मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.

Meaning:
ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो, तोच दोष आपल्या ठिकाणी असणे अशी स्थिती.
From Marathi Mhani app:

आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे ते कारटे.

Meaning:
आपल्या माणसाचे कौतुक आणि दुसऱ्याबद्दल नावे ठेवण्याची वृत्ती.
From Marathi Mhani app:

आपला हात जगन्नाथ.

Meaning:
मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावर अवलंबून असतो.
From Marathi Mhani app:

आपली पाठ आपल्याला दिसत नाही.

Meaning:
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.
From Marathi Mhani app:

आपलीच नखे आपणांस विष होतात.

Meaning:
आपलीच कृत्ये आपणांस भोवतात.
From Marathi Mhani app:

आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.

Meaning:
दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वत:चे वाईट करुन घेणे.
1
From Marathi Mhani app:

आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.

Meaning:
कोणाविषयी प्रेम नसणे.
From Marathi Mhani app:

आपलेच दात अन् आपलेच ओठ.

Meaning:
शिक्षा करणारे आपणच आणि ज्याला शिक्षा करायची तोही आपल्यातलाच अशी अडचणीची परिस्थिती.
From Marathi Mhani app:

आपल्या आळवाची खाज आपणास ठाऊक.

Meaning:
आपले व्यंग आपणासच माहित असते.
From Marathi Mhani app:

आपल्या कानी सात बाळ्या.

Meaning:
एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखविणे.
नमस्कार मित्रानो ,

आपल्या चॅनेल ला किती स्टार द्याल ?

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा ,
त्यानंतर एक Telegram Channels Boat अशी स्क्रीन ओपन होईल ,
त्याच्या खाली तळाशी start वर क्लिक करा ,
तिथे तुम्हाला

⭐️
⭐️⭐️
⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️⭐️

असे स्टार दिसतील , त्यापैकी आपण आम्हाला किती रेटींग्ज ( तारांकित ) म्हणजे किती स्टार देऊ इच्छिता त्यावर क्लिक करा .

त्यानंतर आपण आणखी रिप्लाय देऊन आपले आमच्या चॅनेल विषयीचे मतही मांडू शकता .

आणखी रिप्लाय देऊन आपण विविध विषयांची चॅनेल पण शोधू शकता .

चला तर मग खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला 5⭐️ रेटिंग्स द्या:

https://telegram.me/tchannelsbot?start=marathi
____________________________________
Rate us
1
From Marathi Mhani app:

आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.

Meaning:
दुसऱ्यांनी केलेल्या बारीक-सारीक चुका दिसतात, परंतु आपल्या हातून कितीही मोठी चूक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे.
From Marathi Mhani app:

आपल्याच पोळीवर तूप ओढणे.

Meaning:
फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
From Marathi Mhani app:

आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठे कुठे लावणार?

Meaning:
एकदम फार मोठी आपत्ती आली असताना तिचे निवारण करता येणे शक्य नसते.
From Marathi Mhani app:

आयजीच्या जीवावर बायजी उदार.

Meaning:
दुसऱ्याचा पैसा खर्च करुन औदार्य दाखवणे.
👍1
From Marathi Mhani app:

आयत्या पिठावर रेघोट्या.

Meaning:
दुसऱ्याच्या मिळकतीवर चैन करणे.
From Marathi Mhani app:

आयत्या बिळात नागोबा.

Meaning:
दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा स्वत:करिता आयता फायदा घेण्याची वृत्ती.
From Marathi Mhani app:

आला चेव तर केला देव नाही तर हरहर महादेव.

Meaning:
नियमीत असे काहीच करायचे नाही.
From Marathi Mhani app:

आलीया भोगासी असावे सादर.

Meaning:
आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे त्यानुसार भोगावे लागते, त्याबद्दल कुरकुर करु नये.
From Marathi Mhani app:

आले अंगावर, घेतले शिंगावर.

Meaning:
संकटाशी धैर्याने सामना करणे.
From Marathi Mhani app:

आवळा देऊन कोहळा काढणे.

Meaning:
स्वार्थासाठी एखाद्याला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे.