MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जमिनीची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली.

जमीन हस्तांतरित होण्यापूर्वी राज्य शासनास या जागेवर काम सुरू करण्याचे निर्देश पंतप्रधान यांनी दिले होते. त्याप्रमाणे राज्य शासनाने काम सुरू केले आहे. तसेच निविदाही काढली आहे.

केंद्र शासनाने डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा उपलब्ध करून देण्यासाठी ऍटर्नी जनरल यांचे मत घेऊन सीक टेक्‍सटाइल अंडर टेकिंग्ज कायदा १९७४च्या कलम ११ए खाली जमिनीचे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार हस्तांतराच्या प्रक्रियेसाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात ५ एप्रिल २०१५ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता.

डॉ. आंबेडकर स्मारकाचा अंदाजे खर्च ४५० कोटी ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca25and26march2017.html
संगम काळ
०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित 'तौल्कप्पियम' या ग्रंथाची रचनासुद्धा संगम काळातच झालेली आहे. h

०२. गायकांच्या गाण्यावर नर्तकी नृत्य करत असे. यांना 'पाणर' तसेच 'विडैलियर' असे म्हटले जात होते.

०३. 'संगम' हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ 'गोष्टी' किंवा 'परिषद' असा होतो. संगम साहित्याचा मुख्य विषय 'शृंगार' व 'वीरगाथा' आहे. या काळात शृंगाराला 'अहम' आणि वीरगाथेला 'पुरम' असे संबोधले जात होते. 'पेदिनेकिलकिन्कू' ही संगम साहित्याची प्रसिद्ध रचना आहे.

०४. प्रथम संगमाचे आयोजन 'मदुरा' येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. द्वितीय संगमाचे आयोजन 'कपाटपुरम' येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. तृतीय संगमाचे आयोजन 'मदुरा' येथे नक्कीरर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.

०५. 'अवे' हा संगमकालीन परिवार होता ज्याचा अर्थ सभा असे होतो. 'उर' नावाची संस्था नगराच्या प्रशासनाची व्यवस्था पाहत असे.

०६. अरीक्मेंडू येथील उ ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/imp-notes-in-ancient-indian-history-part-2.html
तीन वर्षांत ४४ शहरांत ७७५९ कोटींची 'अमृत' योजना
केंद्र सरकारमार्फत अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमृत अभियानांतर्गत राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली ४३ शहरे व विशेष बाब म्हणून शिर्डी या शहराची निवड झाली आहे

या शहरांना पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प आणि शहरांची फुफ्फुसे असलेली हरित क्षेत्रे तयार करण्यासाठी तीन वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ७७५९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे.

आराखड्याप्रमाणे ३७८९ कोटी रुपयांचे ३८ पाणीपुरवठ्याचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तर, ३७५३ कोटी रुपयांचे ३३ मलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील नागरी भागातील लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकसंख्या ही या अभियानात निवड केलेल्या ४४ शहरांमध्ये समाविष्ट आहे. या अभियानाचा कालावधी हा २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांचा आहे.

पाणीपुरवठा योजनेत अचलपूर (२४ कोटी), यवतमाळ (२६९ कोटी), वर्धा (३५ कोटी), उस्मानाबाद (६८ कोटी), मालेगाव (७८ कोटी), सातारा (८ कोटी), सोलापूर (७२ कोटी), इंचलकरंजी (६९ कोटी), हिंगणघाट (६२ कोटी), अमरावती (११४ कोटी), लातूर (४६ कोटी) ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca27and28mar2017.html
ठळक घडामोडी
०१. १९४६ च्या सुरुवातीस निवडणुका झाल्या, त्या वेळी देशात फक्त १५ टक्के सुशिक्षित व जमीनजुमला धारणा करणाऱ्‍यांनाच मताधिकार होता. त्यामुळे बंगालमध्ये अशरफ मुसलमानांचा राजकारणावरचा प्रभाव टिकून होता. निवडणुकांत मुस्लिम लीगला नेत्रदीपक यश मिळाले. पक्षावर जिनांची पकड अधिकच घट्ट झाली.

०२. ७ ते ९ एप्रिल १९४६ ला निवडून आलेल्या लीग नेत्यांचे दिल्लीत खास अधिवेशन झाले. या अधिवेशनात जिनांच्या सूचनेवरून सुहरावर्दी या दुसऱ्या एका बंगाली नेत्याने १९४० चा लाहोर ठराव दुरुस्त करून दोन पाकिस्तानांऐवजी एकच पाकिस्तान निर्माण करावे असा ठराव मांडला व तोही एकमताने पसार झाला.

०३. अखंड पाकिस्तानाच्या ५६ टक्के एवढी विशाल लोकसंख्या पूर्व पाकिस्तानात राहत होती. विद्यमान बांगला देश हा पूर्वी पूर्व ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/bangladeshFreedomFight.html
पदाचे नाव :प्रशासकीय अधिकारी

एकूण पदे :२०५

किमान शैक्षणिक पात्रता :
किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेचा पदवीधर
(SC / ST साठी ५५% गुण)

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ ६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २० एप्रिल २०१७ ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://bit.ly/2ntIiq0
मौर्य काळ
सम्राट अशोक
प्राचीन अभिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख 'देवनामप्रिय' आणि 'प्रियदर्शी' असेही करण्यात आला आहे. सिंहली भाषिक ग्रंथ दीपवंश मध्ये त्याचा उल्लेख 'प्रियदर्शन' असा करण्यात आला आहे.

