कुणीही तुमच्यावर ठेवलेल्या कोणत्याही विश्वासाचा विश्वासघात करत असताना, एकदा नाही तर हजार वेळा विचार करा, त्याने आपल्यावर हा विश्वास का ठेवला होता ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की चांगले आणी निस्वार्थीच मिळेल कारण, जिथ निस्वार्थ आणी निरपेक्ष भावना असतात तिथेच विश्वास ठेवला जातो . आणी ह्या प्रश्नाचे उत्तर मिळुनही जर तुम्ही कुनाचाही विश्वासघात करत असाल किंवा केला असेल तर एक लक्षात घ्या ज्याचा विश्वासघात झालाय किंवा करणार असाल तर तो व्यक्ती तुम्हाला व तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला विसरुनही जाईल पण ज्याने विश्वासघात केलाय तो मात्र स्वत:च्या मनाचा गुन्हेगार ठरतो आणी एकदा का कोणीही स्वत:च्या मनाचा गुन्हेगार झाला त्याला मिळणारी शिक्षा ही वेदने पेक्षा जास्त यातनादायी असते कारण केलेला विश्वासघात हा तुम्ही त्याच्याशी नाही तर तुमच्यातल्या माणसाशी केलेला विश्वासघात असतो म्हणून विश्वास ठेवताना आणी विश्वासघात करताना नेहमी विचार करा