MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
नासाचे मानवी जखमा भरणारे नवीन तंत्रज्ञान
०१. मानवाला होणाऱ्या जखमा लवकर भरून येण्यासाठी नासाने विद्युतवाहक अशा उच्च तंत्रज्ञानाधिष्ठित पदार्थाचा वापर करण्याचे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. पृथ्वीबाहेर गुरुत्व नसताना मानवी रक्ताचे गुणधर्म वेगळे असतात. त्यामुळे तेथे जखमा लवकर भरून येत नाहीत त्यामुळे धोका जास्त असतो.

०२. अवकाश मोहिमांचा खर्च त्यामुळे जास्त होतो. नवीन पदार्थात कमी प्रमाणात वीज मानवी त्वचेच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेली जाते त्यामुळे जखमा लवकर भरतात. वीजवाहक पदार्थाचे नाव पॉलिव्हिनिलीडीन फ्लोराईड असे आहे व त्याचा उपयोग जखमा लवकर भरण्यासाठी करता येतो.

०३. जखमेच्या आजूबा.......................... ............................ ........................ ........................

समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे निधन
०१. गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज यांच्या पत्नी आणि समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे १० ऑक्टोबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. परमेश्वर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून त्या फुफ्फुसांच्या आजारावर उपचार घेत होत्या.

०२. परमेश्वर गोदरेज यांनी ए,..................................... ....................... ........... ''''''''''''''''''''' http://www.mpscacademy.com/2016/10/ca13oct2016.html
* राष्ट्रपती
०१. भारताच्या राज्यघटनेच्या कलम ५२ ते ५८ मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचा उल्लेख आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व महान्यायवादी यांचा समावेश होतो.

०२. राज्यघटनेतील भाग ५ मधील प्रकरण १ हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे.

०३. राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतिक असतात.

०४. याबाबत घटनात्मक तरतुदी म्हणजे, भारताचा एक राष्ट्रपती असेल (कलम ५२). भारताच्या संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील [कलम ५३ (१)]. राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील [कलम ५३ (२)].


* राष्ट्रपतींची निवडणूक
०१. राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षपणे होते. कलम ५४ नुसार, राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून होते. या निर्वाचक गणात संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित............... ...................... .......................... ........................... ....................... .................. ........... http://www.mpscacademy.com/2015/08/President-of-india.html
बॉब डायलन यांना साहित्यासाठीचे 'नोबेल' जाहीर

०१. बॉब डायलन यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉब डायलन हे अमेरिकी गायक आणि गीतकार आहेत. गेली ५४ वर्षे बॉब यांनी सतत नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांमध्ये स्विडीश अकादमीने बॉब यांचे कौतुक केले आहे.

०२. १९९३ मध्ये कादंबरीकार टोनी मॉरिसन यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. मॉरिसन यांच्यानंतर कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला नव्हता. अखेर २३ वर्षानंतर बॉब डायलन यांना साहित्याचे नोबेल मिळाले आहे.

०३. ७५ वर्षीय डायलन यांचे लिखाण पारंपारिक लिखाण पद्धतीला छेद देणारे आहे. साचेबद्ध लिखाण न करता वेगळ्या पद्धतीने लिखाण करणे हे डायलन यांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही चौकटीत न बसणाऱ्या याच लिखाणाचा आता नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

०४. बॉब डायलन हे नोबेल पुरस्कार पटकावणारे २५९ अमेरिकन आहेत. आतापर्यंत ८ अमेरिकन व्यक्तींचा साहित्याचे नोबेल मिळाले आहे. साहित्यासाठी नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डायलन हे नववे अमेरिकन साहित्यिक आहेत.

०५. बॉब डिलन या नावाचे वलय आणि त्याची दंतकथा १९६०च्या दशकापासून अद्याप सहा दशके संपलेली नाही. त्याच्याजवळ पॉप स्टार किंवा रॉकस्टारला साजेसा आवाज नाही किंवा गिटारच्या फ्रेट्सवर अवघड कॉर्ड्स वाजविण्याची हातोटी असलेली शैली नाही.

०६. त्याचे लोकसंगीत फक्त अमेरिकेचे संचित राहिले नाही. ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन............... ....................... ........................ .................... ................ ................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca14October2016.html
* कार्यकारी अधिकार
०१. भारत शासनाचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. सर्व सैन्यदलांचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात.

०२. राष्ट्रपतींच्या नावाने काढलेले व अमलात आणलेले आदेश कोणत्या पद्धतीने काढावेत याचे नियम राष्ट्रपती तयार करू शकतात.

०३. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात व त्यांच्या सल्ल्याने मंत्रीमंडळाची नेमणूक करतात.

०४. भारताचा महान्यायवादी, उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश, महालेखापरीक्षक, राज्यपाल व नायब राज्यपाल, मुख्य तसेच अन्य निवडणूक आयुक्त, तिन्ही सेनांचे सेनापती व अन्य प्रमुख अधिकारी तसेच वित्त आयोग, लोकसेवा आयोग, अनुसूचित जाती व जमाती आयोग, मागासवर्ग आयोग इत्यादी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, आंतरराज्य मंडळाचे अध्यक्ष व इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींची नेमणूक व पदच्युती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.

०६. संघ शासनाचे कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करू शकतात तसेच अशा कामकाजाची विभागणी मंत्र्यांमध्ये करू शकतात. तसेच राष्ट्रपती पंतप्रधानाकडून केंद्राच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती तसे................ ................. .................. ............ ................ .................... http://www.mpscacademy.com/2015/08/rights-and-functions-of-president.html
विश्वात दोन महापद्म दीर्घिका निरीक्षणयोग्य टप्प्यात
०१. आपल्या विश्वात दोन महापद्म (ट्रिलियन) दीर्घिका निरीक्षणयोग्य टप्प्यात असून हे प्रमाण आधीच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा वीस पट अधिक आहे, असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

०२. हबल दुर्बिणीने गेल्या वीस वर्षांत ज्या त्रिमिती प्रतिमा मिळवल्या आहेत त्यांच्या मदतीने ही मोजदाद करण्यात आली असल्याचे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलने म्हटले आहे.

०३. १९२४ मध्ये अमेरिकी खगोलवैज्ञानिक एडविन हबल यांनी अँड्रोमिडा म्हणजे देवयानी ही दीर्घिका शोधून काढली होती. .................... ..................... ................... ................ ...................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca15oct2016.html
०१. प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्याच्या सरळ अधिनियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभाग कार्यरत असतो. मुख्य सचिव हा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो.

०२. मुख्य सचिव राज्य सचीवालयाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयावर मुख्य सचिवांचे पूर्ण नियंत्रण असते. केंद्र - राज्य तसेच राज्य - राज्य संबंधात तो प्रमुख दुवा असतो.

०३. १९६५-६६ च्या "आंध्र प्रदेश प्रशासकीय सुधारणा समिती"च्या अहवालानुसार मुख्य सचिव राज्यातील सनदी सेवांचा प्रमुख असतो.

०४. केंद्राच्या कॅबिनेट सचिवाच्या तुलनेत राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका अधिक रुंद असते. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख यासोबतच राज्य लोकसेवा आयोगाचा प्रमुख, राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी या भूमिका त्यांना वठवाव्या लागतात.

०५. मुख्य सचिव या पदावर अधिकाऱ्याचा कालावधी निश्चित नाही. कदाचित मुख्य सचिव त्याच पदावर अस.................... ...................... ..................... ..................... ....................... http://www.mpscacademy.com/2015/08/chief-secreatary.html
०१. राजकीय प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी आणि धोरण निर्मिती व धोरणांची अंमलबजावणी या दोन प्रक्रियांमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा म्हणजे राज्य सचिवालय होय .

०२. प्रत्येक मंत्रालयाचे एक सचिवालय असते. सचिव हा संबंधित मंत्रालयाच्या सचीवालयाचा प्रमुख असतो . या सचिवांना संबंधित राज्य शासनाचे सचिव म्हणतात .

०३. महाराष्ट्रातील १९६८ सालच्या प्रशासकीय सुधारणा समितीने केलेल्या शिफारसीनुसार, राज्य शासनाने आपल्या सचिवालयामध्ये आणि इतर कार्यालयामध्ये अधिकाऱ्याभिमुख प्रारुपाचा स्वीकार केलेला आहे .

