MasterClass IAS™️
433 subscribers
673 photos
1 video
62 files
192 links
Answer writing practice - quality facts collection - effective utilization of data - capacity building - confidence booster - current affairs oriented - value addition to your study - useful for UPSC aspirants as well.
Download Telegram
यकृत (Liver) – सविस्तर माहिती

🔹 व्याख्या

यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव असून ते उजव्या वरच्या पोटाच्या भागात (Upper Right Abdomen) स्थित आहे. यकृताला शरीराचे डिटॉक्सिफिकेशन केंद्र म्हणतात.



📍 रचना व स्थान (Structure & Location)
• पोटाच्या उजव्या वरच्या चतुर्थांशात स्थित
• दोन प्रमुख खंड:
उजवा खंड (Right Lobe) – मोठा
डावा खंड (Left Lobe) – लहान
पित्ताशयाशी (Gallbladder) जोडलेले
• रक्तपुरवठा:
हेपॅटिक आर्टरी
पोर्टल शिरा (Portal Vein)
हेपॅटिक शिरा



⚙️ यकृताची मुख्य कार्ये

1️⃣ चयापचय (Metabolism)
• कर्बोदके, मेद व प्रथिने यांचे चयापचय
• ग्लुकोज → ग्लायकोजन मध्ये रूपांतर

⸻Join us @masterclass19

2️⃣ विषहरण (Detoxification)
• अल्कोहोल, औषधे, अमोनिया, विषारी पदार्थ रक्तातून काढून टाकणे



3️⃣ पित्तनिर्मिती (Bile Production)
• पित्त तयार करते
मेदांचे पचन सुलभ करते
• पित्त साठवण → पित्ताशय



4️⃣ साठवण (Storage)
• जीवनसत्त्वे: A, D, B₁₂
• खनिजे: लोह (Iron)
• ऊर्जा साठा: ग्लायकोजन



5️⃣ प्रथिन निर्मिती (Protein Synthesis)
अल्ब्युमिन – द्रव संतुलन
रक्त गुठळ्या बनवणारी घटक (Clotting factors)

⸻Join us @masterclass19

6️⃣ रोगप्रतिकारक कार्य (Immunity)
Kupffer पेशी
• जंतू व विषाणू नष्ट करतात



🩺 यकृताचे आजार
1. हिपॅटायटिस (Hepatitis)
• यकृताची सूज
2. सिरोसिस (Cirrhosis)
• दीर्घकालीन नुकसानामुळे यकृतावर चट्टे
3. फॅटी लिव्हर (Fatty Liver)
• यकृतात मेद साठा
• स्थूलता, मधुमेहाशी संबंधित
4. लिव्हर कॅन्सर
• यकृतातील ट्युमर



🧠 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (MCQ Ready)
• सर्वात मोठे अंतर्गत अवयव → यकृत
• यकृताचे स्थान → उजवा वरचा पोटाचा भाग
• पित्ताचे कार्य → मेदांचे पचन
• अल्ब्युमिन निर्मिती → यकृत
• यकृतावर कायमस्वरूपी चट्टे → सिरोसिस
Join us @masterclass19
1
शिस्त ….संघर्ष ….विजय….



@masterclass19 🔥
👍41
🚨सर्व अडथळ्यांना न जुमानता तू इथपर्यंत आलास—कारण तू थांबला नाहीस.
.
.

उद्या परीक्षेला आत्मविश्वास, शांत मन आणि धैर्याने सामोरा जा.✌🏻
.
.
तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव; उत्तरांमधून आजवरचा प्रत्येक संघर्ष बोलू दे.🔥
.
.
Rise. Write. Win. 🌟✍️
@masterclass19
1
🔴US-Venezuela Conflict

5 MUST-KNOW Aspects about Venezuela to understand what's going on...

• Geographical features
• Bordering Countries
• Oil Reserves
• US Policy: Monroe & “Donroe" Doctrine
• International Organisations membership

@MasterClass19
1
Forwarded from Swarajya Content Hub
संयुक्त_पूर्व_परीक्षा_2025.pdf
21.3 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

आज झालेला पेपर
👆👆
The Indian Army, under the aegis of Trishakti Corps, establishes a 10 kW solar power plant at Muguthang village, located at an altitude of approximately 15,000 feet near the India–China border in North Sikkim.

