MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग ७९ पदांसाठी महाराष्ट्र कृषीसेवा पूर्व परीक्षा जाहीर [शेवटचा दिनांक : २ मे २०१७]
पदाचे नाव : कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ)

एकूण पदे :७९

किमान शैक्षणिक पात्रता : कृषी / कृषी अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षेवयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३

Read Full Advertisement
http://bit.ly/2oMg1xu
UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक कमांडंट पदासाठी १७९ जागांची भरती [शेवटचा दिनांक : ५ मे २०१७]
पदाचे नाव :सहाय्यक कमांडंट

एकूण पदे :१७९

किमान शैक्षणिक पात्रता :पदवीधर

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹२००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला यांना फी नाही

Read Full Advertisement
http://bit.ly/2nQOVGj
नोकरीसंदर्भात जाहिराती व त्याविषयी माहिती नियमितपणे तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमचे अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करा.
या एपमध्ये परीक्षेच्या जाहिराती, त्यांचा अभ्यासक्रम, परीक्षा दिनांक, परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि हे सर्व या एकाच एप्लिकेशन मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.jobupdates
जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांतील ‘मोठी लालसरी’ हतनूर परिसरात
जळगाव जिल्ह्य़ातील हतनूर (मुक्ताईसागर) धरणाच्या जलाशयात 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन नेटवर्क' (आययुसीएन) द्वारा घोषित जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांमधील 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' (अल्बीनो प्रकारातील स्थानिक भाषेतील 'मोठी लालसरी') हा स्थलांतरीत पाणपक्षी आढळून आला आहे.

या पक्षाची भारतातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेने याची दखल घेतली असून त्यासंदर्भातील माहिती मार्चच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातंर्गत कार्यरत 'इन्व्हायरमेंटल इन्फार्मेशन सिस्टिम' (ईएनव्हीआयएस) ने भुसावळ तालुक्यातील वरणगांव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या या संशोधनावर शिक्कामोर्तब केले आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये वेटलॅण्ड इंटरनॅशनल या स्वित्र्झलंडमधील पर्यावरण संस्थेकडून देशभरात पक्षीगणना झाली. त्यावेळी वरणगावच्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेने या गणनेत सहभाग घेत मुक्ताईसागर (हतनूर) धरणाच्या जलाशय परिसरात गणना केली. यावेळी पक्षीमित्र शिवाजी जवरे (बुलढाणा) यांना एक पक्षी दिसला असता तज्ज्ञांची मते जाणून घेतलीम् असता हा पक्षी मोठी लालसरीच असल्याचे निष्पन्न झाले.

महाजन यांनी याबाबतचा शोधनिबंध तयार करुन तो 'न्यूजलेटर ऑफ बर्ड वॉचर' या आंतरराष्ट्रीय विज्ञान ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca-16and17April2017.html
'कार्य' म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय. (w = f × d)
कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही 'आदिश राशी'आहे.

SI पद्धतीला बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन – मीटर म्हणजेच ज्यूल हे आहे. CGS पद्धतीत डाईन-सेंटीमीटर किंवा अर्ग आहे.


1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
1 अर्ग = 1 डाईन × 1 सें.मी.
1 ज्यूल = 107 अर्ग



घन, ऋण व शून्य कार्य
ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बालाने केलेले कार्य धन असते. उदा. बंद बस ढकलणे

बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्या बलाने केलेले कार्य ऋण असते. उदा. चेंडूचा झेल घेणे

ज्या वेळी बाल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते. उदा. दोरीला बांधलेला दगड फिरवणे

पृथ्वी व सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. यामध्ये केंद्रकीय बलाने केलेले कार्य शून्य आहे.

सरल दोलक विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेने कार्य करते, तर दोरीवरील ताण त्याच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात. त्यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत असतो. त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते.
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) विविध पदभरती [शेवटचा दिनांक : ५ मे २०१७]
परीक्षा दिनांक : १५ जून २०१७

वयोमर्यादा : ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग यांना फी नाही

http://jobs.mpscacademy.com/2017/04/ssc.html
एड्स (AIDS) रोगाविषयी माहिती
एड्स (AIDS)
प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू).

एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.

जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला. भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. महाराष्ट्रामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.


जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण भारत देशात आहेत. भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रु ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/aids.html
तुर्कस्तान करणार अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल
तुर्कस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये ५१.३७ टक्के मते मिळवून विद्यमान अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्डोगन यांनी देशाच्या राजकारणावरील आपली पकड घट्ट केली आहे.

एर्डोगन यांच्या अध्यक्षपदाची व्याप्ती आणि ताकद वाढविण्यासाठी देशभरात झालेल्या मतदानापैकी 'येस'च्या बाजूने ५१.३७ टक्के लोकांनी मतदान केले असून ४८.६३ टक्के जनतेने 'नो'च्या बाजूने मतदान केले.

तुर्कस्तानमध्ये अध्यक्षीय पद्धत लागू करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटनादुरुस्तीसाठी ही निवडणूक झाली. या प्रस्तावित विधेयकानुसार, यापुढील अध्यक्षीय आणि संसदीय निवडणूक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी होईल.

अध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा असेल. एका व्यक्तीला दोनदाच अध्यक्षपद भूषविता येऊ शकेल. तुर्कस्तानमधील ही नवी प्रस्तावित रचना अमेरिका आणि फ्रान्सच्या धर्तीवर असेल.

मंत्रिमंडळासह सर्व महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांकडे असतील. एक किंवा अधिक उपा ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca18and19April2017.html
कुष्ठरोग रोगाविषयी माहिती
कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो 'मायकोबॅक्टेरियम लेप्री' या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.

या रोगजंतूचा शोध डॉ.ए.हॅन्सन यांनी 1873 साली लावला. म्हणून या रोगास 'हॅन्सन्स डिसीज' असेही म्हणतात.कुष्ठरोगावरील औषध 'डॅप्सोन' (D.D.S.) हे 1940 मध्ये उपलब्ध झाले व त्यांचा वापर 1943 पासून सुरु झाला.

कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची भारतामध्ये 1954-55 मध्ये सुरुवात झाली. 1980 मध्ये कुष्ठरोगावरील 'बहुविध औषधोपचार पद्धती' (MDT) सुरु झाली. 1983 मध्ये 'राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम' सुरु झाला.

जगातल्या एकूण कुष्ठरुग्णांपैकी 1/3 रुग्ण एकटया भारतामध्ये आहेत. भारतात तामिळनाडू, आंध्र ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/leprosy.html
देना बँक मध्ये ३०० जागांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती [शेवटचा दिनांक : ९ मे २०१७]
एकूण पदे : ३००

किमान शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह पदवीधर

वयोमर्यादा : २० ते २९ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ ४००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹५०

http://bit.ly/2pESv3H
क्षयरोग रोगाविषयी माहिती
हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो. क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.


क्षयरोगाचे प्रकार -
०१. फुप्फुसाचा
०२. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)

क्षयरोगाची लक्षणे
तीन आठवडे किंवा ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/tuberculosis.html
म. गांधींच्या टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री
ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मिळ टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री झाली आहे. कोणत्याही भारतीय टपाल तिकिटाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

१९४८ मध्ये गांधींचा चेहरा असलेले दहा रुपयांची टपाल तिकिटे वितरित करण्यात आले होते. गुलाबी, तपकिरी रंगाचे ही केवळ तेरा टपाल तिकिटे सध्या विविध संग्राहकांकडे आहेत. त्यातील चार तिकिटांचा सेट ऑस्ट्रेलियातील खासगी तिकीट संग्राहकाने विकत घेतला.

भारतीय टपाल तिकिटाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे ब्रिटनमधील 'स्टेनली गिब्बन्स' या लिलाव करणाऱ्या कंपनीने निवेदनात म्हटले आहे. यातील उर्वरित ............................. .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/04/ca22and23April2017.html
हिवताप रोगाविषयी माहिती
०१. हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे. हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो. हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.

०२. डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मादांना रक्ताची गरज असल्याने फक्त मादाच दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.

०३. हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्‍या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.

०४. 'हिवताप जंतूचा शोध' १८८० मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला. सन १८९७ मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.

हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.
प्लीहेची वाढ होते.
रक्तक्षय होतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २०१७ जाहीर
एकूण पदे :१९९

किमान शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (B.E. / B.Tech)

वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० मे २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/04/blog-post_24.html
बँक ऑफ इंडिया मध्ये विविध ६७० पदांसाठी भरती
एकूण पदे :६७०

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ मे २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/04/blog-post_96.html
कर्करोग रोगाविषयी माहिती
या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते. कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो. पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कर्करोगाची कारणे
तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.
या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.

कर्करोगाचे प्रकार
ल्युकेमिया - पांढर्‍या पेशींचा कर्करोग
लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग
सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग
कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग
के. विश्‍वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदीबरोबरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्‍वनाथ यांना जाहीर झाला आहे.

नवी दिल्लीत तीन मे रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दहा लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञ, तसेच कलाकारांना भारत सरकारतर्फे दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.

२०१५ चा पुरस्कार मनोज कुमार यांना मिळाला होता. आता २०१६ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी के. विश्‍वनाथ ठरले आहेत.

के. विश्‍वनाथ यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९३० रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात चेन्नईच्या एका स्टुडिओत तांत्रिक सहायक म्हणून केली. त्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. तेलगू, तमीळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

के. विश्‍वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्वाती मुथ्थम' या चित्रपटाची ५९ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. 'सरगम', 'कामचोर', 'जाग ............................. .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/04/ca04and25April2017.html
स्वाइन फ्ल्यू रोगाविषयी माहिती
'स्वाईन फ्ल्यू' एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) पॅनडेमिक या साथीचा ताप येण्याला 'स्वाईन फ्ल्यू' असे म्हणतात. जगातील आरोग्य संघटनेने 'महासाथ' हा आजार जाहीर केला आहे.

पक्षी, डुक्कर आणि माणूस यांच्यातील विषाणूंच्या एकत्रीकरणातून एच-1 एन-1 हा नवीन विषाणू तयार झाला आहे.

रोगाची लक्षणे
धाप लागणे.
जीभ व ओठ काळेनीळे पडणे.
खूप चिडचिड होणे.
खोकला व शिंक येणे.
शरीर दुखणे.
घसा खवखवणे.
चक्कर येणे.
थंडी वाजून येणे.
डोके दुखणे.
थकवा जाणवणे.
छाती व पोट दुखणे

उपचार
'टॅंमिफ्लू' व 'रेलेन्झा' ही औषधे वापरली जातात.

मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये 'स्वाईन फ्ल्यू' एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.



महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यूची पहिली बळी आहे.
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) विविध २२२१ पदे

एकूण पदे :२२२१

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १५ मे २०१७

Read Full Advertisement
http://bit.ly/2pjW01O
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत PSI STI Assistant १००८ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर
एकूण पदे :१००८

वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

PSI Posts : 650
STI Posts : 251
Assistant : 107

परीक्षा शुल्क :
एका पदाकरिता ₹३७३
दोन पदाकरिता ₹४७३
तीन पदाकरिता ₹५७३

परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी
एका पदाकरिता ₹२७३
दोन पदाकरिता ₹३२३
तीन पदाकरिता ₹३७३

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १६ मे २०१७

Read Full Advertisement Here
http://bit.ly/2ouBpIY
बीसीसीआयची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील मक्तेदारी संपुष्टात
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची जागतिक क्रिकेटमधील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.

आयसीसीच्या आर्थिक नफ्याचे बीसीसीआय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या बरोबरीने प्रामुख्याने लाभार्थी आहेत, मात्र आता हे वर्चस्व धुळीस मिळणार आहे. भारताला आयसीसीच्या नफ्यातून प्रतिवर्षी ५७० दशलक्ष डॉलर्स रक्कम मिळते, मात्र आता ही रक्कम निम्यावर येणार आहे.

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत प्रशासन, घटनात्मक सुधारणा आणि आर्थिक संरचना या मुद्दय़ांवर मतदान घेण्यात आले. बीसीसीआयने सुधारणाविरोधी मतदान केले मात्र निकालात बीसीसीआय एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे बीसीसीआयवर ओढवलेल्या नामुष्कीमागे आयसीसीचे पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांची भूमिका निर्णायक आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष मनोहर यांनी बीसीसीआयच्या वर्चस्ववादी भूमिकेला आक्षेप घेत बदल सुचवला होता.

दबावतंत्र म्हणून भारतीय संघ इंग्लं ............................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/04/ca26And27April2017.html