MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे निधन
किशोरीताई आमोणकर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. सततच्या रियाजामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे.

"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग', "सहेला रे...' सारख्या अनेत भावमधुर गीतांनी रसिकांच्या ह्दयाचा ठाव घेणाऱ्या किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ मध्ये झाला.

त्या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या. मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मातोश्री गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे झाले. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते.

घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. त्यांनी सर्व घराण्यांच्या गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता.

१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................ http://www.mpscacademy.com/2017/04/ca04and05april2017.html
Official Answer Key of State Services Pre Released Download
Paper 1 : https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/paper%20I.pdf

Paper 2 : https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/paper%20II.pdf
राज्यसेवेचा स्कोर कसा काढावा?
पेपर १
अ ==> बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या
ब ==> चुकलेल्या उत्तरांची संख्या

क==> ब / ३ (ब भागिले ३)

ड ==> अ - क

तुमचा पेपर १ चा स्कोर = ड x २




पेपर २
अ ==> बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या
ब ==> चुकलेल्या उत्तरांची संख्या
क==> डिसिजन मेकिंग एकूण स्कोर

ड ==> ब / ३ (ब भागिले ३)

इ ==> अ - ड

तुमचा पेपर २ चा स्कोर = इ x २.५ + क
एकूण स्कोर = पेपर १ + पेपर २
तुमचा एकूण स्कोर किती आला?
anonymous poll

१६० पेक्षा अधिक – 73
👍👍👍👍👍👍👍 28%

९० ते ११० – 36
👍👍👍 14%

१३० ते १४० – 34
👍👍👍 13%

१५० ते १६० – 30
👍👍👍 11%

११० ते १३० – 29
👍👍👍 11%

१४० ते १५० – 26
👍👍 10%

८० पेक्षा कमी – 20
👍👍 8%

८० ते ९० – 16
👍👍 6%

👥 264 people voted so far.
जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर
गेल्या कित्येक वर्षांपासून अडकून पडलेले वस्तू आणि सेवा कर विधेयक हे राज्यसभेतही मंजूर झाले आहे. २९ मार्च रोजी जीएसटीशी संबंधित चार विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे.

नव्या कायद्यामुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. जीएसटी संदर्भातील शेवटची मंजुरी १७-१८ मे रोजी मिळेल असे अरुण जेटली म्हणाले.

१ जुलैपासून या कायद्याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.जीएसटीमुळे सर्व देशात वस्तूंचे एकसमान दर राहतील.

जीएसटी हे १९५० पासून आतापर्यंत सर्वात मोठे अर्थविषयक विधेयक होते. जीएसटी लागू झाल्यानंतर भाववाढ आणि चलन फुगवटा होऊ शकतो. १ जुलै पासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. नंतरच्या काळात किमती स्थिर देखील होतील.

अवाजवी कर गुंता टाळून ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ..............http://www.mpscacademy.com/2017/04/ca06and07April2017.html
स्वातंत्र्योत्तर काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका
०१. स्वातंत्र्योत्तर काळात, प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांत ठराव संमत करून घेऊन, इंडोनेशिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जीरिया इ. आफ्रिकी आशियाई देशांच्या मुक्तीसाठी वातावरण तयार करण्यात भारताने उल्लेखनीय कामगिरी बजाविली.

०२. या भूमिकेतूनच १९५६ मध्ये इंग्लंड व फ्रान्स यांनी सुएझ कालव्यासंबंधी केलेल्या सैनिकी हस्तक्षेपास भारताने विरोध केला

०३. वसाहतींना स्वातंत्र्य मिळावे, असा एक ठराव संयुक्त राष्ट्राने करून त्याची अंमलबजावणी कितपत होते, हे पाहण्यासाठी एक २४ सदस्यांची समिती नेमली आहे. भारत हा या समितीचा प्रमुख सदस्य आहे.

०४. वसाहतवादाप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाविरुद्ध जागतिक लोकमत संघटित करण्यासाठी भारताने खूप प्रयत्न केले आहेत

०५. नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते.

०६. भारताची भौगोलिक स्थिती, रशिया व चीनशी असलेले निकटत्व लक्षात घेता, शीतयुद्धाच्या संदर्भात त्याने स्वीकारलेली तटस्थतेची भूमिका स्वाभाविक वाटते.