०४. महाराष्ट्रात (IAS) हा विभागाचा सचिव असतो . विशेश्द्न्य विभागाचा प्रमुख हा सचिवालयातील त्या विभागाचा पदसिद्ध सहसचिव असतो .

०५. सचिवालयातील वरिष्ठ.......................... ........................ ....................... ........................... http://www.mpscacademy.com/2015/09/state-secretariat.html
भारताने केली क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेची खरेदी
०१. भारत आणि रशियामध्ये अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी करार झाला आहे. या करारा अंतर्गत पाच एस-४०० ट्रायंफ क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणेसाठी भारत ३९ हजार कोटी रुपये देणार आहे. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी या क्षेपणास्त्राचा वापर करता येऊ शकतो.

०२. एस-४०० रशियाची सर्वाधिक आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे. ही यंत्रणा सध्या रशियाकडून सीरियामध्ये तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने ३०० ठिकाणांना ट्रॅक करता येऊ शकते. ४०० किलोमीटर अंतरावर असणारी ३६ लक्ष्ये भेदण्याचे सामर्थ्य या यंत्रणेत आहे.

०३. विशेष म्हणजे एस-४०० मध्ये स्टिल्थ विमानांना ट्रॅक करणारी यंत्रणा आहे. स्टिल्थ विमाने सामान्य रडारवर दिसत नाहीत. मात्र एस-४०० मधील यंत्रणा या विमानांनादेखील ट्रॅक करु शकते.या यंत्रणेमुळे भारताला चीन आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळणार आहे.

०४. भारताने नौदलासाठी फ्रिगेट (विनाशिकांना संरक्षण देणाऱ्या नौका) उभारण्याच्या करारवरदेखील स्वाक्षऱ्या के.................... ....................... ..................... .............. ................... http://www.mpscacademy.com/2016/10/16oct2016.html
०१. राज्य सचिवालयाचे कार्य हाताळण्यासाठी कार्यकारी विभाग अस्तित्वात असतात. हे कार्यकारी विभाग आकार आणि अधिकार या दृष्टीने भिन्न भिन्न असतात .

०२. प्रशासकीय आणि वित्तीय विभाग प्रमुखांच्या अधिकारांची नोंद वित्तीय नियम, सनदी सेवा नियम, अर्थसंकल्पीय पुस्तिका आणि इतर संहितामध्ये केलेली आहे .

०३. साधारणपणे सचिवालयातील प्रत्येक प्रशासकीय विभागाचे प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यकारी विभाग कार्यरत असते . परंतु विधी सारख्या सचिवालय विभागाला क्षेत्रीय अभिकरण नाही .

०५. धोरणांची अंमलबजावणी आणि त्या यशस्वी करण्याची जबाबदारी कार्यकारी विभागांवर असते . हे कार्यकारी विभाग सचिवालयाचे भाग नसतात आणि त्यांची स्वतंत्र अशी रचना असते. या कार्यकारी विभागांना 'संचालनालय' या नावाने ओळखले जाते.


* संचालनालयांची रचना
०१. कार्यकारी विभाग हे राज्यस्तरावर कार्य करतातच पण इतर दुय्यम स्तरांवर (उदा. विभाग, जिल्हा) देखील कार्यरत असतात.

०२. राज्य संचालनालयाचा प्रमुख हा संचालक असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी अप्पर संचाल......................... ............................ ....................... ........................ ....................... http://www.mpscacademy.com/2015/09/directorate.html
ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
०१. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे भारताचा दौरा करणार आहेत. लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह थेरेसा मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान पहिल्यांदाच युरोपबाहेरील देशाचा दौरा करणार असल्याने हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

०२. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे ब्रिटनमधील अनेक कंपन्यांना नव्याने करार करायला लागणार आहेत. त्यामुळेच मे भारत भेटीवर येणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ६ ते ८ नोव्हेंबर या दरम्यान मे भारत दौऱ्यावर असणार आहेत.

