मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.

Meaning:
एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग होत नाही.
From Marathi Mhani app:

गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य.

Meaning:
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
From Marathi Mhani app:

गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य.

Meaning:
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
From Marathi Mhani app:

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.

Meaning:
मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही.
From Marathi Mhani app:

गाढवाला गुळाची चव काय?

Meaning:
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही.
From Marathi Mhani app:

गाव करी ते राव न करी.

Meaning:
श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात.
From Marathi Mhani app:

गाव तेथे उकीरडा.

Meaning:
प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच.
From Marathi Mhani app:

गावंढळ गावात गाढवी सवाशीण.

Meaning:
जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्व येते.
From Marathi Mhani app:

गावास गेला आणि गावचा झाला.

Meaning:
तो परगावाला गेला आणि इकडच्या मित्रमंडळींस विसरुन गेला.
From Marathi Mhani app:

गुरुची विद्या, गुरुलाच फळली.

Meaning:
एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य.
From Marathi Mhani app:

गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी.

Meaning:
गरिबीमुळे आपण काही करु शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे.
From Marathi Mhani app:

गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य.

Meaning:
एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे.
From Marathi Mhani app:

गोगलगाय आणि पोटात पाय.

Meaning:
बाह्यरुप एक आणि कृती दुसरीच.
From Marathi Mhani app:

गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.

Meaning:
कोणत्याही कामात ताळमेळ नसणे.
From Marathi Mhani app:

गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.

Meaning:
फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे.
From Marathi Mhani app:

गोष्ट लहान, सांगणं महान.

Meaning:
क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे.
From Marathi Mhani app:

गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.

Meaning:
लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते.
From Marathi Mhani app:

गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.

Meaning:
लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते.
From Marathi Mhani app:

गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.

Meaning:
निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते.
From Marathi Mhani app:

घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते.

Meaning:
प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात.
From Marathi Mhani app:

घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.

Meaning:
कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात.