MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from Deleted Account
*पंकजचे १६ वे विश्वविजेतेपद*
दिग्गज भारतीय खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचे कडवे आव्हान परतावून ११व्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेवर कब्जा केला.

विशेष म्हणजे कारकिर्दीतील १६वे विश्वविजेतेपद पटकावताना अडवाणीने अंतिम सामन्यात गिलख्रिस्टला ६-३ असे नमवले.
Forwarded from Deleted Account
*एलईडी दिवे वापरात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी*
वीज बचतीसाठी ऊर्जा मंत्रालयाने राबविलेल्या एलईडी दिवे वापराच्या उपक्रमात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहेत. तर गुजरात प्रथमस्थानी आहे.

वर्षभरपासून सुरू झालेल्या एलईडी वितरण प्रणालीमध्ये देशात १८ कोटी ३० लाख दिव्यांचे वाटप करण्यात आले.

राज्यात पुण्याने आघाडी घेतली असून या जिल्ह्यात ३० लाख एलईडी वाटप झाले आहेत.त्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात १३ लाख एलईडीचे वितरण करण्यात आले.

देशात तिसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश, चौथ्या स्थानी राजस्थान, पाचव्या स्थानी उत्तर प्रदेश, सहाव्या स्थानी कर्नाटक आहे.
Forwarded from Deleted Account
*देशातील निम्मा ‘एफडीआय’ एकटय़ा महाराष्ट्रात*
परकीय गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षक वाटणाऱ्या महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ आणखीनच वाढला आहे.

गेल्या संपूर्ण वर्षांमध्ये (२०१५-१६) आलेल्या ‘एफडीआय’ला चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांमध्येच मागे टाकले आहे. या ओघाने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे वेगळे सांगण्याची गरज उरली नाही.

किंबहुना या कालावधीत आख्ख्या देशामध्ये आलेल्या ‘एफडीआय’मध्ये (१,४४,६७४ कोटी) एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा आहे.

केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या औद्योगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याकडून (डीआयपीपी) ‘एफडीआय’च्या गुंतवणुकीचा तपशील जाहीर केला जातो.

‘डीआयपीपी’ने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे अव्वलस्थान अधिकच झळाळून उठले आहे.

महाराष्ट्रातील ‘एफडीआय’ प्रामुख्याने वित्तीय सेवा, तंत्रज्ञानाधारित सेवा, दूरसंचार, संगणक, व्यापार आणि वाहनउद्योगात आला आहे.
Forwarded from Deleted Account
*‘युनीसेफ’ची सदिच्छा दूत बनली प्रियांका बनली !*
युनीसेफ ग्लोबलची सदिच्छा दूत पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा आता झाली आहे. ती मुलांच्या हक्कंविषयी समाजात या माध्यमातून जागरुकता निर्माण करणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर प्रियांका युनीसेफसोबत काम करत आहे. युनीसेफची सदिच्छा दूत म्हणून ती काम करत आहे. पण आता ती हेच काम आंतरराष्ट्रीय पातऴीवर नेताना दिसणार आहे.

‘क्वांटिको स्टार’ने युनीसेफच्या सत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले होते.
Forwarded from Deleted Account
*बीडब्ल्यूएफची ‘मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर’ बनली *
२०१६ हे वर्ष रजत पदक विजेती पी. व्ही. सिंधूसाठी गोल्डन ईयर ठरले आहे.

बीडब्ल्यूएफ म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या पुरस्कार सोहळ्यात सिंधूला ‘मोस्ट इम्प्रुव्हड् प्लेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिला हा पुरस्कार दुबईत झालेल्या रंगतदार सोहळ्यात प्रदान कऱण्यात आला.

सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रजत पदक पटकावले. तर चायना ओपन सुपरसिरीज जिंकत तिने आपल्या बॅडमिंटन करिअरमधील पहिल्या सुपरसिरीज खिताबावर आपले नाव कोरले.
Forwarded from Deleted Account
*शिवा थापाला सुवर्ण*
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या शिवा थापाने लाईटवेट (६० किलो) गटात राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच जेतेपदाचा (सुवर्ण) मान मिळविला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान एसएससीबीने (सेनादल) मिळविला. त्यांच्या बॉक्सर्सनी चार सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली.

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (आरएसपीबी) दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य पदकांसह दुसरे स्थान पटकावले.
आनंदला संयुक्त तिसरे स्थान
०१. भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले.

०२. अमेरिकेच्या वेस्ली सो याने सहा गुणांसह अजिंक्यपद पटकावले. अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने साडेपाच गुणांसह दुसरे स्थान घेतले.

०३. आनंदने शेवटच्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक याच्याशी बरोबरी स्वीकारली. आनंद, क्रामनिक व अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांनी प्रत्येकी पाच गुणांसह तिसरे स्थान मिळविले



विराटचा कसोटी कर्णधारपदी विक्रम
०१. विराट सलग १८ कसोटी................. ................... ................... .................. .................. ......................... http://www.mpscacademy.com/2016/12/ca2122Dec2016.html
०१. लॉर्ड एडवर्ड कॉर्नवालिस हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होता. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण तरीही त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.

०२. कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भ्रष्टाचाराचे निर्मूलन केले. ................ ................. ................. .................. .................. .................... ........................ http://www.mpscacademy.com/2016/03/Lord-Cornwallis.html
क्लाइव्हची राजकीय व्यवस्था
०१. बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते. त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी अलाहाबादचा तह केला.

०२. अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे नबाबाने मुघल सम्राट शाह आलम याला परत द्यावेत. युद्धनुकसान भरपाई म्हणून शुजाने रु. ५० लक्ष कंपनीला द्यावेत. काशीचा शासक बळवंत सिंह ह्याला त्याचा प्रदेश परत करावा. अवध राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल. त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नबाब करेल. नबाबानेही कंपनीला गरजेनुसार निःशुल्क सेवा द्यावी. असा तह क्लाइव्हने शुजाउद्दौलासोबत केला.

०३. मुगल सम्राट शाह आलमशी क्लाइव्हने तह केला. त्यात शुजा उदौलाकडून घेतलेले अलाहाबाद व कोरा जिल्हे शाह आलमला देण्यात आले. शाह आलमने कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसाचे दिवाणी हक्क कंपनीला द्यावेत. त्याऐवजी कंपनी सम्राटाला वार्षिक रु. २६ लक्ष व त्या प्रांताच्या निजामतीचा खर्च म्हणून रु. ५३ लक्ष देईल. अशा अटी ठेवण्यात आल्या.



दुहेरी शासनपद्धती (The Dual System):
०१. कंपनीला मुगल सम्राट शाह आलम कडून बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले होते. परंतु तेवढी यंत्रणाही कंपनीकडे नव्हती. म्हणून ह्या कार्यासाठी कंपनीने दोन नाय...................... ................... ....................... .................. ................... ..................... http://www.mpscacademy.com/2016/03/robert-Clive.html
Download Previous Year Question papers, Answer Key & Cutoff.

PSI, STI & ASO Question papers are Posted. State Service Question Papers Will be Posted Soon.

Download All Question Papers, Ans Key and Cutoff in PDF format. Click Below Link.

http://www.mpscacademy.com/2016/02/mpsc-psistiasstistant-qus-papers.html
आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत केशवनला सुवर्ण
०१. हिवाळी ऑलिंपिकमधील लोकप्रिय ल्यूज या क्रीडा प्रकारातील भारताचा प्रमुख खेळाडू शिवा केशवन याने आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

०२. जपानचा तनाका शोहेई (१.४४.८७४ सेकंद) दुसरा आला. तैवानचा लिएन ते ऍन (१.४५.१२० सेकंद) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. या तिघांत केशवन याने ताशी १३०.४ कि.मी. असा सर्वोत्तम वेग राखला.



आयआयटी गोव्याच्या संचालकपदी मिश्रा
०१. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे खास स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) गोव्यासह पाच नव्या संस्थांच्या रिक्त पदांवर संचालकांची नियुक्ती आज करण्यात आली.

०२. देशात २३ आयआयटी आहे....................... .......................... .................. .......................... .................... ................... .................. ................... ................... http://www.mpscacademy.com/2016/12/blog-post_24.html
१. १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचखोरी वाढली होती. बंगालमध्ये अराजकता वाढली होती. ८ फेब्रुवारी १७८५ पर्यंत तो गवर्नर जनरल होता.

०२. या काळात मुगल बादशहा शाह आलमने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सत्ता या काळात प्रबळ होत्या. हेस्टिंग्जने अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या. त्याने अयोध्येच्या बेगम प्रकरणात कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.

०३. वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. हैदरशी दुसरे युध्द हेस्टिंग्जच्या काळातच १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.



हेस्टिंग्जच्या प्रशासकीय सुधारणा
०१. १७७२ मध्ये कंपनीच्या संचालकांनी दुहेरी शासनव्यवस्था समाप्त करण्याचा निर्णय घेतला आणि कलकत्ता कौन्सिलला असा आदेश दिला कि, बंगाल प्रांताची संपूर्ण व्यवस्था .............. .................. ................... ................ .............. .............. ................ ................... http://www.mpscacademy.com/2016/03/Warren-Hastings.html
वेलस्लीचे भारत आगमन
०१. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती. पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते. १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकला. तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता. यावेळी इंग्रजांची एकूण परिस्थिती कठीण होती.

०२. १८०१ मध्ये नेपोलियनने रशियाचा झार पॉल ह्याच्याशी करार करून भारत आक्रमणाची योजना बनविली. नेपोलियनच्या जमिनीवरच्या सामर्थ्याची कल्पना इंग्रजांना होती. त्यामुळे नेपोलीयनची वरील योजना सफल झाली असती तर भारतातील इंग्रजांचा व्यापारही समाप्त झाला असता. अशा परिस्थितीत १७९८ मध्येच लॉर्ड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.

०३. 'Impossible is a word to be found in the dictionary of fools' हे नेपोलियनचे आवडते वाक्य वेलस्लीला माहीत होते आणि त्याचा अर्थही तो जाणत होता. टिपू सुलतान नेपोलियनच्या संपर्कात होता आणि भारतातून इंग्रजांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात होता.

०४. नेपोलीयनची भारत आक्रमणाची योजना म्हणजे टिपूसाठी इंग्रजांना भारतातून नामशेष करण्याची सुवर्णसंधी होती. त्याने श्रीरंगपट्टणमला स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून फ्रेंचाबरोबर आक्रमक व संरक्षणात्मक तह केला.

०५. १७९५ च्या खर्डा लढाईत मराठ्याकडून पराभूत झाल्याने निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली................... ..................... ................... .................. ......................................... http://www.mpscacademy.com/2016/03/lord-Wellesley.html
भारताला नोटा बनवण्यासाठी आठ विदेशी कंपन्या पुरवणार कागद
०१. केंद्र सरकार नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात छापण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून जगातील आठ मोठ्या कंपन्यांना भारतासाठी नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदांचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे.

०२. एप्रिल २०१७ पासून या कंपन्या भारताला नोटांसाठी कागदाचा पुरवठा करतील. तेथून सुमारे २७, ५०० मेट्रिक टन कागद भारताला मिळेल.

०३. या कागदातून छोट्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. यामध्ये १०, २०, ५० आणि १०० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. मोठ्या मूल्याच्या म्हणजे ५०० व २ हजार रूपयांच्या नोटांसाठीचा कागद भारत स्वत:च बनवणार आहे.

०४. याबाबतचा करार गुरूवार आणि शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ नोट मुद्रण प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात झाला.

०५. यासाठी स्वित्झर्लंडमधील लँकार्ड, दक्षिण कोरियाची कोमस्को, फ्रान्सची अॅरोगिनीस, स्वीडनची क्रेन, रशियाची गोझन्क, इंडोनेशियाची पीटी प्युरा, इटलीची फेब्रियानो आणि जर्मनीच्या लुईसेन्थल या कंपनीचे अधिकारी भारतात आले होते.

०६. ब्रिटनच्या डी ला रू कंपनीला हा व्यवहार करण्यासाठी बोलावण्यात आले नव्हते. सुमारे एक दशकाहून अधिक काळ डी ला रू ही कंपनी भारताला नोटा छपाईसाठी कागदाचा पुरवठा करते.



राजमुद्रेचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन
०१. भारतीय राज्यघटनेच्या पानांचे नक्षीकाम करणारे व राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार दीनानाथ भार्गव यांचे इंदूर येथे शनिवारी निधन झाले.

