मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
★|| मराठी व्याकरण ||★

📚 चला ग्रंथकार ओळखू या📚



१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o आण्णाभाऊ साठे
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील
o वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o गावचा टिनोपाल गुरुजी
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o नामदेव ढसाळ
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी
o सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन
o मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o एकेक पान गळावया
o स्फोट
o कल्याणी
o झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o डॉ. यशवंत पाटणे
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o राजेंद्र मलोसे
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o कल्पनेच्या तीरावर
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
-----------------------------------------------------
Join us @marathigrammar
👍155
★|| मराठी व्याकरण ||★
.
🍀📝 शब्दशोध 📝🍀
✍🏼 प्रश्नमंजुषा 😎

खालील शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ सांगा.उत्तर केवळ चार अक्षरी शब्द हवा व प्रत्येक शब्दात शेवटचे दोन अक्षरे
🔹दा र 🔹 असली पाहिजेत.
😊😊 चला प्रयत्न करू या

१) घोडा सांभाळणारा -मोतदार
२) वेत्रधारी- चोपदार
३) ऑफिसर- कामदार
४) रूचकर - चवदार
५) सुंदर - छबीदार
६) चांगल्या घाटाचा -डौलदार
७) उतरती - ढाळदार
८) मोतद्दार -खासदार
९) सोयरा - नातेदार
१०) शोभिवंत - टुमदार
११) तेजस्वी - पाणीदार
१२) छत्रधर -माहीदार
१३) गच्च भरलेले - भरदार
१४) प्रांतावरचा मुख्य अधिकारी - सुभेदार
१५) अधिन -ताबेदार
__________________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा telegram.me/marathigrammar
👍7
★|| मराठी व्याकरण ||★
.
मराठी व्याकरण - [ संक्षिप्त रुपात - भाग I ]
==================================================
१) स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.
.
२) संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.
.
३) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.
.
४) अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.
.
५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.
.
६) सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.
.
७) शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.
.
८) साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.
.
९) शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.
.
१०) प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.
.
११) धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
.
१२) धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.
.
१३) टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
.
१४) समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.
.
१५) शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.
.
१६) मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.
.
१७) इस. १८३६ साली मराठीतील पहिले मुद्रित व्याकरणाचे पुस्तक - "महाराष्ट्र भाषेचे व्याकरण" गंगाधरशास्त्री फडके यांनी लिहिले.
.
१८) महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.
.
१९) मुख्यार्थ्यास बाधा न येता संदर्भानुसार अनेक शब्द सूचित होतात त्यांना व्यंगार्थ असे म्हणतात.
.
२०) व्यंगार्थ निर्माण करणा-या शक्तीस व्यंजना असे म्हणतात.
________________________________________
Join our marathi grammar channel click here : telwgram.me/marathigrammar
👍82
अभ्यस्त शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो,अभ्यस्त शब्द म्हणजे एकच शब्द किंवा वाक्य दोनदा उच्चारणे (अर्थ न बदलता)उदा:बडबड, दगडबिगड, मळमळ इ.
आमचे चॅनेल जॉईन करा इथे @marathigrammar
👍2
🔹मराठी व्याकरण🔹

1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

मांजर
मानव
कोल्हा
गाय
उत्तर : गाय

2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

स्वातंत्र्य दिन
युवा दिन
प्रजासत्ताक दिन
बालिका दिन
उत्तर : प्रजासत्ताक दिन

3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
18:90::7:?

40
60
35
49
उत्तर : 35

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
सोने

हेम
केसरी
रम्य
तर
उत्तर : हेम

5. 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

एक
दोन
तीन
चार
उत्तर : चार

6. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

तुम्हीही
काका
बसा
आमच्याजवळ
उत्तर : बसा

7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

पोलीस
धूसर
मुकुट
टिळा
उत्तर : टिळा

8. 'अष्टपैलू' - या शब्दाचा अर्थ.

आठ कलेत पारंगत
एका कलेत पारंगत
पैलू पाडणारा
सर्व कलांत पारंगत
उत्तर : सर्व कलांत पारंगत

9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

पाऊल
पिल्लू
घोडा
गाढव
उत्तर : घोडा

10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

पिता
भ्राता
देवता
नेता
उत्तर : देवता

11. 'जनक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

जानकी
जननी
जनका
जनकी
उत्तर : जननी

12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.

गळा
शाळा
मळा
विळा
उत्तर : शाळा

13. एकवचनी असलेला शब्द शोधा.

तळे
मळे
डोळे
गोळे
उत्तर : तळे

14. 'उंदराला ----- साक्ष' ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.

