MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
*४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव*
०१. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संपन्न होत आहे. तसेच या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

०२. गेल्या वर्षी २० ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पणजी येथे पार पडलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ९ मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले.

०३. तसेच या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली.

०४. गोव्यातील आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी २७ चित्रपटांच्या परीक्षणानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १० चित्रपट निवडले. त्यात कटय़ार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसोबतच नाशिकचे सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचाही समावेश आहे.

०५. तृतीयपंथीयांच्या बालपणावर आधारित हा चित्रपट असून आजपर्यंत विविध महोत्सवांमध्ये परीक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. आतापर्यंत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झालेल्या ‘कोती’च्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोवल्याचे मानले जात आहे.

०६. मागील वर्षी गोव्यातच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातील स्पर्धेसाठीही या चित्रपटाची निवड झाली होती.कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागासाठी मराठी भाषेतील केवळ कोती या एकमेव चित्रपटाची निवड झाली होती.

०७. कोती चित्रपटाने याशिवाय दिल्लीतील एज्युकेशनल एक्स्पो टीव्हीच्या वतीने आयोजित महोत्सवात परीक्षकांच्या पसंतीचे दादासाहेब फाळके पारितोषिक, कोल्हापूरमधील संस्कृती कलादर्पण संस्थेच्या वतीने आयोजित मायमराठी महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकाविले आहे. सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचे डिसेंबरमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे.

०८. याशिवाय या महोत्सवातील ‘फिल्म बझार’ या विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय हे तीन मराठी चित्रपट राज्य शासनाच्या वतीने पाठविण्यात आले होते.
*तेलंगणात २१ नवीन जिल्हे*
आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण राज्याची निर्मिती दोन वर्षांपूर्वी झाली. मंगळवारी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नवीन २१ जिल्ह्यांची घोषणा केली. यामुळे राज्यात आता एकूण ३१ जिल्हे झाले आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण हे देशातील २९ वे राज्य म्हणून २ जून २०१४ रोजी उदयास आले आहे.
*गॅलॅक्सी नोट ७ चे उत्पादन बंद*
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपले प्रचलित उत्पादन 'गॅलेक्सी नोट 7'चे उत्पादन आणि विक्री कायमची थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. खराब दर्जामुळे अनेक स्मार्टफोन माघारी बोलविण्यात आल्याने ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे. काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या महिन्यात कंपनीने २५ लाख गॅलेक्सी नोट माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती.
*डॉ. नयनज्योत लाहिरी यांना जॉन एफ. रिचर्ड पुरस्कार*
०१. इतिहासाच्या नामवंत प्राध्यापक आणि पुरातत्त्व क्षेत्रातील विद्वान डॉ. नयनज्योत लाहिरी यांच्या 'अशोका इन एन्शन्ट इंडिया' या बहुचर्चित पुस्तकाला २०१६ चा जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर झाला आहे.

०२. अमेरिकन हिस्टरी असोसिएशनतर्फे (एएचए) दरवर्षी दक्षिण आशियाई इतिहासावरील पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.

०३. प्रा. लाहिरी यांचा जन्म ३ मार्च १९६० रोजी दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली. सध्या प्रा. लाहिरी ह्या हरयाणातील अशोका विद्यापीठात कार्यरत आहेत.

०४. आसाममधील प्राचीन स्थळांविषयी त्यांनी केलेले संशोधन मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.सम्राट अशोकावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकासाठीही त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा बारकाईने अभ्यास केला. पुरातत्त्व क्षेत्रातील त्यांचे अजोड काम लक्षात घेऊन इन्फोसिस फाउंडेशनने २०१३ मध्ये त्यांना ५५ लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले होते.
*डॉ. रजनीश कुमार यांना तरुण वैज्ञानिक पुरस्कार*
०१. डॉ. रजनीश कुमार यांना नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्कॉप्स यांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनव संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो.

०२. मध्य प्रदेशातल्या सिंगरौली या छोटय़ा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते रायपूरला आले. कुमार यांनी २००३ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेतून स्नातकोत्तर पदवी घेतली, तर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीत पीएच.डी. केली.

०३. २०१० मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दाखल झाले. पीएनएएस, जेएसीएस, यांसारख्या अनेक नामवंत नियतकालिकांत त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या तीन शोधनिबंधांसाठी त्यांना याआधी एक पुरस्कार मिळाला होता. कॅनडातील नॅशनल रीसर्च कौन्सिलचे ते फेलो आहेत.सध्या ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करतात.

०४. नॅचरल गॅस हायड्रेट्समध्ये अडकलेला मिथेन बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक कंपन्यांशी संलग्न राहून डॉ. कुमार यांनी गॅस हायड्रेट्सचे रेणवीय पातळीवर संशोधन केले आहे.

०५. त्यांचे संशोधन नेहमीच्या चौकटीबाहेरचे आहे त्यात ऊर्जा व पाणी यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. हायड्रेट्समधून काढलेला मिथेन हा अपारंपरिक जीवाश्म इंधन मानला जातो, हायड्रेट्समधील मिथेनचे मोठे साठे भारतात आहेत. त्यामुळे पुढील शंभर वर्षांची ऊर्जा गरज भागू शकते असे त्यांनी सांगितले.

०६. विज्ञानात संशोधनाची प्रेरणा त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेत अभ्यास करीत असताना मिळाली, कारण तेथील शिक्षण दर्जेदार आहे. कार्बन डायॉक्साइड पकडणे व तो वेगळा काढणे, सागरी जलाचे निक्र्षांरीकरण व ऊर्जा संकलन या विषयात त्यांचे संशोधन आहे. पाण्याचा सॉल्व्हंट म्हणून वापर केला जातो ती क्लॅथरेट पद्धत त्यांनी वापरली.
*ज्युरासिक युगातील "इथेसॉर'चा शोध*
०१. डायनॉसोरच्या युगातील (ज्युरासिक काळ) दुर्मिळ सागरी प्राण्याचा शोध संशोधकांना लागला आहे. अनेक दशकांपूर्वीच्या जिवाश्‍माच्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे. 'ब्रिटिश इथेसॉर' असे या माशाचे नाव असून, ही सागरी जात तेव्हाही दुर्मिळ समजली जात होती.

०२. डॉल्फिन किंवा शार्कशी साधर्म्य असलेले 'ब्रिटिश इथेसॉर' हे सागरी प्राणी हे अत्यंत धोकादायक भक्षक होते. यातील काही जणांची लांबी १५ मीटर असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हे प्राणी डायनॉसोर युगात म्हणजे २० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्या वेळी ब्रिटन हा छोटा द्विपसमूहाच्या रूपात होता.

०३. मॅंचेस्टर विद्यापीठातर्फे याबाबतचे संशोधन सहा वर्षांपासून सुरू आहे. 'ब्रिटिश इथेसॉर'ची कवटी व पंखांचे जीवाश्‍म आढळल्याने शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. या जीवाश्‍मावरून हे प्राणी इतरांपेक्षा वेगळे व दुर्मिळ असल्याचे निदर्शनास आले आहे.

०४. ब्रिस्टॉल विद्यापीठामध्ये अनेक वर्षांपासून ठेवलेल्या सांगाड्याच्या अभ्यासावरून या नवीन सागरी जातीचा शोध लागला. मॅंचेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डिन लोमॅक्‍स व अमेरिकेतील ब्रॉकपोर्ट महाविद्यालयातील प्राध्यापक ज्युडी मसारे यांनी याबाबत संशोधन केले.

०५. सॉमरसेट प्रांतातील वॉल्टन येथे 'इथेसॉर'चा प्रचंड सांगाडा आढळला होता. ८० वर्षांपूर्वी हा सांगाडा सिटी म्युझियमने ब्रिस्टॉल विद्यापीठाला भेट दिला होता. १९१५ मध्ये तो या संग्रहालयाने विकत घेतला होता. १९३० मध्ये तो विद्यापीठाला देण्यात आला.

०६. ब्रिटिश जीवाश्‍म शास्त्रज्ञ नायगेल लार्किन यांच्या सन्मानार्थ त्याला 'इथेसॉर लार्किन' असे नाव दिले आहे. 'लार्किन' याचा अर्थ धोकादायक असा आहे.
१. संसदेच्या दोन्ही सभागृहाचा पहिला तास हा प्रश विचारणे व उत्तर देणे यासाठी उपलब्ध असतो. या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंत्री देतात. प्रश्नांची नोटीस सदस्याने लिखित स्वरुपात महासचिव यांना संबोधून द्यावी लागते.

