MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र)
मृत्यू : १ ऑगस्ट १९२० (मुंबई, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन
०१. केशव उर्फ बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्‍नागिरीमधील एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.

०२. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.

०३. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. ते शिक्षण खात्यात डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. १८६६ साली गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. टिळकांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला.

०४. पुण्याला आल्यावर लवकरच १८६६ साली त्यांच्या आई मरण पावल्या आणि लोकमान्य टिळकांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी १९७२ साली त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. मृत्यूपूर्वी गं ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/Lokmanya-Bal-Gangadhar-Tilak.html
राजकारण
०१. टिळक १८९० साली कॉंग्रेस पक्षात सामील झाले. गांधीच्या पूर्वी टिळकच देशातील सर्वात मोठे राजकीय व्यक्ती होते. नंतर गांधीच्या वलयासमोर टिळकांची जादू फिकी पडली.

०२. पुण्याच्या सार्वजनिक सभेवर न्या. रानडेंचा प्रभाव होता. १८९५ साली बहुमत मिळवून सार्वजनिक सभेच्या कार्यकारिणीवर टिळकांनी ताबा मिळविला. १८९६ साली दुष्काळ पडला तेव्हा, "सरकारविरुद्ध निशस्त्र प्रतिकार करण्याचा पुरस्कार करण्याचा जनतेने करण्याची आवश्यकता टिळकांनी केसरीतून प्रतिपादन केली.

०३. १९०७ मधील कॉंग्रेसच्या सुरत अधिवेशनात नव्या अध्यक्षाच्या निवडीवरून मतभेद निर्माण झाले. लाला लजपतराय यांना अध्यक्षपद देण्याची टिळकांची सूचना मवाळानी मान्य केली नाही. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात फुट पडली. कॉंग्रेस मध्ये जहाल व मवाळ गट निर्माण झाले यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळक यांच्याकडे होते.

०४. मधल्या काळात टिळक शिक्षा भोगण्यासाठी मंडाले तुरुंगात गेले. मंडालेचे तुरुंगातून सुटल्यानंतर टिळकांनी त्यांचेच एक सहकारी जोसेफ-काका बाप्टिस्ट यांचे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि ते मी मिळवणारच" हे घोषवाक्य अव ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/Tilak-part-2.html
भारतीय सैन्य दलात कायदा पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर व सामान्य पदवीधर स्तराच्या भरती. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.

http://jobs.mpscacademy.com/p/homepage.html
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना मंगळवारी राष्ट्रपती पदक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

देशभरातील ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.

त्याशिवाय राज्यातील ३९ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात येणार ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca24and25jan2017.html
भौतिक राशीचे मापन
०१. लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान, आकारमान, घनता, चाल इत्यादी भौतिक राशी आहेत. भौतिकशास्त्राचा अभ्यास करतांना भौतिक राशींच्या अचूक मापनाची गरज भासत असते.

०२. मापन – विशिष्ट परिमाणाशी एखाद्या राशीची तुलना करणे म्हणजे त्या राशीचे मापन करणे होय. त्यास एकक असे संबोधतात.

०३. एखाद्या विशिष्ट राशीचे मापन सर्वच स्थळी व सर्व काळी एकसारखे येण्याकरिता काही प्रमाणित एकके (Standard Unit) मापनाकरिता वापरली जातात.प्रमाणित एकक सहजपणे उपलब्ध होणारे असावे. ते नाशवंत नसावे. आणि ते स्थल कालपरत्वे बदलणारे नसावे.

०४. सोयीसाठी लांबी, व ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/physical-amounts.html
गतीचे तीन प्रकार पडतात.
०१. स्थानांतरणीय गती (Transiation Motion) या गती मध्ये वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होत असते. त्यामध्ये वस्तुचे चलन सरळ रेषेत होत असले तर रेखीय विस्थापन किंवा एकरेषीय विस्थापन म्हणतात. चलन जर वक्र होत असेल तर वक्ररेषी विस्थापन म्हणतात. एकाच दिशेने जाणारी आगगाडी, रस्त्यावरून न वळता चालणारा मनुष्य इ. याची उदाहरणे आहेत. याला यादृच्छिक गती किंवा ब्राऊनची गती असेही म्हणतात.

०२. परिवलन गती (Rotational Motion) यामध्ये वस्तुमधील सर्व कण एकाच आसाभोवती परिवलन मार्गाने फिरत असतात. यालाच घुर्णन गती असेही म्हणतात. पृथ्वीचे परिवलन, कप्पी भोवरा, पंखा, पवनचक्की इ. या गतीची उदाहरणे आहेत.