०७. एकीकडे भारताचे आर्थि ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/10/IndiasRoleInInternationalPolitics.html
भारतीय डाक विभाग (महाराष्ट्र सर्कल) १७८९ डाक सेवक पदभरती [शेवटचा दिनांक : ६ मे २०१७]
पदाचे नाव :ग्रामीण डाक सेवक

एकूण पदे :१७८९

किमान शैक्षणिक पात्रता :
१. दहावी उत्तीर्ण
२. संगणक ज्ञान आवश्यक / MS-CIT / CCC

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

Full Advertisement
http://jobs.mpscacademy.com/2017/04/blog-post_8.html
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत ४०८ पदांसाठी लिपिक टंकलेखक परीक्षा जाहीर [शेवटचा दिनांक : २६ एप्रिल २०१७]
पदाचे नाव :लिपिक टंकलेखक

एकूण पदे :४०८
मराठी टंकलेखक : ३७०
इंग्रजी टंकलेखक : ३८

किमान शैक्षणिक पात्रता :
१.दहावी उत्तीर्ण
२. मराठी टंकलेखन ३० श.प्र. मिनिट व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र. मिनिट

Full Advertisement
http://jobs.mpscacademy.com/2017/04/mpsc_8.html
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग ४३ पदांसाठी महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा जाहीर [शेवटचा दिनांक : २६ एप्रिल २०१७]
एकूण पदे :४३

वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २६ एप्रिल २०१७

Full Advertisement
http://jobs.mpscacademy.com/2017/04/mpsc.html
Wasim Khan:
नोकरीसंदर्भात जाहिराती व त्याविषयी माहिती नियमितपणे तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमचे अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करा.
या एपमध्ये परीक्षेच्या जाहिराती, त्यांचा अभ्यासक्रम, परीक्षा दिनांक, परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि हे सर्व या एकाच एप्लिकेशन मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.jobupdates
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी मलाला युसूफजाई
युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे.

मलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले. सोमवारी याबाबतची औपचारिकता पूर्ण होईल असे त्यांनी म्हटले.

पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाविरोधात तालिबानचे दहशतवादी होते. या भागात शिक्षणाचा प्रसार थांबव असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते. परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण घेणे आणि त्याचा प्रसार करणे थांबवले नाही.

दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये तिच्यावर हल्ला करत तिला ठार करण्याचा प्रयत्नही केला. त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले.

तिच्या या कार्याची दखल घेत नोबेल कमिटीने तिला शांततेचा २०१४ चा नोबेल पुरस्कार दिला. हा पुर ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca08and09April2017.html
मराठी भाषेतील वृत्तपत्रे
०१. महाराष्ट्रातील प्रबोधनयुगाचा विचार करता चार मुख्य वृत्तपत्रीय प्रवाह दर्शवले जातात. सुधारणावादी प्रवाह, ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रवाह, धर्म-परंपराभिमानी प्रवाह आणि अब्राह्मणी (बहुजनवादी) प्रवाह हे ते चार प्रवाह आहेत.

०२. सुरुवातीच्या काळातील वृत्तपत्रे ही मतपत्रे म्हणून ओळखली जातात. पहिल्या महायुद्धानंतर वृत्तपत्रीय स्वरूपात बदल होऊन व्यावसायिक पत्रकारितेचा उदय झालेला दिसून येतो. हा प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे.

०३. सुधारणावादी वृत्तपत्रे सुधारणावादी वृत्तपत्रांनी एकप्रकारे आत्मटीकेचे कार्य पार पाडले. ही सुधारणावादी पत्रे मुख्यतः उच्चविद्याविभूषित भारतीयांनी सुरू केली होती. यांचे ध्येय पाश्चात्त्य ज्ञानाच्या आधारे स्वकियांचे प्रबोधन करणे हेच होते.

०४. मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु केले. त्यापूर्वी मुंबापूर वर्तमान नावाचे वृत्तपत्र (२० जुलै १८२८) निघाल्याची नोंद आढळते.

०५. दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले. या पत्रात इंग्रजी व मराठी अशा ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/10/historyofdailypapersinmaharashtra.html
महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारिता
०१. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत, या भुमिकेतून निघालेले पहिले पत्र म्हणजे कृष्णराव भालेकर (१८५०-१९१०) यांचे दीनबंधू.

०२. पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी भालेकरांनी ते सुरु केले. पुढे आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते चालविता आले नाही, त्यामुळे १८८० साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संताजी आवटे यांच्या स्वाधीन केले. लोखंडे यांनी हे पत्र मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांनी ते बरीच वर्षे चालविले. परंतु लोखंडे यांच्या मृत्यूनंतर (१८९७) ते बंद पडले.

०३. दीनबंधूप्रमाणेच दीनमित्र हेही ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने हे पत्र गाजले. मुकुंदराव पाटील यांनी ते तीस वर्षे चालविले. मुळात १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले. १८९२ मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे पत्र बंद पडले.

