MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
आतापर्यंतचे लोकसभेतील एंग्लो इंडियन खासदार


१९५२ ते १९५७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९५२ ते १९५७ - श्री. ए.इ.टी. बैरो

१९५७ ते १९६२ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९५७ ते १९६२ - श्री. ए.इ.टी. बैरो

१९६२ ते १९६७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९६२ ते १९६७ - श्री. ए.इ.टी. बैरो

१९६७ ते १९७० - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९६७ ते १९७० - श्री. ए.इ.टी. बैरो

१९७१ ते १९७७ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९७१ ते १९७७ - श्रीमती मर्जरी गॉडफ्रे

१९७७ ते १९७९ - श्री. ए.इ.टी. बैरो
१९७९ ते १९७९ - श्री. रुडॉल्फ रॉड्रीग्ज

१९८०ते १९८४ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९८० ते १९८४ - श्री. ए.इ.टी. बैरो

१९८४ ते १९८९ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९८४ ते १९८९ - श्री. ए.इ.टी. बैरो

१९८९ ते १९९१ - श्री. जॉस फर्नांडीज
१९८९ ते १९९१ - श्री. पॉल मंतोष

१९९१ ते १९९६ - श्री. फ्रैंक एन्थोनी
१९९१ ते १९९६ - मेजर जनरल रॉबर्ट इ विल्यम्स

१९९६ ते १९९७ - श्री. नील ओब्रायन
१९९६ ते १९९७ - श्रीमती हेडविग रेगो

१९९८ ते १९९९ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा
१९९८ ते १९९९ - लेफ्टनंट जनरल नेविल फॉले

१९९९ ते २००४ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा
१९९९ ते २००४ - श्री. डेन्झेल बी. एटकिन्सन

२००४ ते २००९ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड
२००४ ते २००९ - श्री फ्रान्सिस फान्थोमे

२००९ ते २०१४ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड
२००९ ते २०१४ - डॉ. श्री. चार्ल्स डायस

२०१४ ते पुढे - प्रा. रिचर्ड हे
२०१४ ते पुढे - श्री. जॉर्ज बेकर
महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
* औरंगाबाद जिल्हा
कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी

* जालना जिल्हा
कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी

* बीड जिल्हा
कांबळी नदी, मांजरा नदी

* उस्मानाबाद जिल्हा
मांजरा नदी, तेरणा नदी

* लातूर जिल्हा
मांजरा नदी

* नांदेड जिल्हा
उमरगा(नाला), उलूपी नदी, गांजोटी(नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, घरणी नदी, चांदणी नदी, तवरजा नदी, तिरू नदी, तेरणा नदी, दुधना नदी, देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, भीमा नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, रेणा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीना नदी, सीता नदी, हरणी नदी

* हिंगोली जिल्हा
असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी

* परभणी जिल्हा
कर्परा नदी(कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना नदी, पूर्णा नदी, मासळी नदी


* अकोला जिल्हा
अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी,पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी
* अमरावती जिल्हा
आरणा नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बुरशी नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी,

* गडचिरोली जिल्हा
गाढवी नदी, इंद्रावती नदी, कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी
* गोंदिया जिल्हा
गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी

* चंद्रपूर जिल्हा
इरई नदी, पैनगंगा नदी, मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी

* नागपूर जिल्हा
आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, वेणा नदी (Wunna), वैनगंगा नदी

* यवतमाळ जिल्हा
अडाण नदी(अडाणा नदी), अरुणावती नदी, खुनी नदी, चक्रावती नदी, निर्गुणा नदी (निरगुडा नदी), पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, रामगंगा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी

* बुलढाणा जिल्हा
खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, पूर्णा नदी, मास नदी, उतवळी नदी

* वर्धा जिल्हा
कार नदी, धाम नदी, पंचधारा नदी, पोथरा नदी, बाकळी नदी, बोर नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वेणा नदी (Wunna), वैनगंगा नदी,

* वाशीम जिल्हा
अडाण नदी(Aran River), अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी

* भंडारा जिल्हा
अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बहुळा नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी

* अहमदनगर जिल्हा
आढळा नदी, कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कुकडी नदी, कौतिकी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी

* पुणे जिल्हा
आंद्रा नदी, आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, उरवडे नदी, कर्‍हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, कोळवण नदी, गुंजवणी नदी, घोड नदी, देव नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, बुधा नदी, बेलावडे नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम नदी, रिहे नदी, येलवंती नदी, वेळवंडी नदी, शिवगंगा नदी, सुधा नदी
* नाशिक जिल्हा
अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान(सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी,बामटी(मान) नदी, बारीक नदी, बोरी नदी, भीमा नदी (एक छोटी नदी), भोखण नदी, मान नदी (बामटी) नदी], मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी,वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी, शाकांबरी नदी, सासू(तान) नदीइतर नाले, ओहोळ, प्रवाह वगैरे : अळवली, कंजारी, कनेर, खाटकी, खेर, गुलाडी, तुंगाडी, देव, नेत्रावती, भामेर, भेवरी, वाटोळी, शाखी(शाकंबरी), सालवर, सुकी

* कोल्हापूर जिल्हा
कसारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी, गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी, जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुलशी नदी, दूधगंगा नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी, मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी

* सांगली जिल्हा
अग्रणी नदी, कटोरा ओढा, कासेगाव नदी, खरा ओढा, पंचगंगा नदी, पेठ नदी, बोर नदी, येरळा नदी, वारणा नदी, वाळू ओढा
* सातारा जिल्हा
उरमोडी नदी, कानदानी नदी, कुंडली(कुडाळी) नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, बाणगंगा नदी (फलटण),भीमा नदी, माण(मांड) नदी, मनगंगा (माणगंगा) नदी, मोरना नदी, येरळा नदी, वसना नदी, वांग(वांगना) नदी, वाघेरी(नाला), वाझर्डे नाला, सोळशी नदी

* सोलापूर जिल्हा
अडिला नदी, कुमठा नाला, गोरडा नदी, चंद्रभागा(भीमा) नदी, नागझरी नदी, नीरा नदी, बोटी नदी, बोडकी नदी, भीमा नदी, भेंड नदी, भोगावती नदी, माण नदी, वराई नदी, शेलगी नाला, सीना नदी, सीरा नदी, हत्तूर नाला, हरणी नदी

* जळगाव जिल्हा
अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी

* धुळे जिल्हा
अनेर नदी, अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कान नदी, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, बुराई नदी, भोगावती नदी, मदारी नाला, सूर नदी

* नंदुरबार जिल्हा
गोमती नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पूर्णा नदी, शिवा नदी, गोमाई नदी, वाकी नदी

* ठाणे जिल्हा
उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी,वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी

* मुंबई शहर आणि उपनगर जिल्हे
उल्हास नदी, ओशिवारा नदी, दहिसर नदी, पोयसर नदी, माहीम नदी, मिठी नदी

* रत्‍नागिरी जिल्हा
अंबा नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, मुचकुंदी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शुक(वाघोटन) नदी, सावित्री नदी

* सिंधुदुर्ग जिल्हा
अरुणा नदी, आचरा नदी, कर्ली, केसरी, खांडरा नदी, गड नदी, जगबुडी, जानवली, जोग नदी, तिल्लारी(तिलारी) नदी, तेरेखोल नदी, देवगड नदी, पियाळी नदी, पीठढवळ नदी, बांदा नदी, बेल नदी,भंगसाळ नदी, वाघोटण नदी, शिवगंगा नदी, शुक नदी, सरंबळ नदी, सुखशांती नदी
पंकजला अडवाणीला कांस्यपदक
०१. पंधरा विश्वविजेतेपदे नावावर असलेल्या भारताच्या पंकज अडवाणीला दोहा येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

०२. उपांत्य फेरीच्या सामन्यात वेल्सच्या अँड्रूृ पॅगेटने ७-२ अशा फरकाने गतविजेत्या पंकजचे आव्हान संपुष्टात आणले.

०३. या स्पर्धेनंतर अडवाणी त्वरित बंगळुरूला दाखल होणार असून ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्व बिलिय................ ................. ................. .............. ................ ................ ..................... http://www.mpscacademy.com/2016/11/ca30nov2016.html
इंग्रज सिंध युद्ध
०१. पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख साम्राज्य, सिंध व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच जिंकावयाची राहिली होती. बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता.

