MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from Wasim Khan
*विधिमंडळाचे विशेष अधिवेशन*
1. संसदेत संमत झालेल्या संविधान (122 वी सुधारणा) विधेयकाच्या समर्थनासाठी अर्थात वस्तू आणि सेवाकर विधेयकाच्या मंजुरीसाठी (जीएसटी) 29 ऑगस्ट रोजी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
2. संविधान (122 वी सुधारणा) विधेयक, हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे.
3. तसेच या विधेयकातील सुधारणांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 खालील खंड (2) च्या उपखंड (ख) आणि (ग) मधील तरतूद लागू होत असल्यामुळे विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळण्यासाठी देशातील निम्म्याहून अधिक राज्य विधिमंडळांचे समर्थन आवश्‍यक आहे.
4. त्यामुळे या विधेयकाच्या समर्थनासाठी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात आले असून, त्याच दिवसाच्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीनंतर संस्थगित करण्याविषयी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.
5. संपूर्ण देशामध्ये अप्रत्यक्ष कराची एकसमान पद्धती लागू करण्याच्या हेतूने वस्तू व सेवा करप्रणालीचा अवलंब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेल्या संविधान (एकशे बाविसावी सुधारणा) विधेयक 2014 ला अनुसमर्थन दर्शवण्यासाठी प्रस्ताव विधिमंडळासमोर सादर करावयाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
6. लोकसभेने संविधान (122 वी सुधारणा) विधेयक-2014 हे विधेयक सहा मे 2015 रोजी मंजूर केल्यानंतर राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात आले होते.
7. राज्यसभेने या विधेयकात काही बदल सुचविले. त्यानंतर या बदलासह तीन ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने त्यास मंजुरी दिली.
8. तसेच हे बदल स्वीकृत करीत लोकसभेत हे संविधान सुधारणा विधेयक आठ ऑगस्ट 2016 रोजी मंजूर करण्यात आहे.
Forwarded from Wasim Khan
*‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर*
1. पी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांना भारतातील सर्वोत्तम ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर वर्षभर सातत्याने नेमबाजीत शान उंचावलेला जितू राय हाही या पुरस्काराचा मानकरी ठरला.
2. दीपा कर्माकरला घडवलेल्या बिश्‍वेश्‍वर नंदी यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
3. जागतिक स्पर्धेपाठोपाठ ऑलिंपिकमध्येही अंतिम फेरी गाठलेली माणदेशी एक्‍स्प्रेस ललिता बाबर, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला मुंबईकर अजिंक्‍य रहाणे, भरवशाचा ड्रॅग फ्लिकर व्ही.आर. रघुनाथ यांना ‘अर्जुन’ पुरस्कार देण्यात आला आहे.
4. रोइंगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.
5. क्रीडा पुरस्कार इतिहासात प्रथमच एका वर्षी चार खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहेत.
6. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपर्यंत केवळ जितू राय आणि दीपा कर्माकर यांचेच नाव पुरस्कारासाठी होते; पण सिंधू आणि साक्षीने पदक जिंकल्यानंतर त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला.
7. 2009 मध्ये 2008 मधील ऑलिंपिक कामगिरी लक्षात घेऊन सुशील कुमार, विजेंदर सिंग आणि मेरी कोमला हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 2002 आणि 2012 मध्येही दोघांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला होता.
Forwarded from Wasim Khan
*राजकीय पक्षांच्या दर्जाचा दर दहा वर्षांनी आढावा*
1. दर दहा वर्षांनी राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने बसपा, एनसीपी आणि सीपीआय या पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे बसपा, एनसीपी आणि सीपीआयच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जावर टांगती तलवार होती.
3. यावरून निवडणूक आयोगाने या पक्षांना 2014 मध्ये नोटिसाही जारी केल्या होत्या.
4. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची मान्यता देण्यासंबंधीचे निकष ‘जैसे थे’ राहणार असले तरी अशा दर्जाबाबत लोकसभा आणि विधानसभेच्या सलग दोन निवडणुकीनंतर आढावा घेतला जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
5. सध्या दर पाच वर्षांनी म्हणजे एका निवडणुकीनंतर राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेतला जायचा.