अशोकाने त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात 'महामात्रो' ची नियुक्ती केली होती.

'उपगुप्त' हा मथुरेचा एक बौद्ध भिक्षु होता. त्याच्या प्रभावाखाली अशोकाने धर्मपरिवर्तन करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लघु शिलालेख मध्ये अशोकाने स्वतःचा उल्लेख 'बुद्ध शक्य' असा केला आहे.


अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले. अशोकाने मज्जहानतिकाला बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी काश्मीरला पाठविले.

१७५० मध्ये टीफेंथैलरने सर्वप्रथम दिल्लीमध्ये अशोक स्तंभ शोधून काढला. १९१५ मध्ये बीडनं ने मस्की येथे ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://bit.ly/2of0m74
अंजू जॉर्जला १३ वर्षांपूर्वीच्या उडीसाठी ऑलिम्पिकचे रौप्यपदक
जागतिक अॅथलिट स्पर्धेत लांब उडी प्रकारात भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून देणारी अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिचा आता ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या यादीतही समावेश होण्याची शक्यता आहे. १३ वर्षांपूर्वी झालेल्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत मारलेल्या लांब उडीबद्दल तिला रौप्यपदक दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


२००४ सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू जॉर्ज हिने ६.८३ मीटर लांब उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. पण स्पर्धेत तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकावर त्यावेळी रशियाच्याच स्पर्धकांनी नाव कोरले होते. मात्र, रशियाच्या या खेळाडूंच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर २०१३ साली हा संशय खरा ठरला. पदक विजेत्या रशियाच्या खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये त्यांनी मिळवलेली पदकं त्यांच्याकडून काढून घेण्यात आली.

ही तिन्ही पदकं आता त्यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानाव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाची ब्रॉनविन थॉम्पस ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca29and30mar2017.html
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग १
Special Notes for State Services (Rajya Seva)
काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांनी कुतुबुद्दीन ऐबकला लहानपणीच गुलाम म्हणून विकत घेतले होते. त्यांनी त्यास मुहम्मद घोरी यास विकले. पुढे तो आपल्या पराक्रमाने बादशाह पदावर पोहोचला.

कुतुबुद्दीन ऐबकाने राज्याभिषेकाच्यावेळी त्याच्या नावाचा खुतबा घेतला नव्हता. किंवा त्याने स्वतःच्या नावाची वेगळी नाणीसुद्धा पाडली नाहीत. मृत्यूनंतर ऐबकाचा लाहोर येथे दफनविधी करण्यात आला.

दिल्लीच्या किला राय पिथौरा जवळील 'कुब्बत उल इस्लाम' या मस्जिदीचे निर्माण कुतुबुद्दीन ऐबकने केले होते.

अजमेर येथील 'अढाई दिन के झोपडे' या प्रसिद्ध मस्जिदीचे निर्माण कुतुबुद्दीन ऐबकने केले होते.
शमशुद्दीन अल्तमश (इल्तुतिमीश) हा कुतुबुद्दीन ऐबकाचा जावई होता. अल्तमशने शम्सी वंशाची स्थापना केली. एलदौज उर्फ नासिरुद्दीन कुबाचा अल्तमशचा प्रमुख प्रतिद्वंद्वी होता.

अल्तमशने आपल्या ४० गुलाम सरदारांचा एक गट बनविला होता. तो गट इतिहासात 'तुर्कान-ए-चिहीलगानी' ना ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... .................http://www.mpscacademy.com/2017/03/imp-notes-of-medieval-indian-history.html
एकूण पदे :६०६

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST ₹१५०, OBC ₹३००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० एप्रिल २०१७ ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_31.html
Special for Rajyasewa
सल्तनतकाळ
इ.स. १२०६ ते १५२६ पर्यंतच्या काळाला सल्तनतकाळ असे संबोधण्यात येते. सल्तनतकाळातील पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक तर शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी हा होता. सल्तनत काळात गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश आणि लोदी वंश या ५ घराण्यांनी दिल्लीवर राज्य केले.

याच काळात तैमूरने १३३८ साली भारतावर आक्रमण केले.

सल्तनतकाळात प्रधानमंत्र्याला वजीर नावाने ओळखले जात असे. वजिराच्या विभागाला 'दिवाण ए वजारत' असे नाव होते. प्रांताच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला 'मुशरिफ ए मामलिक' असे नाव होते.

सल्तनतकाळात महालेखापरीक्षकाला 'मुस्तफा ए मामलिक' असे म्हटले जात असे. याचे मुख्य कार्य 'मुशरीफ ए मामलिक'द्वारे तयार केले गेलेल्या हिशोबाची तपासणी करणे हे होते.

