MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
*ब्रह्मपुत्रेचे पाणी अडविण्याचा चीनचा प्रयत्न*
०१. उरी हल्ल्यानंतर सिंधू पाणी कराराच्या फेरविचाराचे सूतोवाच भारताने केलेले असतानाच चीनने ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे पाणी अडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या उपनदीवर चीन अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करत असून २०१४ पासून त्याचे बांधकाम सुरू आहे.

०२. तिबेटमधील क्षिगाझे येथील यार्लुग झँग्बो (ब्रह्मपुत्रेचे तिबेटी नाव) नदीची उपनदी असलेल्या क्षिआबुकुवर तब्बल ७५ कोटी अमेरिकी डॉलर एवढा महाप्रचंड खर्च करून लाल्हो हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

०३. या प्रकल्पामुळे भारतीय भूभागात वाहणारा ब्रह्मपुत्रेचा प्रवाह आक्रसणार असून त्याचा परिणाम ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे. बांगलादेशलाही या प्रकल्पाचा फटका बसणार आहे. भारताने यापूर्वीच चीनकडे या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

०४. चीनने त्याची दखल घेत प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाची रचना जलसाठा करण्याची नसून वाहत्या पाण्यावरील प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले होते. सिंधू कराराबाबत पाकिस्तानला दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर चीनच्या या प्रकल्पाबाबत भारताकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.
*एसबीआय अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य यांना मुदतवाढ*
०१. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

०२. 'एसबीआय'च्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही.

०३. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र कार्यकाळ वाढविण्यात आल्यामुळे आता त्या ६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील.

०४. जागतिक पातळीवरील धोरणानुसार स्टेट बँकेमध्ये सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विलीनीकरणाची जबाबदारी सुरळीत पार पाडावी, म्हणून सरकारकडून अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल वाढविण्यात आला असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे सहयोगी बँकांचे विलीनीकरण त्यांच्या देखरेखीखाली होणार असल्याचे संकेत मिळतात.
*भारत अमेरिकेमध्ये युद्ध अभ्यास*
०१. भारतीय लष्कर आणि अमेरिकेचे सैन्य यांचा उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलातील दोन आठवड्यांचा सामूहिक युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला. 'युद्ध अभ्यास २०१६' या उपक्रमाअंतर्गत हा सराव झाला.

०२. युद्धाच्या दरम्यान एकमेकांच्या सहकार्याने शत्रूविरुद्ध कोणचे डावपेच आखायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत अभ्यास करण्यात आला.

०३. या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या पायदळाचे २२५ जवान आणि अमेरिकी सैन्याचे २० इन्फन्ट्री रेजिमेंटचे २२५ सैनिक सहभागी झाले होते.

०४. अमेरिकी सैन्याच्या पॅसिफिक भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत गेल्या २००४ पासून सुरू झालेला दोन्ही देशांचा युद्ध अभ्यास मालिकेतील हा बारावा सराव होता.

०५. या सरावांमुळे दहशतवाद्यांना प्रमुख्याने डोंगरी भागात तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रत्युत्तर देण्याबाबत सैन्यात प्रगती झाली आहे.
०१. मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद केलेली नाही. कलम १६४ नुसार, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील असे म्हटलेले आहे. संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले जाते.

०२. एखाद्या व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी बहुमत सिध्द करावे असे नाही त्यामुळे राज्यपाल एखाद्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त करून नंतर ठराविक कालमर्यादेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात.

०३. विधीमंडळ सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले जाऊ शकते. पण नियुक्त केल्यापासून सहा महि

Read More on Following Link.....
http://www.mpscacademy.com/2015/07/Chief-Minister.html
* राज्याचे मंत्रीमंडळ
०१. कलम १६३ हे राज्याच्या मंत्रीमंडळाच्या दर्जाशी संबंधित आहे. तर कलम १६४ हे मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन व भत्ते यांच्याशी संबंधित आहे.

