MasterClass IAS™️
433 subscribers
673 photos
1 video
62 files
192 links
Answer writing practice - quality facts collection - effective utilization of data - capacity building - confidence booster - current affairs oriented - value addition to your study - useful for UPSC aspirants as well.
Download Telegram
📘 पंचायतराज – संबंधित कलमे (Articles 243 ते 243-O)

१) कलम 243 – व्याख्या (Definitions)

पंचायतराज संदर्भातील महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या.

२) कलम 243-A – ग्रामसभा (Gram Sabha)

ग्रामसभेचे अधिकार व कार्य.

३) कलम 243-B – पंचायत स्थापन (Constitution of Panchayats)

राज्यात तीन-स्तरीय पंचायतीची रचना.

४) कलम 243-C – सदस्यसंख्या व रचना (Composition of Panchayats)

पंचायत सदस्यांची संख्या, आसनवाटणी.

५) कलम 243-D – आरक्षण (Reservation)

SC/ST व महिलांसाठी आरक्षणाचे नियम.

६) कलम 243-E – पंचायतींचा कार्यकाळ (Duration)

५ वर्षांचा कार्यकाळ व विसर्जन.

७) कलम 243-F – अपात्रता (Disqualifications)

सदस्य होण्यासाठीची पात्रता/अपात्रता.

८) कलम 243-G – अधिकार व जबाबदाऱ्या (Powers, Authority & Responsibilities)

पंचायतींना देण्यात येणारे अधिकार — विषय, योजना, अंमलबजावणी.

९) कलम 243-H – महसूल (Finance of Panchayats)

कर लावण्याचे व उभारणीचे अधिकार.

१०) कलम 243-I – राज्य वित्त आयोग (State Finance Commission)

दर पाच वर्षांनी आयोगाची स्थापना.

११) कलम 243-J – लेखे व लेखापरीक्षण (Accounts & Audit)

लेखापरीक्षणाचे नियम.

१२) कलम 243-K – राज्य निवडणूक आयोग (State Election Commission)

पंचायत निवडणुका आयोजित करणे.

१३) कलम 243-L ते 243-O – विविध तरतुदी
• केंद्रशासित प्रदेशांसाठी तरतुदी
• कायद्यातील बदल
• न्यायालयीन हस्तक्षेपावर मर्यादा (Election matters)



📌 UPSC / MPSC साठी महत्वाची टिप:
• पंचायतराज व्यवस्था ७३ वी घटनादुरुस्ती (1992) द्वारे संविधानात समाविष्ट.
• कलमे 243 ते 243-O + ११वी अनुसूची (Eleventh Schedule – 29 विषय) अत्यंत महत्त्वाची.
• ग्रामसभा, वित्त आयोग, राज्य निवडणूक आयोग — वारंवार विचारले जाणारे मुद्दे.

Join us @masterclass19
2
🔴ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय!

16 वर्षाखालील मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी लागू करत ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश ठरला.

📱📱
📱📱📱📱
Important 1question expected
2👍1
🔴Alert:

मी अधिकारी होऊ शकतो, तर कोणीही अधिकारी होऊ शकतो’ हे वाक्य प्रेरणादायी नाही, तर दिशाभूल करणारं आहे.

इथे ‘कोणीही’ पास होत नाही, इथे फक्त जो रोज अभ्यास करतो तोच निवडला जातो.

यशाला अनेक बाप असतात;अपयश मात्र अनाथ असतं.

तुमची परिस्थिती, तुमचं दुःख, तुमची कथा मार्क्स वाढवत नाही. फक्त अभ्यास वाढवतो.

स्पर्धा परीक्षा प्रेरणेवर कोणीही पास होत नाही, इथे फक्त जो रोज अभ्यास
आज घाम गाळा, आज झोप कमी करा, आज स्वतःशी प्रामाणिक रहा—कारण उद्या नाव तुमचंच असेल, आणि कथा सांगणारे सगळे असतील.”

नियतीने वेळ वाढवून दिला आहे—हा बोनस वेळ आहे; आता सबबी नकोत, फक्त जबरदस्त revision करा आणि पेपर फोडून टाका.

All the best
K Sagar
State Tax Inspector
(Govt. of Maharashtra)
3
Kingdom Plantae)

व्याख्या

वनस्पती राज्यात बहुकोशिकीय, युकॅरियोटिक, स्वयंपोषी (Autotrophic) सजीवांचा समावेश होतो. हे सजीव क्लोरोफिलच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करून स्वतःचे अन्न तयार करतात. त्यांच्या पेशीभित्ती सेल्युलोजची बनलेली असते.

🧬 सामान्य वैशिष्ट्ये
✔️ बहुकोशिकीय (Multicellular)
✔️ युकॅरियोटिक पेशी
✔️ पेशीभित्ती : सेल्युलोज
✔️ पोषण : स्वयंपोषी (Photosynthesis)
✔️ अन्नसाठा : स्टार्च
✔️ हालचाल नाही


पिढ्यांची अदलाबदल (Alternation of Generations)

वनस्पतींच्या जीवनचक्रात दोन अवस्था आढळतात:
गॅमेटोफाइट (n) – लैंगिक पेशी तयार करतो
स्पोरोफाइट (2n) – बीजाणू तयार करतो



वनस्पती राज्याचे वर्गीकरण



1. थॅलोफायटा (Thallophyta / शैवाळ)

वैशिष्ट्ये
• शरीर थॅलससदृश (मुळे, खोड, पाने नसतात)
• प्रामुख्याने जलचर
• वाहक ऊती नसतात
• बीजाणूंनी प्रजनन

शैवाळांचे प्रकार

(अ) हरित शैवाळ (Chlorophyceae)
• रंगद्रव्य: क्लोरोफिल a, b
• अन्नसाठा: स्टार्च
• उदाहरणे: Chlamydomonas, Spirogyra

(आ) तपकिरी शैवाळ (Phaeophyceae)
• रंगद्रव्य: फ्यूकोझँथिन
• अन्नसाठा: लॅमिनॅरिन
• उदाहरणे: Sargassum

(इ) लाल शैवाळ (Rhodophyceae)
• रंगद्रव्य: फायकॉएरिथ्रिन
• अन्नसाठा: फ्लोरिडियन स्टार्च
• उदाहरणे: Gelidium

Join us @masterclass19



2. ब्रायोफायटा (Bryophyta)

वैशिष्ट्ये
• “वनस्पती जगातील उभयचर
• प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता
• खरी मुळे, खोड, पाने नसतात
• वाहक ऊती नसतात
गॅमेटोफाइट अवस्था प्रमुख

उदाहरणे
Riccia, Marchantia, Funaria

महत्त्व
• मृदिक्षय रोखतात
• परिसंस्थेतील अग्रगामी वनस्पती



3. प्टेरिडोफायटा (Pteridophyta)

वैशिष्ट्ये
• खरी मुळे, खोड, पाने असतात
• वाहक ऊती (Xylem व Phloem) असतात
• बीज नसतात, बीजाणूंनी प्रजनन
स्पोरोफाइट अवस्था प्रमुख

उदाहरणे
Fern, Selaginella

Join us @masterclass19



4. जिम्नोस्पर्म्स (Gymnosperms)

वैशिष्ट्ये
उघडी बीजे (फळ नसते)
• बहुतेक सदाहरित
• वाऱ्याद्वारे परागण
• स्पोरोफाइट अवस्था प्रमुख

उदाहरणे
Cycas, Pinus



5. एंजिओस्पर्म्स (Angiosperms / फुलझाडे)

वैशिष्ट्ये
• फुले व फळे असतात
• बीजे फळात बंद
दुहेरी फलन (Unique feature)
• सर्वात विकसित वनस्पती



एंजिओस्पर्म्सचे उपविभाग

(अ) एकबीजपत्री (Monocot)
• एक बीजपत्र
• समांतर शिराविन्यास
• तंतुमय मुळे
• उदाहरणे: तांदूळ, गहू

(आ) द्विबीजपत्री (Dicot)
• दोन बीजपत्रे
• जाळीदार शिराविन्यास
• मुख्य मुळ
• उदाहरणे: वाटाणा, सूर्यफूल

Join us @masterclass19
1