मराठी स्पंदन
283 subscribers
157 photos
2 videos
143 links
मराठी मन. मराठी स्पंदन.

मराठीतील दर्जेदार लेख, विनोद, कविता तसेच इतर साहित्य वाचण्यासाठी 'मराठी स्पंदन'ला सहभागी व्हा..
App Link: http://bit.ly/30goEEo
Download Telegram
to view and join the conversation
उपयुक्त माहिती:

१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?
उत्तर: ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी?
उत्तर: ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .

४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी?
उत्तर: शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर: प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर: हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ….

https://bit.ly/3zhhttG
आज आपल्या पैकी खुप जणांना #नीरजा_भनोत कोण हे ही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने १९८६ साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवीले आणि वयाच्या २३ वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हां वीरता पदक मिळविनारि भारतीय ठरली होती . पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला विसरून गेले.

नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am ७३ या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी.

५ सप्टेम्बर १९८६ मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am ७३ एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. निरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते.

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते .

निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले .

निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले. निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या.

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यां पैकी तिन जणांना मारून टाकले. निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला. निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तीचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला .

निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे .

भारताने निरजाला 'अशोक चक्र' हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले .
पाकिस्तानने 'तमगा-ए-इन्सानियत' हां सर्वोच्च पुरस्कार दिला .
अमेरिकेने 'जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड' हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .

संकलन/संपादन: टीम स्पंदन
साभार: लेखक/कवी
https://bit.ly/35HDBzR
लग्न राशी नुसार आजार.
मागील भागांमध्ये सर्वसाधारण होणारे आजार दिलेले आहेत जे ग्रहानुसार आहेत आता राशीनुसार..

मेश लग्न असता शरीर काटक मजबूत उष्ण प्रकृतीचे असते जीवनशक्ती भरपूर असते मात्र उष्णतेमुळे यांचे डोळे फारसे चांगले नसतात

पोट डोके मूत्रपिंड या भागांना पीडा होण्याचा संभव असतो ही अग्नी तत्वाची राशी असल्यामुळे ताप खरुज तोंडावर पुरळ उठणे असे विकार होऊ शकतात अग्नी पासून भय असते जखमा होण्याचा संभव असतो.

वृषभ लग्न असता मजबूत शरीर यष्टी असते हृदय आणि गळा हे भाग दुर्बल असतात या लग्नावर घटसर्प घशाचे विकार सूज असे विकार होऊ शकतात

मिथुन लग्न असता शरीर मजबूत असते शरीरात नैसर्गिक जीवन शक्ती उत्तम असते परंतु जास्त विचार करण्याच्या योगामुळे व मानसिक श्रमामुळे मज्जातंतू बिघडून स्वभाव चिडखोर व त्रासीक बनतो

मिथुन लग्नाला कफ वात यांचे विकार होताना दिसतात तसेच खोकला दमा रक्ताची अशुद्धता यापासुन रोग होण्याचा संभव असतो

कर्क लग्नाचे शरीर दुर्बल असते ही जलतत्वाची राशी असल्यामुळे हवा पाणी आणि वातावरण बदलण्याचा परिणाम यांच्यावर होऊ शकतो आणि हे लवकर आजाराला बळी पडतात यांचे छाती पोट हे भाग दुर्बल असतात

पोटात वायू धरणे पचन क्रिया व्यवस्थित नसते जलोदर संधिवात गंडमाळ असे विकार यांना होऊ शकतात
मनाच्या चंचल ते मुळे आजार होण्याची शक्यता असते

सिंह लग्नाचे लोक जीवन शक्ती अत्यंत उत्तम असते
यांची दुखणी तीव्र स्वरूपाची असतात परंतु ती लवकर बरी होताना दिसतात साधारणतः रक्ताचे विकार हृदयाचे विकार सिंह राशीच्या लोकांना दिसून येतात

कन्या लग्न नुसार यांचे शरीर सुबक असते रोग लवकर बरे होतात परंतु यांची पोटातील आतडी दुर्बल असते म्हणजेच लहान आतडे मोठे आतडे यावर कन्या राशीचा अंमल असल्यामुळे पोटाचे विकार बद्धकोष्ठता व त्रास तसेच अग्नी मंद असल्यामुळे शक्ती क्षीण होणे असे आजार होताना दिसतात.

