MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
येत्या २८ मे २०१७ रोजी होणाऱ्या 'दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा २०१७' परीक्षेच्या नोट्स तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर मराठीतून वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करा.

डाउनलोड अँप MPSC Notes Pre (PSI / STI / ASO) from Following Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.stipsiasonotespre
जागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर
रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियातील अव्वल क्रमांकाचा मल्ल संदीप तोमर यांनी जागतिक कुस्ती क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. साक्षी पाचव्या, तर संदीप सातव्या स्थानी आहे.

साक्षीने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ५८ किलो गटात ब्रॉंझपदक जिंकले होते. संदीपला पुरुष विभागात ५७ किलो गटात सातवे स्थान आहे. १३ महिलांसह एकूण २४ आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल मल्ल पहिल्या दहा खेळाडूंत आहेत.

ऑलिंपिक आणि युरोपियन विजेता जॉर्जियाचा व्लादिमीर खिंचेगाशेविली (५८ किलो), रशियाचा विश्‍व ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca12and13April2017.html
सृष्टी -प्राणी
उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग १ - असमपृष्ठरज्जू प्राणी
०१. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
०२. पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
०३. सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
०४. प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
०५. नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
०६. अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
०७. आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी
०८. मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय
०९. इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
१०. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस



प्रोटोझोआ
हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन
उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
अमिबा - गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात. आकार अनियमित ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/classification-of-animals.html
भारतात ‘बीबीसी’वर अभयारण्यात पाच वर्षांची बंदी
काझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून १० एप्रिल २०१७ पासून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने घातलेल्या या बंदीमुळे आता बीबीसीला पुढील पाच वर्षे भारतामधील राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही.

काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाल्याचे सरकारने म्हटले आहे. ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca14and15Aprl2017.html

फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ( एनटीसीए) काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीचे पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच बीबीसीवर बंदी टाकण्याची शिफारसही केली होती.

बीबीसीकडून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते.

२७ फेब्रुवारीला एनटीसीएने आ
सजीव वर्गीकरणाचा आधार
०१. प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते. ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.

०२. उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त पेशीची उत्पत्ती झाली. ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.

०३. प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्‍यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात. सजीवांमधील फरक ओळखून साधारणत: समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.

०४. वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना 'वर्गेकक' म्हणतात. सर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे 'सृष्टी' होय. वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास 'विभाग' म्हणतात. प्राण्यांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास 'संघ' म्हणतात.

०५. जवळचे संबध दर्शविणार्‍या ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/classification-of-plants.html
महाराष्ट्र राज्य पोलीस परिवहन विभाग १०४ जागांसाठी पदभरती [शेवटचा दिनांक : १ मे २०१७]
एकूण पदे : १०४

वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹५००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२५०

Read Full Advertisement
http://bit.ly/2oM0FsU
कोंकण रेल्वेत कनिष्ठ अभियंता पदाच्या ३७ जागांसाठी पदभरती [शेवटचा दिनांक : ११ मे २०१७]
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता

एकूण पदे :३७

वयोमर्यादा : ३२ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹२००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST यांना फी नाही


Read Full Advertisement
http://bit.ly/2nQO5JM
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग ७९ पदांसाठी महाराष्ट्र कृषीसेवा पूर्व परीक्षा जाहीर [शेवटचा दिनांक : २ मे २०१७]
पदाचे नाव : कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ)

एकूण पदे :७९

किमान शैक्षणिक पात्रता : कृषी / कृषी अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षेवयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३

Read Full Advertisement
http://bit.ly/2oMg1xu
UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक कमांडंट पदासाठी १७९ जागांची भरती [शेवटचा दिनांक : ५ मे २०१७]
पदाचे नाव :सहाय्यक कमांडंट

एकूण पदे :१७९

किमान शैक्षणिक पात्रता :पदवीधर

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹२००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला यांना फी नाही

