिसेप्स सायनेन्सिस' नावाची बुरशीची प्रजाती घोस्ट मॉथ नावाच्या पतंगाच्या अळ्यांमध्ये परजीवी म्हणून वाढते. नंतर अळी मरून त्याचा सुरवंटासारखा दिसणारा फळसदृश भाग तयार होतो. त्यालाच 'वाइल्ड कॅटरपिलर फंगस' म्हणतात.

०४. तिबेटमध्ये त्याचा स्थानिक औषधींमध्ये पूर्वापार वापर होत आला आहे. आधुनिक विज्ञानाला त्याच्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढून किंमतही भलतीच वाढली. अगदी डोंगराळ प्रदेशातील लहान गावांतही त्याला सोन्याच्या बरोबरीने किंमत मिळते.

०५. मात्र या औषधीच्या वाढीचा वेग अतिशय मंद असून तिची व्यापारी उद्देशाने शेती करणे आजवर शक्य झालेले नाही. त्यामुळे औषध उत्पादन कंपन्यांना कच्च्या मालाच्या पुरवठय़ासाठी या प्रदेशात अल्प प्रमाणात मिळणाऱ्या औषधीवरच अवलंबून राहावे लागते. औषधीसाठी प्रमाणाबाहेर जमीन खणल्याने स्थानिक पर्यावरणही धोक्यात आले आहे.

०६. मात्र गेल्या ११ वर्षांच्या संशोधनाअंती चिनी शास्त्रज्ञांनी या दुर्मीळ औषधीला कृत्रिम पर्याय निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी कॅटरपिलर फंगसमधील अनावश्यक भाग काढून टाकून 'कॉर्डिसेप्स सायनेन्सिस' किंवा 'हिर्सुटेला सायनेन्सिस' हा उपयुक्त भाग वेगळा काढला आणि त्याची वाढ केली.

०७. अशा प्रकारे कृत्रिमरीत्या तयार केलेली औषधी व नैसर्गिक औषधी याच्या डीएनएमध्ये ९७ टक्केसाम्य आढळले. तसेच मूळ औषधी गुणधर्मही सारखेच राहिले. अशा प्रकारे किण्वन (फरमेंटेशन) प्रक्रियेद्वारे कॅटरपिलर फंगसची भुकटी तयार करण्यास चिनी सरकारने तांत्रिक व आर्थिक साहाय्य पुरवले.

०८. प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती केलेल्या औषधातून २० दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे वर्षांला २०० टन औषधी तयार करण्याचे या प्रकल्पांतर्गत उद्दिष्ट आहे.
* मरियप्पन थांगवेलू
०१. सहसा पॅरालिम्पिकमध्ये आपले खेळाडू फारसे चमकत नाहीत. मात्र थांगवेलू याने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णझेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

०२. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

०३. तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्य़ातील पेरियावादागाम्पती या खेडेगावातील रहिवासी. त्याच्यासह चार मुले व एक कन्या यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याच्या आईलाच करावी लागत असे. पाच अपत्यांना व पत्नीला वाऱ्यावर सोडून त्याचे वडील बेपत्ता झाले. वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मरियप्पनच्या आईने जिद्दीने या सर्वाना वाढविले.

०४. मरियप्पन हा केवळ पाच वर्षांचा असताना त्याला अपघात झाला. तो शाळेत जात असताना एका बसचालकाने त्याला उडविले. या अपघातात मरियप्पन याला उजवा पाय गमवावा लागला. त्याला कायमचे अपंगत्व आले.

०५. त्याच्या आईने या संकटासही धैर्याने तोंड दिले. नंतर तिने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

०६. शाळेत असताना मरियप्पन अन्य मुलांबरोबर व्हॉलीबॉल खेळत असे. व्हॉलीबॉलमध्ये स्मॅशिंगचा फटका मारत असताना तो खूप उंच उडी मारत असे. हे त्याच्या शाळेतील शारीरिक शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी मरियप्पन याला उंच उडीचा सराव करण्याचा सल्ला दिला. त्याने हा सल्ला मानला आणि उंच उडीचा सराव सुरू केला.

०७. दिव्यांगत्व येऊनही त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले एवढेच नव्हे तर त्याने व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी चांगल्या गुणांमध्ये प्राप्त केली.

०८. हे शिक्षण सुरू असताना त्याने उंच उडीच्या सरावात खंड पडू दिला नाही. दिव्यांग असले म्हणून निराश न होता संकटांना आत्मविश्वासाने सामोरे गेले तर अनपेक्षित यश मिळविता येते हे त्याने दाखवून दिले.

०९. शिक्षण व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. जर इच्छाशक्ती असेल तर या दोन्ही क्षेत्रांवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते याचा परिपाठ त्याने घालून दिला आहे. पॅरालिम्पिक क्रीडाप्रकारात करिअर करतानाही त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.

१०. कोणत्याही परदेशी प्रशिक्षकाची मदत न घेता व कोणत्याही जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध नसताना त्याने रिओ येथे तिरंगा ध्वज फडकाविला. सवलती व सुविधा नसल्याची कोणतीही तक्रार न करता त्याने हे यश मिळविले आहे.