MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
MPSC राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक भरती - ३०० पदे

Total Posts : 300
एकूण पदे : ३००

Pay Band : 5200 to 20200 + (GP 3500)
वेतनश्रेणी : ५२०० ते २०२०० + (ग्रेड पे ३५००)

Qualification : Any Graduate
किमान शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

Age Limit : 18 to 38 Years [43 for Reserved]
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीयांसाठी ४३]

Exam Fee : 373 Rs. [273 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ३७३ रु. [मागासवर्गीयांसाठी २७३ रु]

Last Date for Application : 02 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ०२ फेब्रुवारी २०१७

Read Full Information at Below Link
http://jobs.mpscacademy.com/2017/01/mpsc-state-excise-department-sub.html
४ वर्षाच्या मुलासोबत गुजराचा ड्रोन निर्मितीचा करार
दरवर्षी आयोजित होणा-या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत अनेक बडया कंपन्या आणि गुजरात सरकारमध्ये करार होतात.

यावर्षी वायब्रंट गुजरातमध्ये एक अनोखी घटना घडली. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या एका १४ वर्षाच्या मुलाने गुजरात सरकारबरोबर ड्रोन निर्मितीचा तब्बल ५ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे.

हर्षवर्धन झाला असे या मुलाचे नाव आहे. गुजरात सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने त्याच्यासोबत ड्रोन निर्मितीचा करार केला आहे. हर्षवर्धन युद्धभूमीवर शत्रूने पेरलेली भूसुरुंग .................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca14and15jan2017.html
०१. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

०२. नाना पाटील यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील याना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.

०३. येडे मच्छिंद्र, दुधोंडी, नागराळे यथे प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य ल ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/krantisinh-nana-patil.html
०१. महादेव गोविंद रानडे हे ब्रिटीशकालीन भारतातील एक मोठे समाजसेवक होते. १८६२ साली त्यांच्या तत्वावर आधारित 'इंदूप्रकाश' या वर्तमानपत्रात लेखन करून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. हे वृत्तपत्र दोन भाषेत होते. त्यांना 'फादर ऑफ जस्टीस' ही बिरुदावली बहाल करण्यात आलेली आहे. त्यांना 'पदवीधरांचे मुकुटमणी' असेही म्हटले जाते. गणेश वासुदेव जोशींच्या समाज विषयक व अर्थविषयक विचारांचा रानडेवर प्रभाव होता.

०२. त्यांचे वडील कंपनी सरकारच्या पदरी कारकून होते. म्हणून त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. १८५६ नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, १८५८ मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला.

०३. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर १८६२ साली विद्यापीठाचे जे पहिले चार पदवीधर झाले त्यापैकी महादेव गोविंद रानडे हे एक होते. इतिहास व अर्थशा ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/justice-mahadev-govind-ranade.html
एक जुलैपासून लागू होणार जीएसटी
एक एप्रिल २०१७ मध्ये लागू होणारे जीएसटी आता लांबवणीवर गेले आहे. एक एप्रिलऐवजी एक जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे

केंद्र आणि राज्यांच्या विविध मागण्यांमुळे १ जुलै रोजी जीएसटी प्रणाली देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांच्या कराच्या मुल्यांकनाचा अधिकार राज्याला द्यावा, अशी अनेक राज्यांची मागणी होती. यावर आजच्या बैठकीत तोड ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca16And17Jan2017.html
जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, बागलकोट, कर्नाटक)
मृत्यू : २ जानेवारी १९४४ (मधुमेहाच्या आजारात निधन)

०१. विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स. १८७३ रोजी वर्तमान कर्नाटक राज्यातील जमखिंडी संस्थानातील मराठा कुटूंबात झाला. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई होते. त्यांच्या बालमनावर कुटुंबातील उदारमतांचा प्रभाव पडला.त्यांच्यावर जॉन स्टूअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर आणि मैक्स म्युलर या लेखकांच्या लेखनाचा प्रभाव होता. वयाच्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्याच रुक्मिणी या आतेबहिणीबरोबर झाला.