तूळ लग्नाचे शरीर उत्तम बांधेसूद असते आजार लवकर बरे होतात परंतु यांचे मूत्रपिंड व कंबर हे अवयव दुर्बल असतात त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार मधुमेह असे विकार होताना दिसतात कंबर दुखण्याची सवय असते त्वचेचे विकार गजकर्ण खरूज होताना दिसतात.

वृश्चिक लग्नाचे लोक काटक असतात या राशीचा अंमल गुप्तेद्रीय व गुद्दद्वार या नाजुक भागावर असते.
यांना मुळ व्याध शुक्र दोष आर्तवाचे विकार होण्याची शक्यता असते.

धनु राशि लग्नी असता यांचे शरीर मजबूत असते परंतु यांच्या मांड्या मांड्या ची हाडे हे भाग दुर्बल असतात यांना आमवात सांधेदुखी हाडे निखळणे असे आजार होऊ शकतात

मकर रास अतिशय दुर्बल राशी समजली जाते मकर रास लग्न असणारे लोक लहानपणी अशक्त असतात त्यांच्यामध्ये उष्णता कमी असते त्यामुळे संधिवात गुडघेदुखी त्वचेचे विकार होताना दिसतात

कुंभ लग्नाचे लोक अतिशय मजबूत शरीराचे असतात यांचा अंमल पाय गुडघे यावर असल्यामुळे हे भाग दुर्बल असतात
यांना मज्जातंतू चे रोग रक्त अल्पता पेटके येणे घोटे दुखणे ,खांद्यात लचक भरणे इत्यादी आजार होताना दिसतात

मीन लग्न असता शरीर प्रकृती अशक्त असते शरीरामध्ये जीवन शक्ती कमी असते हे लोक लवकर रोगाला बळी पडतात त्यांचा मुख्य आजार पोटाचे दुखणे आमवात पाय गार पडणे जलोदर असे विकार होताना दिसतात

आरोग्यम् धनसंपदा या तत्त्वानुसार आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे असते आरोग्य हेच धन आहे
सर्व रोगाचे कारण मंदाग्नी आहे त्यामुळे आपल्या शरीर तत्वानुसार वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार आहाराचे सेवन करणे गरजेचे असते

https://mazespandan.com
.
सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो.....
.
नागपुरी व्यक्ती 😱 :- ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा...??
.
पुणेरी व्यक्ती 😒 :- (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात)
.
इतिहास दफ्तरी नोंद असल्याप्रमाणे मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीराव प्रथम द्वारा १० जानेवारी १७३० रोजी पायाभरणी तसेच २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुशांत केलेली इमारत म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात "शनिवार वाडा" 🏰 ती हिच....!!
.
भाषेवरून विदर्भातले वाटतात, 😒 गाव कोणते तुमचे..???🤔🤔
.
नागपुरी व्यक्ती 😏 :- जशास तसे या मुद्रेत येऊन.....
.
भारतीय उपखंडातील २१'८ उत्तर अक्षांश व ७९'५ पूर्व रेखांश मध्ये येणारे, मध्य भारतात ० मैल स्तंभ असलेले देशाचे केंद्रबिंदू, सिट्रस सिनेन्सिस 🍊 या लिंबु वर्गीय आंबट मधुर चवयुक्त फळाचे उत्पत्ति स्थान,
नाग नदीच्या काठी वसलेले, पुरातन कालीन संबोधले जाणारे दुहेरी अवतरण चिन्हात "फनिन्द्रपुर" वा "नारंगपुर" येथील मी रहिवाशी...!!
पुणेरी व्यक्ती 🤔 :- अहो म्हणजे काय..??
.
नागपुरी व्यक्ती 😀 :- भाऊ, नागपुरचा हायनं मी....!!
.
पुणेरी व्यक्ती 😡 :- अहो मग सरळ सोप्या भाषेत सांगायचे कि...
.
नागपुरी व्यक्ती 😔 :- भाऊ, तुम्ही मले इतिहास शिकवला, 📄 मया तुम्हाले भुगोल🌍 शिकवला,
हिसोब,,,बराबर
😇😂😃😀😅😆😉😛😜😝😝

https://shorturl.at/lFVY3
मनांत तेच लोक बसतात,
ज्यांचे मन साफ आहे. कारण…
सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,
ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते…

आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. पण प्रश्न आहे मनातल्या गाठीचं काय ? आणि गाठी असणारं मन स्वच्छ असतं काय ?