०२. १९७१ साली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कि, विधानसभा बरखास्त झाली असेल किंवा मंत्रीमंडळाने राजीनामा दिलेला असेल तर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रीमंडळ अस्तित्वात असणे आवश्यक आहे. नवीन मंत्रीमंडळ सत्ता ग्रहण करेपर्यंत आधीचेच मंत्रीमंडळ कार्यरत राहते.

०३. १९७४ मध्ये न्यायालयाने निकाल दिला कि, राज्यपालाचे स्वेच्छाधिकार वगळता, त्याला आपली कार्ये पार पडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल. त्याला ................................ ......................................................................................................... ..............http://www.mpscacademy.com/2015/07/state-cabinet.html
डिजिटल लॉकरमध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी
०१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमांतर्गत 'डिजिटल लॉकर योजने'चा देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. या लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते.

०२. अवघ्या दीड वर्षात २६ लाख ६६ हजार ८३२ इतके नागरिक हे लॉकर वापरत आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. सध्या डिजिटलचे युग असल्याने सर्वच क्षेत्रांत पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे.


प्रदूषणामुळे आशियात दरवर्षी ८ लाख लोकांचा मृत्यु
०१. आग्नेय आशियात दरवर्षी आठ लाख लोकांचा हवा प्रदूषणाशी निगडित विकाराने मृत्यू होतो, त्यातील ७५ टक्के मृत्यू हे हृदयविकार व फुप्फुसाच्या कर्करोगाने होतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. जगात दहापैकी ९ व्यक्ती खराब हवा नाकावाटे आत घेत असतात.

०२. हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ९० टक्के मृत्यू हे कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील आहे.......................................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca04october2016.html
* लोकसभेची रचना
०१. तरतूद (कलम ८१). त्यानुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ५५२

इतकी ठरविण्यात आलेली आहे. [राज्य प्रतिनिधी (५३०), केंद्रशासित प्रदेश प्रतिनिधी (२०), एंग्लो इंडियन (२)]

०२. सध्या लोकसभेची सदस्यसंख्या ५४५ आहे. [राज्य प्रतिनिधी (५३०), केंद्रशासित प्रदेश प्रतिनिधी (१३), एंग्लो इंडियन (२)]

०३. लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन हाउसच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे.

०४. ठराविक कालावधीनंतर लोकसभेच्या मतदार संघाची पुनर्रचना केली जाते. हे काम मतदारसंघ निर्धारण आयोग करते. या आयोगाची निर्मिती १९७२ साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

०५. भारतीय लोकप्रतींनिधी कायदा १९५१ नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.



* प्रतिनिधित्व
०१. राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघातून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडतात. त्यात मतदान करण्याचा अधिकार १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व मतदानासाठी अपात्र घोषित न केलेल्या सर्व भारतीयांना आहे.

०२. केंद्रशासित प्रदेशांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व ठरविण्याची पद्धत घटनेत नाही मात्र ती ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यानुसार संसदेने "केंद्रशासित प्रदेश लो..................................... ................................................................................................. ............................. http://www.mpscacademy.com/2015/07/loksabha.html
* पात्रता (कलम ८४)
०१. तो भारतीय नागरिक असावा. त्याने निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेऊन त्याखाली स्वाक्षरी केलेली असावी.

०२. राज्यसभा सदस्यत्वासाठी वयाची ३० वर्षे व लोकसभा सदस्यत्वासाठी वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावी. तसेच संसदेने कायद्याने वेळोवेळी विहित केलेल्या पात्रता त्याने धारण केलेल्या असाव्यात.

०३. लोकसभा तसेच राज्यसभेसाठी तो देशातील कोणत्याही संसदीय मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असावा. ('लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१' )

०४. अनुसूचित जाती व जमाती साठी आरक्षित जागेची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती अनुक्रमे त्या समाजातील असावा. तसेच अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्ती अनारक्षित जागेची निवडणूक लढविण्यासाठी सुद्धा पात्र असतो. ('लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१' )

०५. पूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तो व्यक्ती ज्या राज्यातून निवडणूक लढवत आहे त्या राज्यातीलच मत.......................... ............................................................................... http://www.mpscacademy.com/2015/07/eligibility-for-member-of-parliament.html
भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
०१. ब्रिटिशवंशीय शास्त्रज्ञ डेव्हिड थोउलेस, डंकन हेल्डन आणि मायकल कोस्टेरलिट्स यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. मंगळवारी नोबेल पुरस्कार समितीने पुरस्काराची घोषणा केली. द्रव्याच्या स्थितीवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे तिघेही ब्रिटिश वंशाचे असले तरी काम अमेरिकेत करतात.