०३. ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ब्रिटनसोबत द्विपक्षीय करार कर..................... ....................... ............................. .................... सौरभ वर्मा अजिंक्य
०१. दुखापतींचे आव्हान पेलत भारताच्या सौरभ वर्माने चायनीज तैपेई स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरत यशस्वी पुनरागमन केले. अंतिम लढतीत तिसऱ्या गेमपर्यंत लढत रंगतदार हो........... ..................... .................... ...................... ..................... ................ ........... http://www.mpscacademy.com/2016/10/ca17oct2016.html
०१. मुंबईचा शेरीफ हे अराजकीय नामधारी अधिकारपद आहे. ते एका वर्षासाठी मुंबईच्या कोणत्याही प्रख्यात नागरिकास बहाल केले जाते. एच.आर. कॉलेज मुंबईच्या प्राचार्य डॉ. इंदू साहनी या मुंबईच्या नियुक्त केलेल्या शेवटच्या शेरीफ आहेत. (२००८ साली)

०२. शेरीफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो. शेरीफला स्वतःचे कार्यालय व कर्मचारी वर्ग असतो. परंतु त्याला कार्यकारी अधिकार नसतात. शेरीफचे कार्यालय उच्च न्यायालयाच्या इमारतीत असते.

०३. उच्च न्यायालयाचे समन्स बजावणे, तसेच मालमत्ता जप्त व सील करणे आणि आवश्यकतेनुसार तिचा लिलाव करणे या संबंधी कार्याबाबत तो नामधारी प्रमुख असतो.

०४. शेरीफची महत्वाची कार्ये म्हणजे शहराच्या वतीने परदेशी सन्माननीय अतिथींचे विमानतळावर स्वागत................ ................... ................ .................. ............. .............. http://www.mpscacademy.com/2015/09/Sheriff-of-mumbai.html
चंद्रावर दुर्बिण उभारण्याचा विचार

०१. अवकाशाचे अधिक चांगल्या पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) चाचपणी सुरू असल्याचे 'इस्रो'चे प्रमुख ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले आहे.

०२. चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत जागतिक पातळीवरही चर्चा सुरू आहे. सध्या लेह येथे एक दुर्बिण कार्यरत असून, त्याचे प्रत्यक्ष कामकाज आणि नियंत्रण बंगळूरमधून केले जाते. याच पद्धतीने चंद्रावरही दुर्बिण उभारून कामकाज पृथ्वीवरून करता येणे शक्‍य आहे काय, याबाबत चाचपणी सुरू आहे.

०३. चंद्रावर कोणतेही वातावरण नसल्याने बदलत्या पृथ्वीप्रमाणे वातावरणाचा फटकाही दुर्बिणीला बसण्याची शक्‍यता नाही. हा एकप्रकारे फायदाच आहे. हा प्रयोग तूर्त चर्चेच्याच पातळीवर असला तरी ही शक्‍यता नाकारता येत नाही.

०४. चांद्रयान-२ या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, पुढील वर्षाअखेरीस या मोहिमेला सुरवात होण्याची अपेक्षा आहे.................... ................... .................. .................. .................. .............. http://www.mpscacademy.com/2016/10/ca18oct2016.html
१. राज्य शासनाच्या कायदेमंडळाला 'राज्य विधीमंडळ' असे म्हणतात. घटनेच्या भाग ६ मधील अनुच्छेद १६८ ते २१२ मध्ये राज्य विधीमंडळाच्या बाबतीत तरतुदी आहेत.

०२. घटनेच्या कलम १६८ अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल जे द्विगृही राज्यांसाठी राज्यपाल, विधानसभा व विधानपरिषद या तिघांनी मिळून बनलेले असेल. जेथे विधानपरिषद अस्तित्वात नाही त्या एक्गृही राज्यासाठी फक्त राज्यपाल व विधानसभा यांचे मिळून बनलेले असेल.

०३. सध्या (सप्टेंबर २०१५) मध्ये २२ राज्यात एक्गृही तर ७ राज्यात द्विगृही विधानमंडळ आहे. म्हणजे ७ राज्यात विधानपरिषद व विधानसभा अस्तित्वात आहे. उर्वरित राज्यात फक्त विधानसभा अतित्वत आहे. विधान परिषद असणारी सात राज्ये (आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू व काश्मीर). जम्मू व काश्मीरच्या घटनेतच द्विगृही विधीमंडळाची तरतूद करण्यात आली आहे.



*राज्य विधीमंडळ सदस्यत्वासाठी पात्रता (कलम १७३)
०१. तो भारतीय नागरिक असावा. त्याने निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेऊन त्याखाली स्वाक्षरी केलेली असावी.