०२. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्रालयाची विभागणी पाच गटांत करण्यात आली आहे. अ, ब, क, ड, इ या गटातील मंत्र्यामार्फत अनुक्रमे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी उत्तरे दिली जातात.

* प्रश्नांचे प्रकार
०१. तारांकित प्रश्न (Asterisk Question)
- या प्रश्नांच्या सुरवातीला * असे चिन्ह असते म्हणून यांना तारांकित प्रश्न म्हणतात. अशा प्रश्नांची उत्तरे तोंडीच दिली जातात.
- ज्या प्रश्नातून पुरवणी प्रश्न उद्भवू शकते असेच प्रश्न तारांकित प्रश्न म्हणून विचारण्याचे सदस्यांना सांगण्यात येते.
- अशा प्रश्नांच्या उत्तरावर सदस्य उपप्रश्न (पुरवणी प्रश्न) विचारू शकतात. ज्या प्रश्नात केवळ आकडेवारीची मागणी केलेली असते असे प्रश्न तारांकित असू नये अशी अपेक्षा असते.
- पीठासीन अधिकाऱ्यास वाट......................... ............................ ......................... ....................... ...................... ..................... ............... http://www.mpscacademy.com/2015/08/hour-of-questions-and-answers-in-parliament.html
नासाचे मानवी जखमा भरणारे नवीन तंत्रज्ञान
०१. मानवाला होणाऱ्या जखमा लवकर भरून येण्यासाठी नासाने विद्युतवाहक अशा उच्च तंत्रज्ञानाधिष्ठित पदार्थाचा वापर करण्याचे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. पृथ्वीबाहेर गुरुत्व नसताना मानवी रक्ताचे गुणधर्म वेगळे असतात. त्यामुळे तेथे जखमा लवकर भरून येत नाहीत त्यामुळे धोका जास्त असतो.

०२. अवकाश मोहिमांचा खर्च त्यामुळे जास्त होतो. नवीन पदार्थात कमी प्रमाणात वीज मानवी त्वचेच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेली जाते त्यामुळे जखमा लवकर भरतात. वीजवाहक पदार्थाचे नाव पॉलिव्हिनिलीडीन फ्लोराईड असे आहे व त्याचा उपयोग जखमा लवकर भरण्यासाठी करता येतो.

०३. जखमेच्या आजूबा.......................... ............................ ........................ ........................

समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे निधन
०१. गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज यांच्या पत्नी आणि समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे १० ऑक्टोबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. परमेश्वर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून त्या फुफ्फुसांच्या आजारावर उपचार घेत होत्या.

०२. परमेश्वर गोदरेज यांनी ए,..................................... ....................... ........... ''''''''''''''''''''' http://www.mpscacademy.com/2016/10/ca13oct2016.html
* राष्ट्रपती
०१. भारताच्या राज्यघटनेच्या कलम ५२ ते ५८ मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचा उल्लेख आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व महान्यायवादी यांचा समावेश होतो.

०२. राज्यघटनेतील भाग ५ मधील प्रकरण १ हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे.

०३. राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतिक असतात.

०४. याबाबत घटनात्मक तरतुदी म्हणजे, भारताचा एक राष्ट्रपती असेल (कलम ५२). भारताच्या संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील [कलम ५३ (१)]. राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील [कलम ५३ (२)].


* राष्ट्रपतींची निवडणूक
०१. राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षपणे होते. कलम ५४ नुसार, राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून होते. या निर्वाचक गणात संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित............... ...................... .......................... ........................... ....................... .................. ........... http://www.mpscacademy.com/2015/08/President-of-india.html
बॉब डायलन यांना साहित्यासाठीचे 'नोबेल' जाहीर

०१. बॉब डायलन यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉब डायलन हे अमेरिकी गायक आणि गीतकार आहेत. गेली ५४ वर्षे बॉब यांनी सतत नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांमध्ये स्विडीश अकादमीने बॉब यांचे कौतुक केले आहे.