Read Full Advertisement
http://bit.ly/2nQOVGj
नोकरीसंदर्भात जाहिराती व त्याविषयी माहिती नियमितपणे तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमचे अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करा.
या एपमध्ये परीक्षेच्या जाहिराती, त्यांचा अभ्यासक्रम, परीक्षा दिनांक, परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि हे सर्व या एकाच एप्लिकेशन मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.jobupdates
जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांतील ‘मोठी लालसरी’ हतनूर परिसरात
जळगाव जिल्ह्य़ातील हतनूर (मुक्ताईसागर) धरणाच्या जलाशयात 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन नेटवर्क' (आययुसीएन) द्वारा घोषित जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांमधील 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' (अल्बीनो प्रकारातील स्थानिक भाषेतील 'मोठी लालसरी') हा स्थलांतरीत पाणपक्षी आढळून आला आहे.

या पक्षाची भारतातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेने याची दखल घेतली असून त्यासंदर्भातील माहिती मार्चच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातंर्गत कार्यरत 'इन्व्हायरमेंटल इन्फार्मेशन सिस्टिम' (ईएनव्हीआयएस) ने भुसावळ तालुक्यातील वरणगांव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या या संशोधनावर शिक्कामोर्तब केले आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये वेटलॅण्ड इंटरनॅशनल या स्वित्र्झलंडमधील पर्यावरण संस्थेकडून देशभरात पक्षीगणना झाली. त्यावेळी वरणगावच्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेने या गणनेत सहभाग घेत मुक्ताईसागर (हतनूर) धरणाच्या जलाशय परिसरात गणना केली. यावेळी पक्षीमित्र शिवाजी जवरे (बुलढाणा) यांना एक पक्षी दिसला असता तज्ज्ञांची मते जाणून घेतलीम् असता हा पक्षी मोठी लालसरीच असल्याचे निष्पन्न झाले.

महाजन यांनी याबाबतचा शोधनिबंध तयार करुन तो 'न्यूजलेटर ऑफ बर्ड वॉचर' या आंतरराष्ट्रीय विज्ञान ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca-16and17April2017.html
'कार्य' म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय. (w = f × d)
कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही 'आदिश राशी'आहे.

SI पद्धतीला बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन – मीटर म्हणजेच ज्यूल हे आहे. CGS पद्धतीत डाईन-सेंटीमीटर किंवा अर्ग आहे.


1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
1 अर्ग = 1 डाईन × 1 सें.मी.
1 ज्यूल = 107 अर्ग



घन, ऋण व शून्य कार्य
ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बालाने केलेले कार्य धन असते. उदा. बंद बस ढकलणे

बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्या बलाने केलेले कार्य ऋण असते. उदा. चेंडूचा झेल घेणे

ज्या वेळी बाल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते. उदा. दोरीला बांधलेला दगड फिरवणे

पृथ्वी व सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. यामध्ये केंद्रकीय बलाने केलेले कार्य शून्य आहे.

सरल दोलक विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेने कार्य करते, तर दोरीवरील ताण त्याच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात. त्यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत असतो. त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते.
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) विविध पदभरती [शेवटचा दिनांक : ५ मे २०१७]
परीक्षा दिनांक : १५ जून २०१७

वयोमर्यादा : ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग यांना फी नाही

http://jobs.mpscacademy.com/2017/04/ssc.html
एड्स (AIDS) रोगाविषयी माहिती
एड्स (AIDS)
प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू).

एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.

जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला. भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. महाराष्ट्रामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.


जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण भारत देशात आहेत. भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रु ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/aids.html
तुर्कस्तान करणार अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल
तुर्कस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये ५१.३७ टक्के मते मिळवून विद्यमान अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्डोगन यांनी देशाच्या राजकारणावरील आपली पकड घट्ट केली आहे.