०२. विधानपरिषद सदस्यत्वासाठी वयाची ३० वर्षे व विधानसभा सदस्यत्वासाठी वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावी. तसेच संसदेने कायद्याने वेळोवेळी विहित केलेल्या पात्रता त्याने धारण केलेल्या असाव्यात.

०३. विधानपरिषदेसाठी तो सं................ .................... ................... ............... ................ ....................... http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislature.html
* विधानसभा
०१. तरतूद (कलम १७०). त्यानुसार विधानसभेची कमाल सदस्यसंख्या ५०० तर किमान ६० इतकी ठरविण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे.

०२. लोकसंख्या कमी असल्याच्या कारणावरून काही राज्यांच्या

विधानसभा किमान सदस्यसंख्या अजूनही कमी निश्चित करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश (३०), सिक्कीम (३०), गोवा (३०), मिझोरम (४०), नागालैंड (४६) इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यांची सध्याची सदस्यसंख्या अरुणाचल प्रदेश (६०), सिक्कीम (३२), गोवा (४०), मिझ्रोरम (४०), नागालैंड (६०) इतकी आहे. सिक्कीम व नागालैंड मध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून देण्याची तरतूद आहे.

०३. राज्यांचे विधानसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघातून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडतात. त्यात मतदान करण्याचा अधिकार १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व मतदानासाठी अपात्र घोषित न केलेल्या सर्व भारतीयांना आहे.

०४. घटनेच्या कलम ३३३ अन्वये राज्यपालांना १ एंग्लो इंडियन सदस्य निवडण्याचा अधिकार आहे. (विधानसभेत या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास व तशी राष्ट्रपतींना खात्री झाल्यास). हि तरतूद सुरवातीस फक्त १० वर्षांसाठी होती (१९६० पर्यंत). ती प्रत्येक वेळी १० वर्षांनी वाढवण्यात आली. सध्या ९५ वी घटनादुरुस्ती २००९ द्वारे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.



* विधानसभेची निवडणूक प्रक्रिया
०१. लोकसंख्येच्या निकषानुसार विधानसभेच्या प्रत्यक्ष निवडणुकीसाठी राज्याचे विभाजन प्रादेशिक मतदारसंघात केले जाते. विधानसभेतील प्रतिनिधित्वासाठी लोकसंख्या .............. ..................... .................... ....................... ...................... ........................... http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislative-assembly.html
राज्य विधानपरिषद स्थापन किंवा नष्ट करणे (कलम १६९)
०१. अधिकार संसदेला आहे. त्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते.

०२. मात्र त्यापूर्वी संसदेने संबंधित राज्याच्या विधानसभेने त्या आशयाचा ठराव विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते.

०३. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. मात्र राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद संबंधित कायदा करू शकत नाही.

०४. संसदेने पारित केलेल्या अशा कायद्यात त्या कायद्यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्तीच्या तरतुदी अंतर्भूत असाव्यात. म्हणजे कलम १६८ मधून त्या राज्याचे नाव वगळण्याची किंवा त्यात समाविष्ट करण्याची तरतूद त्या संसदीय कायद्यातच असावी.

०५. अशा संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम ३६८च्या प्रयोजनार्थ घटनादुरुस्ती असल्याचे मानले जाणार नाही.

०६. विधानपरिषद लोकप्रतिनिधीत्वावर आधारलेली नाही, तिच्या अस्तित्वामुळे कायदेकरी प्रक्रियेस विलंब होतो व राज्याच्या खर्चात वा.................... .................... ....................... ........................ ................... ............... ................. ....... http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislative-council.html
केरळचे कक्काथुरुथू बेट उत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत
०१. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळला आणखी एक मानाचा बहुमान मिळाला आहे. केरळच्या कक्काथुरुथू या छोटय़ा बेटाला जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत स्थान मिळाले आहे. 'नॅशनल जिओग्राफिक' नियतकालिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे.

०२. नॅशनल जिओग्राफिकने 'अराऊंड द वर्ल्ड इन २४ अवर्स' या नावाने पर्यटनासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात २४ तासांत जगातील कोणती ठिकाणे, कोणत्या वेळी सर्वोत्तम आणि प्रेक्षणीय असतात, याचा वेध घेण्यात आला आहे.