३. कंपन गती(Vibrational Motion ) ठराविक कालामध्ये पदार्थामध्ये पुन्हा पुन्हा होणारी एकाच प्रकारची हालचाल यालाच कंपन गती असे म्हणतात. लंबकाच्या ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/Motion.html
Forwarded from Wasim Khan
*प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आलेले विशेष पाहुणे*
२०१७ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यूएईचे राजपुत्र प्रमुख पाहुणे आहेत.

आतापर्यंत सर्वात जास्त ५ वेळेस फ्रान्स देशाच्या प्रतिनिधींनी
प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

भूतानच्या राजांनी ४ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

मॉरीशसच्या प्रतिनिधींनी ३ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

पाकिस्तान, सोविएत युनियन, युगोस्लाव्हिया, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, नेपाळ, नायजेरिया, ब्राझील व इंडोनेशिया या देशांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी २ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

चीन, कंबोडिया, बल्गेरिया, टांझा ................. .................... .................. ..................... .................. ....................... http://www.mpscacademy.com/2016/01/republic-day-special-guests-in-india.html
उसेन बोल्टला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक गमावावे लागणार
जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याच्यावर बिजिंग ऑलिम्पिकमध्ये मिळालेले सुवर्णपदक गमाविण्याची वेळ आली आहे.

२००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या चमुने ४x१०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

पण त्या संघाचा सदस्य असलेल्या नेस्टा कार्टरने प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केल्याच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) केलेल्या पुनर्तपासणीत स्पष्ट झाले आहे.या तपासणीमुळे जमैकाच्या संघाचे रिलेचे सुवर्णपदक काढून घेतले जाणार आहे.

त्याऐवजी ट्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संघाला पहिल्या स्थानी बढती मिळाली असून, जपानला रौप्य तर ब्राझिलला कांस्यपदक बहाल केले जाणार आहे.

बोल्टकडे एकूण नऊ सुवर्णपदके जमा होती, मात्र त्यापैकी एक परत करावे लागल्याने ती संख्या आठवर पोहचली आहे.

बोल्टने बीजिंगमध्ये फोर बाय हंड्रेड मीट ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca26And27Jan2017.html
पद्म पुरस्कार 'भारतरत्न' नंतर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ सालापासून करण्यात आली. पण १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९६ या कालखंडात यामध्ये खंड पडला. या सहा वर्षात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीत पद्म पुरस्कार विभागलेला आहे. पद्म पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा या प्रमुख ९ व इतर काही क्षेत्रातून निवडक लोकांना प्रदान केले जातात.

प्रत्येक राज्यातील सरकार, केंद्रीय मंत्री, पूर्वी भारतरत्न व पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती, राज्यांचे मुख्यमत्री व राज्यपाल इत्यादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी समितीकडे कोणत्याही व्यक्तीची शिफारस करू शकतात. पद्म पुरस्कार समिती दरवर्षी पंतप्रधानाकडून ठरविली जाते. यंदा मात्र सामान्य नागरिकालाही ऑनलाईन पद्धतीने शिफारस करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

प्रत्येक वर्षी १ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान या शिफारसी स्वीकारल्या जातात. 'पद्मपुरस्कार समिती' नंतर या नावातून काही जणांची शिफारस पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे करते. एका वर्षात पद्म पुरस्कार प्रदान केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या १२० पेक्षा जास्त असू नये. (विदेशी नागरिक व मरणोत्तर पुरस्कार वगळता).

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. दरवर्षी नंतर मार्च किंवा ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/padma-awards-2017.html
रॉजर फेडररचा १८ व्या ग्रँडस्लॅमचा विश्वविक्रम
विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक असरणाऱया रॉजर फेडरर याने पुन्हा एकदा आपणंच टेनिसचे राजे असल्याचे सिद्ध करून दाखवले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्याच्या चुरशीच्या लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा विजय प्राप्त केला.

फेडररने या विजयासह आपल्या कारकीर्दीतील १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याचा विश्वविक्रम केला. विशेष म्हणजे, फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०० वा सामना होता. पाच वर्षांनंतर फेडररच्या खात्यात ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जमा झाले.

२०११ नंतर आज पहिल्यांदाच रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत टेनिस चाहत्यांना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये पाहायला मिळाली. फेडररच्या खात्यात आता तब्बल १८ ग्रँडस्लॅम जमा झाली आहेत. तर राफेल नदालकडे एकूण १४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत.

