मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
मित्रांनो,
आज आपण मराठी व इंग्रजी
भाषा विषयात निबंध लेखांनाविषयी चर्चा करू...
.
या संदर्भात अधिक माहिती अस्तित्व अकॅडमी येथे भेतूनही करू शकता..
.
📌राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या दोन भाषा विषयात अधिक गुण मिळतील, त्यांनी वरच्या रँकची अपेक्षा ठेवावी, एवढे हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. मुख्य परीक्षा जवळ येत असताना, उरलेल्या शेवटच्या दिवसांत, विशेषतः इंग्रजी या परीक्षेची तयारी कशी करावी, हाच यक्षप्रश्न अनेकांपुढे असेल. त्यातील निबंधाचा विचार येथे करू या.
.
*अलिकडे परीक्षेत चालू घडामोडी, ठळक घटना, इत्यादींवर निबंध विचारला जातो*. त्यामुळे हे विषय कोणते असू शकतील, याचे अंदाज प्रत्येकाने बांधले असतील. पुढील काही विषयांकडे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्ष द्यावे. जसेः Odd and Even Formula to Curb Pollution, Water Conservation - A need of Hour, 'Sairat'- in 100 Crore Club, Perils of Inter-Caste Marriage (या चित्रपटाच्या अनुषंगाने उभा राहिलेला विषय म्हणून याकडे बघता येईल), Should there be censor Board, Rain - Water Harvesting, Farmers suicide, इत्यादी विषय महत्त्वाचे आहेत.
.
खालील मुद्दे निबंधासाठी विशेष लक्षात ठेवावे.
*निबंधाची सुरुवात आकर्षक असावी*, जेणेकरून निबंध पुढे वाचण्याची उत्कंठा वाढली पाहिजे जसे- शेतकरी आत्महत्या विषयावरील निबंधासाठीः Just Five paise a kg! Impossible! How Could it be! What the hail is this going on? Is it the value of the farmers hard work ?.......etc.
.
यानंतर मात्र लगेच *निबंधाच्या टॉपिकची ओळख व त्या विषयाचे गांभीर्य याचा उल्लेख करावा.*
.
पुढचा भाग म्हणजे 'The body of an Essay' असतो. निबंधाचे हे हृद्यच म्हणा ना! यामध्ये *मुख्य कल्पना, तपशील व आपण मांडत असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ एखादे छोटे उदाहरण असावे.*
.
निबंधात किती पॅराग्राफ असावेत याला मर्यादा नसते, पण प्रत्येक स्वतंत्र व नवीन विचारासाठी नवीन पॅरा करावा. साधारणतः या परीक्षेसाठी तीन किंवा चार पॅराग्राफ शब्दसंख्या लक्षात घेता पुरेसे ठरावेत.
.
*शेवटच्या पॅराग्राफमध्ये थोडक्यात सर्व मतांचा सारांश मांडून, स्वतःचे मत मांडावे व काही सूचना लिहाव्यात.*
.
निबंधात कधीही पूर्ण गुण देत नसतात. तेव्हा गुण कमी कसे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे विशेषतः इंग्रजी व्याकरणाच्या चुका नसाव्यात. विविध प्रकारच्या वाक्यरचनांचा वापर करावा. त्याला स्पेलिंग व विरामचिन्हे व्यवस्थित द्यावीत.
.
निबंधात आशय भरपूर असावा, त्याला आधिक महत्त्व आहे. *निबंधाचे सादरीकरण मुद्देसुद असावे. त्यात थापा मारून विनाकारण निबंध वाढवण्याच्या फंदात पडू नये.* विचारांची स्पष्ट मांडणी, सुसूत्रता, आशय आणि सादरीकरण यात कमी पडू नये.
.
निबंधामध्ये थोर व्यक्तींची विधाने उद्धृत करावी का, असा अनेकांचा प्रश्न असतो. यावर एवढेच सांगावेसे वाटते की, माहिती असल्यास व विषयाला अनुलक्षून असल्यास जरूर टाकावे. मुद्दामून अशी विधाने पाठ करण्याची गरज नाही. शेवटी आयोगाला तुमची भाषा व त्या भाषेवरील तुमचा आत्मविश्वास बघायचा आहे. तुम्ही साहित्यिक असावे, हे आयोगाला नक्कीच अपेक्षित नाही. जे इंग्रजी निबंधाच्या बाबतीत आहे, तेच मराठीच्या बाबतही लागू होते.
.
इंग्रजी व्याकरणाच्या वाक्यरचनेत कमीत कमी चुका, विविध प्रकारच्या वाक्यांचे उपयोग (Simple, Compound, Complex) व आशयघन निबंध असल्यास १८ ते २०च्या दरम्यान गुण पडण्यास काही हरकत नाही.
.
📌लेखन- सुदेश वेळापुरे
'द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर' या पुस्तकाचे लेखक
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
यशाचा मटा मार्ग - 4 ऑक्टोबर
From Marathi Mhani app:

जमिनीचे फूल, चालवी जगाची चूल.