०२. डॉ. थोउलेस (वय ८२) हे वॉशिंगटन विद्यापीठात, डॉ. हेल्डन (वय ६५) हे प्रिंन्स्टन विद्यापीठ तर डॉ. कोस्टेरलिट्स (वय ७३) हे ब्राऊन विद्यापीठात कार्यरत आहेत. भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सेसने त्यांना नोबेल पुरस्कारची घोषणा केली आहे.

०३. १९८० च्या दशकात त्यांनी हे संशोधन केले होते. दशकापूर्वी केलेल्या संशोधनास नोबेल पुरस्कार क्वचितप्रसंगीच देण्यात येतो.
०४. आठ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (९३६००० डॉलर किंवा ८३४००० युरो) व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. थोलेस यांना निम्मी रक्कम, तर उर्वरित रक्कम हाल्डेन व होस्टरलित्झ यांना अर्धी-अर्धी मिळणार आहे. १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

०५. अद्भुत गुणधर्माच्या द्रव्यांची गुपिते उलगडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.ज्या क्षेत्रात द्रव्य विचित्र अवस्था धारण करते अशा एका नव्या शाखेचे दार या वैज्ञानिकांनी खुले केले आहे व त्यांनी या द्रव्याच्या वेगळ्या अवस्था व त्यातील बदल यावर संशोधन केले आहे.

०६. अतिवाहक पदार्थ, महाद्रायू (सुपरफ्लुइड्स) व चुंबकीय पटले यावर त्यांचे पायाभूत संशोधन आहे. द्रव्यांच्या काही अवस्थांत त्यांचे गुणधर्म फार वेगळे असतात व त्यांचा वापर विविध कामांसाठी करता येतो, अशी नवी संकल्पना त्यांनी मांडली.

०७. संघनन द्रव्य भौतिक विज्ञानात या संशोधकांचे कार्य मोठे आहे. १९८० मध्ये थोलेस यांनी विद्युत वाहक थरांमध्ये काही प्रयोग करून त्यातील अवस्थांतरे टिपली होती. त्या................................. ...................................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca05october2016.html
संगीत अकादमी पुरस्कार जाहीर
०१. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नाटककार शफाअत खान यांच्यासह लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

०२. या वेळी विविध श्रेणींत देशातील ३९ नामवंत कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले, तर तीन मान्यवरांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे, तर शिष्यवृत्ती स्वरूपात ३ लाख रुपये प्रदान करण्यात आले.

०३. प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’ यांसह अनेक मराठी व ‘धनवान’, ‘मशाल’ अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून त्यांची ओळख आहे.

०४. नेपथ्यामध्ये सातत्यपूर्ण लक्षणीय कामगिरी करणारे प्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना नाटय़ क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रपोजल दोन’, ‘स्पेशल’ अशा अनेकानेक नाटकांचे उत्तम नेपथ्य त्यांनी केले आहे.

०५. नाटय़ लेखनातील वैविध्यपूर्ण शैलीतून नाटक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘ब्लॅक कॉमेडी’ या दुर्मीळ नाटय़ लेखन प्रकारावर हुकमत असणारे नाटककार म्हणून शफाअत खान प्रसिद्ध आहेत. ‘किस्से’, ‘भूमितीचा फार्स’, ‘मुंबईचे ........................................ .................................................................................................... http://www.mpscacademy.com/2016/10/ca06october2016.html
*संगीत अकादमी पुरस्कार जाहीर*
०१. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नाटककार शफाअत खान यांच्यासह लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

०२. या वेळी विविध श्रेणींत देशातील ३९ नामवंत कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले, तर तीन मान्यवरांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे, तर शिष्यवृत्ती स्वरूपात ३ लाख रुपये प्रदान करण्यात आले.

