मराठी व्याकरण
206K subscribers
8.29K photos
34 videos
333 files
555 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

कोल्हा काकडीला राजी.

Meaning:
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे.
From Marathi Mhani app:

कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.

Meaning:
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
★|| eMPSCkatta ||★

जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
🔹विरूध्द अर्थी शब्द


👉 अतिरेकीविवेकी
👉 रसिकअरसिक
👉 अतिवृष्टीअनावृष्टी
👉 उदयअस्त
👉 अनुकूलप्रतिकूल
👉 ककृशमंजुळ
👉 अधोगतीप्रगती
👉 गोडकडू
👉 अबोलबोलका
👉 अवनतीउन्नती
👉 अमृतविष
👉 नीतीअनीती
👉 आरंभशेवट
👉 अंहकारविनंम्रता
👉 आशानिराशा
👉 गर्विष्ठविनंम्र
👉 आळशीकामसू
👉 शूरभिञा
👉 आस्तिकनास्तिक
👉 आरामकष्ट
👉 इष्टअनिष्ट
👉 अब्रूबेअब्रू
👉 उंचबुटका
👉 आगमननिगृमन
👉 अवाॅचीनप्राचीन
👉 निरभ्रआभ्राच्छादित
👉 एकमतदुमत
👉 आयातनियात
👉 उलटसुलट
👉 आदरअनादर
👉 उपद्रवीनिरूपद्रवी
👉 आघाडीपिछाडी
👉 गुणअवगुण/दोष
👉 अपराधीनिरपराधी
👉 साकारनिराकार
👉 अशक्तसशक्त
👉 शकुनअपशकुन
👉 सुकाळदुष्काळ
👉 अपमानसन्मान
👉 सावधबेसावध
👉 साम्यवादभांडवलशाही
👉 अमावास्यापोर्णीमा
👉 हषृखेद
👉 अवघडसोपे
👉 विकासर् हास
👉 प्रकाशकाळोख
👉 विधवासधवा
👉 कंजुसउदार
👉 गध्यपध्य
👉 मंदचपळ
👉 सुरअसुर
👉 निःशस्ञसशस्ञ
👉 विघटनसंघटन
👉 स्वामीसेवक
👉 तेजीमंदी
👉 पापपुण्य
👉 खोलउथळ
👉 नागरीग्रामीण
👉 देवदानव
👉 कमालकिमान
👉 उचितअनुचित
👉 सुसंवादविसंवाद
👉 तप्तशीतल
👉 खंडनमंडन
👉 स्वातंञ्यपारतंञ्य
👉 ज्ञानअज्ञान
👉 पचनअपचन
👉 सासरमाहेर
👉 जहालमवाळ
👉 वियोगसंयोग
👉 संवादविवाद
👉 श्वासनिःश्वास
👉 सुसह्यअसह्य
👉 सुरसनिरस
👉 सबलदुबृल
👉 निंदास्तुती
👉 रणशूररणभीरू
👉 वंध्यनिंध्य
👉 आंतरजातीयसजातीय
👉 वरवधू
👉 स्थूलकृश
👉 सुरूपकुरूप
👉 ज्ञातअज्ञात
___________________________________
Join us @marathi
समास व त्याचे प्रकार

💠v) कर्मधारय तत्पुरुष समास :

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

🌅उदा.    

🌓नील कमल - नील असे कमल
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
 
🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓महादेव - महान असा देव

💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.

💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓महादेव - महान असा देव
 
🌓लघुपट - लहान असा पट
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन

💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓मुखकमल - मुख हेच कमल
 
🌓वेशांतर - अन्य असा वेश
 
🌓भाषांतर - अन्य अशी भाषा

💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓लालभडक - लाल भडक असा
 
🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
 
🌓काळाभोर - काळा भोर असा

💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.    

🌓वज्रदेह - वज्रासारखे देह
 
🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
 
🌓राधेश्याम - राधेसारखा शाम
 
🌓कमलनयन - कमळासारखे नयन

💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख
 
🌓नरसिंह - सिंहासारखा नर
 
🌓चरणकमल - कमलासारखे चरण
 
🌓हृदयसागर - सागरासारखे चरण

💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.   

🌓सुयोग - सु (चांगला) असा योग
 
🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
 
🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध

💠ए) रूपक कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.  

🌅उदा.    

🌓विद्याधन - विद्या हेच धन
 
🌓यशोधन - यश हेच धन
 
🌓तपोबल - ताप हेच बल
 
🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत
 
क्रमशः ..........
मराठी व्याकरण

🔹लिंगविचार

🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप*
*ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग
रुप एकारांत होते
उदा....
मुलगा -- मुलगी - मुलगे

पोरगा -- पोरगी - पोरगे

🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची
स्त्रीलिंगी रुपे होतात.
उदा...
कुंभार -- कुंभारीण
सुतार -- सुतारीण
पाटील -- पाटलीण
वाघ -- वाघीण
माळी -- माळीण

🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*.

उदा...
दास - दासी

वानर -- वानरी

तरुण - तरुणी

🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ*
*वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून
त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा...

लोटा - लोटी

गाडा - गाडी

दांडा -दांडी

🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय
लागून होतात.

उदा....

श्रीमान -- श्रीमती

युवा - युवती

भगवान - भगवती

🏀वरील बाबींचा सराव पाठातील
जितके जास्त शब्द घेवून करता येईल
तितके करावे.

🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर
करता येईल .
From Marathi Mhani app:

खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते.

Meaning:
आपण औदार्य दाखवायचे नाही आणि दुसरा कोणी दाखवीत असला तर त्याच्या आड यावयाचे.
From Marathi Mhani app:

खऱ्याला मरण नाही.

Meaning:
खरे कधी लपत नाही, ते कधीतरी उघड होईल.
From Marathi Mhani app:

खाटकाला शेळी धार्जिणी.

Meaning:
कठोर व्यक्तीला भिऊन सारे त्याच्या इच्छेनुसार काम करीत असतात.
From Marathi Mhani app:

खाण तशी माती.

Meaning:
आई-बापाप्रमाणेच मुले.
From Marathi Mhani app:

खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे.

Meaning:
बोलताना एक प्रकारे बोलणे व कृती करताना दुसऱ्या प्रकारे करणे.
From Marathi Mhani app:

खायला काळ आणि भु‌ईला भार.

Meaning:
निरुपयोगी माणूस.
From Marathi Mhani app:

खायला कोंडा अन् निजायला धोंडा.

Meaning:
भूक लागली की काण्याकोंडाही चालतो, थकल्यावर कोठेही झोप येते.
From Marathi Mhani app:

खा‌ई त्याला खवखवे.

Meaning:
वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते.
From Marathi Mhani app:

खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

Meaning:
मिळाले काही तर ते चांगलेच पाहिजे, नाहीतर काहीच नको.
From Marathi Mhani app:

खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे.

Meaning:
जो मनुष्य धमकीदारीने एखादी गोष्ट करतो तो त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार असतो.
From Marathi Mhani app:

खा‌ऊन माजावे पण टाकून माजू नये.

Meaning:
पैशांचा, संपत्तीचा गैरवापर करु नये.
From Marathi Mhani app:

खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.

Meaning:
लहान गोष्टीची उपेक्षा केल्यास भयानक परिणाम होत असतात.
From Marathi Mhani app:

खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.

Meaning:
आपली कुवत नसताना व्यवहार करणे.
From Marathi Mhani app:

खुंट्याची सोडली नि झाडाला बांधली.

Meaning:
कुठेही शेवटी बंधनातच असणे.