सेनेच्या मुख्य अधिकारी याला 'आरीज ए मुमलिक असे म्हणण्यात येत असे. मात्र हा मुख्य सेनापतो नसे.

आलेख विभागाच्या अध्यक्षाला ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................ http://www.mpscacademy.com/2017/03/medieval-indian-history-notes-part2.html
पेगी व्हिटसन यांचा आठव्यांदा 'स्पेस वॉक'
सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी महिला अवकाशवीर असलेल्या पेगी व्हिटसन (वय५७) यांनी आज आठव्यांदा अवकाशातून चालत जात (स्पेस वॉक) नवा विक्रम प्रस्थापित केला. इतक्‍या वेळा 'स्पेस वॉक' करणाऱ्या त्या पहिल्याच महिला अवकाशवीर ठरल्या आहेत.

व्हिटसन आणि त्यांचे सहकारी शेन किमबरो यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बाहेर पडत येथे येणाऱ्या अवकाशयानांसाठी पार्किंगसाठी जागा (डॉकिंग पोर्ट) तयार करण्याच्या कामास सुरवात केली.

अवकाशात सर्वांत अधिक काळ चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर असून त्या आतापर्यंत ५० तास चाळीस मिनिटे अवकाशात चालल्या आहेत.

या 'स्पेस वॉक' दरम्यान व्हिटसन या हा विक्रमही मोडतील. व्हिटसन या गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून अवकाशस्थानकात असून त्या तिसऱ्यांदा अवकाशस्थानकात आल्या आहेत. त्यांनी आ ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................http://www.mpscacademy.com/2017/04/ca-1-april-2017.html
मुगल साम्राज्य
अकबर
अकबर सत्तेवर आला तेव्हा राज्याला कठीण परिस्थितीतुन बाहेर काढण्याचे श्रेय बैरामखान यास जाते. १५५६ ते १५६० या कालावधीत मुगल साम्राज्याची शासन सूत्रे बैरम खान यांच्या हातात होती.

काही काळानंतर अकबर व बैरम खान यांच्यात बिनसले. तिल्वाडा या ठिकाणी अकबर व बैरम खान यांच्या फौजांमध्ये युद्ध झाले. या युद्धात बैरम खान पराजित झाला.

अकबराची आई हमिदा बानू एक धार्मिक सुफी शिया परिवारातील स्त्री होती. अकबर वर तिचा तसेच इतर स्त्रियांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणूनच काही इतिहासकार अकबर शासनकाळाला 'परदा शासन' किंवा 'पेटीकोट सरकार' असे संबोधतात.

अकबराची दाइ महाम अनगा हिच्या मृत्यूनंतर अकबराच्या शासनातील पेटीकोट शासनाचा अंत झाला.

इ.स. १५६२ मध्ये अकबराने गुलामी प्रथा संपुष्टात आणली.

अकबर पहिला असा मुस्लिम शासक होता ज्याने राजस्थानात सर्वाधिक यश प्राप्त केले. अकबराने ........... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ......... http://www.mpscacademy.com/2017/04/medieval-history-important-notes-part-3.html
भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे आज(रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच जम्मु काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

जम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हो बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मु-श्रीनगर हा प्रवास ३० किलोमीटर ने कमी होईल आहे तर या प्रवासातील दोन तास वेळ वाचणार आहे.

देशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ९.२८ किलोमीटर आहे. २०११ साली या बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. जवळपास सात वर्षाच्या मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पुर्ण झाले असुन त्यासाठी ३७०० कोटी रुपये इतका खर्च लागला.

अत्याधुनिक सुरक्षा असलेल्या या बोगद्यामध्ये १२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीचे नियम ....... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ........http://www.mpscacademy.com/2017/04/ca02and03april2017.html
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे निधन
किशोरीताई आमोणकर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. सततच्या रियाजामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे.

"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग', "सहेला रे...' सारख्या अनेत भावमधुर गीतांनी रसिकांच्या ह्दयाचा ठाव घेणाऱ्या किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ मध्ये झाला.

त्या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या. मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मातोश्री गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे झाले. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते.

घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. त्यांनी सर्व घराण्यांच्या गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता.

१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................ http://www.mpscacademy.com/2017/04/ca04and05april2017.html
Official Answer Key of State Services Pre Released Download
Paper 1 : https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/paper%20I.pdf

Paper 2 : https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/paper%20II.pdf
राज्यसेवेचा स्कोर कसा काढावा?
पेपर १
अ ==> बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या
ब ==> चुकलेल्या उत्तरांची संख्या

क==> ब / ३ (ब भागिले ३)

ड ==> अ - क

तुमचा पेपर १ चा स्कोर = ड x २




पेपर २
अ ==> बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या
ब ==> चुकलेल्या उत्तरांची संख्या
क==> डिसिजन मेकिंग एकूण स्कोर

ड ==> ब / ३ (ब भागिले ३)

इ ==> अ - ड

तुमचा पेपर २ चा स्कोर = इ x २.५ + क