मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
जॉईन करा @Marathi
👍1
जॉईन करा @Marathi
जॉईन करा @Marathi
जॉईन करा @Marathi
जॉईन करा @Marathi

*⬇️मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा*⬇️


*प्रश्न १: खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?*

१)पुजारी
२) परिश्रम
३) प्रगती
४) प्रशांत

*प्रश्न २: खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे?*

१) सोक्षमोक्ष
२) कडकड
३) काळाकाळा
४) गडगड

*प्रश्न ३: खालीलपैकी कोणता सिद्ध शब्दाचा प्रकार नाही?*

१) तदभव
२) अभ्यस्त
३) देशी
४) तत्सम

*प्रश्न ४: खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?*

१) घोडा
२) धोंडा
३) झाड
४) गाव

*प्रश्न ५: खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे ?*

१) सरसर
२) दूरदूर
३) दगड धोंडा
४) पडसाद

*प्रश्न ६: खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून रूढ झाला आहे?*

१) किल्ली
२) कंबर
३) काम
४) कजाग

*प्रश्न ७: 'खळखळ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?*

१) अनुकरण वाचक
२) अंशाभ्यस्त
३) पूर्णाभ्यास्त
४) उपसर्गघटित

*प्रश्न ८: खालीलपैकी नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?*

१) नातसून
२) नीलकंठ
३) नाइलाज
४) नवरात्र

*प्रश्न ९: 'सहोदर' या सामाजिक शब्दाचा समास कोणता?*

१) विभक्ती बहुव्रीही
२) सहबहुव्रीही
३) प्रादिबहुव्रीही
४) नञ बहुव्रीही

*प्रश्न १०: 'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे' या वाक्यातील उपमान कोणते?*

१) माया
२) तुझी
३) आम्हावरी
४)आभाळागत
👍21
अभिनंदन मित्रहो,
आपल्या मराठी व्याकरण या चॅनेल ची सदस्य संख्या 20,000 च्या पुढे गेली.
ज्ञानप्रतिभेचा संगम - माधवराव पटवर्धन ( माधव ज्युलियन )
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महत्वाची सूचना:

लवकरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक ( YCMOU ) या विद्यापीठाची इतिहास , अर्थशास्त्र , राज्यशास्त्र , इ . विषयांची पुस्तके pdf स्वरूपात आपल्या चॅनेल वर प्रसारित केली जाणार आहेत, तत्पूर्वी आपल्या सर्व मित्राना @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल वर जॉईन करा.

जॉईन होण्याची सोपी पद्धत-
1) टेलिग्राम हे ऍप प्ले स्टोर वरून डोवनलोड करा .

2) त्यानंतर https://telegram.me/eMPSCkatta या लिंक वर क्लिक करा , @eMPSCkatta चॅनेल ओपन होईल.

3) चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.
1
लक्षणा (लक्ष्यार्थ) :- 

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.

उदा. आम्ही ज्वारी खातो. याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.

1) बाबा ताटावर बसले.

2) घरावरून हत्ती गेला.

3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.

4) मी शेक्सपिअर वाचला.

5) सूर्य बुडाला.

6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.

 
"ल" आणि "ळ" ही दोन स्वतंत्र अक्षरे.
या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा "ळ" चा उच्चार काही लोक सहजपणे "ल" सारखा पण "ल" नाही, "ल" व "ळ" च्या मधला करतात. तर काही वेळेस "ल" करतात.

"ल" हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण "ळ" हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील "ळ" हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृत मधे सध्या "ळ" नाही.
हिंदी, बंगाली, आसामी मधे "ळ" नाही.

सिंधी, गुजराती मधे "ळ" आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही.

मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात "ळ" आहे व वापर भरपूर आहे.

"ल" व "ळ" च्या उच्चारातील सारखेपणा मुळे "ळ" च्या ऐवजी "ल" बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित.

हिंदीत कमल व मराठीत कमळ

"ल" काय, "ळ" काय..
काय फरक पडला?

पण कसे मराठीत होत नाही. "ल" की "ळ" यावरून अर्थात फरक पडतो.

T.me/marathi

काही शब्द पाहू.

अंमल - राजवट
अंमळ - थोडा वेळ

वेळ time
वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा
खल बत्ता मधील खल
खळ- गोंद

पाळ - कानाची पाळ
पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या, बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी
नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल - निवडणूकीचा कल, झुकाव
कळ - वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण

लाल - लाल रंग
लाळ - थुंकी

ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा
ओळ - रेघ

मल - शौच
मळ - कानातला, त्वचेचा मळ

माल - सामान
माळ - मण्यांची माळ, हार

चाल - चालण्याची ढब....त्याची चाल ऐटदार आहे वगैरे
चाळ - नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना--जनता दल, पुरोगामी लोकशाही दल
दळ - भाजी अथवा फळाचा गर, वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट
छळ - त्रास

काल - yesterday
काळ - कालखंड वगैरे, मृत्यु

गलका - ओरडा आरडा
गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते........खाली होत नाही.

तरी आपली भाषा जपा इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

जॉईन करा @Marathi

"ळ" जपा.............मराठीचे सौंदर्य जपा....!!!
👍1