एर्डोगन यांच्या अध्यक्षपदाची व्याप्ती आणि ताकद वाढविण्यासाठी देशभरात झालेल्या मतदानापैकी 'येस'च्या बाजूने ५१.३७ टक्के लोकांनी मतदान केले असून ४८.६३ टक्के जनतेने 'नो'च्या बाजूने मतदान केले.

तुर्कस्तानमध्ये अध्यक्षीय पद्धत लागू करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटनादुरुस्तीसाठी ही निवडणूक झाली. या प्रस्तावित विधेयकानुसार, यापुढील अध्यक्षीय आणि संसदीय निवडणूक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी होईल.

अध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा असेल. एका व्यक्तीला दोनदाच अध्यक्षपद भूषविता येऊ शकेल. तुर्कस्तानमधील ही नवी प्रस्तावित रचना अमेरिका आणि फ्रान्सच्या धर्तीवर असेल.

मंत्रिमंडळासह सर्व महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांकडे असतील. एक किंवा अधिक उपा ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca18and19April2017.html
कुष्ठरोग रोगाविषयी माहिती
कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो 'मायकोबॅक्टेरियम लेप्री' या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.

या रोगजंतूचा शोध डॉ.ए.हॅन्सन यांनी 1873 साली लावला. म्हणून या रोगास 'हॅन्सन्स डिसीज' असेही म्हणतात.कुष्ठरोगावरील औषध 'डॅप्सोन' (D.D.S.) हे 1940 मध्ये उपलब्ध झाले व त्यांचा वापर 1943 पासून सुरु झाला.

कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची भारतामध्ये 1954-55 मध्ये सुरुवात झाली. 1980 मध्ये कुष्ठरोगावरील 'बहुविध औषधोपचार पद्धती' (MDT) सुरु झाली. 1983 मध्ये 'राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम' सुरु झाला.

जगातल्या एकूण कुष्ठरुग्णांपैकी 1/3 रुग्ण एकटया भारतामध्ये आहेत. भारतात तामिळनाडू, आंध्र ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/leprosy.html
देना बँक मध्ये ३०० जागांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती [शेवटचा दिनांक : ९ मे २०१७]
एकूण पदे : ३००

किमान शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह पदवीधर

वयोमर्यादा : २० ते २९ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ ४००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹५०

http://bit.ly/2pESv3H
क्षयरोग रोगाविषयी माहिती
हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो. क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.


क्षयरोगाचे प्रकार -
०१. फुप्फुसाचा
०२. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)

क्षयरोगाची लक्षणे
तीन आठवडे किंवा ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/tuberculosis.html
म. गांधींच्या टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री
ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मिळ टपाल तिकिटांची पाच लाख पौंडांना विक्री झाली आहे. कोणत्याही भारतीय टपाल तिकिटाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

१९४८ मध्ये गांधींचा चेहरा असलेले दहा रुपयांची टपाल तिकिटे वितरित करण्यात आले होते. गुलाबी, तपकिरी रंगाचे ही केवळ तेरा टपाल तिकिटे सध्या विविध संग्राहकांकडे आहेत. त्यातील चार तिकिटांचा सेट ऑस्ट्रेलियातील खासगी तिकीट संग्राहकाने विकत घेतला.

भारतीय टपाल तिकिटाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत असल्याचे ब्रिटनमधील 'स्टेनली गिब्बन्स' या लिलाव करणाऱ्या कंपनीने निवेदनात म्हटले आहे. यातील उर्वरित ............................. .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/04/ca22and23April2017.html
हिवताप रोगाविषयी माहिती
०१. हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे. हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो. हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.

०२. डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मादांना रक्ताची गरज असल्याने फक्त मादाच दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.

०३. हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्‍या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.

०४. 'हिवताप जंतूचा शोध' १८८० मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला. सन १८९७ मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.

हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.
प्लीहेची वाढ होते.
रक्तक्षय होतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २०१७ जाहीर
एकूण पदे :१९९

किमान शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (B.E. / B.Tech)

वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० मे २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/04/blog-post_24.html