०३. प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’ यांसह अनेक मराठी व ‘धनवान’, ‘मशाल’ अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून त्यांची ओळख आहे.

०४. नेपथ्यामध्ये सातत्यपूर्ण लक्षणीय कामगिरी करणारे प्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना नाटय़ क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रपोजल दोन’, ‘स्पेशल’ अशा अनेकानेक नाटकांचे उत्तम नेपथ्य त्यांनी केले आहे.

०५. नाटय़ लेखनातील वैविध्यपूर्ण शैलीतून नाटक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘ब्लॅक कॉमेडी’ या दुर्मीळ नाटय़ लेखन प्रकारावर हुकमत असणारे नाटककार म्हणून शफाअत खान प्रसिद्ध आहेत. ‘किस्से’, ‘भूमितीचा फार्स’, ‘मुंबईचे कावळे’ यांसारख्या ब्लॅक कॉमेडी शैलीतील त्यांच्या नाटकांनी रसिकांना भुरळ घातली. ‘राहिले दूर घर माझे’, ‘शोभायात्रा’ अशी अनेकानेक नाटके लिहून त्यांनी नाटय़ क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.

०६. देशातील लोकनृत्यांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या महाराष्ट्रातील लावणी लोकनृत्याचा प्रचार व प्रसार करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना लावणी नृत्यातील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले.

०७. ललित कला व नाटय़ विषय लेखन तसेच नाटय़ समीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
*रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर*
०१. जीन पेरी सॅवेज, सर जे फ्रेझर स्टोडार्ट, बर्नार्ड एल. फेरिंगा यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बुधवारी नोबेल पुरस्कार समितीने याची घोषणा केली.

०२. जगातील सर्वाधिक लहान यंत्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी आण्विक यंत्रासाठी प्रमाणबद्ध रचना आणि संश्लेषणासाठी केलेल्या संशोधनात त्यांचे अमूल्य योगदान आहे.जगातील सर्वांत लहान अशी 'मॉलेक्‍युलर मशिन' त्यांनी तयार केली आहे.

०३. हालचालींवर नियंत्रण ठेवता येणारे रेणू या शास्त्रज्ञांनी तयार केले. त्यांना ऊर्जा दिल्यानंतर ते 'सांगितलेले' काम करू शकतात. या संशोधनाचा उपयोग इलेक्‍ट्रिक ट्रेन, वॉशिंग मशिन, पंखे, फूड प्रोसेसर आदी गोष्टींमध्ये या रेणूंचा वापर करता येऊ शकतो, असे नोबेल समितीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या तिघा शास्त्रज्ञांना आठ कोटी स्वीडिश क्रोनरचा पुरस्कार विभागून देण्यात येईल.

०४. मॉलेक्‍युलर मशिन तयार करण्यासाठीचे पहिले पाऊल सुवेज यांनी १९८३ मध्ये टाकले. त्यांनी दोन कंकणाकृती रेणू एकत्र गुंफून त्याची साखळी तयार केली. सर्वसामान्यपणे दोन रेणू हे घट्ट बंधात बांधले जातात. त्यात अणूंभोवती फिरणारे इलेक्‍ट्रॉन विभागले जातात. परंतु साखळीमध्ये हा बंध जास्त मुक्त असा यांत्रिक बंध असतो.

०५. एखाद्या यंत्र चालण्यासाठी त्यातील भागांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे असते. रेणूंच्या साह्याने तयार झालेल्या साखळीने नेमकेपणाने हेच काम केले आहे.

०६. या प्रक्रियेतील दुसरा टप्पा स्टोडार्ट यांच्या संशोधनामुळे १९९१ मध्ये गाठला गेला. त्यांनी रेण्वीय आस तयार करून त्याच्याभोवती रेण्वीय साखळ्या फिरू शकतात, हे दाखवून दिले. स्टोडार्ट यांनी या तंत्राद्वारे मॉलेक्‍युलर लिफ्ट, मॉलेक्‍युलर मसल आणि कॉम्पुटर चिप तयार करता येऊ शकते, हे दाखवून दिले.