०४. ब्राह्मणेतर चळवळीचे एक अध्वर्यू दिनकरराव जवळकर (१८९८-१९३२) यांची पत्रकारितेतील कामगिरीही महत्त्वाची आहे. शाहू महाराजांच्या इच्छेनुसार त्यांनी ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/10/historyofnewspapersofmaharashtra.html
पदाचे नाव :प्रोबेशनरी ऑफिसर

किमान शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह पदवीधर

वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ ६५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १७ एप्रिल २०१७

View Full Advertisement
http://jobs.mpscacademy.com/2017/04/blog-post_10.html
ब्रिटिशकालीन भारतातील औद्योगिक धोरण
०१. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी कापड, शाली, जरीकाम व किनखाब ह्यांना मागणी होती. परंतु इंग्‍लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होऊन अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ते जवळजवळ लयास गेले.

०२. जुन्या भारतीय उद्योगधंद्यांच्या र्‍हासाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
ब्रिटिशांची विघातक व्यापारी व आर्थिक नीती,
एतद्देशीय राज्यांच्या र्‍हासाबरोबर उद्योगधंद्यांना असणार्‍या राजाश्रयाचा लोप,
औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावर व त्यामुळे स्वस्त यंत्रोत्पादित वस्तूंच्या स्पर्धेत अंतर्देशीय व परदेशी बाजारपेठांत भारतीय मालाच्या मागणीचा र्‍हास,
परदेशी पक्क्या मालाच्या आयातीस व एतद्देशीय कच्च्या मालाच्या निर्यातीस उपकारक व त्यामुळे भारतीय उद्योगधंद्यांच्या विकासास मारक, असा भारतीय रेल्वेचा विकास,
जेत्यांच्या संस्कृतीच्या अंधानुकरणाने परंपरागत भारतीय मालाच्या बाजारपेठेत घट,
ह्या सर्व बदलांच्या अनुषंगाने उत्पादनतंत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्याची निकड होती. तथापि भारतीय कारागीर अशा सुधारणा करण्यात अयशस्वी ठरले.

०३. ईस्ट इंडिया कंपनीकडून १८५० मध्ये राज्यकारभार राणीकडे जाईपर्यंत व त्यानंतरही ब्रिटिश ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/10/IndustrialDevelopmentOfIndia.html
भारत- ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्या भारत दौऱ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार झाले असून दहशतवाद, संघटीत गुन्हेगारी अशा विविध विषयांवरील करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली.

या दौऱ्यात दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर असेल असे त्यांनी सांगितले. आम्ही भारतासोबत एकत्र काम करु इच्छितो. ऑस्ट्रेलियात सुमारे पाच लाख नागरिक भारतीय वंशाचे आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

माल्कम टर्नबुल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. यामध्ये दोन्ही देशांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली. यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

भारतीय विद्यार्थ्यांना चांगली संधी आणि सोयी सुविधा दिल्या जातील असे टर्नबुल यांनी सांगितले. दहशतवादविरोधी करार तसेच मानवी तस्करी, आर्थिक गैरव्यवहार आणि अन्य गुन्ह्यासंबंधीच्या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील अशी आशाही त्यांनी वर्तवली आहे.

सोमवारी टर्नबुल यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर टर्नबुल यांचा हा पहिलाच भा ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca10and11April2017.html
येत्या २८ मे २०१७ रोजी होणाऱ्या 'दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा २०१७' परीक्षेच्या नोट्स तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर मराठीतून वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करा.

डाउनलोड अँप MPSC Notes Pre (PSI / STI / ASO) from Following Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.stipsiasonotespre
जागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर
रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियातील अव्वल क्रमांकाचा मल्ल संदीप तोमर यांनी जागतिक कुस्ती क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. साक्षी पाचव्या, तर संदीप सातव्या स्थानी आहे.

साक्षीने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ५८ किलो गटात ब्रॉंझपदक जिंकले होते. संदीपला पुरुष विभागात ५७ किलो गटात सातवे स्थान आहे. १३ महिलांसह एकूण २४ आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल मल्ल पहिल्या दहा खेळाडूंत आहेत.

ऑलिंपिक आणि युरोपियन विजेता जॉर्जियाचा व्लादिमीर खिंचेगाशेविली (५८ किलो), रशियाचा विश्‍व ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2017/04/ca12and13April2017.html
सृष्टी -प्राणी
उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग १ - असमपृष्ठरज्जू प्राणी
०१. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
०२. पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
०३. सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
०४. प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
०५. नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
०६. अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
०७. आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी
०८. मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय
०९. इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
१०. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस



प्रोटोझोआ
हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन
उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
अमिबा - गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात. आकार अनियमित ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .............. http://www.mpscacademy.com/2016/12/classification-of-animals.html