०२. भारतीय राज्य घटनेच्या पानांचे नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार व शांती निकेतनमधील कला भवनचे तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांनी अवघ्या २० वर्षांच्या भा.................... ..................... ................ .................... .................... .................. .................. ................. ....................... http://www.mpscacademy.com/2016/12/ca26dec2016.html
०१. भारत व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी व्यापारी कंपन्याना अधिकृत परवानगी दिली. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदरलैंड), फ्रान्स, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, ऑस्ट्रिया, स्वीडन इत्यादी राष्ट्रांत व्यापाराविषयी स्पर्धा सुरू झाली. या देशांनी सुरू केलेल्या ईस्ट इंडिया कंपन्यांपैकी ब्रिटिश, डच व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्यांनी अतिपूर्वेकडील राष्ट्रांमध्ये व्यापाराबरोबर साम्राज्य स्थापन करण्यातही यश मिळविले. म्हणूनच ह्या कंपन्यांना महत्त्व आहे.

०२. सोळाव्या व सतराव्या शतकांत अनेक ख्रिस्ती धर्मप्रसारक व व्यापाऱ्यांनी पूर्वेकडील देशांचा प्रवास केला होता. तथापि वास्को-द-गामाने १४९८ मध्ये आफ्रिकेला वळसा घालून पूर्वेकडील राष्ट्रांकडे येण्यासाठी शोधलेला नवीन मार्ग जागतिक इतिहासाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला. विविध देशांतील धाडसी जलप्रवाशांनी पूर्वेकडील देशांना भेटी देऊन, पौर्वात्य देशांची यूरोपीय लोकांना आपल्या प्रवासवृत्तांताद्वारे ओळख करून दिली.

०३. ह्या माहितीमुळे पूर्वेकडील अप्रगत देशांमधून नैसर्गिक साधनसामग्रीचा जास्तीत जास्त फायदा उठविण्यासाठी यूरोपीय राष्ट्रांत स्पर्धा सुरू झाली. दळणवळणांच्या साधनांतील सुधारणा व ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही कारणेही यूरोपीय राष्ट्रांना अतिपूर्वेकडील देशांकडे आकर्षित करण्यास प्रेरक ठरली.

०४. त्या त्या देशांतील कंपन्यांच्या भागधारकांनी जमविलेले भांडवल व काही कंपन्यांना शासन संस्थेकडून मिळालेले आर्थिक साहाय्य यामुळे ह्या कंपन्यांना आर्थिक स्थिरता लाभली.



डच ईस्ट इंडिया कंपनी
०१. डच लोक अतिपूर्वेकडील मसाल्यांच्या बेटांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी १५९५ पासूनच प्रवास करीत होते. अखेर १५९७ मध्ये जावाच्या सुलतानाबरोबर तह करण्यात डचांना यश मिळाले. अतिपूर्वेकडील व्यापारात वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांबरोबर स्पर्धा करण्यासाठी एकत्रित संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे, या जाणिवेने नेदरलैंडच्या स्टेट जनरलने एक व्यापारी कंपनी स्थापन केली.

०२. वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये ऊर्फ डच ईस्ट इंडिया कंपनी (Vereenigde Oost-Indische Compagnie अर्थ: संयुक्त पूर्व भारतीय कंपनी) ही इ.स. १६०२ साली स्था.................. ................. ............... ................. ................. ................ ............... ................ ................. ............... ................ http://www.mpscacademy.com/2016/03/Trading-Companies-In-British-india.html
गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन
०१. हरियाणामध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन धावणार आहे. प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी गुरुग्राममध्ये कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

०२. विशेष म्हणजे कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तयार केले आहे. यासाठी भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्याला अमेरिकेतील एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

०३. अश्वनी उपाध्याय या रेल्वे अधिकाऱ्याने इमिल जेकब यांच्या मदतीने कॅटरपिलर ट्रेनची संकल्ना विकसित केली. एमआयटीमधून या दोघांची पीएचडी झालेली आहे.

०४. कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. एका कॅटरपिलर ट्रेनच्या रुळांवरुन दुसरी ट्रेनदेखील जाऊ शकते. एक ट्रेन रुळांवरुन जात ................... ...................... .................... ................... .................. ...................... ..................... http://www.mpscacademy.com/2016/12/ca27-28Dec2016.html
पहिले अफगाण युद्ध (१८३८-१८४२)
०१. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले.

