मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.

Meaning:
लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते.
From Marathi Mhani app:

गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.

Meaning:
निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते.
From Marathi Mhani app:

घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते.

Meaning:
प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात.
From Marathi Mhani app:

घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.

Meaning:
कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात.
From Marathi Mhani app:

घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी.

Meaning:
स्वतःच्या घरची गरिबी असूनही बायकोसाठी खूप खर्च करणे.
From Marathi Mhani app:

घर ना दार, चावडी बिऱ्हाड.

Meaning:
बायको पोरे नसणारा एकटा माणूस.
From Marathi Mhani app:

घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करुन.

Meaning:
घर बांधायला अथवा लग्न करायला आपल्या अंदाजापेक्षा अधिक खर्च येतो.
From Marathi Mhani app:

घर फिरले की घराचे वासेही फिरतात.

Meaning:
वाईट दिवस आले म्हणजे आपले म्हणविणारे लोकदेखील मदत करत नाहीत.
From Marathi Mhani app:

घर साकड नि बा‌ईल भाकड.

Meaning:
कोणत्याही बाबतीत अनुकूल परिस्थिती नसणे.
From Marathi Mhani app:

घरची करते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.

Meaning:
आपल्या कुटुंबापेक्षा बाहेरच अधिक लक्ष असणे.
From Marathi Mhani app:

घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.

Meaning:
स्वतः खर्च करुन इतरांची कामे करणे.
From Marathi Mhani app:

घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे.

Meaning:
स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने त्याच्यावर काम लादणे.
From Marathi Mhani app:

घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.

Meaning:
ऐपत नसताना ऐट दाखविणे.
From Marathi Mhani app:

घराला नाही कौल, रिकामा डौल.

Meaning:
घरात गरिबी पण रिकामीच ऐट.
From Marathi Mhani app:

घरासारखा गुण, सासू तशी सून.

Meaning:
लहान मोठ्यांचे अनुकरण करीत असतात.
From Marathi Mhani app:

घरोघरी मातीच्या चुली.

Meaning:
सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
From Marathi Mhani app:

घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.

Meaning:
कमाई थोडी पण खर्चच फार.
From Marathi Mhani app:

घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.

Meaning:
श्रम करुन पोट भरण्यापेक्षा लुबाडणाऱ्याची चैन अधिक.
From Marathi Mhani app:

घे सुरी आणि घाल उरी.

Meaning:
फाजील उत्सुकता दाखविणे.
From Marathi Mhani app:

घोडामैदान जवळ असणे.

Meaning:
कसोटीची वेळ जवळच असणे.
From Marathi Mhani app:

घोडी मेली ओझ्याने नि शिंगरू मेले हेलपाट्याने.

Meaning:
आई काम करुन करुन थकते व तिचे मूल तिच्या मागे फिरुन थकून जाणे.