०२. १९९३ मध्ये कादंबरीकार टोनी मॉरिसन यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. मॉरिसन यांच्यानंतर कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला नव्हता. अखेर २३ वर्षानंतर बॉब डायलन यांना साहित्याचे नोबेल मिळाले आहे.

०३. ७५ वर्षीय डायलन यांचे लिखाण पारंपारिक लिखाण पद्धतीला छेद देणारे आहे. साचेबद्ध लिखाण न करता वेगळ्या पद्धतीने लिखाण करणे हे डायलन यांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही चौकटीत न बसणाऱ्या याच लिखाणाचा आता नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

०४. बॉब डायलन हे नोबेल पुरस्कार पटकावणारे २५९ अमेरिकन आहेत. आतापर्यंत ८ अमेरिकन व्यक्तींचा साहित्याचे नोबेल मिळाले आहे. साहित्यासाठी नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डायलन हे नववे अमेरिकन साहित्यिक आहेत.

०५. बॉब डिलन या नावाचे वलय आणि त्याची दंतकथा १९६०च्या दशकापासून अद्याप सहा दशके संपलेली नाही. त्याच्याजवळ पॉप स्टार किंवा रॉकस्टारला साजेसा आवाज नाही किंवा गिटारच्या फ्रेट्सवर अवघड कॉर्ड्स वाजविण्याची हातोटी असलेली शैली नाही.

०६. त्याचे लोकसंगीत फक्त अमेरिकेचे संचित राहिले नाही. ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन............... ....................... ........................ .................... ................ ................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca14October2016.html
* कार्यकारी अधिकार
०१. भारत शासनाचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. सर्व सैन्यदलांचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात.

०२. राष्ट्रपतींच्या नावाने काढलेले व अमलात आणलेले आदेश कोणत्या पद्धतीने काढावेत याचे नियम राष्ट्रपती तयार करू शकतात.

०३. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात व त्यांच्या सल्ल्याने मंत्रीमंडळाची नेमणूक करतात.

०४. भारताचा महान्यायवादी, उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश, महालेखापरीक्षक, राज्यपाल व नायब राज्यपाल, मुख्य तसेच अन्य निवडणूक आयुक्त, तिन्ही सेनांचे सेनापती व अन्य प्रमुख अधिकारी तसेच वित्त आयोग, लोकसेवा आयोग, अनुसूचित जाती व जमाती आयोग, मागासवर्ग आयोग इत्यादी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, आंतरराज्य मंडळाचे अध्यक्ष व इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींची नेमणूक व पदच्युती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.

०६. संघ शासनाचे कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करू शकतात तसेच अशा कामकाजाची विभागणी मंत्र्यांमध्ये करू शकतात. तसेच राष्ट्रपती पंतप्रधानाकडून केंद्राच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती तसे................ ................. .................. ............ ................ .................... http://www.mpscacademy.com/2015/08/rights-and-functions-of-president.html
विश्वात दोन महापद्म दीर्घिका निरीक्षणयोग्य टप्प्यात
०१. आपल्या विश्वात दोन महापद्म (ट्रिलियन) दीर्घिका निरीक्षणयोग्य टप्प्यात असून हे प्रमाण आधीच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा वीस पट अधिक आहे, असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

०२. हबल दुर्बिणीने गेल्या वीस वर्षांत ज्या त्रिमिती प्रतिमा मिळवल्या आहेत त्यांच्या मदतीने ही मोजदाद करण्यात आली असल्याचे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलने म्हटले आहे.

०३. १९२४ मध्ये अमेरिकी खगोलवैज्ञानिक एडविन हबल यांनी अँड्रोमिडा म्हणजे देवयानी ही दीर्घिका शोधून काढली होती. .................... ..................... ................... ................ ...................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca15oct2016.html
०१. प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्याच्या सरळ अधिनियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभाग कार्यरत असतो. मुख्य सचिव हा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो.

०२. मुख्य सचिव राज्य सचीवालयाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयावर मुख्य सचिवांचे पूर्ण नियंत्रण असते. केंद्र - राज्य तसेच राज्य - राज्य संबंधात तो प्रमुख दुवा असतो.