२००७ नंतर नदालने मिळवलेला हा पहिलाच विजय आहे आण ऑस्ट्रेलियन स्पध्रेतही फेडररने पहिल्यांदा नदा ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca30jan2017.html
Sales Tax Inspector Pre 2016 Official Answer Key Released
Download From below Link
https://goo.gl/xQEoXY
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कॅग विनोद राय
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून, कॅगचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इतिहासकार व स्तंभलेखक रामचंद्र गुहा, भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि आयडीएफसीचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

विनोद राय हे कॅगचे माजी महालेखापाल असताना, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा घोटाळा बाहेर आला. देशाचे ११ वे महालेखापाल म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. टूजी आणि कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे ते चर्चेत होते.

रामचंद्र गुहा यांचे गांधीनंतरचा भारत हे गाजलेले पुस्तक आहे. इतिहासकार व स्तंभलेखक म्हणून देशभरात ते प्रसिद्ध आहेत. पर्यावरण, राजकीय, सामाजिक आणि क्रिकेट या विषयात त्यांचा अभ्यास आहे. क्रिकेटचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे.

बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी आणि विक्रम लिमये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व करतील. न्यायालयाने बीसीसीआयमध्ये मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना पद न सांभाळण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयासंदर्भात हा निर्णय दिला आहे.

विनोद राय हे १९७२ च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस आहेत. २००८ ते २०१३ पर्यंत ते भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक (कॅग) राहिले आहेत. वर्ष २०१६ मध्ये नागरी सेवेत त्यां ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca01feb2017.html
बल
०१. न्यूटनच्या पहिल्या नियमावरून, अचल वस्तु गतिमान करण्यासाठी किंवा वस्तुची सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस बल असे म्हणतात.

०२. बलाद्वारे आपण
—---गतिमान वस्तुत वेगाच्या परिमानात बदल घडवून आणू शकतो.
—--- वेगाचे परिमाण तसेच राखून केवळ गतीची दिशा बदलू शकता किंवा
—--- वेगाचे परिणाम व दिशा या दोहोंमध्ये बदल करू शकतो.

०३. बल या राशीस परिणाम व दिशा असल्यामुळे बल ही सदिश राशी आहे.

०४. CGS पध्दतीत बलाच्या एककास डाईन (Dyne) असे म्हणतात. १ Cm/s2 वस्तुमानात १ त्वर ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/Force.html
भारतातील फ्रेंच सत्तेचा कालखंड १६६४ ते १९५४ आहे. भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच , पोर्तुगीज , ब्रिटिश इ . यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली . व्यापारा बरोबरच भारतात सत्तासंपादन करण्याचीही स्पर्धा या यूरोपीयांत सुरू झाली.


* पहिला कालखंड (१६६४ ते १७४२)
०१. भारताशी व्यापार करावयाच्या स्पर्धेत उतरलेल्या प्रमुख यूरोपीय सत्तांपैकी फ्रेंच शेवटचे होते. चौदाव्या शतकात जॉर्देनस, फ्रायर ओडोरिक यांसारख्या धर्मोपदेशकांनी व सतराव्या शतकात फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताविषयी बरीच उत्सुकता निर्माण केली होती.

०२. भारतात येऊन गेलेल्या या प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी, विशेषतः सुरतला आलेल्या काप्युशँ मिशनऱ्यांनी पूर्वेकडे व्यापार करू इच्छिणाऱ्यांचे काम सुलभ केले.

०३. फ्रान्सचा राजा चौथा हेनरीच्या उत्तेजनाने पूर्वेकडे, विशेषतः भारताशी व्यापार करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या (१६०१, १६०४ व १६४२ इ.) परंतु चौदाव्या लूई चा अर्थमंत्री झां बातीस्त कॉलबेअर याच्या पुढाकाराने १६६४ साली स्थापन झालेल्या 'काँपान्यी देस इंडिज'च्या स्थापनेपासून फ्रेंचांचा भारताशी पद्धतशीर व्यापार सुरू झाला.

०४. बॅबॅर व लाबुलॉय ला गूझ या फ्रान्सच्या राजदूतांनी औरंगजेबाकडून १६६६ मध्ये सुरतेला वखार घालण्याची परवानगी मिळविली. दोन वर्षांनी वखार सुरू झाली. शिवाजींनी १६६ ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/French-Company-india.html
अर्थसंकल्प २०१७
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटलींनी बँकांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. अर्थसंकल्पात जेटलींनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी वर्ष २०१७-१८ साठी दहा हजार कोटींच्या कोटींची तरतूद जाहीर केली आहे.