6. तसेच आता दर दहा वर्षांनी याबाबत आढावा घेतला जाईल.
Forwarded from Wasim Khan
*श्रीमंत देशांमध्ये भारत 7 व्या स्थानी*
1. जगातील 10 श्रीमंत देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे.
2. भारतातील एकूण व्यक्तीगत संपत्ती 5600 अब्ज डॉलर्स आहे.
3. तसेच अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
4. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत भारत 7 व्या स्थानावर आहे.
5. कॅनडा 8, ऑस्ट्रेलिया 9 आणि इटली 10 व्या स्थानावर आहे.
6. पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत एकूण व्यक्तीगत संपत्ती 48,900 अब्ज डॉलर्स आहे.
7. चीन दुस-या आणि जापान तिस-या स्थानावर आहे. चीनमध्ये एकूण व्यक्तीगत संपत्ती 17,400 अब्ज डॉलर्स आणि जापानमध्ये 15,100 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
8. तसेच या यादीत इंग्लंड 4,जर्मनी 5 व्या आणि फ्रान्स 6 व्या स्थानावर आहे.
*आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वी सारखा ग्रह*
1. पृथ्वीपासून जवळपास चार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या पृथ्वीसारख्याच दुसऱ्या ग्रहाचा शोध संशोधकांनी लावला.
2. तसेच हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून, प्रॉक्‍झिमा-बी असे त्याला नाव देण्यात आले आहे. या ग्रहाची आकारासहित बहुतेक वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत.
3. या ग्रहावरील वातावरणाचे अस्तित्व व सजीवांचा अधिवास याबाबत मात्र अद्याप संशोधन सुरू आहे.
4. प्रॉक्‍झिमा-बी हा ग्रह प्रॉक्‍झिमा सेन्शॉरी या लाल लघुताऱ्याच्या शेजारीच असल्याचे संशोधन 'नेचर' या विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
5. ब्रिटिश संशोधकांच्या पुढाकाराने युरोपियन शास्त्रज्ञांनी हे संशोधनपर लिखाण केले आहे. या लिखाणासाठी संशोधकांनी 16 वर्षांपासून माहिती संकलन केले.
6. तसेच या माहिती संकलनाच्या आधारे व चिलीमधील युरोपियन साऊदर्न ऑब्जर्व्हेटरी टेलेस्कोपच्या साह्याने संशोधकांनी या ग्रहाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले.
7. लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातील प्रमुख संशोधक लेखक ग्युलेम अँग्लाडा एस्क्‍युड यांनी या संशोधनाला त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगितले.
*मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ टपाल पाकीटाचे अनावरण*
1. संत मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर भारतात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे.
2. तसेच या पाकिटाचे अनावरण 2 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.
3. भारतीय टपाल खात्यातर्फे जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.
4. त्यावर 2010 मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे.
5. मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे तयार करण्यात येणार आहे.
*वर्ल्ड बॅंकच्या अध्यक्षपदी पुन्हा जिम योंग किम*
1. जागतिक बॅंकेचे (वर्ल्ड बॅंक) अध्यक्ष जिम योंग किम यांचे नाव पुन्हा अध्यक्षपदासाठी अमेरिकेने जाहीर केले आहे.
2. दारिद्य्र आणि हवामान बदलच्या आव्हानांना नावीन्यपूर्ण सामोरे जाण्याची क्षमता किम यांच्यात आहे, असे अमेरिकेचे मत आहे.
3. अमेरिकेचे कोषागार विभागाचे मंत्री जॅकब जे लू यांनी किम यांच्या नावाची घोषणा केली.
4. लू म्हणाले, 'किम' त्यांच्या कारकीर्दीत जागतिक विकासासमोरील आव्हानांना नावीन्यपूर्ण पद्धतीने सामोरे गेले आहेत.
5. दारिद्य्र, असमानता आणि हवामान बदलाबाबतही त्यांनी पावले उचलली आहेत.
6. 'इबोला' आणि निर्वासित यासारखे मोठे प्रश्‍न त्यांनी हाताळले आहेत.