@MasterClass19:
3
मग ही भयाण शांतता
आवडू लागेल तुम्हालाही...
अगदी मनापासून .....

मेंदूत घोंगावणारं विचारांचं वादळ
कुणाची मन तर दुखावली जाणार नाहीत ना ..आपल्या शब्दांनी ..आपल्या कृतींनी?
याच विचाराचं काहूर नेहमीच माजलेलं ...

खरंतर या सगळ्याचा कुणाला काहीच फरक पडत नाही ...आपणच अनावश्यक जास्त विचार करतो ...अमूल्य वेळ वाया घालवतो ...आणि दोष मात्र नशिबाला देतो ..नशीब ....ज्याचं अस्तित्वच नगण्य आहे ...

तुम्ही निघालेल्या प्रवासाला ...तुमच्या सोबत असणारी,चालणारी लोकं अचानक गायब होतात ...कदाचित तुमची वेळ ...तुमची स्थिती...याला कारणीभूत असावी..लोकं पसार झाल्यानं ...पसरते एक निरव शांतता..जी भयाण वाटू लागते ...मग तुम्ही फसता एका दृष्टचक्रामध्ये ...गर्दीतही तुम्ही एकटे असता ...आणि एकांतात विचारांची गर्दी ...

पण या सगळ्याला अर्थ नसतो ...तुम्हांला या जगाबद्दल जी भावना आहे तीच जगानेही तुमच्याबद्दल बाळगावी हा काही नियम नाही ना ...

सरतेशेवटी उरते तीच नकोशी शांतता ...या शांततेनं आता आक्राळ रूप धारण केलेलं असत ...पण आपण थांबायचं नाही..एकच जागी पडून राहायचं नाही ...चालायचं ...जिवाच्या आकांतानं...रडू आलं तर रडायचं ...पण चालत राहायचं ..
एका वळणावर जीवघेणी भयाण शांतता पुन्हा सापडेल ...नवीन रूपात ...सुरुवातीला गर्दीत राहणाऱ्यांना त्रास होतो ...पण नन्तर सवय होते ...तेव्हाही चालत राहायचं ...अशा वळणांवर कुणीतरी येईल सोबत चालायला ...हा विचार पण निरर्थक ...अगदीच निर्रथक ...

या भयाण शांततेत तुम्ही एकटे नाहीत ...खूप जण चालतायत ...पण कोणच कोणाला दिसत नाही किंबहुना पाहत नाही...कोण दिसलाच दुर्लक्ष करणाऱ्यांचीच संख्या जास्त ...पण तुम्ही तस करू नका .... तर दोन पावलं का होईना ...सोबत चाला.. त्याला साथ दया..त्याच्या मंदावलेल्या पावलांना थोडं का होईना पण बळ मिळेल ...

याच शांततेत...खूप गोष्टी..व्यक्ती ..परिस्थिती..वर्तणूक ..शब्द ..कृती .. नजरेसमोरून तरळून जातील ..पण आपल्याला फरक पडत नाही ...कसलाच...कोणाचाच ...या अविर्भावात चालायचं ...चेहऱ्यावर गूढ हास्य घेऊन ...आत खोलवर अगदी वणवा लागला असला तरी ...आग धुमसत राहील काही काळ ...पण होईल शांत तीही ..आग अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेली नाही ...

या नंतर तुमच्या मनाला एक अवस्था प्राप्त होईल ...ज्यात तुम्हांला ....
ना कोणाकडून अपेक्षा
ना कोणाची आपल्याकडून उपेक्षा
ना कोणाविरुद्ध जिंकण्याची इच्छा
ना कोणाला हरवण्याची इर्ष्या ...
हे सारं काही वाटू लागेल ...त्यानंतर थोडं पुढे सरकाल तुम्हांला पुन्हा लाभेल ... तीच अवघड शांतता ...

आता या सगळ्या थरार नाट्यांनंतर ही शांतता तुम्हांला आपलीशी वाटायला लागेल ...ज्यात लोकं नसतील ...विचार नसतील ...सवयी नसतील...फक्त तुम्ही असाल ...तुमच्यासाठी ....तुमची तुम्हांला नव्याने ओळख करून देण्यासाठी ...

या सगळ्या भयानक नाट्यात सुरू होईल स्वतःला ओळखण्याचा नवा अध्याय ...जो रटाळ असेल सुरुवातीला ...एखाद्या रहस्यमयी कादंबरी सारखा ....पण वाचनाला वेग मिळाला की प्रत्येक उलटलेल्या पानाबरोबर उत्कंठा वाढत जाते...तश्या नवनवीन गोष्टी शोधायला लागाल ...स्वतःला पाहायला शिकाल...स्वतःबरोबर रमायला लागाल ...आता तुम्ही स्वतःबरोबर मैत्री कराल ...स्वतःला ओळखाल ...ही स्वतःची ओळख होणं ...म्हणजे ...कादंबरीचा शेवटी गोड होण्यासारखी भावना ..आता तुम्ही तुम्हांला ओळ्खताय ..अगदी नखशिखांत ....एकदा का तुम्ही तुम्हांला ओळखलं ...तुम्हांला तुमच्या बलाढ्य क्षमतांचा साक्षात्कार झाला ....

की ....

मग ही भयाण शांतता
आवडू लागेल तुम्हालाही
अगदी मनापासून .....

© Sagar Kamble STI
@ksagar19
@masterclass19
@missioncombined
3
🚨महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५:

🔴 SCIENCE ANSWERs
🔴

66. X-rays विधाने (True/False)
योग्य पर्याय: (1)
➡️ True, True, False, False

67. Match the pairs (Radioactivity)
योग्य पर्याय: (4)
Alpha particle → ²He⁴ (Helium nucleus)
Beta particle → Electron
Unit of radioactivity → Curie
Gamma rays → High energy photon

68. Latent heat of fusion
योग्य पर्याय: (3)

69. वातावरणीय थरांचा क्रम (Ground → Upwards)
योग्य पर्याय: (4)
➡️ Troposphere → Stratosphere → Mesosphere → Thermosphere

70. Aluminium चे मुख्य खनिज
योग्य पर्याय: (1) Bauxite

71. Carbon चा सर्वाधिक आढळणारा समस्थानिक (Isotope)
योग्य पर्याय: (4) 12

72. Dentalium कोणत्या संघात मोडतो?
योग्य पर्याय: (1) Mollusca

73. Catfish चे whisker-like projections
योग्य पर्याय: (2) Barbels

@masterclass19

74. Agnatha (primitive vertebrate)
योग्य पर्याय: (3) Petromyzon (Lamprey)

75. वनस्पती गट – उदाहरण जुळवा
योग्य पर्याय: (3)
Algae → Chlamydomonas
Bryophyte → Funaria
Pteridophyte → Lycopodium
Gymnosperm → Cycas

76. Phosphorus deficiency चे लक्षण
योग्य पर्याय: (3) Necrotic spots

77. Calcium metabolism मध्ये महत्त्वाचा घटक
योग्य पर्याय: (4) Boron

78. Blood clotting साठी आवश्यक Vitamin
योग्य पर्याय: (1) Vitamin K

79. ABO रक्तगटाचा शोध
योग्य पर्याय: (4) Karl Landsteiner

80. World Diabetes Day
योग्य पर्याय: (4) 14 November

@masterclass19
👍21
🔴फुकटचा सल्ला”-01🔥

अभ्यासाला नव्याने सुरुवात करत असाल तर शक्यतो स्वतः पुस्तक (GS) वाचून नोट्स काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

कोणतीही नोट्स स्वस्त आहेत, सोप्या मिळतात किंवा सगळे घेत आहेत म्हणून लगेच स्वीकारू नका.

कारण—
स्वतः वाचलेले पुस्तक तुम्हाला समज, तर्कशक्ती आणि आत्मविश्वास देते.
स्वतः काढलेल्या नोट्समध्ये तुमच्या विचारांची छाप असते, त्यामुळे त्या लक्षात राहतात.

इतरांच्या नोट्स तुम्हाला दिशा देऊ शकतात, पण गंतव्यापर्यंत पोहोचवतात ते स्वतःचे वाचनच.
शॉर्टकटच्या नादात पाया कमकुवत झाला, तर पुढचा अभ्यास टिकत नाही.

म्हणूनच—
📌 आधी मूलभूत पुस्तके
📌 नियमित वाचन
📌 स्वतःच्या शब्दांत नोट्स
📌 नंतरच रेडीमेड मटेरियल
@masterclass19
3🔥3
🔴 “फुकटचा सल्ला – 02” 💔➡️🔥

कुणालाही न दिसलेल्या
त्या शांत रात्री…
डोळ्यांत झोप नाही,
आणि मनात फक्त एकच स्वप्न.

कधी स्वतःवर राग,
कधी परिस्थितीवर अश्रू…
पण तरीही तुम्ही थांबला नाहीत.

आज ते सगळं विसरून जा.
कारण आजचा दिवस
तुमच्या संघर्षाची साक्ष आहे.

शांत श्वास घ्या,
एक क्षण …डोळे मिटा…
पेपर तुमचाच आहे,
आणि पोस्टही तुमचीच.


MPSC Group-C Prelim – मनापासून शुभेच्छा. 🌱

MasterClass IAS
📌 @masterclass19
🔥21
🔴 “फुकटचा सल्ला – 03

🏆शून्यातून अभ्यास सुरू करणाऱ्यांसाठी
….

प्रामाणिक प्रयत्न करणारे शिक्षक खूप आहेत, हे नक्की.
पण त्याचबरोबर टाळूवरचं लोणी खाणारेही कमी नाहीत.

सगळीकडे एकच दावा ऐकू येतो —
“आमच्या notes मधूनच 15/15… 12/12!”

प्रत्यक्षात Telegram notes, ready-made PDFs, “या notes मधूनच प्रश्न येतात” अशा जाहिराती तुमच्यासाठी नाहीत.Telegram notes वर फिरणाऱ्या बहुतेक notes या NCERT, State Board आणि standard reference books मधूनच उचललेल्या असतात.
फक्त नाव बदललेलं असतं, मांडणी बदललेली असते —
मजकूर तोच असतो.

याचा फायदा होतो तो
२–४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांना, कारण त्यांना आधीच संदर्भ, चौकट आणि परीक्षेची दिशा समजलेली असते.

पण नवीन विद्यार्थी? त्याच्यासाठी हे सगळं भ्रम आहे. Shortcut नाहीच.

दुसऱ्यांचे notes वाचून
कोणीही स्पर्धा परीक्षा जिंकलेली नाही.

कारण🖌️
• बाजारातले notes उत्तर देतात, पण विचार घडवत नाहीत.
• ready-made notes फक्त तात्पुरता आत्मविश्वास देतात, क्षमता नाही.
• परीक्षेत गुण मिळतात ते फक्त पाठांतरावर नाही, समज आणि मांडणीहेही तितकंच महत्त्वाचं आहे.

खरी तयारी सोपी नसते.
ती वेळ घेते.
ती त्रास देते.
पण तीच निकाल देते.

🏆
पहिल्या ६–८ महिन्यांत
वेग नाही, glamour नाही,
फक्त शिस्त, संयम आणि सातत्य लागते.

खरी तयारी म्हणजे —
📌 पुस्तक → समज → स्वतःचे मुद्दे → स्वतःची भाषा → स्वतःची मांडणी

जे स्वतः notes काढतात,
ते फक्त उत्तर लिहीत नाहीत,
ते प्रश्न फोडतात.

म्हणून लक्षात ठेवा —
“Notes विकत घेता येतात,
पण तयारी कधीच नाही.

🎯MasterClass IAS-A
YouTube Channel🌱
@masterclass19
4👍2
🔥4