MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
शाहरूख खानला चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांना चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी राज्यपाल म्हणाले की, शाहरूख खान फक्त त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाहीत, तर त्यांच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात.

शाहरूख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते. यश चोप्रा यांनी शाहरूख खान यांच्यातील क्षमता खूप आधी ओळखली. शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्याचे श्रेय यश चोप्रा यांना जाते.

सर्वोच्च स्थानावर फार काळ ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca-26to28feb2017.html
कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार
सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याची किमया साधणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) देण्यात येणाऱ्या वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीच्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

यंदाच्या हंगामात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावांचा मानही कोहलीच्या नावावर आहे. त्याने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे.

अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला आहे.

प्रदीर्घ रणजी हंगामात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या श्रेयस अय्यरला माधवराव सिंधिया पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कूचबिहार करंडक स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या अरमान जाफरला एनकेपी साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca01and02mar2017.html

सी. के. नायडू चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या जय बिस्ताची एम. ए. चिदम्बरम पुरस्कारासाठी निवड झाली आ
* औरंगाबाद जिल्हा
कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी

* जालना जिल्हा
कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी

* बीड जिल्हा
कांबळी नदी, मांजरा नदी

* उस्मानाबाद जिल्हा
मांजरा नदी, तेरणा नदी

* लातूर जिल्हा
मांजरा नदी

* नांदेड जिल्हा
उमरगा(नाला), उलूपी नदी, गांजोटी(नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, घरणी नदी, चांदणी ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/rivers-in-maharashtra-districtwise.html
In This Video we are going to describe the List of the Winners of Academy Awards 2017. Academy Awards is Also known as Oscars. Oscar Awards. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO Rajyaseva (State Services)......... ........................ ...................... ................... .......... .................... ...................... ........................
https://www.youtube.com/watch?v=K4BodDlyM14
अटारी सीमेवर फडकणार सर्वात उंच तिरंगा
पंजाबमधील अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकवण्यात येणार आहे. पाच मार्चला अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकवला जाणार आहे. लाहोरवरुनदेखील सहज दिसू शकेल, इतक्या उंचीवर तिरंगा लावण्यात येणार आहे. मात्र या तिरंग्याबद्दल पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे.

तिरंगा फडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खांबामध्ये दूरवरचे दृश्य टिपणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हेरगिरी केली जाऊ शकते, असा आक्षेप पाकिस्तानने घेतला आहे. मात्र भारताकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.

इतक्या उंचीचा खांब लावने दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन आहे, असा आक्षेप पाकिस्तानकडून घेण्यात आला आहे. भारतीय तिरंगा जिरो लाईनच्या २०० मीटर मागे आहे. त्यामुळे कोणत्याही कराराचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आले आहे.

अटारीच्या सीमेवर ३५० फूट उंचीवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक उंच असलेला तिरंगा फडकवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या खांबाचे वजन ५५ टन असणार आहे.

देशातील सर्वात उंच तिरंगा १२० ......... ........................ ...................... ................... .......... .................... ...................... ........................ http://www.mpscacademy.com/2017/03/ca-03and04mar2017.html
गोदावरी
*उगम*
त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
*उपनद्या*
उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती.
डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा
*वैशिष्ट्ये*
मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
लांबी- १,४६५ कि.मी.
सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम


०२. भीमा नदी
*उपनद्या*
उजव्या तिराने :- भामा, इंद्रायणी, . .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/riversInIndia.html
अँडी मरे अजिंक्य
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेने दुबई टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह यंदाच्या हंगामातील पहिलेवहिले जेतेपद पटकावले. मरेच्या कारकीर्दीतील हे ४५वे जेतेपद आहे. अंतिम लढतीत मरेने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर ६-३, ६-२ अशी मात केली.

या विजयासह मरेने व्हर्डास्कोविरुद्धची कामगिरी १३-१ अशी सुधारली. स्पर्धेच्या २५ वर्षांच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा मरे इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. शेवटच्या ८ पैकी ७ स्पर्धामध्ये मरेने अंतिम फेरी गाठली आहे. पाच वर्षांपूर्वी अंतिम लढतीत रॉजर फेडररविरुद्ध मरेला पराभवाला सामोरे जावे ला .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca0506marc2017.html
वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

०२. वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते. उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे

०३. वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण असते.

०४. सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.
भौगोलिक वैशिष्ट्ये-
- वाळूने व्यापलेला प्रदेश.
- वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
- हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
- वर्षभरातील पाव .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/Desert.html
सर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.

०२. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते.
०३. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात.

०४. नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वहात येतयेत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हण .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/09/Rivers.html
MPSC Notes Pre (STI /PSI ASO) [Updated App]


Download Updated Version of MPSC PSI STI ASO Notes App.
If you are using Previous Version of This App Then Uninstall it and Install This New Version.
This Version Came with More User Friendly Interface. Less Size. And More Notes. Thanks.

Author:- Mpsc Academy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0


Download Link from Play Store :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.stipsiasonotespre
MPSC Current Events [Updated App]

Download Updated Version of MPSC Current Events App.
If you are using Previous Version of This App Then Uninstall it and Intstall This New Version.
This Version Came with More User Friendly Interface. And Less Size. Thanks.

Author:- Mpsc Academy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0

Download From Play Store :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.currentevents
स्वच्छ भारत योजनेत महाराष्ट्र पहिला
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील १२७ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात ३१२८२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केले आहे.

राज्यात सध्या १५३५१० शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील १३ शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर नगर, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा शहरे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी आठ शहरांचा समावेश आहे.