०३. १९६५-६६ च्या "आंध्र प्रदेश प्रशासकीय सुधारणा समिती"च्या अहवालानुसार मुख्य सचिव राज्यातील सनदी सेवांचा प्रमुख असतो.

०४. केंद्राच्या कॅबिनेट सचिवाच्या तुलनेत राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका अधिक रुंद असते. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख यासोबतच राज्य लोकसेवा आयोगाचा प्रमुख, राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी या भूमिका त्यांना वठवाव्या लागतात.

०५. मुख्य सचिव या पदावर अधिकाऱ्याचा कालावधी निश्चित नाही. कदाचित मुख्य सचिव त्याच पदावर अस.................... ...................... ..................... ..................... ....................... http://www.mpscacademy.com/2015/08/chief-secreatary.html
०१. राजकीय प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी आणि धोरण निर्मिती व धोरणांची अंमलबजावणी या दोन प्रक्रियांमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा म्हणजे राज्य सचिवालय होय .

०२. प्रत्येक मंत्रालयाचे एक सचिवालय असते. सचिव हा संबंधित मंत्रालयाच्या सचीवालयाचा प्रमुख असतो . या सचिवांना संबंधित राज्य शासनाचे सचिव म्हणतात .

०३. महाराष्ट्रातील १९६८ सालच्या प्रशासकीय सुधारणा समितीने केलेल्या शिफारसीनुसार, राज्य शासनाने आपल्या सचिवालयामध्ये आणि इतर कार्यालयामध्ये अधिकाऱ्याभिमुख प्रारुपाचा स्वीकार केलेला आहे .

०४. महाराष्ट्रात (IAS) हा विभागाचा सचिव असतो . विशेश्द्न्य विभागाचा प्रमुख हा सचिवालयातील त्या विभागाचा पदसिद्ध सहसचिव असतो .

०५. सचिवालयातील वरिष्ठ.......................... ........................ ....................... ........................... http://www.mpscacademy.com/2015/09/state-secretariat.html
भारताने केली क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेची खरेदी
०१. भारत आणि रशियामध्ये अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी करार झाला आहे. या करारा अंतर्गत पाच एस-४०० ट्रायंफ क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणेसाठी भारत ३९ हजार कोटी रुपये देणार आहे. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी या क्षेपणास्त्राचा वापर करता येऊ शकतो.

०२. एस-४०० रशियाची सर्वाधिक आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे. ही यंत्रणा सध्या रशियाकडून सीरियामध्ये तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने ३०० ठिकाणांना ट्रॅक करता येऊ शकते. ४०० किलोमीटर अंतरावर असणारी ३६ लक्ष्ये भेदण्याचे सामर्थ्य या यंत्रणेत आहे.

०३. विशेष म्हणजे एस-४०० मध्ये स्टिल्थ विमानांना ट्रॅक करणारी यंत्रणा आहे. स्टिल्थ विमाने सामान्य रडारवर दिसत नाहीत. मात्र एस-४०० मधील यंत्रणा या विमानांनादेखील ट्रॅक करु शकते.या यंत्रणेमुळे भारताला चीन आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळणार आहे.

०४. भारताने नौदलासाठी फ्रिगेट (विनाशिकांना संरक्षण देणाऱ्या नौका) उभारण्याच्या करारवरदेखील स्वाक्षऱ्या के.................... ....................... ..................... .............. ................... http://www.mpscacademy.com/2016/10/16oct2016.html
०१. राज्य सचिवालयाचे कार्य हाताळण्यासाठी कार्यकारी विभाग अस्तित्वात असतात. हे कार्यकारी विभाग आकार आणि अधिकार या दृष्टीने भिन्न भिन्न असतात .

०२. प्रशासकीय आणि वित्तीय विभाग प्रमुखांच्या अधिकारांची नोंद वित्तीय नियम, सनदी सेवा नियम, अर्थसंकल्पीय पुस्तिका आणि इतर संहितामध्ये केलेली आहे .

०३. साधारणपणे सचिवालयातील प्रत्येक प्रशासकीय विभागाचे प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यकारी विभाग कार्यरत असते . परंतु विधी सारख्या सचिवालय विभागाला क्षेत्रीय अभिकरण नाही .