०३. नॅशनल जिओग्राफिकने उत्तम ठिकाणांच्या यादीत कक्काथुरुथू बेटाचा समावेश केल्याने केरळचे पर्यटनमं................... ................. ..................... ....................... .

इरोम शर्मिलांनी केली राजकीय पक्षाची स्थापना
०१. सोळा वर्षे उपोषण केल्यानंतर राजकारणात येण्याची घोषणा करणाऱ्या आयर्न लेडी इरोम शर्मिला यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स' या नव्या पक्षाच्या माध्यमातून त्या जनतेची सेवा करणार आहेत.

०२. या नव्या पक्षाचा प्रभाव आगामी निवडणुकीत निश्चितच दिसून येईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच महिन्यात इरोम शर्मिला यांना जिल्हा न्यायालयाने आत्म.............. ................. ................... ................... .............. ................. http://www.mpscacademy.com/2016/10/ca19oct2016.html
* विधानसभा अध्यक्ष
०१. विधानसभेच्या अध्यक्षाचे पद लोकसभेच्या अध्यक्षाच्या धर्तीवरच निर्माण करण्यात आले आहे.

०२. नव्याने निवडून आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.

०२. विधानसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवड सध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करतात. या निवडणुकीची तारीख राज्यपाल ठरवतात.

०३. विधानसभेचा कार्यकाल संपण्याच्या आत अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास विधानसभा दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करते. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणतीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा.

०५. विधानसभा अध्यक्षाचा पदावधी विधानसभेच्या कालावधी एवढाच असतो. मात्र विधानसभा वि............................ ................. ................ .................. .................... http://www.mpscacademy.com/2015/09/presiding-officers-of-state-legislature.html
भारत-म्यानमारमध्ये तीन करारांवर सह्या

०१. भारत व म्यानमार यांच्यात अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध घट्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी व म्यानमारच्या नेत्या ऑंग सान सू की यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सू की भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

०२. म्यानमारमधील भूकंपात पॅगोडाचे नुकसान झाले होते. त्यावेळी भारताने पुन्हा बांधणीसाठी मदत केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतातील लोकशाहीचे म्यानमारला कौतुक असल्याचे सू की यांनी स्पष्ट केले.

०३. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आँग सान स्यू की यांच्यादरम्यान आज कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंबंधी व्यापक चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी तीन करारांवर सह्या केल्या.

०४. स्यू की यांनी महात्मा गांधी आ.................. ................... .................... ............... .............. http://www.mpscacademy.com/2016/10/ca20oct2016.html
युरोपियनांचे भारतात आगमन
०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते भारतात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.

०२. पूर्वी भारतातील माल इराणचे आखात - कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) - इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला. कारण तुर्कानी युरोपियन व्यापाऱ्यांचा मार्गच अडवून धरला.

०३. भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले.

०४. या गरजेतूनच स्पॅनिश रा................. .................... .................. ............... ........... . http://www.mpscacademy.com/2015/10/establishment-of-british-rule-in-india.html
भारताने तिसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
०१. भारताने इराणवर ३८-२९ असा शानदार विजय मिळवला आहे. भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी केली.
०२. चढाईपटूंच्या यशस्वी चढाया आणि त्याला बचावपटूंची लाभलेली सर्वांगसुंदर साथ यामुळे भारता.................. .................. ................ ....................... ........

वडोदऱ्यात हरित विमानतळ व रेल्वे विद्यापीठ
०१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वडोदरा येथे नव्या एकात्मिक विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले. कोचीनंतर आता हे देशातील दुसरे हरित विमानतळ आहे.

०२. विकासासाठी संपर्कता नितांत गरजेची आहे असे सांगून मोदी यांनी, वडोदरामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ.............. ................. ................ ................ ................ .............. http://www.mpscacademy.com/2016/10/current-events.html
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला.

०२. यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती.



प्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)
०१. भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर, १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती.

०२. एक वर्षाहून अधिक काळ ही तुकडी युद्धाची वाट पाहत समुद्रात थांबली परंतु युद्ध न झाल्या........................ .................... .................... ..................... ..................... http://www.mpscacademy.com/2015/09/british-french-war.html