मित्रांनो माझ्या सह आपण सर्वांनीच या विचाराला लाईक करते वेळी हाच विचार केला असणार कि माझं मन तर साफचं आहे, माझ्या मनात कुठे ही आणि कसली ही गाठ नाही, हो ना ? ज्या काही गाठी आहेत, जी काही मनाची अस्वछता आहे ती समोरच्याचं मनात आहे. आणि म्हणूनच तर तो विचार मला भावला आणि मी त्याला लगेच लाईक केले…

मित्रांनो या विश्वात संत सोडले ना तर या जगात एक वेळ तनात गाठ नसणारा सापडेल पण मनात गाठ नसणारा एक हि व्यक्ती सापडणार नाही…
आपल्या सर्वांच्याचं मनांत गाठ नव्हे तर गाठी आहेत गाठी, फक्त गाठीचे प्रकार वेग वेगळे आहेत..कोणच्या मनात मी पणाची गाठ तर कोणाच्या मनात द्वेषाची, कोणाच्या मनात ईर्ष्येची, कोणाच्या मनात अहंकाराची, स्वार्थाची, वासनेची, मोहाची, मायेची, मोठेपणाची, हुशारीची, पदाची, पदवीची, संपत्तीची, प्रतिष्टेची, धर्माची, तर कोणाच्या मनात जातीची गाठ आहे. या आणि अशा अनेक गाठी आपल्या सर्वांच्या मानत कमी जास्त प्रमाणात आहेतचं, आणि या गाठीचं ओझं आम्हीं दररोज अभिमानाने वागवत असतो, पण आम्ही हे मान्य करत नाही की माझ्या मनात गाठ आहे, आणि तरी ही आम्हां प्रत्येकालाचं वाटतं कि माझं मन साफ आहे…

तनातली गाठ दिसते, पण मनातली गाठ आम्ही दाखवत नाही. पण लक्षात ठेवा तनात असलेली गाठ जेवढा त्रास देत नाही ना तेवढा त्रास मनातली गाठ आपल्याला देत असते.. आपण किती ही प्रयत्न केला त्या गाठी लपवण्याचा, तरी त्या मनातल्या गाठी इतरांना आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातुन आपल्या वागण्यातून दिसतात…

या गाठीचं ओझं आम्ही का वागवतो आहे ?
आणि किती दिवस वागवणार आहोत ?
खरंच हे गाठीचं ओझं गरजेचं आहे का ?
याचा विचार आम्ही कधी तरी करणार आहोत का ?

मित्रांनो न बऱ्या होणाऱ्या कॅन्सरच्या शरीरातल्या गाठी पेक्षा ही भयानक आहेत या गाठी आणि त्या देखील आपल्या मनात आहेत. विचार करा एक वेळ तनातल्या गाठीवर उपाय होईल ही, पण मनातल्या गाठीचं काय ? या गाठी मुळे जर आपण माणसांच्या मनांत बसू शकत नाही मग ईश्वरतर लांबच…मग काय उपयोग आहे आपल्या नित्य देव पूजा पाठाचा, प्रार्थनेचा, देव दर्शनाचा…

हा जन्म परत नाही हे आम्हीं परत परत का विसरतो ? आज कोरोना सारख्या आजाराने आम्हांला खूप काही शिकवलं आहे..श्रीमंतांची श्रीमंती देखील आज त्यांना उपयोगी पडत नाही… मी मी म्हणनारे श्रीमंत देखील झोपडीतल्या गरीबा सारखे घरात बसून आहेत..ज्या गोष्टींचा आम्हला अभिमान होता गर्व होता किंवा आहे त्या गोष्टी या प्रतिकूल परिस्थतीत मध्ये आपल्या काय उपयोगाच्या आहेत.. शेवटी माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो आहे ना…

विसरू नका शेवटी ईश्वरचं सर्वश्रेष्ठ आहे, निसर्गचं सर्वश्रेष्ठ आहे, हे आपल्याला मान्यचं करावं लागेल..आज आपण जे काही आणि जसे काही आहोत, भले त्यामध्ये आपलं कर्तृत्व आहे हुशारी आहे, जिद्द आहे, पण म्हणून त्या गोष्टींचा गर्व, अभिमान, मी पणा करू नका…आपल्या प्रत्येकांचंच जीवन हे निसर्गाशी सुसंगत आहे आणि असायला हवं, ना कि निसर्गावर मात करणार असावं..आपण सगळेच एक दुसऱ्यांशी आणि एक दुसऱ्यांसाठी पूरक आहोत..आपण सगळेच एक मेकांच्या आधाराशिवाय ना पुढे जाऊ शकत ना मोठे होऊ शकत ना जगू शकत..कारण हे विश्वची माझे घर आहे…मग का या गाठी मनात ठेवायच्या ?

चला तर मग, या वर एकच साधा आणि सरळ उपाय करू या काही लोकांना माफ करू या तर काही लोकांना काही गोष्टी विसरून जाउया..

आपण सगळे सांसारिक आहोत त्यामुळे आपल्याला संत तर नाही होता येणार, पण संतांनी सांगितलेल्या मार्गाने मात्र नक्की जाता येउ शकतं …
मित्रांनो आपण आज तर आहोत पण उद्या असू कि नाही ते आपल्या पैकी कोणालाच माहित नाही..तेव्हा मित्रांनो आयुष्य खूप साधं, सोपं आणि सरळ आहे..
फक्त मनातल्या गाठी काढू या… आणि सगळे मिळून एकच गाणं गाऊ या…

माणसाने माणसाशी माणसासम वागणे,
हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे.

https://bit.ly/367K9Ie
एका देशी बारमध्ये एक गुरुजी शिरतात__
पहिल्याच बेवडया मित्राला पकडतात आणि म्हणतात,
"दारू पिणे वाईट असते.... सोड पाहू!"
बेवडा मित्र : " सुळ गुरुजी तुम्ही कधी घेतली आहे का ?"
गुरुजी : "नाही कधीच नाही !"
बेवडा : "एकदा घेऊन पहा, नाही आवडली तर मी पिणे सोडीन !!"
गुरुजी : "ओ के ! पण चहाच्या कपातून द्यायला सांग ! उगाच लोकांनी मला पिताना पाहायला नको !"
बेवडा जातो गुत्याच्या मालकाकडे आणि कपात दारू मागतो.

मालक : *अरेच्या सुळ गुरुजी आले वाटतं* !
😳🤔😝😛😂😂😜
https://marathibestjokes.page.link/qL6j
ऊसाला झाली दोन दोन पोरं,
मोठा मुलगा ‘गुळ’ 👨🏾‍🦱 अन्
धाकटी मुलगी ‘साखर’ 👩‍🦳

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,
गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर 😀

साखर तशी स्वभावाला गोड,
तिच्यात उणेपणा शोधणं अवघड 😉

गुळ मात्र स्वभावाला चिकट,
समोर दिसला की ईतरांना वाटे संकट 😅

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई,
गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही 😧

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,
गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ‘ओबडधोबड’ 😆

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,
बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले 😍

तीला झाला एक मुलगा
दिसायला होता तो गोरागोरा,
यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले ‘शिरा’ 😘

ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची,
त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? 🤔

ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग,
सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग 😥

बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना,
काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना 😔

ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप 🤓
त्याने प्रयत्न केले खुप,
अन् ऊसाला आला हुरुप 🤪

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,
जी दिसायला होती बेत्ताची 🥰

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,
होते ऊसाच्या तोलामोलाचे,
ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे 😁

अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड,
रुपाला साजेसे, नांंव होते तीचे ‘भरड 🤩

गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना,
तो कशाला करतो नसत्या वल्गना ? 😂

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,
लग्न जमले अन् सारे तयारीला लागले 😎

किचन ओटा झाला,
लग्नासाठी बुक,
स्वयंपाकघर पण सजविले खुप 😌

‘भरड’ ला तूप कढईत घेउन गेले,
तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले 🙆‍♂️