मांजर
कुत्रा
पोपट
कावळा
उत्तर : मांजर

15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ

प्रगती होणे
पूर्णपणे नष्ट होणे
जमीन हादरणे
मैत्री वाढणे
उत्तर : पूर्णपणे नष्ट होणे

16. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

मैत्री
शत्रू
मैत्रीण
सूर्य
उत्तर : शत्रू

17. 'बिनभाड्याचे घर' या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

शाळा
घराला भाडे नसणे
तुरुंग
मंदिर
उत्तर : तुरुंग

18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.
घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.

तबेला
पागा
गोठा
घोडागृह
उत्तर : पागा

19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.
सापाचा खेळ करणारा.

मदारी
जादूगार
दरवेशी
गारुडी
उत्तर : गारुडी

20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
पाणी

अमृत
दूध
झरा
सलील
उत्तर : सलील
___________________________________
या चॅनेल ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा @Marathi
👍87
@MPSCMaterial

एक असे चॅनेल बनवले आहे जिथे फक्त MPSC शी रिलेटेड डिजिटल मटेरियल शेअर केले जाईल , जसे कि ,
👉 महत्वाचे विडिओ ,
👉 महत्वाचे फोटो ,
👉 pdf नोट्स ,
👉 ऑडिओ नोट्स ,
👉 शालेय pdf बुक्स ,
👉 नेट वर उपलब्ध सर्व साईट वरील pdf नोट्स ,
👉 चालू घडामोडी pdf नोट्स
👉 आणखी बरंच काही

लगेच जॉईन करा .... @MPSCmaterial
_____________________________________
Click here to join MPSC Material channel telegram.me/mpscmaterial

जॉईन करा लगेच
👍1🙏1
🌹संग्रही ठेवावे असे🌹
टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी


मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

१९६० पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे.

काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी :


अकिंचन
🌹वासू. ग. मेहेंदळे

अनंततनय
🌹दत्तात्रेय अनंत आपटे

अनंतफंदी
🌹अनंत भवानीबावा घोलप

अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा
🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

अनिल
🌹आत्माराम रावजी देशपांडे

अनिल भारती
🌹शान्ताराम पाटील
(या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)

अशोक (कवी)
🌹नारायण रामचंद्र मोरे

अज्ञातवासी
🌹दिनकर गंगाधर केळकर

आधुनिक नीळकंठ
🌹बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर

आनंद
🌹विनायक लक्ष्मण बरवे

आनंदतनय
🌹गोपाळ आनंदराव देशपांडे

इंदिरा
🌹इंदिरा संत

इंदुकांत
🌹दिनकर नानाजी शिंदे

उदासी/हरिहरमहाराज
🌹नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/
🌹उद्धव xxxx कोकिळ

एकनाथ, एकाजनार्दन
🌹एकनाथ सूर्यनारायण पैठणकर

एक मित्र, विनायक
🌹विनायक जनार्दन करंदीकर

कलापी, बालकवी
🌹त्र्यंबक बापूजी ठोंबरे

कवीश्वरबास
🌹भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर

कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल
🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

कांत
🌹वा.रा. कांत

काव्यशेखर
🌹भास्कर काशीनाथ चांदूरकर

किरात/भ्रमर
🌹कृष्णाजी लक्ष्मण सोमण

कुंजविहारी
🌹🌹हरिहर गुरुनाथ सलगरकर

कुमुदबांधव
🌹स.अ. शुक्ल

कुसुमाग्रज
🌹विष्णू वामन शिरवाडकर

केशवकुमार
🌹प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे

केशवसुत
🌹कृष्णाजी केशव दामले

केशवसुत
🌹नारायण केशव बेहेरे

के.स.रि.
🌹केशव सदाशिव रिसबूड

कोणीतरी
🌹नरहर शंकर रहाळकर

गिरीश
🌹शंकर केशव कानेटकर

गोपिकातनया
🌹कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)