Meaning:
जमिनीच्या वरच्या थरात पिके पिकतात.
From Marathi Mhani app:

जळतं घर भाड्याने कोण घेणार?

Meaning:
नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार?
From Marathi Mhani app:

जळत्या घराचा पोळता वासा.

Meaning:
घराला लागलेल्या आगीतून काही काढता आले तर काढून घ्यावे.
From Marathi Mhani app:

जशी करणी तशी भरणी.

Meaning:
जसे आपण काम करु तसेच त्याची भरपाई मिळते.
From Marathi Mhani app:

जशी कामना तशी भावना.

Meaning:
जशी मनात इच्छा असते तशीच भावना बनते.
From Marathi Mhani app:

जशी देणावळ तशी धुणावळ.

Meaning:
पैशाप्रमाणे काम करणे.
From Marathi Mhani app:

जशी नियत तशी बरकत.

Meaning:
ज्याप्रमाणे आपली वागणूक असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळते.
From Marathi Mhani app:

जसा गुरु तसा चेला.

Meaning:
गुरुप्रमाणे शिष्य.
From Marathi Mhani app:

जसा भाव तसा देव.

Meaning:
ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याचप्रमाणे फळ मिळते.
From Marathi Mhani app:

जातीसाठी खावी माती.

Meaning:
जातीसाठी जे करायचे ते करणे, प्रसंगी कमीपणाही पत्करणे.
From Marathi Mhani app:

जात्यावर बसले की ओवी सुचते.

Meaning:
काम करावयास प्रारंभ केला की ते पूर्ण करण्याचे अनेक मार्ग सुचतात.
From Marathi Mhani app:

जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.

Meaning:
बाहेरुन एखाद्या माणसाचा देखावा केला, तरी त्याचे गुण देखावा करणाऱ्याच्या अंगी येत नाहीत.
From Marathi Mhani app:

जाळाशिवाय नाही कढ अन् माये शिवाय नाही रड.

Meaning:
ज्याला एखाद्याविषयी प्रेम, आपुलकी आहे त्यालाच ती व्यक्ती संकटात सापडली असता दुःख होईल.
From Marathi Mhani app:

जावयाचं पोर, हरामखोर.

Meaning:
जावयाच्या पोराला कितीही चांगले वागवा तरी तो उपकार स्मरत नाही.
From Marathi Mhani app:

जावा जावा आणि उभा दावा.

Meaning:
जावा-जावांचे कधी पटत नाही.
From Marathi Mhani app:

जावा जावा हेवा देवा.

Meaning:
जावा-जावांचे कधी पटत नाही.
From Marathi Mhani app:

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

Meaning:
प्रत्यक्ष काम करु लागल्यावर अडचणी कळतात.
From Marathi Mhani app:

जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.

Meaning:
ज्याच्याकडून काही लाभ होत असेल त्याचीच लोक खुशामत करतात.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🙏 धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏

आपण दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आज आपल्या @eMPSCkatta चॅनेलने 20,000 सदस्यसंख्या पार केली. आपले चॅनेल महाराष्ट्रातील 20K लोकांपर्यंत पोहचवण्यास आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आपण आपले काम असेच सुरु ठेवा व आम्हाला आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहित करा.

आपणास सांगण्यास आनंद वाटतो कि आपण 10,000 मेंबर चा टप्पा चॅनेल सुरु केल्या पासून 99 व्या दिवशी , तर 20,000 मेंबर चा टप्पा आज 154व्या दिवशी पार केला.यावरून लक्षात येते आम्ही आपल्या पसंतीस उतरलो आहोत, आम्हीही आपल्या याच विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न निश्चितच करू.

मित्रानो , आपले चॅनेल दि.6 मे 2016 रोजी सुरु करताना कल्पनाही केली नव्हती इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आपण आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दिला. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आपल्याच मागणीच्या पूर्ततेसाठी आज आणखी 2 नवीन चॅनेल्स सुरु करत आहोत.

1) @MPSCcsat
2) @mpscHRD

चॅनेल च्या नावावरून तुमच्या लक्षात आले असेलच हि दोन चॅनेल्स कशाबद्दल आहेत. अर्थातच @MPSCcsat हे राज्यसेवा पूर्व 2017 ध्यानात घेऊन CSAT साठी , तर @mpscHRD हे राज्यसेवा मुख्य 2017 समोर ठेऊन सुरु केली आहेत. आपण सर्वांनी ती जॉईन करावीत, आम्हाला खात्री आहे आमच्या इतर चॅनेल्स प्रमाणेच आपण या नवीन 2 चॅनेल्स ना पण तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.

Regards- @eMPSCkattaAdmin

आपल्या सर्व मित्रांना आजच जॉईन करा...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