7. तसेच, जागतिक बॅंकेत सुधारणा करण्याचे काम ते करीत असून, वित्तीय स्त्रोतांचा वापर ते वाढवीत आहेत.
8. जागतिक बॅंकेत अमेरिका सर्वांत मोठा भागीदार देश आहे. त्यामुळे अमेरिकेकडून किम यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांची पुन्हा निवड निश्‍चित मानली जात आहे.
9. जुलै 2012 मध्ये किम यांनी जागतिक बॅंकेचे बारावे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.
*इस्रो व्दारे स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी *
1. वातावरणातील हवेचाच इंधन म्हणून वापर करण्याच्या प्रयोगासाठी अत्याधुनिक स्क्रॅमजेट इंजिन असलेल्या ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी व्हेईकलची (एटीव्ही) भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) (दि.28) यशस्वीपणे चाचणी घेतली.
2. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून या रॉकेटची चाचणी घेण्यात आली.
3. अमेरिका, रशिया आणि युरोपीय अवकाश संस्थांनंतर अशी चाचणी घेणारा भारत हा चौथा देश बनला आहे.
4. भारताने प्रथमच असा प्रयोग केला आहे. हवेतील हायड्रोजन आणि ऑक्‍सिजनचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या यंत्रणेची (एअर ब्रिदिंग प्रॉपल्शन सिस्टिम) याद्वारे चाचणी घेण्यात आली.
5. उड्डाणानंतर रॉकेट अकरा किलोमीटर उंचीवर असताना स्क्रॅमजेट इंजिन प्रज्वलित झाले.
6. तीनशे सेकंदांनी नियोजनाप्रमाणे हे रॉकेट श्रीहरीकोटापासून अंदाजे 320 किलोमीटर दूर बंगालच्या उपसागरात कोसळले.
7. एटीव्ही हे दोन भाग असलेले प्रक्षेपक आहे. दोन स्क्रॅमजेट इंजिन 'एटीव्ही'च्या दुसऱ्या भागावर बसविली होती.
8. प्रक्षेपकाने उड्डाणाचा पहिला भाग पूर्ण करताच स्क्रॅमजेट इंजिन सुरू झाले आणि ते पाच सेकंद प्रज्वलित राहिले.
9. तसेच ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आवाजापेक्षाही अधिक वेगात असताना हवेतील वायूंच्या साह्याने इंजिन सुरू करण्याचे अवघड तंत्रज्ञान निर्माण करण्याची भारतीय शास्त्रज्ञांची क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे.

स्क्रॅमजेट इंजिन म्हणजे -
स्क्रॅमजेट (सुपरसॉनिक कम्बस्टिंग रॅमजेट) हे एअरब्रिदिंग जेट इंजिनचा एक प्रकार असून यामध्ये ध्वनीपेक्षाही अधिक वेगात असताना हवेतच प्रज्वलन होते. प्रज्वलन करण्याआधी हवेवर प्रचंड दाब निर्माण करण्यासाठी प्रक्षेपकाचा वेग प्रचंड असणे आवश्‍यक असते. स्क्रॅमजेटमधील हवेचा वेग कायमच प्रचंड असल्याने रॉकेट वेगाने जात असताना या इंजिनाची कार्यक्षमता अत्यंत परिणामकारक असते. स्क्रॅमजेट इंजिनामध्ये हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून होतो, तर ऑक्‍सिजन प्रज्वलकाचे काम करतो.

'स्क्रॅमजेट'चे फायदे -
रॉकेटच्या इंधनाबरोबर असणाऱ्या प्रज्वलकाचा खर्च वाचणार आहे.
पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपकांच्या उड्डाणासाठीही वापर शक्‍य आहे.
प्रक्षेपकाचे वजनही कमी होणार असल्याने अधिक वजनाचे उपग्रह नेता येणे शक्‍य आहे.