०२. अ‍ॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे केंद्रित झाले होते. जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या. अ‍ॅम्हर्स्ट ते डलहौसी पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले.

०३. लॉर्ड हेस्टिंग्जनंतर लॉर्ड अ‍ॅक्हर्स्ट भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या कारकिर्दीतच पहिले ब्रम्ही युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही फौजांचा पराभव केला. १८२६ साली यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व तेनासरीम हे प्रांत दिले व आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या.

०४. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर आक्रमण करील अशी त्यांना भीती होती. म्हणून अफगाणिस्तानावर प्रभाव प्रस्थापित करण्याचे इंग्रजांनी ठरवले. अफगाणि.................... ........................... ........................ .................... ...................... ......................... http://www.mpscacademy.com/2016/02/british-sindh-wars.html
पहिले इंग्रज शीख युद्ध (१८४५-१८५६)
०१. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती इंग्रजांनी रणजीतसिंहाच्या अधिकाराला मर्यादा घालण्यासाठी २८ एप्रिल १८०९ रोजी अमृतसरचा मैत्रीची तह केला. रणजितसिंहाने सतलज नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करू नये अशी अट इंग्रजांनी घातली. पुढे तीस वर्षे हीच व्यवस्था कायम राहिली. पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धात रणजितसिंगाने इंग्रजांना सहकार्यही दिले.

०२. १८१२ पर्यंत इंग्रज-शीख संबंध सलोख्याचे राहिले. पण त्यानंतर मराठा व गुरखा यांना मदत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात दुरावा निर्माण होत गेला. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी रणजितसिंगशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले. या उद्देशाने प्रेरित होऊनच इंग्रजांनी रॉर्बट बर्न याला रणतिजसिगला काही वस्तू भेट देण्यासाठी लाहोरला पाठविण्यात आले.

०३. एवढयाने संतुष्ट न होता गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक याने स्वत: रणजितसिंगची सतलज नदीच्या काठावर रोपड येथे २७ ऑक्टोबर १८३१ रोजी भेट घेतली. यावेळी रणजितसिंगने रशियन आक्रमणाचे संकट उत्पन्न झाले तर परस्परात मैत्री कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. या भेटीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितसिंगने कंपनीला आपल्या राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिली.

०४. गवर्नर जनरल बेंटिकने रणजितसिंहास कल्पना न देता १८३२ मध्ये सिंधच्या अमीरासोबत एक व्यापारी तह केला. रणजितसिंहास सिंध पाहिजे होता, म्हणून तो ब्रिटीशांच्या या कृतीवर नाराज झाला. शिखांनी एक लष्करी ठाणे ताब्यात घेतले होते ते ठाणे १............... ...................... .................. ................. ............... .................. ................... http://www.mpscacademy.com/2016/03/british-sikh-wars.html
दुहेरी राज्यव्यवस्था
०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.

०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.

०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबा.............. ............. ............. ............ .............. ............. .............. ................ http://www.mpscacademy.com/2016/03/british-india-state-policy-till-1857.html
कंपनी सरकारची न्याय व्यवस्था
०१. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० च्या चार्टर अॅक्टनुसार करण्यात आली. या अॅक्टनुसार कंपनीला कायदे व नियम तयार करणे, अध्यादेश काढणे इ. अधिकार देण्यात आले होते. हे अधिकार कंपनीच्या ताब्यातील प्रदेश व तिचे प्रशासन या संदर्भात दिले होते.

०२. कंपनीच्या कायद्यानुसार दिवाणी व फौजदारी खटल्यांचा निकाल दिला जात नसे. १६६९ च्या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यात मुंबई देण्यात आली. तसेच या प्रदेशा संदर्भात कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. १७८३-१७८६ च्या कायद्यानुसार व्यापारी व नाविक दलासंबंधी न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला.