०७. मॉलेक्‍युलर मोटर पहिल्यांदा तयार करण्याचा मान फेरिंगा यांच्याकडे जातो. त्यांनी १९९९ मध्ये मॉलेक्‍युलर मोटरचा वापर करून मॉलेक्‍युलर रोटर ब्लेड एकाच दिशेने फिरवून दाखविली. त्यांनी मॉलेक्‍युलरच्या मोटरच्या साह्याने नॅनोकारही तयार केली.
*एचआयव्ही आणि एड्स विधेयकांमध्ये सुधारणा*
०१. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एचआयव्ही आणि एडस विधेयक २०१४ मधील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे एचआयव्ही आणि एडसबाधित रूग्णांना कायदेशीररित्या अँटी रेट्रोव्हायरल उपचार घेण्याचा हक्क मिळाला आहे.

०२. नव्या विधेयकानुसार केंद्र आणि राज्य सरकारला एआरटी सेंटर (अँटी रेट्रोव्हायरल थेरपी) आणि संधीसाधू संक्रमण व्यवस्थापन सुविधा पुरवणे बंधनकारक राहील. तसेच एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा प्रांतिक किंवा वैयक्तिक भेदभाव करता येणार नाही.

०३. संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) काळात हे विधेयक सादर करण्यात आले होते. त्यानंतर यंदाच्या जुलै महिन्यात संसदेच्या स्थायी समितीने यामधील त्रुटी दूर करण्यासाठी हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे पाठवले होते.
*रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती*
०१. अभिनेत्री व भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रूपा गांगुली यांची नियुक्ती केली आहे.

०२. पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रूपा गांगुली भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या.

०३. दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत गांगुली यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. रूपा गांगुली यांचे नाव १९८८ मधील महाभारतातील भूमिकेमुळे घराघरांत पोचले.
*भारताविरुद्धची अणवस्त्र याचिका फेटाळली*
०१. अण्वस्त्र स्पर्धा थांबविण्यात भारत, पाकिस्तान आणि ब्रिटन अपयशी ठरल्याचा आरोप करत मार्शल आईसलॅन्डने (बेट) दाखल केलेली याचिका संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयाने बुधवारी फेटाळली. या निर्णयामुळे मार्शल आईसलॅन्डला मोठा धक्का बसला आहे.

०२. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील १६ न्यायाधीशांच्या पीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेतील मुद्दे सुनावणीयोग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळली.

०३. सुमारे ७० हजार लोकसंख्या असलेल्या मार्शल आईसलॅन्डने अणुचाचणीचा फटका अनुभवलेला आहे. नऊ देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप मार्शल आईसलॅन्डने २०१४ मध्ये केला होता. याबाबत मार्शल आईसलॅन्डने भारतासह नऊ देशांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला.

०४. त्यापैकी चीन, फ्रान्स, इस्रायल, उत्तर कोरिया, रशिया आणि अमेरिका या देशांविरोधातील याचिका सुनावण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला होता. भारत, पाकिस्तान आणि ब्रिटनने अण्वस्त्र स्पर्धा रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने भारतासह तिन्ही देशांना मोठा दिलासा मिळाला आहे
*गॅस अनुदानसाठी आधार कार्ड बंधनकारक*
०१. १ डिसेंबरपासून ‘आधार’ कार्ड असल्याशिवाय कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून गॅस ग्राहकांना ‘आधार’साठी नोंदणी करण्याची दोन महिन्यांची शेवटची मुदत दिली आहे.

०२. सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’चा वापर करण्यासंबंधीचा कायदा १६ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला असून त्यानुसार तेल मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

०३. तसेच हा निर्णय आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर ही राज्ये वगळून देशभर लागू होईल. सध्या सरकार घरगुती गॅस ग्राहकास वर्षाला स्वयंपाकाच्या गॅसचे १२ सिलिंडर अनुदानित दरात देते.