याची फलश्रुती म्हणजे हागणदारीमुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील दहा शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरगुड, पन्हाळा आणि वेंगुर्ला या पाच गावांचा समावेश आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदीमधील पहिले पावलात १९ शहरे २ ऑक्‍टोबर २०१५ रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत. दुसऱ्या पावलात २६ जानेवारी २०१६ पर्यंत ३२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहे. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

३६ शहरे २ ऑक्‍टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर २ ऑक्‍टोबर २ .............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca0708mar2017.html
ताडोबात 'बटरफ्लाय ट्रेल' १३ प्रजातींची फुलपाखरे
भारतात प्रथमच ५ मार्चला राष्ट्रीय फुलपाखरू संस्था व वर्धा जिल्ह्य़ातील सेलू येथील विद्याभारती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच 'बटरफलाय ट्रेल' उपक्रम राबविण्यात आला.

या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्य़ात हा उपक्रम करण्याची जबाबदारी येथील ग्रीन प्लॅनेट सोसायटी व सार्ड संस्था (सोशल अ‍ॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट)वर होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थांनी पद्मापूर गेट ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली गेट रस्त्यावर बटरफलाय ट्रेल आयोजित केले होते.

सव्‍‌र्हे करीत असताना १३ प्रजातींची फुलपाखरे मिळाली. त्यात कॉमन रोज, टायगर फलेन, कॉमन सेलर, कॉमन ग्रॉस येलो, ग्रेट एग्जफलाय, ब्ल्यू टायगर, लाइम बटरफलाय, कॉमन मॉरमन, कॉमन पिक्चर व्ह्य़ुविंग, कॉमन लेपर्ड, ऑरेंज टिप, ब्ल्यू फॅन्सी, कॉमन जाजबेल, हेलन ग्रेट एग्जफलाय फिमेल इत्यादी प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद घेऊन ती राष्ट्रीय फुलपाखरू संस्थेला पाठविली जातील.

संपूर्ण भारतात सुमारे १५०० फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात ही संख्या सुमारे ३०० असून विदर्भात सुमारे १७७ आहे. उत्तर दक्षिण भागांमध्ये सर्वाधिक सुमारे ५ ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca-09-10-march-2017.html
सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस क्षेपणास्राची यशस्वी चाचणी
भारत व रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चंदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावर शनिवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस असून, त्याची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंतचे लक्ष अचूकपणे टिपू शकते. या नव्या ब्राह्मोस क्षेपणास्रामध्ये अचूक लक्ष भेदण्याची क्षमता आहे.

नवीन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले हे क्षेपणास्र संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हीं दलांची शक्ती वाढणार आहे. सर्वात अचूक लक्ष्यभेदी क्षमता असणारे हे जगातील पहिले क्षेपणास्र आहे.

'डिआरडीओ'चे प्रमुख ख्रिस्तोफर या क्षेपणास्राविषयी म्हणाले की, भारत-रशियाच्या संगनमतानेच ब्राह्मोसची मारक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्राह्मोसच्या आणखी एका आवृत्तीवर काम सुरु असून, ८०० किमी पल्ल्याचे लक्ष्य गाठणारे क्षेपणास्र लवकर ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca11and12mar2017.html
Forwarded from Wasim Khan
PSI पूर्व परीक्षा २०१७ उत्तरे (७५ उत्तरे)
Visit Following Link to See Answers

http://www.mpscacademy.com/2017/03/psi-pre-2017-answers.html
सागरी तापमानवाढीमुळे मालदीवमधील प्रवाळ बेट नष्ट
वर्षभरापूर्वी मालदीवमध्ये असलेले प्रवाळ बेट आता नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. वाढत्या सागरी तापमानामुळे हा परिणाम होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.

जगातील प्रवाळबेटे नष्ट होत असून ती परिसंस्थात्मक दुर्घटना आहे. जगात गेल्या तीस वर्षांत निम्मी प्रवाळबेटे नष्ट झाली आहेत. आता उरलेली प्रवाळ बेटे निदान तीन दशके तरी टिकून राहावीत अशी संशोधकांची अपेक्षा आहे.

प्रवाळ बेटांचे अस्तित्व हे पृथ्वीला उपकारक असते कारण त्यामुळे सागरी प्रजातींना फायदा होत असतोच. शिवाय जगातील अब्जावधी लोकांना त्याचा लाभ मिळतो. आतापासून शंभर वर्षांनी सर्व प्रवाळ बेटे नष्ट होतील व हा लाभ मिळणार नाही.

जगात आता जागतिक तापमानवाढ थांबली असे गृहित धरले तरी २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळ बेटे नष्ट झालेली असतील. त्यामुळे खूप मोठी उपाययोजना केली गेली तरच ही बेटे वाचू शकतात. मानवी वंशच या प्रवाळ बेटांच्या नष्ट होण्याने धोक्यात येऊ शकतो.

प्रवाळ बेटे ऑक्सिजनची निर्मिती करतात. पाण्याखालील पर्जन्य जंगले असे त्यांचे वर्णन केले जाते. चार पैकी एका सागरी प्रजातीला प्रवाळ बेटात आसरा मिळत असतो. वादळांपासून किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे कामही ही बेटे करतात. या बेटांवरील ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/CA13and14march2017.html
In This Video we are going to describe the Infromation About INS Virat Aircarft Ship. This Ship is Also Called as Mother Ship. And Play Crucial Role in Wars for India. This Video Will be Useful for MPSC PSI STI ASO State Services ( Rajyaseva ).

https://youtu.be/fvcKwprweH0
PSI Pre 2017 Answer Key