मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
प्रश्नसंच 1 : मराठी

१) नामाऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दाला काय म्हणतात ?
अ) विशेष नाम
ब) सर्वनाम
क) विशेषण
ड) क्रियापद
उत्तर : ब
====================

२) शब्दाच्या किती जाती आहेत?
अ) आठ
ब) पाच
क) तीन
ड) बारा
उत्तर :अ
====================

३) विसंगत पर्याय निवडा
अ) क - ख
ब) च - छ
क) ब - भ
ड) त - थ
उत्तर : क
====================

४) हरणाच्या कानात वारा शिरला ? (कर्ता ओळखा)
अ) हरीण
ब) शिरला
क) कान
ड) वारा
उत्तर : अ
====================

५) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे ? (शब्द शक्ती ओळखा )
अ) लक्षणा
ब) व्यंजना
क) अभिधा
ड) वरील पैकी सर्व
उत्तर : ड
====================

६) नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?
अ) द्विगु समास.
ब) द्वंद्वाव समास
क) कर्मधारय समास
ड) अलुक तत्पुरुष समास.
उत्तर : क
====================

७) स्वताशी केलेले भाषण म्हणजेच ?
अ) संवाद
ब) स्वगत
क) वाद
ड) नांदी
उत्तर : ब
====================

८) राजु जोराने धावतो. (प्रयोग ओळखा )
अ) भावे प्रयोग
ब) कर्मणी प्रयोग
क) सकर्मक कर्तरी
ड) अकर्मक कर्तरी
उत्तर :क
====================

९) कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?
अ) देशी
ब) तत्सम
क) तत्भव
ड) परभाषीय
उत्तर : ब
====================

१०) आई सारखी मायाळू आईच . (अलंकार ओळखा )
अ) उपमा
ब) व्यतिरेक
क) अनन्वय
ड) रुपक
उत्तर : ड
====================
Join our channel here @marathi
3👍2🤔1
विषय मराठी


शब्दाच्या जाती

1)नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.


उदाहरण - घर, आकाश, गोड

2)सर्वनाम-

जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.


उदाहरण - मी, तू, आम्ही

3) विशेषण-

जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच

4)क्रियापद-

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे

5)क्रियाविशेषण-

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या

6) शब्दयोगी अव्यय-

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी


7) उभयान्वयी अव्यय-

जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा

8) केवलप्रयोगी अव्यय-

जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब
___________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा .
🔹 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🔹

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
______________________________________
जॉईन करा आमचे मराठी व्याकरणाचे चॅनेल , जॉईन होण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा. चॅनेल ओपन झाले कि तळाशी join ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
🔹महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने :

[संत] - [समाधीस्थाने]

गाडगे महाराज - अमरावती
रामदासस्वामी - सज्जनगड
एकनाथ - पैठण
गजानन महाराज - शेगाव
द्यानेश्वरी - आळंदी
गोरोबा कुंभार - ढोकी
चोखा मेळा - पंढरपूर
मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी
तुकडोजी महाराज - मोझरी
संत तुकाराम - देहू
साईबाबा - शिर्डी
जनार्दनस्वामी - दौलताबाद
निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर
दामाजी पंत - मंगळवेढा
श्रीधरस्वामी - पंढरपूर
गुरुगोविंदसिंह - नांदेड
रामदासस्वामी - जांब
द्यानेश्वर - आपेगाव
सोपानदेव - आपेगाव
गोविंदप्रभू - रिधपुर
जनाबाई - गंगाखेड
संत तुकाराम - देहू
निवृत्तीनाथ - आपेगाव
नरसी - हिंगोली
_____________________________________
जॉईन करा आमचे मराठी व्याकरणाचे चॅनेल , जॉईन होण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा. चॅनेल ओपन झाले कि तळाशी join ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
From Marathi Mhani app:

अंधारात केले पण उजेडात आले.

Meaning:
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.
👌1
From Marathi Mhani app:

अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.

Meaning:
स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे.
From Marathi Mhani app:

अगं माझे बायले, सर्व तुला वाहिले.

Meaning:
आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती.
From Marathi Mhani app:

अघळ पघळ अन् घाल गोंधळ.

Meaning:
मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते.
From Marathi Mhani app:

अटक्याचा सौदा आणि येरझारा चौदा.

Meaning:
एखाद्या छोट्या कामासाठी उगीचच जास्त मेहनत करावी लागणे.
From Marathi Mhani app:

अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.

Meaning:
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.
👍2
From Marathi Mhani app:

अडला हरी, गाढवाचे पाय धरी.

Meaning:
अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते.
👍1
From Marathi Mhani app:

अडली गाय फटके खाय.

Meaning:
एखादा माणूस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण करणे.
1
From Marathi Mhani app:

अपमानाची पोळी, सर्वांग जाळी.

Meaning:
स्वाभिमानी माणूस स्वत:चा अपमान कधीही सहन करीत नाही.
From Marathi Mhani app:

अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही.

Meaning:
सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो.
From Marathi Mhani app:

अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे.

Meaning:
फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची.
From Marathi Mhani app:

अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.

Meaning:
स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे.
From Marathi Mhani app:

अगं माझे बायले, सर्व तुला वाहिले.

Meaning:
आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती.
From Marathi Mhani app:

अघळ पघळ अन् घाल गोंधळ.

Meaning:
मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते.
From Marathi Mhani app:

अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.

Meaning:
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.
🙏1
From Marathi Mhani app:

अती उदार तो सदा नादार.

Meaning:
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते.
👏1
From Marathi Mhani app:

अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम.

Meaning:
अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते.
👍1