भरपुर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी,
गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’ 🥰

लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले,
अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले ☺️

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश 🥳

मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला,
‘भरडी’ चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला 😇

काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता,
कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता 😋

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,
थाटामाटात बारसे झाले,
नांव ठेवले लापशी 💃

आवडली ना !!!😊😊😊🤣🤣🤣

https://bit.ly/3jNfKa7
स्वामी विवेकानंदांच्या वाणीमध्ये जितकं बळ होतं त्यापेक्षा कैकपटीने सामर्थ्य त्यांच्या पायांमध्ये होतं. अखंड भारत पिंजून काढल्यानंतर प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. त्याप्रमाणेच पुजनीय तात्यांनी वारी हा जीवनाचा मुलमंत्रच बनवला आहे. शौर्याची उपासना करण्यासाठी कधी पु. तात्यांनी आग्रा ते राजगड ही वारी केली, त्याग आणि बलिदानाची उपासना करण्यासाठी तात्यांनी धर्मवीरगड ते तुळापूर ही वारी केली. छ.संभाजीराजांच्या त्यागाचे स्मरण ठेवून चालताना तात्यांबरोबर असलेले हजारो आधुनिक मावळे अनवाणीच होते आणि मुक्कामाच्या ठिकाणी चटणी-भाकर खाऊन इतिहासाचे स्मरण करत होते. व्यसनामुळे समाजाची आणि लाखो कुटुंबाची होळी रोखण्यासाठी तात्यांनी शेकडो गावांमध्ये व्यसनमुक्तीची वारी सुरू केली. अनेक गावातील माता-माऊल्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त युवक संघाने गावोगावी दारूबंदी केली.

देशभक्ती देवभक्ती उरामध्ये भरून असलेला तरुणच देशाचा उद्धार करू शकतो या भावनेने पु.तात्यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमी मध्ये प्रत्येक गडकोटाच्या पायथ्याशी युवकांच्या संस्काराची वारी सुरू केली. या संस्कार शिबिरांमध्ये हजारो युवक गेल्या 20 वर्षांपासून उज्वल भविष्यासाठी संस्काराची जन्मभर पुरणारी शिदोरी बांधून घेत आहेत.
“होईन भिकारी ! पंढरीचा वारकरी!” या जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाला आदर्श मानून तात्यांनी पंढरीच्या विठुरायाची वारी तब्बल ५० वर्षे सांभाळली. हातामध्ये वारकरी पताका, गळ्यामध्ये टाळ, कमरेला उपरणे, चेहऱ्यावर वारकऱ्याची मुद्रा आणि मुखामध्ये ज्ञानोबा-तुकोबांचे नाम घेऊन वेगाने चालणाऱ्या पु.तात्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा असतो. आपल्या कार्यकर्तृत्वाचा कोणताही अभिमान न बाळगता हजारो वैष्णवांचा मेळा करून हरी भजनाचा गजर करणारे तात्या आधुनिक सत्पुरुष शोधतात.

“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास! कठीण वज्रास भेदू ऐसे!” या संत वचनाप्रमाणे खांद्यावर पताका घेणारा वारकरी नाठाळांना त्याच पताकेच्या उलट्या काठीने वठणीवर आणू शकतो हे पु.तात्यांनी महाराष्ट्राला वेळोवेळी दाखवून दिले आहे. ज्यावेळी बारावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुकोबारायांचा अपमान झाला तेव्हा शिक्षण मंडळाला धारेवर धरणारे पु.तात्याच होते! जेव्हा तुकोबारायांची तपोभूमी असलेला भामचंद्र डोंगर गिळून ‘डाऊ केमिकल कंपनी’ या राक्षसाचा जन्म होणार होता, तेव्हा सबंध कंपनी जाळून भस्मसात करणारे अग्निपुरुष तात्याच होते! पु.डोंगरे महाराज म्हणायचे,”गाईच्या रक्तानं माखलेल्या मातीमध्ये समाज सुखानं नांदू शकत नाही!” म्हणूनच संभाजीनगर येथे ‘गोवंश हत्याबंदी निर्धार’ मेळाव्यामध्ये १०,००० वारकऱ्यांबरोबर गौरक्षणाचा मूलमंत्र देणारे गोभक्त पु.तात्याच होते! महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गोरक्षणासाठी भर रात्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या महापूजेपासून रोखणारे वीर वैष्णव तात्याच होते! पंढरपुरातील मंदिर समितीचे अध्यक्ष स्वतः वारकरी असावे हा आग्रह धरणारे सत्याग्रही पु.तात्याच होते! सरकारकडून दिला जाणारा पद्मश्री हा गौरव पुरस्कार लीलया त्यागणारे पु. तात्याच होते.

देशभरामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्रांमध्ये हजारो वारकऱ्यांना त्या-त्या राज्यांमध्ये नेऊन वारकरी संप्रदायाची भजननिष्ठा, साधननिष्ठा, संत ग्रंथांची अक्षर उपासना सोशल मीडियाचा आधार न घेता दुरदुरपर्यंत पोहोचवणारे आधुनिक वारकरी म्हणजे पु.तात्याच आहेत!
लाखो रुपयांचा चुराडा करून नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी स्व.राजीवजी दीक्षित गुरुकुल उभारून देशभक्ती, देवभक्ती, स्वावलंबनाचे, व्यवसायाचे धडे देणारे क्रांतदर्शी समाजशिक्षक म्हणजे पु.तात्या !

अन्यायाचा विरोध आणि प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करण्याचं तळपतं साधन म्हणजे लेखणी ! लोकमान्यांनी लेखणीच्या जोरावर सरकारवर वाभाडे काढले. म.फुलेंनी लेखणीच्या जोरावर सरकारचे डोके ठिकाणावर आणले. त्याच पद्धतीने आपल्या अभ्यासपूर्ण प्रखर लेखांनी समाजाला वेळोवेळी योग्य दिशा देणारे द्रष्टे व्यक्तिमत्व म्हणजे पु. बंडातात्या !
‘इतिहासाचा आंधळा अभिमान हा शाप आहे पण इतिहासाचे घोर अज्ञान हा घोर अपराध आहे’ या विचारसरणीला अनुसरून जन्मभर छ.शिवरायांचे चरित्र अनेक शिबिरातून युवकांच्या हृदयात उतरवणारे पंढरीचे वारकरी आणि शिवबांचे धारकरी म्हणजे पु.तात्या !
‘मेरा मन स्वदेशी मेरा तन स्वदेशी! मरनेके बाद मेरा कफनभी स्वदेशी!’असं म्हणून स्वदेशीचा प्रचार,प्रसार करणारे स्वदेशभक्त म्हणजे पु.तात्या !
वारकरी संप्रदायातील त्याग, संप्रदायनिष्ठा आणि चारित्र्यसंपन्न जीवनाचे मूर्तीमंत प्रतीक, व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक,युवक आणि युवती संस्कार सोहळ्यातून हजारो युवकांना प्रेरणा देणारे स्फूर्तिस्थान, गोरक्षा,गोसेवा आयुर्वेद,सेंद्रिय,शेती,भ्रष्टाचार निर्मूलन,अनेक धर्मरक्षक आंदोलने, गावोगावी दारूबंदी अशा राष्ट्रकार्यांनी भारलेले तेजस्वी जीवन म्हणजे पु.बंडातात्या !
“नाही भीडभाड तुका म्हणे सानाथोर!” या उक्तीप्रमाणे जगणारे संतवीर, युवकमित्र, प्रखर देशभक्त,निर्भीड निस्वार्थी स्वाभिमानी जीवन आणि अखंड वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान म्हणजे पु.बंडा तात्या! इतिहासाचे गाढे अभ्यासक, भागवत, महाभारत, रामायण, कपिलगीता प्रवक्ते, अशा असंख्य पैलूंनी दीपस्तंभाप्रमाणे ओजस्वी जीवन म्हणजे पु.तात्या !
समाजहिताची आंदोलने मोर्चे यामध्ये खंबीरपणे समाजहीताची बाजू घेणाऱ्या पु.तात्यांच्या आयुष्याचा अध्यात्मिक आणि सामर्थ्यशाली पाया वा. संप्रदायाच्या अध्वर्यूंच्या संत्संगतीने बनला आहे. कडाक्याच्या थंडीत अलकनंदेच्या काठावर अनुष्ठानपूर्वक परमभागवत डोंगरेजी महाराज यांचे भागवत श्रवण, ज्ञानेश्वरी उपासक पु. धुंडा महाराज देगलूरकर, गाथाभाष्यकार पु.शंकर महाराज खंदारकर, ब्रह्मीभुत विहेकर गुरुजी, गाथामूर्ती भोसरीकर माऊली,थोर विद्वान एकनाथ महाराज देगलूरकर,पु.भगवान मामा कराडकर अशा अनेक महात्म्यांचा संगतीने आकाराला आलेले निर्भीड,निस्पृह,निर्भीक अशा पद्धतीचं जीवन आपल्याला पु.तात्यांकडे पाहिल्यावर नक्कीच दिसेल!