०२. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखंडी येथेच झाले. १८९१ साली ते मैट्रीक उत्तीर्ण झाले. मैट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जमखिंडीच्याच हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोक ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/vitthal-ramji-shinde.html
जन्म : २६ जून १८७४ (कागल, कोल्हापूर)
राज्यकाल : १८९४ ते १९२२
मृत्यू : ६ मे १९२२ (पन्हाळा लॉज, खेतवाडी, मुंबई) (हृदयविकाराचा झटका)


वैयक्तिक जीवन
०१. शाहू महाराजांचा जन्म कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (अप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थाना ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/rajarshi-shahu-maharaj.html
'जलीकट्ट'साठी तामिळनाडूत तीव्र निदर्शने
जलीकट्टमूवरील (बैलांच्या शर्यती) बंदी उठविण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे.

जल्लीकट्ट हे तमिळ संस्कृतीचे प्रतीक असून, त्यावरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी बुधवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हजारो लोकांनी मरीना समुद्र किनाऱ्यावर एकत्र येऊन जलीकट्टुच्या समर्थनार्थ निदर्शने केली.

तमुक्कममध्ये या मागणीसाठी तीन विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी बैलांना मोकाट सोडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

जलीकट्टुविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या 'पेटा' या संस्थेविरोधातही आंदोलकांनी रोष व्यक्त केला. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.

पोंगल सणाच्या दुसऱ्या दिवशी मदुराई येथून सुरू झालेल्या या राज्यव्यापी आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca18and19jan2017.html
विनायक दामोदर सावरकर
जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर


वैयक्तिक जीवन व शिक्षण
०१. सावरकर हे एक हिंदुत्ववादी, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

०२. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकर ९ वर्षाचे असताना ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/vinayak-damodar-savarkar.html
जन्म : १४ एप्रिल १८९१ (महू, मध्य प्रदेश)
मृत्यू : ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)

* वैयक्तिक जीवन
०१. डॉ. आंबेडकरांचा जन्म लष्करी छावणीत महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. आंबेडकरावर गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांचा प्रभाव होता.

०२. इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी भीमरावांचा आधार त्यांच्या आत्या मीराबाईं बनल्या.

०३. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील 'कॅम्प स्कूल' मध्ये आपल्या भीमरावांचे नाव दाखल केले.

०४. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.इ.स. १९०६ मध्ये बाबासाहेबांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर झाले.

०५. २ फेब्रुवारी १९१३ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जुलै १९२६ मध्ये त्यांच्या राजरत्न या मुलाचे निधन झाले. १९२७ मध्ये त्यांचे बंधू बाळासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर २६ मे १९३५ रोजी रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले. १५ एप्रिल १९४८ रोजी बाबासाहेबांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत नोंदणी पद्धतीने दुसरे लग्न केले.

०६. १५ ऑगस्ट १९४७ च्या पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटनेच्या मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर टाकली गेली. व ती त्यांनी यशस्वीपणे पार पा ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/Dr.-Babasaheb-Ambedkar.html
STI Halltickt Released
डाउनलोड करण्यासाठी खालील लाईनवर क्लिक करा.

https://mahampsc.mahaonline.gov.in/mpsc/mpsc_download_hallticket.aspx

इतर नोकरीसंदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.
http://jobs.mpscacademy.com
आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुविधा
भारताची सर्वात मोठी युद्धनौका आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवणा-या आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मशिन सॅटेलाईटवर चालणार असून एटीएमची सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.

भारतीय नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रमादित्य या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे.

आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची ६० मीटर्स उंच असून ही उंची २० मजली इमारतीएवढी आहे. तिच्या २० मजल्यांमध्ये २४ डेक्स आहेत. युद्धनौकेची लांबी २८४ मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मैदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे. तिच्यावर असलेल्या १६०० ते १८०० नौसनिकांना महिन्याभरासाठी दर महिन्याला एक लाख अंडी, २० हजार लीटर्स दूध आणि १६ टन तांदूळ लागतो.