०३. १७२६ मध्ये मुंबई, मद्रास, फ़ोर्ट विल्यम (कलकत्ता) येथे मेयर कोर्ट स्थापण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली. प्रत्येक कोर्टमध्ये १ मेयर व ९ मदतनीस असत. ९ पैकी ७ जण ब्रिटनमध्ये जन्मलेले व ब्रिटिश नागरिक असावेत असे बंधन होते. या कोर्टनी आपल्या क्षेत्रातील दिवाणी खटल्यांचा निकाल देणे, त्याच्या विरोधात सरकारच्या कोर्टात अपील करणे अशी त्यांची कार्ये होती.

०४. सरकारी कोर्टचे सदस्य त्या प्रांता.................. ............... ............. ............ ............... ............... ............... ................. http://www.mpscacademy.com/2016/05/british-india-state-policy-till-1857-part2.html
'टाइम'च्या प्रभावशाली छायाचित्रांमध्ये महात्मा गांधी यांचा चरखा
०१. अमेरिकेतील 'टाइम' मासिकाने १०० सर्वात प्रभावशाली छायाचित्रांच्या संकलनात चरख्यासह महात्मा गांधी यांचे १९४६ मधील एका छायाचित्राचा समावेश केला आहे. महात्मा गांधी यांचे हे कृष्णधवल छायाचित्र प्रसिद्ध छायाचित्रकार मार्गारेट बोर्केव्हाइट यांनी काढले होते.

०२. 'टाइम'च्या संकलनात सन १८२० पासून २०१५ पर्यंत घेण्यात आलेली सर्वात प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. 'टाइम'ने त्यात आता चरख्यासमवेत महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एका छायाचित्राचा समावेश केला आहे.

०३. हे छायाचित्र भारतीय नेत्यांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखासाठी घेण्यात आले होते. मात्र, ते प्रकाशित होण्याच्या दोन वर्षे आधी आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हे छायाचित्र श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रकाशित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते.

०४. टाइमच्या संकलनात १८२० ते २०१५ या कालावधीत घेण्यात आलेल्या सर्वाधिक प्रसिद्ध आणि इतिहास घड................ .................. ................ ............. ............... .............. ................ http://www.mpscacademy.com/2016/12/ca2dec2016.html
Sorry for the Inconvenience. Updates were stopped for some reasons. Updates will be continued from 18 December 2016.
Thanks.
Forwarded from Deleted Account
*चेन्नईला धडकले ‘वरदा’*
‘वरदा’ चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने चेन्नईच्या किनार्‍यावर धडकले असून किनारपट्टीवरील अनेक वृक्ष सोसाट्याच्या वार्‍याने उन्मळून पडली आहेत.

चेन्नईत ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. ७००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चक्रीवादळाचा कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अणूऊर्जा प्रकल्पात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.

तामिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाला वरदा हे नाव पाकिस्तानने ठेवले.

चक्रीवादळांना नाव देण्याची परंपरा २० व्या शतकापासून सुरु झाली. चक्रीवादळांना एखादं विशिष्ट नाव देण्याचं कारण म्हणजे, चक्रीवादळासंदर्भात दोन देशात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत होणं हे मुख्य कारणं आहे.

माहितीची देवाण-घेवाण करताना जर एकाच चक्रीवादळाला अनेक नावांनी संबोधले तर घोळ होऊ शकतो. तसेच, अनेक अफवा पसरु शकतात.

त्यामुळे प्रत्येक देशांने येणा-या चक्रीवादळाला नाव देण्याचं ठरवलं. चक्रीवादळाला नाव देण्याचा करार अटलांटिक क्षेत्रात १९५३ साली झाला.

भारतानं २००४ साली हिंदी महासागरात येणार्‍या वादळाला नाव देऊन या परंपरेला सुरूवात केली. भारतानं आत्तापर्यंत अग्नि, आकाश, बिजली आणि जल अशी नावं दिली आहेत.

भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंड परिसरातील अन्य देशांच्या वेधशाळांशी संपर्क करते.

म्हणजेच ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड इत्यादी देशांशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादे नाव निश्चित केलं जातं.

वरदा या वादळापूर्वी हुडहुड हे वादळ आलं होतं. या वादळाला ओमान या देशानं नाव ठेवलं होतं. त्याआधीच्या वादळाला फायलीन हे नाव थायलंडने दिले होतं.
Forwarded from Deleted Account
*स्वीडन पैसे मोजून खरेदी करतोय कचरा*
स्वीडन या पर्यावरण पूरक देशात सध्या कचर्‍याची चणचण जाणवू लागली असल्याने बाहेरच्या देशातून येथे कचरा आयात केला जात आहे.

