MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
५) वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
कोल्हापूर
30%
सांगली
29%
रायगड
27%
सातारा
💥फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे.

💥हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते. 

💥याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली. 

💥दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले. 

💥जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले.

💥एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली.

💥 हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.

💥भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून मार्च २०१८ पर्यंत सर्व गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल असे उद्दिष्ट आहे.

💥 याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎾6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज🎾

▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)

▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)

▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)

▪ रॉस विटली (इंग्लंड)

▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)

▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झाला आहे ?
Anonymous Quiz
13%
मुलताई
26%
महाबळेश्वर
58%
अमरकंटक
3%
सिहावा
७) महाराष्ट्रात तापी नदीचा प्रवाह किती कि.मी लांबीचा आहे ?
Anonymous Quiz
22%
724 कि.मी
30%
451 कि.मी
31%
282 कि.मी
17%
208 कि.मी
९) खालीलपैकी दक्षिण कोकणातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत ?
Anonymous Quiz
25%
सावित्री , वशिष्टी
29%
वैतरणा, उल्हास
24%
काजवी , मुचकुंदी
22%
दमनगंगा , पाताळगंगा
१०) पुढील पर्यायापैकी महाप्राण वर्ण कोणता आहे ?
Anonymous Quiz
14%
च्
14%
ब्
32%
स्
41%
क्ष्
💥💥ब्रेकिंग न्यूज 💥💥

👉महापोर्टलद्वारे होणारी शासकीय भरती अखेर पूर्णपणे बंद.

👉पुढील भरती नवीन संस्थेद्वारे घेण्यास सरकारने दिले आदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
☔️☔️☔️भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प☔️☔️☔️

💥 मुचकुंदी प्रकल्प
👉मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

🔥 श्रीशैलम प्रकल्प
👉आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

💥 बियास प्रकल्प
👉पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

🔥 भाक्रा-नानगल
👉पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

💥 दामोदर खोरे योजना
👉पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

🔥 फराक्का योजना
👉हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

💥 हिराकूड
👉प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४० कि मी आहे.

🔥 चंबळ योजना
👉हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

💥 उकाई प्रकल्प
👉तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

🔥 कोसी प्रकल्प
👉विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

💥 नागार्जुनसागर
👉आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔥1
💥💥एका शब्दात सांगायचे झाले तर ज्या प्रकारे आपण आपला मोबाईल नंबर चेंज न करतात फक्त सेवा देणारी कंपनी पोर्ट करतो उदा. JIO मधून Idea किंवा Idea मधून JIO अगदी तसच महापोर्टल आपली सर्विसकंपनी पोर्ट करणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) खालीलपैकी 'पररूप संधी' चे उदाहरण कोणते आहे ?
Anonymous Quiz
11%
होऊ
32%
केलेसे
39%
एकेक
19%
कितीक
१२) 'निरिच्छ' हा कोणता संधी प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
विशेषसंधी
36%
व्यंजनसंधी
29%
स्वरसंधी
23%
विसर्गसंधी
१३) 'मन्वंतर' शब्दाचा संधी विग्रह करा
Anonymous Quiz
4%
मनि + अंतर
39%
मनु + अंतर
51%
मन: + अंतर
7%
मन + अंतर
१४) 'व्यासंग' शब्दाचा संधी विग्रह करा.
Anonymous Quiz
12%
वा + असंग
36%
वि: + आसंग
35%
व्य + असंग
16%
वि + आसंग
💥💥💥म्हणी व अर्थ💥💥💥

🌷कुडी तशी पुडी------
देहाप्रमाणे आहार

🌷कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस------
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला

🌷कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच------
मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही

🌷कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ------
आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

🌷कुसंतनापेक्षा निसंतान बरे------
वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे

🌷केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले------
पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले

🌷केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी------
अत्यंत गरीब परिस्थिती असणे

🌷केळ्याचा लोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर------
केळीचे पीक भरपूर पैसे देते

🌷कोंड्याचा मांडा करुन खाणे------
आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे

🌷कोरड्याबरोबर ओले जळते-----
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो

🌷कोल्हा काकडीला राजी------
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे

🌷कोळसा कितीही उगाळला तरी काळाच------
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
​💥💥 व्यक्तिवेध - नुसरत बद्र 💥💥

🔰 आपल्या देशात चित्रपटातील अथवा इतरही गाणी लिहिणारांना साहित्यात कवीचा दर्जा देताना काचकूच केली जाते परंतु कवीला किंवा गीतकाराला खरी लोकप्रियता मिळते ती चित्रपटांतील अथवा गैरफिल्मी गाण्यांमधूनच. खरंतर केवळ प्रसिद्धीच नव्हे तर आर्थिक स्थैर्यसुद्धा मिळते.

🔰 उर्दूतील ख्यातनाम शायर बशीर बद्र यांचे चिरंजीव आणि गीतकार म्हणून प्रसिद्धीला आलेले शायर नुसरत बद्र यांना ही लोकप्रियता, स्थैर्य, यश नुकते मिळू लागले होते आणि अकस्मात त्यांना मृत्यूने हाक दिली.

🔰 'ये ज़हानत भी कितनी भारी है, इश्क़ की रात कारोबारी है'सारखी दमदार शायरी लिहून नुसरत यांनी शायरांच्या जगात स्थान मिळवले होते. गझल गायक आणि संगीतकार जगजीतसिंग यांनी त्यांच्या काही गझलांना संगीत दिल्यावर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले आणि चित्रपटसृष्टीतून विचारणा सुरू झाली.

🔰 गीतलेखनाकडे वळले आणि शंभराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. आदेश श्रीवास्तव, रहमान अशा संगीतकारांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांनी गीतकार म्हणून प्रवेश केला तोच अगदी झोकात. संगीतकार इस्माइल दरबार आणि माँटी शर्मा या दोन्ही संगीतकारांनी देवदास-पारो-चंद्रमुखी या तिघांच्याही भावना व्यक्त करण्यासाठी नुसरत बद्र यांच्या शायरीवर भरवसा ठेवला.

🔰बद्र यांनी या विश्वासाचे सोने केले आणि कुठल्याही गीतकाराला स्वप्न वाटावे तसे यश, लोकप्रियता त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील गाण्यांना मिळाली. 'सिलसिला ये चाहत का न हमने बुझने दिया, बैरी पिया, वो चांद जैसी लडकी ही' सर्व गाणी उत्तम होती, परंतु 'हमपे ये किसने हरा रंग डाला, ख़ुशी ने हमारी हमें मार डाला' या सारख्या अगदीच वेगळ्या शब्दरचनेमुळे या गाण्याकडे विशेष लक्ष वेधले गेले.

🔰 शास्त्रीय संगीताचा नेमका वापर असलेले 'मोरे पिया'ही गाजले. या गाण्यांमुळेच त्यांना पुढे भराभर चित्रपट मिळत गेले. पुन्हा ते यशाच्या शोधात असतानाच त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. विविध आजारांनी ग्रासले. 'देवदास'च्या गाण्यांमंधून पुढील अनेक वर्षे त्यांचे मधाळ शब्द आपल्या कानात पाझरत राहतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16) Select correct synonyms of
🔰 Abnegation
Anonymous Quiz
22%
Satisfaction
45%
Renunciation
23%
Mercy
11%
Occupation
17) Choose correct Antonyms for
🔰 Seldom
Anonymous Quiz
17%
Indifference
23%
Weak
47%
Frequent
13%
severe