०२. याच सुमारास रणजितसिंगाने अफगाणचा पेशावर प्रांत जिंकून घेतला होता. तो परत मिळविण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला.

०३. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले.

०४. सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड.................. .................... ................... ................ .................. ................ .................. ................. http://www.mpscacademy.com/2016/03/british-agfan-wars.html
MPSC Notes Pre (STI /PSI ASO)
Android Application
Author:- MpscAcademy
Developer:- Softlink Labs
Download Size:- 11.46 MB
Latest Version:- 1.0

Download Application :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.notes.pre.sti.psi.aso
शस्त्रास्त्र खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
०१. आपल्या सशस्त्र बलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेला भारत हा मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानी पोचला आहे. त्याच्या आधी फक्त सौदी अरेबियाचा क्रमांक आहे.

०२. अमेरिकी संसदेचे सभागृह असलेल्या काँग्रेसची संशोधन सेवा सीआरएसने 'कन्व्हेशनल आर्म्स ट्रान्सफर्स टू डेव्हलपिंग नेशन्स २००८ -२०१५' हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

०३. भारताने २००८ ते २०१५ पर्यंत ३४ अब्ज डॉलर किमतीचे संरक्षण साहित्य खरेदी केले. तर सौदी.............. .................. ................ ................. .................. ....................http://www.mpscacademy.com/2016/12/ca30dec2016.html
रोकडरहितसाठी 'भीम' एप्लिकेशन लाँच
०१. स्मार्टफोन किंवा अगदी साधा फोन असणारा मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे ‘भीम’ नावाच्या आधार क्रमांकावर आधारलेल्या पेमेंट अ‍ॅपचे पंतप्रधान यांनी शुक्रवारी उद्घाटन केले.

०२. 'भारत इंटरफेस फॉर मनी' असे या अ‍ॅपचे खरे नाव आहे. सुमारे दोन आठवडय़ांत हे अ‍ॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.

०३. डिजिटल पेमेंट करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा या वेळी मोदींनी केली. त्यानुसार, दररोज पंधरा हजार भाग्यवान ग्राहक निवडले जातील आणि त्यांच्या खात्यावर एक हजार रुपये 'डिजिटली' भरले जातील. तब्बल शंभर दिवस ही योजना चालू राहील आणि १४ एप्रिल रोजी 'महाभव्य लकी ड्रॉ' काढला जाईल.

०४. सध्या फक्त हे एप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण. कोणताही प्रक्रिया कर नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.

०५. तूर्तास अ‍ॅपवरून ३० बँकांचे व्यवहार होऊ शकतात. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, साउथ इंडिया बँक, स्टँडर्ड चार्टर्ड यांचा त्यात समावेश आहे.

०६. 'भीम'वरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही 'यूपीआय'सक्षम बँकेत खाते हवे. वापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे



'इंटरनेट ऑफ बर्ड्स' तंत्रज्ञान विकसित
०१. बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची प्रजाती ओळखण्यासाठी 'इंटरनेट ऑफ बर्ड्स' हे नवीन तं................... ............................... ................. .................. .................... .................... ......................... http://www.mpscacademy.com/2017/01/ca01jan2017.html
इंग्रज-गुरखा युद्धे (१८१४-१८१६)
०१. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद देण्यात आले.

०२. १७६७ मध्ये काश्मीरमधील गुरखे नावाच्या राजपुतांनी नेपाळवर स्वारी करुन नेवार राजाला जर्जर केले, तेव्हा त्याने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी मदत म्हणून काही फौज रवाना केली, पण तराईच्या प्रदेशातून जाताना पर्जन्यामुळे व रोगराईमुळे बरेचसे सैन्य मृत्युमुखी पडले. १७६८ साली गुरख्यांचा नेता पृथ्वीनारायण ह्याने भाटगावच्या रणजीत मल्लाचे वारसदार नेवार राजाचा पराभव करुन काठमांडूचे राज्य मिळविले.

०३. १७७१ साली पृथ्वीनारायणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा प्रतापसिंह गादीवर आला. प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर १७७५ साली त्याचा अल्पवयीन मुलगा रणबहाद्दूर ह्यास गा................ ................... .................... .................. ................. ................... ................... http://www.mpscacademy.com/2016/03/British-gurkha-Wars.html