पर्यावरण क्षेत्रात अग्रणी मानल्या जाणार्‍या या देशात कचर्‍यापासून उष्णता मिळविण्याचा स्टेट ऑफ द आर्ट प्लांट सुरू केला गेला आहे व यात जमा केलेला कचरा जाळून त्यापासून मिळणारी उष्णता नागरिकांच्या घराघरातून पोहोचविली जाते.

स्वीडनमध्ये थंडीचे दिवस फार कष्टकारक असतात. यासाठी देशाने राष्ट्रीय हिटींग नेटवर्क स्थापन केले आहे. त्यात कचरा जाळून निर्माण होणारी उष्णता पाईपद्वारे घराघरांपर्यंत पोहोचविली जाते व घरे उबदार केली जातात. या एकाच प्रकल्पातून या पद्धतीने शेकडो घरांना उब पुरविली जाते.

गतवर्षात स्वीडनने फक्त १ टक्का कचरा जमिनीत जिरविला आहे. बाकी कचरा उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला गेला आहे. आता मात्र येथे कचरा कमी पडू लागल्याने अन्य देशांकडून तो पैसे मोजून आयात केला जात आहे.
Forwarded from Deleted Account
*पंकजचे १६ वे विश्वविजेतेपद*
दिग्गज भारतीय खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचे कडवे आव्हान परतावून ११व्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेवर कब्जा केला.

विशेष म्हणजे कारकिर्दीतील १६वे विश्वविजेतेपद पटकावताना अडवाणीने अंतिम सामन्यात गिलख्रिस्टला ६-३ असे नमवले.
Forwarded from Deleted Account
*एलईडी दिवे वापरात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी*
वीज बचतीसाठी ऊर्जा मंत्रालयाने राबविलेल्या एलईडी दिवे वापराच्या उपक्रमात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहेत. तर गुजरात प्रथमस्थानी आहे.

वर्षभरपासून सुरू झालेल्या एलईडी वितरण प्रणालीमध्ये देशात १८ कोटी ३० लाख दिव्यांचे वाटप करण्यात आले.

राज्यात पुण्याने आघाडी घेतली असून या जिल्ह्यात ३० लाख एलईडी वाटप झाले आहेत.त्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात १३ लाख एलईडीचे वितरण करण्यात आले.

देशात तिसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश, चौथ्या स्थानी राजस्थान, पाचव्या स्थानी उत्तर प्रदेश, सहाव्या स्थानी कर्नाटक आहे.
Forwarded from Deleted Account
*देशातील निम्मा ‘एफडीआय’ एकटय़ा महाराष्ट्रात*
परकीय गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षक वाटणाऱ्या महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ आणखीनच वाढला आहे.

गेल्या संपूर्ण वर्षांमध्ये (२०१५-१६) आलेल्या ‘एफडीआय’ला चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांमध्येच मागे टाकले आहे. या ओघाने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे वेगळे सांगण्याची गरज उरली नाही.

किंबहुना या कालावधीत आख्ख्या देशामध्ये आलेल्या ‘एफडीआय’मध्ये (१,४४,६७४ कोटी) एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा आहे.

केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या औद्योगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याकडून (डीआयपीपी) ‘एफडीआय’च्या गुंतवणुकीचा तपशील जाहीर केला जातो.

‘डीआयपीपी’ने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे अव्वलस्थान अधिकच झळाळून उठले आहे.

महाराष्ट्रातील ‘एफडीआय’ प्रामुख्याने वित्तीय सेवा, तंत्रज्ञानाधारित सेवा, दूरसंचार, संगणक, व्यापार आणि वाहनउद्योगात आला आहे.
Forwarded from Deleted Account
*‘युनीसेफ’ची सदिच्छा दूत बनली प्रियांका बनली !*
युनीसेफ ग्लोबलची सदिच्छा दूत पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा आता झाली आहे. ती मुलांच्या हक्कंविषयी समाजात या माध्यमातून जागरुकता निर्माण करणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर प्रियांका युनीसेफसोबत काम करत आहे. युनीसेफची सदिच्छा दूत म्हणून ती काम करत आहे. पण आता ती हेच काम आंतरराष्ट्रीय पातऴीवर नेताना दिसणार आहे.

