मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

आगीतून फुफाट्यात जाणे.

Meaning:
लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात जाणे.
From Marathi Mhani app:

आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला.

Meaning:
इच्छाच खूप प्रत्यक्षात काही नाही.
From Marathi Mhani app:

आचार भ्रष्टी, सदा कष्टी.

Meaning:
ज्याचे आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो.
From Marathi Mhani app:

आज अंबारी, उद्या झोळी धरी.

Meaning:
कधी वैभव तर कधी दैन्य.
आजा मेला, नातू झाला.

Meaning:
एखादे नुकसान व्हावे आणि त्याचवेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे.
____________________________________
अधिक माहितीसाठी आमचे मराठी व्याकरणाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा @marathi .
From Marathi Mhani app:

आठ हात लाकूड, न‌ऊ हात धलपी.

Meaning:
अत्यंत मुर्खपणाची अतिशयोक्ती.
1
From Marathi Mhani app:

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?

Meaning:
जे मुळातच नाही त्याची थोडीसुद्धा अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
1
From Marathi Mhani app:

आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे.

Meaning:
संकुचित वृत्तीचा विशालतेचा विचार सांगतो.
From Marathi Mhani app:

आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

Meaning:
न होणाऱ्या गोष्टीबद्दल चिकित्सा करु नये.
1
From Marathi Mhani app:

आधणातले रडतात, सुपातले हसतात.

Meaning:
जे लोक आज सुखात आहेत, त्यांना उद्या दु:खाचे दिवस येणारच असतात.
👍1
From Marathi Mhani app:

आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.

Meaning:
आधी मूर्खासारखे बोलायचे आणि नुकसान झाल्यावर रडायचे, त्याचा काहीच उपयोग नसतो.
From Marathi Mhani app:

आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी.

Meaning:
आधी आचरण बिघडते मग वाईट दशा प्राप्त होते.
From Marathi Mhani app:

आधी पोटोबा मग विठोबा.

Meaning:
आधी स्वार्थ मग परमार्थ.
From Marathi Mhani app:

आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास.

Meaning:
आधीच हौस आणि त्यात अनुकूल परिस्थितीची भर.
👍1
From Marathi Mhani app:

आधीच तारे त्यात शिरले वारे.

Meaning:
आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यावे तसे होणे.
From Marathi Mhani app:

आधीच नव्हती हौस, त्यात पडला पाऊस.

Meaning:
एखादे काम मनापासून करायचे नसल्यास काहीही कारण पुढे करुन ते काम टाळणे.
From Marathi Mhani app:

आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं.

Meaning:
आपले दोष दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे.
From Marathi Mhani app:

आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.

Meaning:
ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो, तोच दोष आपल्या ठिकाणी असणे अशी स्थिती.
From Marathi Mhani app:

आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे ते कारटे.

Meaning:
आपल्या माणसाचे कौतुक आणि दुसऱ्याबद्दल नावे ठेवण्याची वृत्ती.
From Marathi Mhani app:

आपला हात जगन्नाथ.

Meaning:
मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावर अवलंबून असतो.
From Marathi Mhani app:

आपली पाठ आपल्याला दिसत नाही.

Meaning:
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.