असं निस्वार्थी जीवन ज्या महात्म्याचं आहे व कोणत्याही प्रलोभनाला कधीच बळी न पडलेले समर्थ जीवन व वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेच्या उपासनेच्या नीष्ठेशी आजपर्यंत कधीही तडजोड न केलेलं हे असामान्य जीवन! आपला वारसा कोणीतरी पुढे चालवावा असा विचार स्वप्नातही ज्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही, गेल्या पन्नास वर्षांपासून अवघा महाराष्ट्र हजारो वेळा कीर्तनाच्या निमित्ताने भ्रमण करूनही कीर्तनानंतर पाकिटाचा आकार कधीच न पाहणारे आणि निस्पृहतेची प्रेरणा संप्रदायातील युवा कीर्तनकार यांना देणारे पु.तात्या, सरकारच्या विरोधात आणि गत दीड वर्षाच्या परिस्थितीने प्रभावित असलेल्या वर्तमान समाजमनाच्या विरोधात दगड टाकून अंगावर चिखल का उडवून घेतील? त्यांना प्रसिद्धीची गरज वाटतेय का? सरकारकडून कोणता पद हवं आहे का? संप्रदायाचे नेतृत्व करावयाचे आहे का? किंवा आपल्या संस्थेला सरकारकडून अनुदान घ्यायचे आहे का? वर सांगितलेल्या बाबींबद्दल, ज्यांनी तात्यांचे जीवन जवळून पाहिलेले आहे त्यांच्या मनामध्ये तिन्ही कालात त्याविषयी कधीही संदेह निर्माण करणार नाहीत ! याचे कारण “निस्पृहस्य तृणं जगत् !”या सूत्र वचनामध्ये सापडते ! वारकरी संप्रदायाचा पाईक व संतविचारांचा वाहक आणि श्रीगुरु, संतवीर बंडा महाराज कराडकर यांच्याकडून प्रेरणा घेणार्‍या माझ्यासारख्या वारकऱ्याला विनम्रपणे हे सांगावे वाटतं “सोशल मिडिया वाचाळवीरांनो तात्यांच्या विषयी व्यक्त होताना वाणीला थोडा आवर घाला!”

त्यामुळेच आपला पुण्यक्षय व वाचिकपाप यापासून बचाव होण्याची शक्यता आहे! हिमालयाची अध्यात्मउंची,भीष्मांची सत्यता, शुकांचे चारित्र्य, गंगेची निर्मलता ज्ञानराजांची कृपालुता, तुकोबारायांचे वैराग्य, छ.संभाजीराजांचा धर्माभिमान, भगतसिंगांची देशभक्ती व सावरकरांची विज्ञाननिष्ठा या सर्व दैवी गुणांचे दर्शन वर्तमानात एकाच महापुरुषाचा दर्शनाने होते; त्या सत्पुरुषाचे नाव म्हणजे संतवीर श्रीगुरु बंडातात्या कराडकर !! म्हणून समारोपाला एकच सांगेन संत ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचे अनुसरण करणे हेच आम्हा युवा वारकऱ्यांचे कर्तव्य !! त्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न उरला कुठे ?
“तेणेची पंथे चालो जाता l न पडे गुंता कोठे काही ll

(कार्यकर्ता, व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र )
रामकृष्णहरी

https://bit.ly/3wf5pGt
एका अमेरिकन मॉल मधे मालक एका नविन सेल्समन वर ओरडत होता. दिवसभरात फ़क्त एक ग्राहक केले म्हणून.

