मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
33.8K subscribers
2.71K photos
79 videos
429 files
412 links
❊◆❊ संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दधन ❊◆❊

# मार्गदर्शक : यशवंत मारुतीराव सोलाट ( पुणे )

➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 9763603597

★ व्याकरण व वाक्यरचना
★ म्हणी व वाक्प्रचार
★ सर्वसामान्य शब्दसंग्रह
Download Telegram
संपूर्ण मराठी व्याकरण वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे


15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

86)पोटात तुटणे - वाईट वाटणे

87)नख लावणे - नाश करणे

88)डोळो निवणे - समाधान होणे

Join @MayboliMarathi
Forwarded from MPSC Pune
'गर्दीपेक्षा दर्दी भारी, दर्दी पेक्षा वर्दी लय भारी...."

PSI Law आणि मराठी व्याकरण

Online Batch

मार्गदर्शक:
उत्तम पवार सर (PSI Law)
यशवंत सोलाट सर (मराठी व्याकरण)

इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील नंबर वर रजिस्ट्रेशन करावे...

संपर्क: 9881878498/9518788364
कोरोनामुळे ऑनलाइन शाळा सुरु झालीए, मग आता
👧👦
नवीन बाल गीत😀😀😀

सांग सांग गूगलनाथ
माऊस अडकेल काय,
कॉम्प्युटर हा बंद पडून
सुट्टी मिळेल काय?
सांग सांग गूगलनाथ...

गूगलनाथ, बाईंचा
माईक बिघडेल काय,
ओरडून ओरडून शिकवताना
घसा बसेल काय?
गूगलनाssथ, गूगलनाथ!...

गूगलनाथ, गूगलनाथ
खरं सांग एकदा
आठवड्यातून वायफाय बंद
पडेल का रे तीनदा
गूगलनाssथ, गूगलनाथ!...

गूगलनाथ उद्या आहे
गणिताचा पेपर
वीज पडून इंटरनेटची
तुटेल का रे केबल?
गूगलनाssथ, गूगलनाथ!...

गूगलनाथ पुरे झाली
स्क्रीनवरची शाळा
मित्र नाही, दंगा नाही,
आलाय रे कंटाळा
गूगलनाssथ, गूगलनाथ!...
😂😂😂
⭕️ महाभरती साठी अत्यंत उपयुक्त ⭕️

1) " नवल " हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल ?

1) नवलाकडे
2) नवलाचे
3) नवलाई
4) नवलाईने

2) " सुलभा " हे कोणते नाम आहे ?

1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) सर्वनाम

3) " गोडवा " या शब्दाचा प्रकार सांगा.

1) नाम
2) भाववाचक नाम
3) विशेषण
4) सर्वनाम

4) " भारत " या शब्दाची जात ओळखा ?

1) सामान्यनाम
2) समूहवाचक नाम
3) विशेषनाम
4) गरिबी

5) शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्यनाम शब्द ओळखा.

1) शहर
2) शांतता
3) सौदर्य
4) श्रीमंती

6) " त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. "या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे .

1) सर्वनाम
2) उभयान्वयी अव्यय
3) विशेषण
4) नाम

7) शब्दाचा प्रकार ओळखा -"पर्वत "

1) सामान्यनाम
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) विशेषण नाम

8) "आपल्या " या शब्दाचे भाववाचक रूप कोणते ?

1) आपण
2) आपुलकी
3) आम्ही
4) आपली

9) विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) अनेकवचनी
2) एकवचनी
3) बहुवचनी
4) यापैकी नाही

10) पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा :

1) सैन्य
2) साखर
3) वर्ग
4) कळप
📚 मराठी व्याकरण : वाक्प्रचार व अर्थ

AbhyasTeAdhikari I Comp.Exam


सर्वस्व पणाला लावणे
: सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे

साखर पेरणे
: गोड गोड बोलून आपलेसे करणे

सामोरे जाणे
: निधड्या छातीने संकटास तोंड देणे

साक्षर होणे
: लिहिता-वाचता येणे

साक्षात्कार होणे
: आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

हस्तगत करणे
: ताब्यात घेणे

सोन्याचे दिवस येणे
: अतिशय चांगले दिवस येणे

सूतोवाच करणे
: पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे

संधान बांधने
: जवळीक निर्माण करणे

संभ्रमात पडणे
: गोंधळात पाडणे

स्वप्न भंगणे
: मनातील विचार कृतीत न येणे

स्वर्ग दोन बोटे उरणे
: आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे

हट्टाला पेटणे
: मुळीच हट्ट न सोडणे

हमरीतुमरीवर येणे
: जोराने भांडू लागणे

हरभऱ्याच्या झाडावर चढणे
: खोटी स्तुती करून मोठेपणा देणे


© संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
​​ मराठी व्याकरण : संधी आणि संधीचे प्रकार

@maybolimarathi I Comp.Exam


📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी व्याकरण हा विषय अभ्यासाने अगत्याचे ठरते. या विषयातील संधी आणि संधीचे प्रकार हा घटक आज समजावून घेऊन.

🗣 संधी : संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.

🧐 संधीचे प्रमुख प्रकार :

1) स्वरसंधी : स्वरसंधी: एकमेका शेजारी येणारे वणग जर स्वर असतील तर त्याला 'स्वरसंधी' म्हणतात.

