मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

घर ना दार, चावडी बिऱ्हाड.

Meaning:
बायको पोरे नसणारा एकटा माणूस.
From Marathi Mhani app:

घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करुन.

Meaning:
घर बांधायला अथवा लग्न करायला आपल्या अंदाजापेक्षा अधिक खर्च येतो.
From Marathi Mhani app:

घर फिरले की घराचे वासेही फिरतात.

Meaning:
वाईट दिवस आले म्हणजे आपले म्हणविणारे लोकदेखील मदत करत नाहीत.
From Marathi Mhani app:

घर साकड नि बा‌ईल भाकड.

Meaning:
कोणत्याही बाबतीत अनुकूल परिस्थिती नसणे.
From Marathi Mhani app:

घरची करते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.

Meaning:
आपल्या कुटुंबापेक्षा बाहेरच अधिक लक्ष असणे.
From Marathi Mhani app:

घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.

Meaning:
स्वतः खर्च करुन इतरांची कामे करणे.
From Marathi Mhani app:

घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे.

Meaning:
स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने त्याच्यावर काम लादणे.
From Marathi Mhani app:

घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.

Meaning:
ऐपत नसताना ऐट दाखविणे.
From Marathi Mhani app:

घराला नाही कौल, रिकामा डौल.

Meaning:
घरात गरिबी पण रिकामीच ऐट.
From Marathi Mhani app:

घरासारखा गुण, सासू तशी सून.

Meaning:
लहान मोठ्यांचे अनुकरण करीत असतात.
From Marathi Mhani app:

घरोघरी मातीच्या चुली.

Meaning:
सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
From Marathi Mhani app:

घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.

Meaning:
कमाई थोडी पण खर्चच फार.
From Marathi Mhani app:

घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.

Meaning:
श्रम करुन पोट भरण्यापेक्षा लुबाडणाऱ्याची चैन अधिक.
From Marathi Mhani app:

घे सुरी आणि घाल उरी.

Meaning:
फाजील उत्सुकता दाखविणे.
From Marathi Mhani app:

घोडामैदान जवळ असणे.

Meaning:
कसोटीची वेळ जवळच असणे.
From Marathi Mhani app:

घोडी मेली ओझ्याने नि शिंगरू मेले हेलपाट्याने.

Meaning:
आई काम करुन करुन थकते व तिचे मूल तिच्या मागे फिरुन थकून जाणे.
From Marathi Mhani app:

घोडे खा‌ई भाडे.

Meaning:
ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा.
From Marathi Mhani app:

घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.

Meaning:
एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग.
🔹अलंकार

🔶व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .

🔶अलंकारांचे प्रकार:-
१) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

1. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."
2. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो.
🔺उदा:
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत माया तुझी आम्हांवरी राहू दे

२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

1. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
🔺उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे
माहेरची वाटे खरेखुर

३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

1. "उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो."
🔺उदा.-
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
🔺स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.
🔺अन्य उदाहरणे-
1. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |
2. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे |
3. आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी , ती हाक येई कानी मज होय शोक भारी , नोहेच हाक माते मारी , कुणी कुठारी

४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

1. दुसर्यास उद्देशून केलेली उक्ती.
2. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
🔺उदा:-
येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू
करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे
विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक
1
🔹वाक्य पृथक्करण

🔸पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यापृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.

🔷वाक्य:

उद्देश विभाग(उद्देशांग)विधेय विभाग
(विधेयांग)
1)उद्देश (कर्ता)     1) कर्म व कर्म विस्तार
2)उद्देश विस्तार     2) विधानपूरक
                           3) विधेय विस्तार
                           4)  विधेय (क्रियापद)


💠उद्देश विभाग/उद्देशांग:💠

💠1)उद्देश (कर्ता)

🔸वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो.
🔸क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.

🔶उदा.🔸

🔹रामुचा शर्ट फाटला.
(फाटणारे काय/कोण?)
🔹रामरावांचा कुत्रा मेला.
(मरणारे कोण/काय?)
🔹मोगल साम्राज्याचा अंत झाला.
(होणारे-कोण/काय?)
🔹रामुच्या घराचा दरवाजा उघडला.
(उघडणारे कोण/काय?)
👉वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.

💠2) उद्देश विस्तार

🔸कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील. तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.

🔶उदा.🔸    

🔸शेजारचा रामु धपकन पडला.नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.

🔶विधेय विभाग/विधेयांग.

🔸वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.

🔶उदा.🔸

🔹रामने झडाचा पेरु तोडला.
(या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म.)

🔹गवळ्याने म्हशीची धार काढली.
(या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म)

💠1) कर्म विस्तार

🔷कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार होय.

🔶उदा.🔸

🔸रामने झाडाचा पेरु तोडला.गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.

💠2) विधान पूरक

🔷कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते विधानपूरक असते.

🔶उदा.🔸    

🔸राम राजा झाला.संदीप शिक्षक आहे.शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना विधानपूरक असे म्हणतात.

💠3) विधेय विस्तार

🔷क्रियापदास विधेय असे म्हणतात.

🔸वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या  शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात.

🔶उदा.🔸   

🔸कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.

💠4) विधेय/क्रियापद

🔷वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात.

🔶उदा.🔸

🔸रमेश खेळतो.
🔸रमेश अभ्यास करतो.
🔸रमेश चित्र काढतो.

आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा व चॅनेल ओपन झाले की join ऑप्शन वर क्लिक करा.
1👌1
★|| eMPSCkatta ||★

🚫 महत्वाची सूचना 🚫

मित्रानो ,
आपले चॅनेल सुरु होऊन बरेच दिवस झाले , दरम्यानच्या काळात आपण बऱ्याच पोस्ट चॅनेल वरती केल्या आहेत.बराच माहितीचा साठा आपल्या चॅनेल वरती आहे.

तुम्हाला यातील काही मागील पोस्ट आपणास रेफरन्स साठी किंवा फावल्या वेळात पहावयाच्या असतील तर एका सोप्या स्टेप मध्ये आपण हि माहिती मिळवू शकता .

प्रथम आपले चॅनेल @Marathi ओपन करा , चॅनेल च्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन उभ्या टिम्ब आहेत त्यावर क्लिक करा , सर्च ऑप्शन येईल तिथे आपणास हवी असलेली माहिती चा शब्द टाईप करून सर्च करा , तो शब्द अंतर्भूत असलेल्या आजवरच्या सर्व पोस्ट दिसतील.

उदा:
समजा आपल्या चॅनेल वरील " समास " चे लेख शोधायचे आहेत तर आपण सर्च मध्ये फक्त " समास " हा शब्द टाईप केला तर सर्व लेख दिसतील. ज्याप्रमाणे आपण pdf मध्ये एखादा शब्द शोधतो त्या प्रमाणेच इथेही शोधू शकतो.चला तर मग लगेच आपणास हवी ती माहिती सर्च करायला सुरुवात करा.

आहे ना फायदेशीर...?
_____________________________________
आपल्या सर्व मित्राना आपल्या @Marathi चॅनेल वर जॉईन करा.
👍21