'स्क्रॅमजेट' इंजिनचे स्वरूप -
स्क्रॅमजेट इंजिनाचे वजन - 3277 किलो
रॉकेटच्या उड्डाणाचा काळ - 300 सेकंद
स्क्रॅमजेटची चाचणी घेणाऱ्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर
आवाजापेक्षा सहापट अधिक रॉकेटचा वेग - 6 मॅक
स्क्रॅमजेट इंजिनांची संख्या - 2 इंजिन
*सानिया मिर्झाला कनेक्टीकट ओपनचे विजेतेपद*
1. भारताची आघाडीची टेनिस तारका सानिया मिर्झा हिने सुरू होणाऱ्या वर्षाच्या अखेरच्या व चौथ्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनआधी येथे रोमानियाच्या मोनिका निकुलेस्कू हिच्या साथीने कनेक्टीकट ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
2. सानिया आणि निकुलेस्कूयांनी नुकतीच पुन्हा जोडी बनवली आणि पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले. तिने गेल्या वेळेस 2010 मध्ये जोडी बनवली होती.
3. सानिया आणि निकुलेस्कूने विजेतेपदाच्या लढतीत युक्रेनच्या कॅटरिना बोंडारेंको आणि तैवानच्या चुआंग चिया जंग जोडीचा एक तास 30 मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत 7-5, 6-4 असा पराभव केला.
4 . सानिया आणि निकुलेस्कू ही जोडी फक्त थोड्या कालावधीसाठी असून, या दोन्ही खेळाडूंनी यूएस ओपनमध्ये नियमित जोडीदारासोबत खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
*पनवेल नगरपालिकेचा महापालिकेत समावेश*
1. पनवेल नगरपालिकेचा महापालिकेत समावेश करण्यात आल्याने राज्यातील महापालिकांची संख्या आता 27 झाली आहे.
2. पनवेल महापालिकेची अधिसूचना काही दिवसांतच निघणार आहे.
3. प्रस्तावित विमानतळ म्हणजेच 'नैना' क्षेत्रातील जवळपास 36 गावे महापालिकेतून वगळण्यात आली आहेत.
4. नवीन महापालिकेच्या हद्दीत सिडकोच्या जमिनी असलेल्या ठिकाणी किंवा विकास प्रकल्प सुरू असलेल्या जागी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे जबाबदारी असेल.
5. उर्वरित क्षेत्रात पनवेल महापालिका जबाबदारी पार पाडणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली.
6. सध्याची पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची अधिसूचना मेमध्ये प्रसिद्ध झाली होती.
7. तसेच यासंदर्भातील कोकण विभागीय आयुक्‍तांचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. विभागीय आयुक्तांनी सादर केलेला अहवाल नगरविकास विभागाने स्वीकारला आहे.
8. तसेच पनवेल नगरपालिकेच्या हद्दीबाहेरच्या 68 गावांचा समावेश करून नवी महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
9. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही होणार आहे. यासाठी सिडकोने 'दि न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लूएन्स नोटिफाईड एरिया' (नैना) जाहीर केला असून त्यात काही गावांचा समावेश आहे.
*ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना पदावरून हटविले*
1. ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ (68) यांना (दि. 31 ऑगस्ट) पदावरून हटविण्यात आले.
2. राष्ट्रीय अर्थसंकल्पात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
3. राष्ट्रपतींना हटविण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज असते. झालेल्या महाभियोगात 81 पैकी 61 सिनेटर्सनी त्यांना दोषी ठरविले.
4. त्यानंतर त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात आले. यामुळे डाव्या विचारांच्या 13 वर्षांच्या शासनाचा अंत झाला आहे.
5. तसेच मायकेल टेमर हे आता ब्राझीलचे नवे राष्ट्रपती असतील.
*'नॅशनल हेरल्ड' व 'नवजीवन' हे दैनिक लवकरच वाचकांच्या भेटीस*
1. कॉंग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे इंग्रजीतील 'नॅशनल हेरल्ड' आणि हिंदीतील 'नवजीवन' ही दैनिके पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) च्या वतीने करण्यात आली.
2. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1937 मध्ये 'एजेएल' या कंपनीची स्थापना केली होती.
3. तसेच या दोन्ही वर्तमानपत्रांच्या मुख्य संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार नीलभ मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.
4. मिश्रा यांच्याकडे वर्तमानपत्राच्या संपादकपदाबरोबरच डिजिटल माध्यमाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
5. मिश्रा यांनी यापूर्वी 'आउटलूक' या नियतकालिकाचे संपादकपद भूषविले असून 'नॅशनल हेरल्ड' आणि 'नवजीवन'साठी संपादकीय टीम उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
6. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे खजिनदार मोतीलाल व्होरा हे 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड'चे अध्यक्ष आहेत.