ही रसद पूर्ण भरलेल्या अवस्थेत ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस प्रवास करू शकते. दर दिवशी ४०० टन खारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी यावर एक जलशुद्धीकरण प्रकल्पच वसविण्यात आला आहे.

या युद्धनौकेची २४ विमान आणि १ ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca20and21jan2017.html
जन्म : ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा, महाराष्ट्र)
मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० (पुणे, महाराष्ट्र)


* वैयक्तिक जीवन
०१. जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. ते जातीने क्षत्रिय माळी होते. ते कटगुणचे चौगुले होते. बारा बलुतेदारांपैकी चौगुले एक असत. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. आधुनिक विचारवंतानी त्यांना 'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' म्हणून गौरविले आहे.

०२. ज्योतीबांचे आजोबा माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत. पेशव्यांनी खुश होऊन ३५ एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी त्यांना दिली. ज्योतीबांच्या वडिलांनी व दोन काकांनी शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळी काम केले होते. तसेच त्यांच्या वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. आजोबाच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या काकाने (राणोजी) हडपली. म्हणून गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केला.

०३. ज्योतिबा ९ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईंचे निधन झाले. १८३४ ते १८३८ या काळात पंतोजींच्या शा ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/mahatma-jyotiba-govindrav-phule.html
जन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र)
मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे)


* जीवन व शिक्षण
०१. भाऊरावांचा जन्म एका जैन कुटुंबात झाला. त्यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे मूळ आडनाव देसाई होते नंतर महाजन आणि त्याहीनंतर पाटील असे झाले.

लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. भाऊरावांचे वयाच्या १८व्या वर्षीच लक्ष्मीबाईसोबत लग्न झाले.

०२. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण १९०२ ते १९०९ या काळात राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्या वेळी ते जैन वसतिगृहात राहत असताना अस्पृश्यांच्या एका समारंभाला हजर राहून परतले. आंघोळीच्या नियमभंगापोटी वसतिगृह सुपरिटेंडंट श्रीयुत लट्ठे यांनी त्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली. त्यानंतर ते थेट शाहू महाराजांच्या राजवाड्यावर आले.

०३. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.कोल्हापुरातच त्यांचा सत्यशोधक चळवळीशी परिचय झाला. येथेच त्यांच्यावर महात्मा फुले व विठ्ठ ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/karmveer-bhaurao-patil.html
सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे अजिंक्यपद
भारताची ‘फुलराणी’ म्हणून ओळख असलेली महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला अखेर विजयाचा सुर गवसला आहे. सायनाने रविवारी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या पोर्नपावे चोकयूवाँग हिच्यासोबतच्या अटीतटीच्या लढाईत सायना नेहवाल हिने २२-१०, २२-१० असा रोमांचक विजय प्राप्त केला.

गेल्या वर्षभरात गंभीर दुखापतींचा सामना करणाऱया सायनाने अखेर दुखापतींवर मात करून यंदाच्या वर्षात झोकात पुनरागमन केले आहे. गंभीर दुखापतीतूनही पुनरागमन करता येते याची प्रचिती देत सायनाने अंतिम फेरीत अफलातून कामगिरी केली.

पोर्नपावे चोकयूवाँग हिच्यासोबत सायनाचा हा पहिलाच सामना होता आणि यात भारतीय बॅडमिंटनपटूने विज ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca22and23jan2017.html
जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र)
मृत्यू : १ ऑगस्ट १९२० (मुंबई, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन
०१. केशव उर्फ बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्‍नागिरीमधील एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.

०२. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.

०३. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. ते शिक्षण खात्यात डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. १८६६ साली गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. टिळकांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला.

०४. पुण्याला आल्यावर लवकरच १८६६ साली त्यांच्या आई मरण पावल्या आणि लोकमान्य टिळकांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी १९७२ साली त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. मृत्यूपूर्वी गं ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/02/Lokmanya-Bal-Gangadhar-Tilak.html
राजकारण
०१. टिळक १८९० साली कॉंग्रेस पक्षात सामील झाले. गांधीच्या पूर्वी टिळकच देशातील सर्वात मोठे राजकीय व्यक्ती होते. नंतर गांधीच्या वलयासमोर टिळकांची जादू फिकी पडली.

