मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
ल, मारुत, समीर, वायू
वाट = मार्ग, रस्ता
वाद्य = वाजप
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू
वेश = सोशाख
वेदना = यातना
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी
विद्या = ज्ञान
विनंती = विनवणी
विरोध = प्रतिकार, विसंगती
विसावा = विश्रांती, आराम
विश्व = जग, दुनिया
वीज = विद्युर, सौदामिनी
वृत्ती = स्वभाव
वृद्ध = म्हातारा
वैराण = ओसाड, भकास, उजाड
वैरी = शत्रू, दुष्मन
वैषम्य = विषाद
व्यवसाय = धंदा
व्याख्यान = भाषण
शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग
शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ
शर्यत = स्पर्धा, होड, चुरस
शहर = नगर
शंकर = चंद्रचूड
श्वापद = जनावर
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
शाळा = विद्यालय
शाळुंका = शिविलिंग
शेत = शिवार, वावर, क्षेत्र
शीण = थकवा
शील = चारित्र्य
शीतल = थंड, गार
शिक्षा = दंड, शासन
श्रम = कष्ट, मेहनत
सकाळ = प्रभात, उष:काल
सचोटी = खरेपणा
सफाई = स्वच्छता
सवलत = सूट
सजा = शिक्षा
सन्मान = आदर
संकट = आपत्ती
संधी = मोका
संत = सज्जन, साधू
संपत्ती = धन, दौलत, संपदा
सायंकाळ = संध्याकाळ
सावली = छाया
साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा
स्तुती = प्रशंसा
स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज
स्थान = ठिकाण, वास, ठाव
स्त्री = बाई, महिला, ललना
संध्याकाळ = सायंकाळ, सांज
स्फूर्ती = प्रेरणा
स्वच्छता = झाडलोट
सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
सावली = छाया
सामर्थ्य = शक्ती, बळ
साहित्य = लिखाण
सेवा = शुश्रूषा
सिनेमा = चित्रपट, बोलपट
सिंह = केसरी, मृगराज, वनराज
सुविधा = सोय
सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
सूत = धागा, दोरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
सोने = सुवर्ण, कांचन, हेम
सोहळा = समारंभ
हद्द = सीमा, शीव
हल्ला = चढाई
हळू चालणे = मंदगती
हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
हात = हस्त, कर, बाहू
हाक = साद
हित = कल्याण
हिंमत = धैर्य
हुकूमत = अधिकार
हुरूप = उत्साह
हुबेहूब = तंतोतंत
हेका = हट्ट, आग्रह
क्षमा = माफी
💢 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार💢

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच
'शब्दसिद्धी' असे म्हणतात.

शब्दांचे खालील प्रकार पडतात.

🌀 तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.

💠उदा.
राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.

🌀 तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.

💠उदा.
घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

🌀देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.

💠उदा.
झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

🌀 परभाषीय शब्द :

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.

🌀1) तुर्की शब्द

💠कालगी, बंदूक, कजाग

🌀2) इंग्रजी शब्द

💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

🌀 3) पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

🌀4) फारशी शब्द
💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

🌀 5) अरबी शब्द
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.


🌀6) कानडी शब्द
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

🌀7) गुजराती शब्द
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

🌀8) हिन्दी शब्द
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

🌀 9) तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

🌀10) तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


....,.......
2
🔹समास
बहुव्रीही समास

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.    

नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 
वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 
दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

🔵i) विभक्ती बहुव्रीही समास -

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.
 
अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.    

प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
 
जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
 
जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
 
गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती

🔵ii) नत्र बहुव्रीही समास -

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
 या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदा.    

अनंत - नाही अंत ज्याला तो
 
निर्धन - नाही धन ज्याकडे तो
 
नीरस - नाही रस ज्यात तो

🔵iii) सहबहुव्रीही समास -

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

उदा.    

सहपरिवार - परिवारासहित असा जो
 
सबल - बलासहित आहे असा जो
 
सवर्ण - वर्णासहित असा तो

🔵iv) प्रादिबहुव्रीही समास -

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.    

सुमंगल - पवित्र आहे असे ते
 
सुनयना - सु-नयन असलेली स्त्री
 
दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती
From Marathi Mhani app:

गरज सरो अन् वैद्य मरो.

Meaning:
ज्याने आपली गरज भागविली त्याला विसरुन जाणे.
From Marathi Mhani app:

गरजवंताला अक्कल नसते.

Meaning:
गरजेमुळे अडलेल्या, दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते.
From Marathi Mhani app:

गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.

Meaning:
गरिबावर सावकाराचा अंमल.
From Marathi Mhani app:

गरीबानं खपावं, धनिकानं चाखावं.

Meaning:
गरिबाने कष्ट करावेत आणि श्रीमंताने माल खावा.
2
From Marathi Mhani app:

गर्जेल तो पडेल काय?

Meaning:
केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही कृती होत नाही.
From Marathi Mhani app:

गर्वाचे घर खाली.

Meaning:
गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानीत होण्याची वेळ येते.
From Marathi Mhani app:

गळा नाही सरी, सुखी निद्रा करी.

Meaning:
ज्या स्त्रीच्या अंगावर दागिने नसतात, तिला सुखाने झोप लागते.
From Marathi Mhani app:

गळ्यातले तुटले ओटीत पडले.

Meaning:
कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ असणे.
From Marathi Mhani app:

गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवाया.

Meaning:
अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करु शकत नाही.
From Marathi Mhani app:

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

Meaning:
एखादे काम सिद्धीस गेले तर ठीक, नाही तरी नुकसान नाही.
From Marathi Mhani app:

गाड्याबरोबर नळ्याची यात्रा.

Meaning:
मोठयाच्या आश्रयाने लहानांचाही फायदा.
1
From Marathi Mhani app:

गाढव माजला की तो अखेर आपलेच मूत पितो.

Meaning:
मूर्ख व्यक्ती आपल्या उन्मत्ततेने आपलेच हसू करुन घेतो.
From Marathi Mhani app:

गाढवांचा गोंधळ नि लाथांचा सुकाळ.

Meaning:
मूर्ख लोक एकत्र जमले तर भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही.
From Marathi Mhani app:

गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.

Meaning:
एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग होत नाही.
From Marathi Mhani app:

गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य.

Meaning:
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
From Marathi Mhani app:

गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य.

Meaning:
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
From Marathi Mhani app:

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.

Meaning:
मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही.
From Marathi Mhani app:

गाढवाला गुळाची चव काय?

Meaning:
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही.