मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
निबंध लेखन
1
व्यक्ती आणि त्यांची आत्मचरित्रे
👍1
व्यक्ती आणि त्यांची आत्मचरित्रे
👍1
From Marathi Mhani app:

चढेल तो पडेल.

Meaning:
उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही.
From Marathi Mhani app:

चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.

Meaning:
काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
From Marathi Mhani app:

चांदणे चोराला, ऊन घुबडाला.

Meaning:
चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाहीत.
From Marathi Mhani app:

चांभाराच्या देवाला खेटराची पूजा.

Meaning:
जशास तसे या न्यायाने वागणे चांगले.
From Marathi Mhani app:

चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला.

Meaning:
क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च.
From Marathi Mhani app:

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

Meaning:
प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच.
From Marathi Mhani app:

चालत्या गाडीला खीळ घालणे.

Meaning:
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे.
From Marathi Mhani app:

चिंती परा ते ये‌ई घरा.

Meaning:
दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते.
From Marathi Mhani app:

चोर तो चोर वर शिरजोर.

Meaning:
गुन्हा करुन वर मुजोरी.
From Marathi Mhani app:

चोर सोडून संन्याशाला फाशी.

Meaning:
खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे.
From Marathi Mhani app:

चोराच्या उलट्या बोंबा.

Meaning:
स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे.
From Marathi Mhani app:

चोराच्या मनात चांदणे.

Meaning:
वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे.
From Marathi Mhani app:

चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक.

Meaning:
वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात.
From Marathi Mhani app:

चोराच्या हातची लंगोटी.

Meaning:
ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब.
From Marathi Mhani app:

चोराला सुटका आणि गावाला फटका.

Meaning:
चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे.
From Marathi Mhani app:

चोरावर मोर.

Meaning:
एकापेक्षा एक सवाई.
From Marathi Mhani app:

चोरीचा मामला हळू हळू बोंबला.

Meaning:
पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.