०२. पुण्याच्या सार्वजनिक सभेवर न्या. रानडेंचा प्रभाव होता. १८९५ साली बहुमत मिळवून सार्वजनिक सभेच्या कार्यकारिणीवर टिळकांनी ताबा मिळविला. १८९६ साली दुष्काळ पडला तेव्हा, "सरकारविरुद्ध निशस्त्र प्रतिकार करण्याचा पुरस्कार करण्याचा जनतेने करण्याची आवश्यकता टिळकांनी केसरीतून प्रतिपादन केली.

०३. १९०७ मधील कॉंग्रेसच्या सुरत अधिवेशनात नव्या अध्यक्षाच्या निवडीवरून मतभेद निर्माण झाले. लाला लजपतराय यांना अध्यक्षपद देण्याची टिळकांची सूचना मवाळानी मान्य केली नाही. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात फुट पडली. कॉंग्रेस मध्ये जहाल व मवाळ गट निर्माण झाले यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळक यांच्याकडे होते.

०४. मधल्या काळात टिळक शिक्षा भोगण्यासाठी मंडाले तुरुंगात गेले. मंडालेचे तुरुंगातून सुटल्यानंतर टिळकांनी त्यांचेच एक सहकारी जोसेफ-काका बाप्टिस्ट यांचे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि ते मी मिळवणारच" हे घोषवाक्य अव ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/Tilak-part-2.html
भारतीय सैन्य दलात कायदा पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर व सामान्य पदवीधर स्तराच्या भरती. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.

http://jobs.mpscacademy.com/p/homepage.html
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना मंगळवारी राष्ट्रपती पदक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

देशभरातील ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.

त्याशिवाय राज्यातील ३९ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात येणार ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/01/ca24and25jan2017.html
भौतिक राशीचे मापन
०१. लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान, आकारमान, घनता, चाल इत्यादी भौतिक राशी आहेत. भौतिकशास्त्राचा अभ्यास करतांना भौतिक राशींच्या अचूक मापनाची गरज भासत असते.

०२. मापन – विशिष्ट परिमाणाशी एखाद्या राशीची तुलना करणे म्हणजे त्या राशीचे मापन करणे होय. त्यास एकक असे संबोधतात.

०३. एखाद्या विशिष्ट राशीचे मापन सर्वच स्थळी व सर्व काळी एकसारखे येण्याकरिता काही प्रमाणित एकके (Standard Unit) मापनाकरिता वापरली जातात.प्रमाणित एकक सहजपणे उपलब्ध होणारे असावे. ते नाशवंत नसावे. आणि ते स्थल कालपरत्वे बदलणारे नसावे.

०४. सोयीसाठी लांबी, व ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/physical-amounts.html
गतीचे तीन प्रकार पडतात.
०१. स्थानांतरणीय गती (Transiation Motion) या गती मध्ये वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होत असते. त्यामध्ये वस्तुचे चलन सरळ रेषेत होत असले तर रेखीय विस्थापन किंवा एकरेषीय विस्थापन म्हणतात. चलन जर वक्र होत असेल तर वक्ररेषी विस्थापन म्हणतात. एकाच दिशेने जाणारी आगगाडी, रस्त्यावरून न वळता चालणारा मनुष्य इ. याची उदाहरणे आहेत. याला यादृच्छिक गती किंवा ब्राऊनची गती असेही म्हणतात.

०२. परिवलन गती (Rotational Motion) यामध्ये वस्तुमधील सर्व कण एकाच आसाभोवती परिवलन मार्गाने फिरत असतात. यालाच घुर्णन गती असेही म्हणतात. पृथ्वीचे परिवलन, कप्पी भोवरा, पंखा, पवनचक्की इ. या गतीची उदाहरणे आहेत.

३. कंपन गती(Vibrational Motion ) ठराविक कालामध्ये पदार्थामध्ये पुन्हा पुन्हा होणारी एकाच प्रकारची हालचाल यालाच कंपन गती असे म्हणतात. लंबकाच्या ................. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/Motion.html