मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

जमिनीचे फूल, चालवी जगाची चूल.

Meaning:
जमिनीच्या वरच्या थरात पिके पिकतात.
From Marathi Mhani app:

जळतं घर भाड्याने कोण घेणार?

Meaning:
नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार?
From Marathi Mhani app:

जळत्या घराचा पोळता वासा.

Meaning:
घराला लागलेल्या आगीतून काही काढता आले तर काढून घ्यावे.
From Marathi Mhani app:

जशी करणी तशी भरणी.

Meaning:
जसे आपण काम करु तसेच त्याची भरपाई मिळते.
From Marathi Mhani app:

जशी कामना तशी भावना.

Meaning:
जशी मनात इच्छा असते तशीच भावना बनते.
From Marathi Mhani app:

जशी देणावळ तशी धुणावळ.

Meaning:
पैशाप्रमाणे काम करणे.
From Marathi Mhani app:

जशी नियत तशी बरकत.

Meaning:
ज्याप्रमाणे आपली वागणूक असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळते.
From Marathi Mhani app:

जसा गुरु तसा चेला.

Meaning:
गुरुप्रमाणे शिष्य.
From Marathi Mhani app:

जसा भाव तसा देव.

Meaning:
ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याचप्रमाणे फळ मिळते.
From Marathi Mhani app:

जातीसाठी खावी माती.

Meaning:
जातीसाठी जे करायचे ते करणे, प्रसंगी कमीपणाही पत्करणे.
From Marathi Mhani app:

जात्यावर बसले की ओवी सुचते.

Meaning:
काम करावयास प्रारंभ केला की ते पूर्ण करण्याचे अनेक मार्ग सुचतात.
From Marathi Mhani app:

जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.

Meaning:
बाहेरुन एखाद्या माणसाचा देखावा केला, तरी त्याचे गुण देखावा करणाऱ्याच्या अंगी येत नाहीत.
From Marathi Mhani app:

जाळाशिवाय नाही कढ अन् माये शिवाय नाही रड.

Meaning:
ज्याला एखाद्याविषयी प्रेम, आपुलकी आहे त्यालाच ती व्यक्ती संकटात सापडली असता दुःख होईल.
From Marathi Mhani app:

जावयाचं पोर, हरामखोर.

Meaning:
जावयाच्या पोराला कितीही चांगले वागवा तरी तो उपकार स्मरत नाही.
From Marathi Mhani app:

जावा जावा आणि उभा दावा.

Meaning:
जावा-जावांचे कधी पटत नाही.
From Marathi Mhani app:

जावा जावा हेवा देवा.

Meaning:
जावा-जावांचे कधी पटत नाही.
From Marathi Mhani app:

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

Meaning:
प्रत्यक्ष काम करु लागल्यावर अडचणी कळतात.
From Marathi Mhani app:

जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.

Meaning:
ज्याच्याकडून काही लाभ होत असेल त्याचीच लोक खुशामत करतात.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🙏 धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏

आपण दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आज आपल्या @eMPSCkatta चॅनेलने 20,000 सदस्यसंख्या पार केली. आपले चॅनेल महाराष्ट्रातील 20K लोकांपर्यंत पोहचवण्यास आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आपण आपले काम असेच सुरु ठेवा व आम्हाला आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहित करा.

आपणास सांगण्यास आनंद वाटतो कि आपण 10,000 मेंबर चा टप्पा चॅनेल सुरु केल्या पासून 99 व्या दिवशी , तर 20,000 मेंबर चा टप्पा आज 154व्या दिवशी पार केला.यावरून लक्षात येते आम्ही आपल्या पसंतीस उतरलो आहोत, आम्हीही आपल्या याच विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न निश्चितच करू.

मित्रानो , आपले चॅनेल दि.6 मे 2016 रोजी सुरु करताना कल्पनाही केली नव्हती इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आपण आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दिला. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आपल्याच मागणीच्या पूर्ततेसाठी आज आणखी 2 नवीन चॅनेल्स सुरु करत आहोत.

1) @MPSCcsat
2) @mpscHRD

चॅनेल च्या नावावरून तुमच्या लक्षात आले असेलच हि दोन चॅनेल्स कशाबद्दल आहेत. अर्थातच @MPSCcsat हे राज्यसेवा पूर्व 2017 ध्यानात घेऊन CSAT साठी , तर @mpscHRD हे राज्यसेवा मुख्य 2017 समोर ठेऊन सुरु केली आहेत. आपण सर्वांनी ती जॉईन करावीत, आम्हाला खात्री आहे आमच्या इतर चॅनेल्स प्रमाणेच आपण या नवीन 2 चॅनेल्स ना पण तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.

Regards- @eMPSCkattaAdmin

आपल्या सर्व मित्रांना आजच जॉईन करा...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Deleted Account