MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Download Previous Year Question papers, Answer Key & Cutoff.

PSI, STI & ASO Question papers are Posted. State Service Question Papers Will be Posted Soon.

Download All Question Papers, Ans Key and Cutoff in PDF format. Click Below Link.

http://www.mpscacademy.com/2016/02/mpsc-psistiasstistant-qus-papers.html
आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत केशवनला सुवर्ण
०१. हिवाळी ऑलिंपिकमधील लोकप्रिय ल्यूज या क्रीडा प्रकारातील भारताचा प्रमुख खेळाडू शिवा केशवन याने आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

०२. जपानचा तनाका शोहेई (१.४४.८७४ सेकंद) दुसरा आला. तैवानचा लिएन ते ऍन (१.४५.१२० सेकंद) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. या तिघांत केशवन याने ताशी १३०.४ कि.मी. असा सर्वोत्तम वेग राखला.



आयआयटी गोव्याच्या संचालकपदी मिश्रा
०१. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे खास स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) गोव्यासह पाच नव्या संस्थांच्या रिक्त पदांवर संचालकांची नियुक्ती आज करण्यात आली.

०२. देशात २३ आयआयटी आहे....................... .......................... .................. .......................... .................... ................... .................. ................... ................... http://www.mpscacademy.com/2016/12/blog-post_24.html
१. १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचखोरी वाढली होती. बंगालमध्ये अराजकता वाढली होती. ८ फेब्रुवारी १७८५ पर्यंत तो गवर्नर जनरल होता.

०२. या काळात मुगल बादशहा शाह आलमने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सत्ता या काळात प्रबळ होत्या. हेस्टिंग्जने अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या. त्याने अयोध्येच्या बेगम प्रकरणात कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.

०३. वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. हैदरशी दुसरे युध्द हेस्टिंग्जच्या काळातच १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.



हेस्टिंग्जच्या प्रशासकीय सुधारणा
०१. १७७२ मध्ये कंपनीच्या संचालकांनी दुहेरी शासनव्यवस्था समाप्त करण्याचा निर्णय घेतला आणि कलकत्ता कौन्सिलला असा आदेश दिला कि, बंगाल प्रांताची संपूर्ण व्यवस्था .............. .................. ................... ................ .............. .............. ................ ................... http://www.mpscacademy.com/2016/03/Warren-Hastings.html
वेलस्लीचे भारत आगमन
०१. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती. पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते. १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकला. तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता. यावेळी इंग्रजांची एकूण परिस्थिती कठीण होती.

०२. १८०१ मध्ये नेपोलियनने रशियाचा झार पॉल ह्याच्याशी करार करून भारत आक्रमणाची योजना बनविली. नेपोलियनच्या जमिनीवरच्या सामर्थ्याची कल्पना इंग्रजांना होती. त्यामुळे नेपोलीयनची वरील योजना सफल झाली असती तर भारतातील इंग्रजांचा व्यापारही समाप्त झाला असता. अशा परिस्थितीत १७९८ मध्येच लॉर्ड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.

०३. 'Impossible is a word to be found in the dictionary of fools' हे नेपोलियनचे आवडते वाक्य वेलस्लीला माहीत होते आणि त्याचा अर्थही तो जाणत होता. टिपू सुलतान नेपोलियनच्या संपर्कात होता आणि भारतातून इंग्रजांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात होता.

०४. नेपोलीयनची भारत आक्रमणाची योजना म्हणजे टिपूसाठी इंग्रजांना भारतातून नामशेष करण्याची सुवर्णसंधी होती. त्याने श्रीरंगपट्टणमला स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून फ्रेंचाबरोबर आक्रमक व संरक्षणात्मक तह केला.

०५. १७९५ च्या खर्डा लढाईत मराठ्याकडून पराभूत झाल्याने निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली................... ..................... ................... .................. ......................................... http://www.mpscacademy.com/2016/03/lord-Wellesley.html
भारताला नोटा बनवण्यासाठी आठ विदेशी कंपन्या पुरवणार कागद
०१. केंद्र सरकार नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात छापण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून जगातील आठ मोठ्या कंपन्यांना भारतासाठी नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदांचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे.

०२. एप्रिल २०१७ पासून या कंपन्या भारताला नोटांसाठी कागदाचा पुरवठा करतील. तेथून सुमारे २७, ५०० मेट्रिक टन कागद भारताला मिळेल.

०३. या कागदातून छोट्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. यामध्ये १०, २०, ५० आणि १०० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. मोठ्या मूल्याच्या म्हणजे ५०० व २ हजार रूपयांच्या नोटांसाठीचा कागद भारत स्वत:च बनवणार आहे.