०५. धोरणांची अंमलबजावणी आणि त्या यशस्वी करण्याची जबाबदारी कार्यकारी विभागांवर असते . हे कार्यकारी विभाग सचिवालयाचे भाग नसतात आणि त्यांची स्वतंत्र अशी रचना असते. या कार्यकारी विभागांना 'संचालनालय' या नावाने ओळखले जाते.


* संचालनालयांची रचना
०१. कार्यकारी विभाग हे राज्यस्तरावर कार्य करतातच पण इतर दुय्यम स्तरांवर (उदा. विभाग, जिल्हा) देखील कार्यरत असतात.

०२. राज्य संचालनालयाचा प्रमुख हा संचालक असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी अप्पर संचाल......................... ............................ ....................... ........................ ....................... http://www.mpscacademy.com/2015/09/directorate.html
ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
०१. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे भारताचा दौरा करणार आहेत. लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह थेरेसा मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान पहिल्यांदाच युरोपबाहेरील देशाचा दौरा करणार असल्याने हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

०२. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे ब्रिटनमधील अनेक कंपन्यांना नव्याने करार करायला लागणार आहेत. त्यामुळेच मे भारत भेटीवर येणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ६ ते ८ नोव्हेंबर या दरम्यान मे भारत दौऱ्यावर असणार आहेत.

०३. ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ब्रिटनसोबत द्विपक्षीय करार कर..................... ....................... ............................. .................... सौरभ वर्मा अजिंक्य
०१. दुखापतींचे आव्हान पेलत भारताच्या सौरभ वर्माने चायनीज तैपेई स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरत यशस्वी पुनरागमन केले. अंतिम लढतीत तिसऱ्या गेमपर्यंत लढत रंगतदार हो........... ..................... .................... ...................... ..................... ................ ........... http://www.mpscacademy.com/2016/10/ca17oct2016.html
०१. मुंबईचा शेरीफ हे अराजकीय नामधारी अधिकारपद आहे. ते एका वर्षासाठी मुंबईच्या कोणत्याही प्रख्यात नागरिकास बहाल केले जाते. एच.आर. कॉलेज मुंबईच्या प्राचार्य डॉ. इंदू साहनी या मुंबईच्या नियुक्त केलेल्या शेवटच्या शेरीफ आहेत. (२००८ साली)

०२. शेरीफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो. शेरीफला स्वतःचे कार्यालय व कर्मचारी वर्ग असतो. परंतु त्याला कार्यकारी अधिकार नसतात. शेरीफचे कार्यालय उच्च न्यायालयाच्या इमारतीत असते.

०३. उच्च न्यायालयाचे समन्स बजावणे, तसेच मालमत्ता जप्त व सील करणे आणि आवश्यकतेनुसार तिचा लिलाव करणे या संबंधी कार्याबाबत तो नामधारी प्रमुख असतो.

०४. शेरीफची महत्वाची कार्ये म्हणजे शहराच्या वतीने परदेशी सन्माननीय अतिथींचे विमानतळावर स्वागत................ ................... ................ .................. ............. .............. http://www.mpscacademy.com/2015/09/Sheriff-of-mumbai.html
चंद्रावर दुर्बिण उभारण्याचा विचार

०१. अवकाशाचे अधिक चांगल्या पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) चाचपणी सुरू असल्याचे 'इस्रो'चे प्रमुख ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले आहे.

०२. चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत जागतिक पातळीवरही चर्चा सुरू आहे. सध्या लेह येथे एक दुर्बिण कार्यरत असून, त्याचे प्रत्यक्ष कामकाज आणि नियंत्रण बंगळूरमधून केले जाते. याच पद्धतीने चंद्रावरही दुर्बिण उभारून कामकाज पृथ्वीवरून करता येणे शक्‍य आहे काय, याबाबत चाचपणी सुरू आहे.

०३. चंद्रावर कोणतेही वातावरण नसल्याने बदलत्या पृथ्वीप्रमाणे वातावरणाचा फटकाही दुर्बिणीला बसण्याची शक्‍यता नाही. हा एकप्रकारे फायदाच आहे. हा प्रयोग तूर्त चर्चेच्याच पातळीवर असला तरी ही शक्‍यता नाकारता येत नाही.