बुडित कर्जांच्या वसुलीसाठी यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार असून दिवाळखोरी जाहीर करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्याचा इशारा दिला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या अर्थसंकल्पात सात कलमी 'इंद्रधनुष' योजना जाहीर केली होती.

सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी 'स्वयम' योजना जाहीर केली गेली आहे. २०२२ पर्यंत ५ लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना आणण्यात आली आहे. तर संकल्प प्रकल्पासाठी ४ हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून याद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच IIT, मेडिकलसह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बो ................ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/ca02and03February2017.html
उर्जा
०१. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.

०२. MKS पध्दतीत ऊर्जा ज्युल या एककात मोजतात तर CGS पध्दतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक होय.

०३. कार्या प्रमाणे ऊर्जा ही सुध्दा अदिश राशी आहे.

०४. निसर्गामध्ये ऊर्जेची यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ऊष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, आण्विक ऊर्जा इ. विविध रुपे आढळतात.


* यांत्रिक उर्जा
०१. यांत्रिक ऊर्जा दोन प्रकारात आढळून येते. गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा१. गतिज ऊर्जा (kinetic Enregy):-
—----गतिमान अवस्थेमुळे पदा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/energy.html
०१. द्रव्य जागा व्यापतात. त्याबरोबर सर्व पदार्थ जागा व्यापतात.

०२. पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्यामधील द्रव्यसंचयन होय. वस्तुमान हा सर्व पदार्थाचा सर्वसामान्य गुणधर्म होय. वस्तुमान हे द्रव्याच्या आकारमानाच्या प्रमाणात असते. भिन्न प्रकारचे द्रव्य असलेल्या परंतु सारखेच आकारमान असलेल्या पदार्थाचे वस्तुमान भिन्न असु शकतात

०३. पदार्थावरील लावलेले बल काढून घेताच ते त्यांच्या मुळचा आकार व मुळ्चे आकारमान प्राप्त करुन घेतात या गुणधर्माला प्रत्यास्थता (Elasticity) असे म्हणतात.

०४. पदार्थात सद्यस्थिती स्व ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/matter.html
आयफोन आता मेड इन इंडिया, बंगळुरुत होणार उत्पादन
टेक्नॉलॉजी क्षेत्रात दबदबा असणारी 'अॅपल' या कंपनीने आता बंगळुरुत उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलच्या निर्णयाचे कर्नाटक सरकारने स्वागत केले असून अॅपलमुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा विकास होणार आहे. जागतिक स्पर्धेमध्ये भारताला याचा फायदा होईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

'अॅपल'च्या प्रतिनिधी प्रिया बालसुब्रमण्यम (उपाध्यक्ष, आयफोन ऑपरेशन्स) आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी राज्यातील अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेतली होती.

अॅपलची प्रॉडक्ट्स भारतात उपलब्ध असली तरी या प्रॉडक्ट्सचे उत्पादन चीन, कोरिया अशा देशांमधल्या अॅपलच्या प्रॉडक्शन युनिटस् मधून होतं.

अॅपलच्या या प्रयत्नांना भारतीय कायद्यामधल्या काही अटी जाचक ठरत आहेत. परदेशी कंपनीने भारतात उत्पादन सुरू केलं तर ३०% कच्चा माल देशांतर्गत स्त्रोतांमधून घ्यावा यासंबंधी काही कायद्यांमध्ये तरतुदी आहेत.

अॅपलच्या दृष्टीने हा कच्चा ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/02/4And5Feb2017.html
* दाब
०१. भौतिक शास्त्रात दाब ही संकल्पना द्रव व वायू या प्रवाही पदार्थाबाबत वापरण्यात आली आहे.

०२. एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेने क्रिया करणाऱ्या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठ भागावरील दाब असे म्हणतात.

०३. दाबामधील बदल दर्शविण्यासाठी दाबमापी (बॅरोमीटर ) हे एक साधे व सोपे उपकरण वापरले जाते

०४. द्रवातील कोणत्याही बिंदुवरील दाब त्या बिंदुच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो.

०५. वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.एखाद्या पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.

०६. दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.
दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ

०७. लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झाले ............... ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/pressure.html