मालक – “इतर सेल्समननी 20 ते 25 ग्राहक केलेत आणि तू फ़क्त एकच?
किती विक्री केलीस तू ??”

सेल्समन – “$ 99,200 !!”

मालक – “काय? काय म्हणतोस? काय विकलंस तू त्याला.”

सेल्समन – “एक मासेमारी करण्याचा गळ, एक मोठा फिशिंग rod, एक फिशिंग boat, एक ट्रक, एक तंबू, एक बार्बिक्यू, काही किचन वस्तु, एक बेड, एक चादर, एक उशी, एक ऑक्सीजन सिलिण्डर.”

मालक – “पण तो तर मासेमारीचा गळ विकत घ्यायला आला होता, मग हे सर्व तू त्याला विकलं?”

“सर, तो तर डोके दुखतंय म्हणून टेबलेट घ्यायला आला होता !!”

मालकाने हात जोडले व म्हणाला,
“हे मला समजून सांग.”

सेल्समन – “मी त्याला डोके दुखण्यावर मासेमारी हा मन रमविण्याचा चांगला पर्याय आहे व टेबलेटचे दुष्परिणाम सांगितले. मग त्याने गळ विकत घेतला. नंतर त्याला विचारले, तुम्ही मासेमारीसाठी कशाने जाणार? मग त्याला बोट विकली. आता बोट घरी कशी घेऊन जाणार? मग त्याला ट्रक विकला. मासेमारीसाठी गेल्यावर राहणार कुठे म्हणून तंबू विकला, रात्री खाणार काय मग बार्बिकु विकला. रात्री झोपायला बेड आणि इतर वस्तु विकल्या. अजुन मला त्याला मछरदानी, सकाळी उठल्यावरचे लागणारे सामान, अंघोळीसाठी लागणारे साहित्य, गारमेंट्स विकायचे होते.”

मालक – “मग ?

सेल्समन – “त्याच्याकडचे पैसे बोट घेतल्यावर संपले होते. मग credit कार्ड वर ट्रक घेतला. पर्सनल loan करुन बाकी सामान घेतले बिच्याऱ्याने. उरलेले सामान घ्यायला तो उद्या येणार आहे. सोने विकतो म्हणाला.”

मालक –
“तू या आधी कोठे काम करत होता रे ??”

सेल्समन –
“सर, मी भारतात मोठ्या हॉस्पिटल मधे PRO होतो.
साधा ताप आला तरी आम्ही त्याला पहिल्यांदा Covid टेस्ट, मग CT SCAN, X-ray, MRI, 2D eco, troponin, नंतर LFT, all blood test. या एडमिट व्हायच्या आधीच्या test!! नंतर पैश्यासाठी त्याला लोन देणाऱ्याचा नंबर द्यायचो, नंतर उरलेल्या test. मग एडमिट करुन घ्यायचो. मग त्याची बायको सोने विकायची, मग इतर test,….”

🤗😂
https://bit.ly/3qRnJ7v
एखाद्याच्या मनात कायमच
राहायचं असेल तर
त्याच्याकडून...


पैसे उधार घेऊन टाका आणि
ते पैसे परत कधीच नका
देऊ..
🥶😬🥶😬😳😬🤪🥴😝
डोळ्यांत पाणी आणणारा लेख.. 👍👌😔

बाबांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेने एक हास्य उमलले.
त्यांचे हास्य पाहून असे वाटले की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेव्हढा प्रसन्न झाला नसेल तेव्हढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल.

बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली.
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”🙏❤️🚩

https://bit.ly/3y6bfvS
*गल्लीत लग्न होतं..*
*आम्हाला बोलावणं नाही आलं..*


*पण शांत बसण्या शिवाय पर्याय नव्हता.*

*दूर गार्डन पाशी ऊभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो.*


*जशे ५० क्रॉस झाले, तसा पोलिसांना फोन लावला...*

.
.

.
*मंग राग नई येत का भो..... माणुसले*😡😡
😜😂🤣🤓🧐🌞🪔🐅🗝🧐🧐😃😃😜