०४. याबाबतचा करार गुरूवार आणि शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ नोट मुद्रण प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात झाला.

०५. यासाठी स्वित्झर्लंडमधील लँकार्ड, दक्षिण कोरियाची कोमस्को, फ्रान्सची अॅरोगिनीस, स्वीडनची क्रेन, रशियाची गोझन्क, इंडोनेशियाची पीटी प्युरा, इटलीची फेब्रियानो आणि जर्मनीच्या लुईसेन्थल या कंपनीचे अधिकारी भारतात आले होते.

०६. ब्रिटनच्या डी ला रू कंपनीला हा व्यवहार करण्यासाठी बोलावण्यात आले नव्हते. सुमारे एक दशकाहून अधिक काळ डी ला रू ही कंपनी भारताला नोटा छपाईसाठी कागदाचा पुरवठा करते.



राजमुद्रेचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन
०१. भारतीय राज्यघटनेच्या पानांचे नक्षीकाम करणारे व राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार दीनानाथ भार्गव यांचे इंदूर येथे शनिवारी निधन झाले.

०२. भारतीय राज्य घटनेच्या पानांचे नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार व शांती निकेतनमधील कला भवनचे तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांनी अवघ्या २० वर्षांच्या भा.................... ..................... ................ .................... .................... .................. .................. ................. ....................... http://www.mpscacademy.com/2016/12/ca26dec2016.html
०१. भारत व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी व्यापारी कंपन्याना अधिकृत परवानगी दिली. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदरलैंड), फ्रान्स, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, ऑस्ट्रिया, स्वीडन इत्यादी राष्ट्रांत व्यापाराविषयी स्पर्धा सुरू झाली. या देशांनी सुरू केलेल्या ईस्ट इंडिया कंपन्यांपैकी ब्रिटिश, डच व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्यांनी अतिपूर्वेकडील राष्ट्रांमध्ये व्यापाराबरोबर साम्राज्य स्थापन करण्यातही यश मिळविले. म्हणूनच ह्या कंपन्यांना महत्त्व आहे.

०२. सोळाव्या व सतराव्या शतकांत अनेक ख्रिस्ती धर्मप्रसारक व व्यापाऱ्यांनी पूर्वेकडील देशांचा प्रवास केला होता. तथापि वास्को-द-गामाने १४९८ मध्ये आफ्रिकेला वळसा घालून पूर्वेकडील राष्ट्रांकडे येण्यासाठी शोधलेला नवीन मार्ग जागतिक इतिहासाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला. विविध देशांतील धाडसी जलप्रवाशांनी पूर्वेकडील देशांना भेटी देऊन, पौर्वात्य देशांची यूरोपीय लोकांना आपल्या प्रवासवृत्तांताद्वारे ओळख करून दिली.

०३. ह्या माहितीमुळे पूर्वेकडील अप्रगत देशांमधून नैसर्गिक साधनसामग्रीचा जास्तीत जास्त फायदा उठविण्यासाठी यूरोपीय राष्ट्रांत स्पर्धा सुरू झाली. दळणवळणांच्या साधनांतील सुधारणा व ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही कारणेही यूरोपीय राष्ट्रांना अतिपूर्वेकडील देशांकडे आकर्षित करण्यास प्रेरक ठरली.

०४. त्या त्या देशांतील कंपन्यांच्या भागधारकांनी जमविलेले भांडवल व काही कंपन्यांना शासन संस्थेकडून मिळालेले आर्थिक साहाय्य यामुळे ह्या कंपन्यांना आर्थिक स्थिरता लाभली.



डच ईस्ट इंडिया कंपनी
०१. डच लोक अतिपूर्वेकडील मसाल्यांच्या बेटांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी १५९५ पासूनच प्रवास करीत होते. अखेर १५९७ मध्ये जावाच्या सुलतानाबरोबर तह करण्यात डचांना यश मिळाले. अतिपूर्वेकडील व्यापारात वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांबरोबर स्पर्धा करण्यासाठी एकत्रित संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे, या जाणिवेने नेदरलैंडच्या स्टेट जनरलने एक व्यापारी कंपनी स्थापन केली.