‘क्वांटिको स्टार’ने युनीसेफच्या सत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले होते.
Forwarded from Deleted Account
*बीडब्ल्यूएफची ‘मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर’ बनली *
२०१६ हे वर्ष रजत पदक विजेती पी. व्ही. सिंधूसाठी गोल्डन ईयर ठरले आहे.

बीडब्ल्यूएफ म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या पुरस्कार सोहळ्यात सिंधूला ‘मोस्ट इम्प्रुव्हड् प्लेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिला हा पुरस्कार दुबईत झालेल्या रंगतदार सोहळ्यात प्रदान कऱण्यात आला.

सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रजत पदक पटकावले. तर चायना ओपन सुपरसिरीज जिंकत तिने आपल्या बॅडमिंटन करिअरमधील पहिल्या सुपरसिरीज खिताबावर आपले नाव कोरले.
Forwarded from Deleted Account
*शिवा थापाला सुवर्ण*
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या शिवा थापाने लाईटवेट (६० किलो) गटात राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच जेतेपदाचा (सुवर्ण) मान मिळविला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान एसएससीबीने (सेनादल) मिळविला. त्यांच्या बॉक्सर्सनी चार सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली.

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (आरएसपीबी) दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य पदकांसह दुसरे स्थान पटकावले.
आनंदला संयुक्त तिसरे स्थान
०१. भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले.

०२. अमेरिकेच्या वेस्ली सो याने सहा गुणांसह अजिंक्यपद पटकावले. अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने साडेपाच गुणांसह दुसरे स्थान घेतले.

०३. आनंदने शेवटच्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक याच्याशी बरोबरी स्वीकारली. आनंद, क्रामनिक व अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांनी प्रत्येकी पाच गुणांसह तिसरे स्थान मिळविले



विराटचा कसोटी कर्णधारपदी विक्रम
०१. विराट सलग १८ कसोटी................. ................... ................... .................. .................. ......................... http://www.mpscacademy.com/2016/12/ca2122Dec2016.html
०१. लॉर्ड एडवर्ड कॉर्नवालिस हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होता. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण तरीही त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.

०२. कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भ्रष्टाचाराचे निर्मूलन केले. ................ ................. ................. .................. .................. .................... ........................ http://www.mpscacademy.com/2016/03/Lord-Cornwallis.html
क्लाइव्हची राजकीय व्यवस्था
०१. बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते. त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी अलाहाबादचा तह केला.

०२. अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे नबाबाने मुघल सम्राट शाह आलम याला परत द्यावेत. युद्धनुकसान भरपाई म्हणून शुजाने रु. ५० लक्ष कंपनीला द्यावेत. काशीचा शासक बळवंत सिंह ह्याला त्याचा प्रदेश परत करावा. अवध राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल. त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नबाब करेल. नबाबानेही कंपनीला गरजेनुसार निःशुल्क सेवा द्यावी. असा तह क्लाइव्हने शुजाउद्दौलासोबत केला.

०३. मुगल सम्राट शाह आलमशी क्लाइव्हने तह केला. त्यात शुजा उदौलाकडून घेतलेले अलाहाबाद व कोरा जिल्हे शाह आलमला देण्यात आले. शाह आलमने कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसाचे दिवाणी हक्क कंपनीला द्यावेत. त्याऐवजी कंपनी सम्राटाला वार्षिक रु. २६ लक्ष व त्या प्रांताच्या निजामतीचा खर्च म्हणून रु. ५३ लक्ष देईल. अशा अटी ठेवण्यात आल्या.



दुहेरी शासनपद्धती (The Dual System):
०१. कंपनीला मुगल सम्राट शाह आलम कडून बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले होते. परंतु तेवढी यंत्रणाही कंपनीकडे नव्हती. म्हणून ह्या कार्यासाठी कंपनीने दोन नाय...................... ................... ....................... .................. ................... ..................... http://www.mpscacademy.com/2016/03/robert-Clive.html