उदा . विद्यार्थी = विद्या + अर्थी

2) व्यंजनसंधी : जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला 'व्यंजनसंधी' असे म्हणतात.

उदा . वाक्चातुर्य = वाग्+चातुर्य

3) विसर्गसंधी : एकत्र येणाऱ्या पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण किंवा विसर्ग असेल तर तयार होणाऱ्या संधीला विसर्गसंधी म्हणतात.

उदा . दुर्वासन = दुः + वासन

काही महत्त्वाच्या म्हणी #Marathi

1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.

2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.

3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.

4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.

5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.

6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.

7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.

9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.

10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.

11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.

12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.

13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.

14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.

15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.

16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.

17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.

18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.

19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.

20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.


सामील व्हा @MayboliMarathi
t.me/lionmission

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
सदर चॅनल हा उत्तम पवार सर व यशवंत सोलाट सर यांच्या नवीन सुरू होणाऱ्या बॅच संदर्भातील आद्यवत माहिती देण्यासाठी सुरू केलेला आहे.

आपण हा चॅनेल जॉईन करून आमच्या संपर्कात राहा. 👍
​​ मराठी व्याकरण : संधी आणि संधीचे प्रकार

@maybolimarathi I Comp.Exam


📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी व्याकरण हा विषय अभ्यासाने अगत्याचे ठरते. या विषयातील संधी आणि संधीचे प्रकार हा घटक आज समजावून घेऊन.

🗣 संधी : संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.

🧐 संधीचे प्रमुख प्रकार :

1) स्वरसंधी : स्वरसंधी: एकमेका शेजारी येणारे वणग जर स्वर असतील तर त्याला 'स्वरसंधी' म्हणतात.

उदा . विद्यार्थी = विद्या + अर्थी

2) व्यंजनसंधी : जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला 'व्यंजनसंधी' असे म्हणतात.

उदा . वाक्चातुर्य = वाग्+चातुर्य

3) विसर्गसंधी : एकत्र येणाऱ्या पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण किंवा विसर्ग असेल तर तयार होणाऱ्या संधीला विसर्गसंधी म्हणतात.

उदा . दुर्वासन = दुः + वासन

1) ‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे ......................... क्रियापद आहे.

1) संयुक्त
2) शक्य
3) करणरूप
4) प्रयोजक
2) ‘तिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे ?

1) सिध्द क्रियाविशेषण अव्यय
2) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
3) प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
4) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
3) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘निशी’

1) कैवल्यवाचक
2) कालवाचक
3) साहचर्यवाचक
4) तूलनावाचक
4) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही.

1) कारणबोधक
2) विकल्पबोधक
3) न्यूनत्वबोधक
4) परिणाम बोधक
5) खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?

1) वाग, अहा
2) अरेरे, आईगं
3) शाबास, वाहवा
4) फक्त छे, छटं
मराठी व्याकरण
मार्गदर्शक
यशवंत सोलाट ( पुणे )
मो. 9763603597

https://www.facebook.com/eMPSCkatta/videos/554428311916546/?app=fbl

यशवंत सोलाट सर यांचा मराठी व्याकरणचा क्लास पुण्यामध्ये फेमस आहे.

वरील लिंक वरील व्हिडीओ MPSC तसेच इतर सर्व सरळसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे. सर्वांनी अवश्य पहावा..

मराठीची भीती अवश्य निघून जाईल.
त्यामुळे व्हिडीओ एकदा नक्की पहाच आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

खाली त्यांच्या मराठीच्या दर्जेदार टेलिग्राम चॅनेल ची लिंक देखील देत आहोत. नक्कीच जॉईन व्हा.

जॉईन टेलिग्राम चॅनेल 👍
@MayboliMarathi
@ClassBookAppAdv
📕 Join 👉@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

🚦
मांजर
🚦मानव
🚦कोल्हा
🚦गाय

उत्तर : गाय

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

🚦स्वातंत्र्य दिन
🚦युवा दिन
🚦प्रजासत्ताक दिन
🚦बालिका दिन

उत्तर : प्रजासत्ताक दिन

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

3. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
सोने

🚦हेम
🚦केसरी
🚦रम्य
🚦तर

उत्तर : हेम

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

4. 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

🚦एक
🚦दोन
🚦तीन
🚦चार

उत्तर : चार

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

5. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

🚦तुम्हीही
🚦काका
🚦बसा
🚦आमच्याजवळ

उत्तर : बसा

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

6. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

🚦पोलीस
🚦धूसर
🚦मुकुट
🚦टिळा

उत्तर : टिळा

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

7. 'अष्टपैलू' - या शब्दाचा अर्थ.

🚦आठ कलेत पारंगत
🚦एका कलेत पारंगत
🚦पैलू पाडणारा
🚦सर्व कलांत पारंगत

उत्तर : सर्व कलांत पारंगत

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

8. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

🚦पाऊल
🚦पिल्लू
🚦घोडा
🚦गाढव

उत्तर : घोडा

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

9. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

🚦पिता
🚦भ्राता
🚦देवता
🚦नेता

उत्तर : देवता

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

10. 'जनक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

🚦जानकी
🚦जननी
🚦जनका
🚦जनकी

उत्तर : जननी

📕 Join 👉
@MayboliMarathi
━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━