०२. वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये ऊर्फ डच ईस्ट इंडिया कंपनी (Vereenigde Oost-Indische Compagnie अर्थ: संयुक्त पूर्व भारतीय कंपनी) ही इ.स. १६०२ साली स्था.................. ................. ............... ................. ................. ................ ............... ................ ................. ............... ................ http://www.mpscacademy.com/2016/03/Trading-Companies-In-British-india.html
गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन
०१. हरियाणामध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन धावणार आहे. प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी गुरुग्राममध्ये कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

०२. विशेष म्हणजे कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तयार केले आहे. यासाठी भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्याला अमेरिकेतील एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

०३. अश्वनी उपाध्याय या रेल्वे अधिकाऱ्याने इमिल जेकब यांच्या मदतीने कॅटरपिलर ट्रेनची संकल्ना विकसित केली. एमआयटीमधून या दोघांची पीएचडी झालेली आहे.

०४. कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. एका कॅटरपिलर ट्रेनच्या रुळांवरुन दुसरी ट्रेनदेखील जाऊ शकते. एक ट्रेन रुळांवरुन जात ................... ...................... .................... ................... .................. ...................... ..................... http://www.mpscacademy.com/2016/12/ca27-28Dec2016.html
पहिले अफगाण युद्ध (१८३८-१८४२)
०१. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले.

०२. याच सुमारास रणजितसिंगाने अफगाणचा पेशावर प्रांत जिंकून घेतला होता. तो परत मिळविण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला.

०३. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले.

०४. सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड.................. .................... ................... ................ .................. ................ .................. ................. http://www.mpscacademy.com/2016/03/british-agfan-wars.html
MPSC Notes Pre (STI /PSI ASO)
Android Application
Author:- MpscAcademy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 11.46 MB
Latest Version:- 1.0

Download Application :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.notes.pre.sti.psi.aso
शस्त्रास्त्र खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
०१. आपल्या सशस्त्र बलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेला भारत हा मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानी पोचला आहे. त्याच्या आधी फक्त सौदी अरेबियाचा क्रमांक आहे.

०२. अमेरिकी संसदेचे सभागृह असलेल्या काँग्रेसची संशोधन सेवा सीआरएसने 'कन्व्हेशनल आर्म्स ट्रान्सफर्स टू डेव्हलपिंग नेशन्स २००८ -२०१५' हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

०३. भारताने २००८ ते २०१५ पर्यंत ३४ अब्ज डॉलर किमतीचे संरक्षण साहित्य खरेदी केले. तर सौदी.............. .................. ................ ................. .................. ....................http://www.mpscacademy.com/2016/12/ca30dec2016.html
रोकडरहितसाठी 'भीम' एप्लिकेशन लाँच
०१. स्मार्टफोन किंवा अगदी साधा फोन असणारा मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे ‘भीम’ नावाच्या आधार क्रमांकावर आधारलेल्या पेमेंट अ‍ॅपचे पंतप्रधान यांनी शुक्रवारी उद्घाटन केले.

०२. 'भारत इंटरफेस फॉर मनी' असे या अ‍ॅपचे खरे नाव आहे. सुमारे दोन आठवडय़ांत हे अ‍ॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.

०३. डिजिटल पेमेंट करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा या वेळी मोदींनी केली. त्यानुसार, दररोज पंधरा हजार भाग्यवान ग्राहक निवडले जातील आणि त्यांच्या खात्यावर एक हजार रुपये 'डिजिटली' भरले जातील. तब्बल शंभर दिवस ही योजना चालू राहील आणि १४ एप्रिल रोजी 'महाभव्य लकी ड्रॉ' काढला जाईल.

०४. सध्या फक्त हे एप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण. कोणताही प्रक्रिया कर नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.

०५. तूर्तास अ‍ॅपवरून ३० बँकांचे व्यवहार होऊ शकतात. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, साउथ इंडिया बँक, स्टँडर्ड चार्टर्ड यांचा त्यात समावेश आहे.

०६. 'भीम'वरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही 'यूपीआय'सक्षम बँकेत खाते हवे. वापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे



'इंटरनेट ऑफ बर्ड्स' तंत्रज्ञान विकसित
०१. बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची प्रजाती ओळखण्यासाठी 'इंटरनेट ऑफ बर्ड्स' हे नवीन तं................... ............................... ................. .................. .................... .................... ......................... http://www.mpscacademy.com/2017/01/ca01jan2017.html
इंग्रज-गुरखा युद्धे (१८१४-१८१६)
०१. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद देण्यात आले.

०२. १७६७ मध्ये काश्मीरमधील गुरखे नावाच्या राजपुतांनी नेपाळवर स्वारी करुन नेवार राजाला जर्जर केले, तेव्हा त्याने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी मदत म्हणून काही फौज रवाना केली, पण तराईच्या प्रदेशातून जाताना पर्जन्यामुळे व रोगराईमुळे बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले. १७६८ साली गुरख्यांचा नेता पृथ्वीनारायण ह्याने भाटगावच्या रणजीत मल्लाचे वारसदार नेवार राजाचा पराभव करुन काठमांडूचे राज्य मिळविले.