०४. चांद्रयान-२ या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, पुढील वर्षाअखेरीस या मोहिमेला सुरवात होण्याची अपेक्षा आहे.................... ................... .................. .................. .................. .............. http://www.mpscacademy.com/2016/10/ca18oct2016.html
१. राज्य शासनाच्या कायदेमंडळाला 'राज्य विधीमंडळ' असे म्हणतात. घटनेच्या भाग ६ मधील अनुच्छेद १६८ ते २१२ मध्ये राज्य विधीमंडळाच्या बाबतीत तरतुदी आहेत.

०२. घटनेच्या कलम १६८ अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल जे द्विगृही राज्यांसाठी राज्यपाल, विधानसभा व विधानपरिषद या तिघांनी मिळून बनलेले असेल. जेथे विधानपरिषद अस्तित्वात नाही त्या एक्गृही राज्यासाठी फक्त राज्यपाल व विधानसभा यांचे मिळून बनलेले असेल.

०३. सध्या (सप्टेंबर २०१५) मध्ये २२ राज्यात एक्गृही तर ७ राज्यात द्विगृही विधानमंडळ आहे. म्हणजे ७ राज्यात विधानपरिषद व विधानसभा अस्तित्वात आहे. उर्वरित राज्यात फक्त विधानसभा अतित्वत आहे. विधान परिषद असणारी सात राज्ये (आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू व काश्मीर). जम्मू व काश्मीरच्या घटनेतच द्विगृही विधीमंडळाची तरतूद करण्यात आली आहे.



*राज्य विधीमंडळ सदस्यत्वासाठी पात्रता (कलम १७३)
०१. तो भारतीय नागरिक असावा. त्याने निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेऊन त्याखाली स्वाक्षरी केलेली असावी.

०२. विधानपरिषद सदस्यत्वासाठी वयाची ३० वर्षे व विधानसभा सदस्यत्वासाठी वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावी. तसेच संसदेने कायद्याने वेळोवेळी विहित केलेल्या पात्रता त्याने धारण केलेल्या असाव्यात.

०३. विधानपरिषदेसाठी तो सं................ .................... ................... ............... ................ ....................... http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislature.html
* विधानसभा
०१. तरतूद (कलम १७०). त्यानुसार विधानसभेची कमाल सदस्यसंख्या ५०० तर किमान ६० इतकी ठरविण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे.

०२. लोकसंख्या कमी असल्याच्या कारणावरून काही राज्यांच्या

विधानसभा किमान सदस्यसंख्या अजूनही कमी निश्चित करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश (३०), सिक्कीम (३०), गोवा (३०), मिझोरम (४०), नागालैंड (४६) इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यांची सध्याची सदस्यसंख्या अरुणाचल प्रदेश (६०), सिक्कीम (३२), गोवा (४०), मिझ्रोरम (४०), नागालैंड (६०) इतकी आहे. सिक्कीम व नागालैंड मध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून देण्याची तरतूद आहे.

०३. राज्यांचे विधानसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघातून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडतात. त्यात मतदान करण्याचा अधिकार १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व मतदानासाठी अपात्र घोषित न केलेल्या सर्व भारतीयांना आहे.

०४. घटनेच्या कलम ३३३ अन्वये राज्यपालांना १ एंग्लो इंडियन सदस्य निवडण्याचा अधिकार आहे. (विधानसभेत या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास व तशी राष्ट्रपतींना खात्री झाल्यास). हि तरतूद सुरवातीस फक्त १० वर्षांसाठी होती (१९६० पर्यंत). ती प्रत्येक वेळी १० वर्षांनी वाढवण्यात आली. सध्या ९५ वी घटनादुरुस्ती २००९ द्वारे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.



* विधानसभेची निवडणूक प्रक्रिया
०१. लोकसंख्येच्या निकषानुसार विधानसभेच्या प्रत्यक्ष निवडणुकीसाठी राज्याचे विभाजन प्रादेशिक मतदारसंघात केले जाते. विधानसभेतील प्रतिनिधित्वासाठी लोकसंख्या .............. ..................... .................... ....................... ...................... ........................... http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislative-assembly.html