7. त्याच बरोबर उर्दूमधून 'कौमी आझाद' हे वर्तमानपत्रदेखील सुरू होणार आहे.
*जगातील सर्वात वयस्कर पक्षी काकाकुवा*
1. जगातील सर्व पक्ष्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त म्हणजे 83 वर्षे जगणा-या काकाकुवा या पक्ष्याचा (दि.29) रोजी मृत्यू झाला.
2. जगातील सर्वात वयस्कर पक्षी म्हणून काकाकुवा पक्ष्याकडे पाहिजे जात होते.
3. शिकागो येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयात काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू झाला.
4. प्राणिसंग्रहालयात काककुवा पक्ष्याला कुकी या नावाने सर्वजण ओळखत होते.
5. लाल व पिवळा तुरा असलेला सफेद गुलाबी रंगाचा कूकी हा अवघ्या एक वर्षाचा असताना ऑस्ट्रेलियातील तारोंगा प्राणिसंग्रहालयातून आणले होते.
6. काकाकुवा पक्ष्याबद्दल माहिती -
काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे.
तसेच या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे.
मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बर्‍याच बेटांवर हा पक्षी आढळतो.
ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याच्या अकरा जाती आहेत. त्यापैकी पिवळसर तुरा असलेले पांढर्‍या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात.
*परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार भारताचा रहिवासी परवाना*
1. भारतामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना 'भारतीय रहिवासी' म्हणून दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे.
2. ठराविक मर्यादेपर्यंत गुंतवणूक केल्यास त्यांना व्हिसा, मालमत्ता खरेदी हक्क, कुटुंबियांना रोजगार इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
3. याविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विस्तृत धोरण तयार करण्यात आले आहे.
4. परदेशातून अधिकाधिक निधी आकर्षित करुन मेक इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
5. याअंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांसाठी व्हिसाचे नियम सुलभ केले जाणार असून त्यांच्या कुटुंबियांनादेखील नोकऱ्या/रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
6. तसेच याकरिता नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. सुरुवातीला गुंतवणूकदारांना दहा वर्षांकरिता रहिवासी परवाना दिला जाईल. त्यानंतर ही मर्यादा वाढविली जाऊ शकते.
*'नासा'ने शोधले सर्वांत दूरवरील आकाशगंगा*
1. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 11.1 अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेला आकाशगंगांचा पुंजका आढळला आहे.
2. शास्त्रज्ञांना आढळलेल्या या आतापर्यंत सर्वांत लांबवरच्या आकाशगंगा आहेत.
3. 'नासा'च्या चंद्रा एक्‍स रे ऑब्झर्व्हेटरी आणि इतर काही दुर्बिणींच्या मदतीने आकाशगंगांचा हा पुंजका सापडला आहे.
4. तसेच या पुंजक्‍यातील आकाशगंगा 70 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
5. दुर्बिणीने पकडलेली प्रकाशकिरणे ही आकाशगंगेच्या जन्मानंतर लगेचचीच असल्याचाही अंदाज आहे. या पुंजक्‍याच्या सखोल अभ्यासानंतर विश्‍वाच्या उत्क्रांतीबद्दल नवी माहिती मिळण्याची दाट शक्‍यता असल्याचे 'नासा'ने म्हटले आहे.
6. आकाशगंगेच्या या पुंजक्‍याला 'सीएलजे 1001+0220' असे नाव देण्यात आले आहे.
7. 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार, या पुंजक्‍याच्या केंद्रस्थानी 11 प्रचंड आकाशगंगा असून, त्यातील नऊ आकाशगंगांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नवे तारे जन्म घेत आहेत. हे प्रमाण दरवर्षी तीन हजार सूर्य निर्माण होण्यासारखे आहे.
8. आकाशगंगांच्या इतर पुंजक्‍यांच्या मानाने केंद्रस्थानी तारे निर्माण होण्याचे हे प्रमाण प्रचंड आहे.