मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
🔹सराव प्रश्न :

१) 'भाववाचक नाम' ओळखा
१) उंची
२) शरद
३) पुस्तक
४) झाडे

२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१) ती हळू चालते
२) रघु खूप झोपला
३) रमेश दुध पितो
४) तो मूर्ख आहे

३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा .
माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे
१) अंगणाला
२) अंगणाशी
३) अंगणाचे
४) अंगणा

४) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?
१) उभयान्वयी अव्यय
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण अव्यय
४) केवलप्रायोगी अव्यय

५) कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ..........म्हणतात
१) वाक्य
२) शब्दसमूह
३) कर्तरी प्रयोग
४) प्रयोग

६) ' पुस्तक ' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?
१) नपुसंकलिंग
२) पुल्लिंग
३) स्त्रीलिंग
४) यापैकी नाही

७) ' मी निबंध लिहिते असे ' या वाक्यातील काळ ओळखा
१) रीती भूतकाळ
२) रीती वर्तमानकाळ
३) रीती भविष्यकाळ
४) अपूर्ण भूतकाळ

८) ' आणि ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
१) विकल्पबोधक
२) परिणामबोधक
३) संकेतबोधक
४) समुच्चयबोधक

९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे 'हा कोणता अव्यय आहे ?
१) उभयान्वयी
२)क्रियाविशेषण
३)केवलप्रयोगी
४)शब्द योगी

१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?
१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?
२)पाऊस आला आणि हवेत गारवा झाला.
३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.
४)खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.

११)'बाभळी मुद्रा व देवळी निद्रा 'या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस
२)अत्यंत बावळट माणुस
३)बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा
४)खूपच आळशी माणुस

१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले,
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले |
हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
१) यमक
२)पुष्यमक
३)अनुप्रास
४) श्लेष

Telegram.me/Marathi
🔹प्रश्नसंच

1. 'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

हिंदीफारसीकानडी  गुजराती

उत्तर : कानडी

2. 'पेशवा' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

कानडीगुजरातीफारसी  हिंदी

उत्तर : फारसी

3. 'लंबोदर व पीतांबर' ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

बहुव्रीहि समास  तत्पुरुष समासद्वंद्वं समासयापैकी नाही

उत्तर : बहुव्रीहि समास

4. खालीलपैकी कोणता पर्यायाला 'अव्ययीभाव' समासाचे उदाहरण होईल?

बटाटेवडापंचवटीबेमालूम  तोंडपाठ

उत्तर : बेमालूम  

5. 'शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवावे' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.

कर्तरी प्रयोगभावे प्रयोग  कर्मणी प्रयोगयापैकी नाही

उत्तर : भावे प्रयोग  

6. 'भरत म्हणून एक राजा होऊन गेला' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता?

कारणबोधक उभयान्वयी अव्ययस्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय  उपदेशबोधक उभयान्वयी अव्ययपरिणामबोधक उभयान्वयी अव्यय  

उत्तर : स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

7. 'मला फक्त शंभर रुपये हवेत' - या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार ओळखा.

सार्वनामिक विशेषणसाधित क्रिया विशेषणकेवलप्रयोगी अव्ययसंग्रहवाचक शब्दयोगी अव्यय  

उत्तर : संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

8. 'अमका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

सर्वनामिक विशेषण         नामसाधित विशेषणअव्ययसाधित विशेषण         धातुसाधित विशेषण

उत्तर : सर्वनामिक विशेषण

9. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात सांगा.
आमच्या गावात बरेच पाटील आहेत.

भाववाचक नामसामान्य नामविशेषणविशेषनाम

उत्तर : सामान्य नाम

10. 'अनिल' च्या समानार्थी शब्द -

मत्स्यमंडूकरुणसमीरण

उत्तर : समीरण

------------------------------------
जॉईन करा @Marathi
🔹समानार्थी शब्द:

अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
 
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी
 
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन
 
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
 
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी
 
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
 
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित
 
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
 
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश
 
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश
 
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
 
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
 
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन
 
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद
 
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य
 
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
 
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
 
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले
 
इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र
 
उकल - उलगडा, सुटका, मोकळे
 
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
 
उपाय - तजवीज, इलाज, उपचार
 
उमाळा - तरंग, लोट, उकळी
 
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ
 
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक
1👍1👏1
From Marathi Mhani app:

चढेल तो पडेल.

Meaning:
उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही.
From Marathi Mhani app:

चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.

Meaning:
काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
From Marathi Mhani app:

चांदणे चोराला, ऊन घुबडाला.

Meaning:
चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाहीत.
From Marathi Mhani app:

चांभाराच्या देवाला खेटराची पूजा.

Meaning:
जशास तसे या न्यायाने वागणे चांगले.
From Marathi Mhani app:

चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला.

Meaning:
क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च.
From Marathi Mhani app:

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

Meaning:
प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच.
From Marathi Mhani app:

चालत्या गाडीला खीळ घालणे.

Meaning:
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे.
From Marathi Mhani app:

चिंती परा ते ये‌ई घरा.

Meaning:
दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते.
From Marathi Mhani app:

चोर तो चोर वर शिरजोर.

Meaning:
गुन्हा करुन वर मुजोरी.
From Marathi Mhani app:

चोर सोडून संन्याशाला फाशी.

Meaning:
खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे.
From Marathi Mhani app:

चोराच्या उलट्या बोंबा.

Meaning:
स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे.
From Marathi Mhani app:

चोराच्या मनात चांदणे.

Meaning:
वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे.
From Marathi Mhani app:

चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक.

Meaning:
वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात.
From Marathi Mhani app:

चोराच्या हातची लंगोटी.

Meaning:
ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब.
From Marathi Mhani app:

चोराला सुटका आणि गावाला फटका.

Meaning:
चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे.
From Marathi Mhani app:

चोरावर मोर.

Meaning:
एकापेक्षा एक सवाई.
From Marathi Mhani app:

चोरीचा मामला हळू हळू बोंबला.

Meaning:
पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.