०४. अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते व त्याने गॅस सिलिंडर घरी आल्यावर त्याची पूर्ण किंमत द्यायची असते. नव्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी अद्यापही ‘आधार’ कार्ड घेतलेले नाही त्यांना नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
* लोकसभा अध्यक्ष
०१. नव्याने निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.

०२. लोकसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवड सध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करतात. या निवडणुकीची तारीख राष्ट्रपती ठरवतात.

०३. लोकसभेचा कार्यकाल संपण्याच्या आत अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास लोकसभा दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करते. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणतीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ लोकसभेचा सदस्य असावा.

०४. अध्यक्ष सहसा सत्ताधारी पक्षातील असतो. (पण संसदीय इतिहासात प्रथमच १९९६ साली ११व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पी.ए. संगमा या विरोधी पक्षातील सदस्याची (कॉंग्रेस) बिनविरोध निवड झाली (२३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८) दरम्यान अध्यक्ष म्हणून काम केले. त्यादरम्यान जनता दलाच्या सरकारांनी काम केले.

०५. लोकसभा अध्यक्षाचा पदावधी लोकसभेच्या कालावधी एवढाच असतो. मात्र लोकसभा विसर्जित झा................................... ............................................................................................ http://www.mpscacademy.com/2015/07/speaker-of-loksabha.html
१. घटनेच्या कलम १०६ अन्वये संसद सदस्यांचे पगार व भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. घटनेत संसद सदस्यांसाठी पेन्शनची तरतूद नाही मात्र संसदीय कायद्याद्वारे हि तरतूद करण्यात आली आहे.

०२. त्यानुसार संसदेने 'संसद सदस्यांचे पगार, भत्ते व पेन्शन कायदा, १९५४' संमत केला आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. २०१० मध्ये कायद्यात सुधारणा करून संसद सदस्यांचे पगार व भत्ते यांत वाढ केली.

०३. २०१० च्या सुधारणेनुसार, संसद सदस्यांचा पगार १६००० वरून ५०००० रु. प्रती महिना करण्यात........................................ http://www.mpscacademy.com/2015/07/sallery-and-allowances-of-member-of-parliament.html
ताजमहलवर मड थेरेपी करण्यात येणार
०१. ताजमहलचा पिवळा पडलेला मुख्य घुमट चमकवण्यासाठी मड थेरेपी (मातीचा मुलामा) करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे एक वर्षभर ताजमहल पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला आहे.

०२. ताजमहल पर्यटकांसाठी कधीपासून बंद करायचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही.ताजमहलचा मुख्य घुमटा हा पिवळा पडला आहे. या घुमटाला मातीचा मुलामा देऊन तो पूर्वीसारखाच चमकदार केला जाणार आहे.

०३. या घुमटावर असलेला ९. २९ मीटर उंचींच्या कलशावरही पहिल्यांदाच रासायनिक प्रक्रिया करण्या............................................................ ............................................. http://www.mpscacademy.com/2016/10/ca07october2016.html
* निवड
०१. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर, कलम ९३ अन्वये लोकसभा सदस्य आपल्यापैकी एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात. उपाध्यक्ष निवडणुकीची तारीख अध्यक्षांमार्फत ठरविली जाते. उपाध्यक्षांचा कार्यकाल लोकसभेइतकाच असतो.

०२. जर उपाध्यक्षांचे लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास किंवा त्यांनी अध्यक्षांना संबोधून स्वतःच्या सहीनिशी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून दूर केले असल्यास लोकसभा उपाध्यक्ष पद रिक्त होते.

०३. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत अध्यक्षसारखीच असते. ते उपाध्यक्ष असले तरी अध्यक्षाच्या अधिनस्थ नसतात ते लोकसभेलाच जबाबदार असतात.


* कार्य व अधिकार
०१. लोकसभा अध्यक्ष सभागृहा............................................... ........................ http://www.mpscacademy.com/2015/08/loksabha-deputy-speaker.htm