०३. १७७१ साली पृथ्वीनारायणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा प्रतापसिंह गादीवर आला. प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर १७७५ साली त्याचा अल्पवयीन मुलगा रणबहाद्दूर ह्यास गा................ ................... .................... .................. ................. ................... ................... http://www.mpscacademy.com/2016/03/British-gurkha-Wars.html
निजाम राजवटीची स्थापना
०१. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.

०२. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.

०३. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह के............... ................. .................. ................. ............... .................... ................. ..................... http://www.mpscacademy.com/2016/03/Nijam-Ofhyderabad.html
भारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर
०१. भारतीय कालगणनेत रविवारी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली.

०२. जागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते. भारतात आतापर्यंत ३६ वेळा लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.

०३. पृथ्वीचे भ्रमण काहीसे मंदावल्याने सरत्या वर्षाच्या मध्यरात्री म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी व ५९ सेकंदांनी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळ एका सेकंदासाठी थांबवण्यात आले. यानंतर रविवारी पहाटे लीप सेकंदाची भर घालून भारतीय प्रमाणवेळ जागतिक कालगणनेशी सुसंगत करण्यात आली.

०४. पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या कक्षेतील भ्रमणात सातत्य नसून काहीवेळा हे भ्रमण सरासरीपेक्षा जलद तर काहीवेळा संथ होते. भूकंप अथवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा बदल होतो.

०५. सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात एका सेकंदाला फार महत्त्व नाही. परंतु उपग्रहांचे कार्य, खगोलशास्त्र आदी बाबतीत एक सेकंदही महत्त्वाचे असते. त्यामुळे या लीप सेकंदाची भर घालण्यात आली, अशी माहिती नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे संचालक डी. के. असवाल यांनी दिली.



अग्नी-४ क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी
०१. भारताने आज अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडीसातील बालासोर स्थित चांदीपूर तटावर ही यशस्वी चाचणी करण्यात आली.

०२. अग्नी-४ क्षेपणास्त्र ४ ह................ .................... ................... ................. ................. ................. .................. ................ http://www.mpscacademy.com/2017/01/ca03jan2017.html
पूर्वपिठीका
०१. १९०५ साली राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांत रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. १९२० मध्ये नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाची नवी घटना तयार करताना भाषिक तत्वावर काँग्रेस समित्या स्थापन करण्याचे मान्य केले. त्यानुसार काँग्रेसने भाषेच्या आधारावर प्रांतिक समित्या स्थापन केल्या.

०२. पण त्यापूर्वी आंध्र प्रदेशाच्या मागणीसाठी तेलगू भाषिकांनी १९१३ पासून सभा घेण्यास सुरुवात केली होती. कानडी भाषिकांनी कर्नाटकाच्या मागणीसाठी १९१६ मध्ये 'विद्यावर्धक संघ' व 'कर्नाटक एकीकरण सभा' अशा संघटना स्थापन केल्या होत्या.

०३. प्रा. विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी इ.स. १९१७ मध्ये 'लोकशिक्षण' या मासिकात एक लेख लिहिला. त्यात मुंबई प्रांत, मध्य प्रांत, वऱ्हाड आणि हैद्राबाद या संस्थानात विभागला गेलेला मराठी भाषिक प्रांत एकत्र आणून एकसंध महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार मांडला. त्यांनी 'महाराष्ट्राचे तीन भाग' या लेखात सर्व मराठी भाषिक भाग एकत्र येण्याची आवश्यकता प्रतिपादली होती.

०४. प्रांताची पुनर्रचना भाषिक तत्वावर करण्यात यावी अशी विनंती काँग्रेसने 'इंडियन स्टॅट्युटरी कमिशन'ला केली होती. १९२८च्या नेहरू रिपोर्टमध्येही भाषावार प्रांतरचना करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली.

०५. त्याचवेळी मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, वऱ्हाड, मराठवाडा व गोवा या मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र प्रांत निर्माण करण्यात यावा अ ....................... ....................... ..................... ................... ......................... http://www.mpscacademy.com/2015/07/formation-of-maharashtra-state.html
राज्य पुनर्रचना समिती १९५३
०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन बोलावले. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने २९ मे १९५४ रोजी फाजल अली आयोगाला आपले निवदेन सादर केले. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवण्यात यावे असे निवेदन दिले. पश्चिम खान्देश, महाविदर्भ, मराठवाडा या भागातील नेत्यांनीही आपली निवेदने आयोगाला सादर केली होती.

०२. भाषावार प्रांतरचनेच्या पुरस्कर्त्यांनी गांधीजींच्या उपोषणाचा मार्ग अवलंबिला. स्वामी सीताराम आणि त्यांच्या अनुयायांनी १६ ऑगस्ट १९५१ रोजी प्राणांतिक उपोषणाला प्रारंभ केला. पण विनोबांच्या विनंतीला मान देऊन ते उपोषण मागे घेण्यात आले.

०३. सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेने भाऊसाहेब हिरे यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त निवेदन २४ ऑक्टोबर १९५४ रोजी राज्य पुनर्रचना समितीला सादर केले. यात मराठी भाषिक एक राज्याचा आग्रह धरला.

०४. मात्र या समितीने 'संयुक्त महाराष्ट्र' व 'महागुजरात' दोन्ही मागण्या फेटाळून विदर्भाचे स्वतंत्र राज्य व उरलेल्या मराठी भाषिकांचे व गुजरातीचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे असे सुचविले.

०५. समितीच्या शिफारसींचा महाराष्ट्र व गुजरात मध्ये तीव्र विरोध सुरु झाला. तो कमी करण्यासाठी ९ नोव्हें................... ........................ ...................... .................... .................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/formation-of-maharashtra-state-part-2.html
* संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
०१. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.

०२. द्वैभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली

०३. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

०४. नेहरुंना राज्याला 'मुंबई' नाव हवे होते. पण ते वगळून संयुक्त महाराष्ट्र समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली.

०५. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर................ ................ .................. .................... .................. ................... ................... ..................... .................. http://www.mpscacademy.com/2016/10/formation-of-united-maharashtra.html
डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. १४४४
०१. केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.

०२. या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्‍नांवर उत्तरे मिळणार आहेत.

०३. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे.


महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद
०१. महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पण खेळाडू या नात्याने आपण संघात कायम राहणार असल्याचेही त्याने स्प............ ................ ................. ................ .................. .................... ................... ................... ................... ..................... http://www.mpscacademy.com/2017/01/ca05jan2016.html
उठावाची पूर्वपीठिका
०१. १७५७ ते १८५६ हा इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. १८५६ पर्यंत संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.

०२. १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे. हे भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला.

०३. हा उठाव एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द जो असंतोष होता. त्याचाच परिपाक या उठावाने झाला.

०४. ब्रिटिशांनी भारत जिंकले व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले. या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले.

०५. शेती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते.

०६. १७६०-७० च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी सं................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part1.html
१८५७ च्या उठावाची कारणे
राजकीय कारणे :-
०१. १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले. कंपनीचे साम्राज्यवादी धोरण याला कारणीभूत होते.

०२. वेलस्लीने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला. वेलस्लीने अनेक संस्थाने बरखास्त केली. ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही. परिणाम त्यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या. लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज हे दुसरे कारण होते.

०३. संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती हे सुद्धा महत्वाचे कारण ठरले. १८५७ पूर्वी डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली. डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.

०४. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली. इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.

०५. कंपनीच्या भरभराटीसाठी लॉर्ड बेंटिकने अनेक योजना आखल्या होत्या. भारतातील अनेक संस्थानि ................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part2.html
प्रत्यक्ष उठाव
(सातारा - रंगो बापुजी गुप्ते)
०१. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक आठ लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्लाखान दोघेही इंग्लंडला गेले होते. परंतु ब्रिटिशांनी घेतलेल्या निर्णयांत बदल केला नाही. परिणामत: रंगो बापूजी व अजीमुल्लाखान यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.

०२. इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांनी एक योजना आखली रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांचा तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांची मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वजण इंग्रजांकडून दुखावलेले होते.

०३. या उठावात कमळाचे फुल व चपाती ही क्रांतीची प्रतिके होती. तर दिल्ली, लखनौ, कलकत्ता व सातारा ही क्रांतीची प्रमुख केंद्र होती. संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. उठावाचे नियोजन करून ३१ मे १८५७ हा उठावाचा दिवस निश्चित करण्यात आला. परंतु काडतुसाच्या बातमीने सैनिकांत खूप असंतोष निर्माण झाला होता.


(बराकपूर - मंगल पांडे)
०१. अशातच बराकपूरच्या छावणीमध्ये एका ब्राम्हण सैनिकास एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पा ................. ..................... ...................... ...................... ..................... ...................... ....................... ..................... ...................... http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part3.html
❤1