गोपीनाथ
🌹गोपीनाथ तळवलकर

गोमा गणेश
🌹गणेश कृष्ण फाटक

गोविंद
🌹गोविंद दत्तात्रय दरेकर

गोविंदपौत्र
🌹श्रीधर व्यंकटेश केतकर

गोविंदप्रभु
🌹गुंडम अनंतनायक राऊळ

गोविंदाग्रज
🌹राम गणेश गडकरी

ग्रेस
🌹माणिक सीताराम गोडघाटे

चक्रधर
🌹श्रीचांगदेव राऊळ

चंद्रशेखर
🌹चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

चेतोहर
🌹परशुराम नारायण पाटणकर

जगन्नाथ
🌹जगन्नाथ धोंडू भांगले

जगन्मित्र
🌹रेव्हरंड नारायण वामन टिळक

जननीजनकज
🌹पु.पां गोखले

टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती
🌹वासुदेव गणेश टेंबे

ढोलीबुवा/महीपतिनाथ
🌹सखाराम केरसुणे

तुकाराम/तुका
🌹तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले

दत्त
🌹दत्तात्रय कोंडो घाटे

दया पवार
🌹दगडू पवार

दामोदर
🌹वीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे

दा.ग.पा.
🌹दामोदर गणेश पाध्ये

दासोपंत/ दिगंबरानुचर
🌹दासो दिगंबर देशपांडे

दित्जू/माधव जूलियन
🌹माधव त्र्यंबक पटवर्धन

नामदेव
🌹नामदेव दामाशेटी शिंपी

नारायणसुत
🌹श्रीपाद नारायण मुजुमदार

निरंजन
🌹वसंत सदाशिव बल्लाळ

निशिगंध
🌹रा.श्री. जोग

निळोबा
🌹निळा मुकुंद पिंपळनेरकर

नीरजा
🌹नीरजा साठे

नृसिंहसरस्वती
🌹नरहरी माधव काळे

पठ्ठे बापूराव
🌹श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)

पद्मविहारी
🌹रघुनाथ गणेश जोशी

पद्मा
🌹पद्मा गोळे

पी.सावळाराम
🌹निवृत्तिनाथ रावजी पाटील

पुरु.शिव. रेगे
🌹पु.शि. रेगे

पूर्णदास
🌹बाबा उपसकर-राजाध्यक्ष

प्रभाकर शाहीर
🌹प्रभाकर जनार्दम दातार

फुलारी/बी रघुनाथ
🌹भगवान रघुनाथ कुलकर्णी

बहिणाबाई
🌹बहिणाबाई नथूजी चौधरी

(संत) बहिणाबाई
🌹कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)

बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
🌹ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी

बाबा आमटे
🌹मुरलीधर देवीदास आमटे

बाबुलनाथ
🌹विनायक श्यामराव काळे

बालकवी/कलापि
🌹त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बाळा
🌹बाळा कारंजकर

बी; B
🌹बाळकृष्ण अनंत भिडे

बी; BEE
🌹नारायण मुरलीधर गुप्ते

बी रघुनाथ/फुलारी
🌹भगवान रघुनाथ कुलकर्णी

बोधलेबुवा
🌹माणकोजी भानजी जगताप

भगवानकवि
🌹भगवान रत्नाकर कर्‍हाडकर

भानजी
🌹भास्कर त्रिंबक देशपांडे

भानुदास/मामळूभट
🌹भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)

भावगुप्तपद्म
🌹पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

भावशर्मा
🌹के.(केशव) नारायण काळे

भालेंदु
🌹भालचंद्र/गुलाबराव सीताराम स
👍51
ुकथनकर

भ्रमर/किरात
🌹कृष्णाजी लक्ष्मण सोमण

मंदार
🌹एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

मध्वमुनीश्वर
🌹त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)

मनमोहन
🌹गोपाळ नरहर उर्फ मनमोहन नातू

मनोहरबंधू
🌹भास्कर कृष्ण उजगरे

महिपती
🌹महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर

महीपतिनाथ/ढोलीबुवा
🌹सखाराम केरसुणे

माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा
🌹माणिक मनोहर नाईक, हरकुडे

माधव
🌹माधव केशव काटदरे

माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियन
🌹माधव त्र्यंबक पटवर्धन

माधव मिलिंद
🌹कॅ. मा.कृ. शिंदे

माधवसुत
🌹दामोदर माधव कुळकर्णी

माधवानुज
🌹काशीनाथ हरी मोडक

मीरा
🌹मीरा तारळेकर

मुकुंदराय
🌹🌹मुकुंद गणेश मिरजकर

मुक्ताबाई/मुक्ताई
🌹मुक्ता विठ्ठलपंत कुलकर्णी

मुक्तिबोध
🌹शरच्चंद्र माधब मुक्तिबोध

मुक्तेश्वर
🌹मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल

मोरोपंत
🌹मोरेश्वर रामचंद्र पराडकर

यशवंत
🌹यशवंत दिनकर पेंढरकर

यशोधरा
🌹यशोधरा साठे

योगेश
🌹भालजी पेंढारकर

रंगनाथ स्वामी (निगडीकर)
🌹रंगनाथ बोपाजी घोडके

रघुनाथ पंडित
🌹रघुनाथ पंडित चंदावरकर, रघुनाथ
गणेश नवहस्त/नवाथे

रमेश बाळ
🌹बाळ सीताराम मर्ढेकर

राजहंस
🌹यादव शंकर वावीकर

राधारमण
🌹कृष्णाजी पांडुरंग लिमये

रामजोशी/कविराय
🌹राम जनार्दन जोशी

रामदास
🌹नारायण सूर्याजी ठोसर

वसंत
🌹वासुदेव बळवंत पटवर्धन

डॉ. वसंत अवसरे
🌹शांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)

वसंतविहार
🌹शंकर दत्तात्रय जोशी

वा.दा.ओ.
🌹वामन दाजी ओक

वामन पंडित
🌹वामन तानाजी शेषे / वा शेष

विठाबाई
🌹विठा रामप्पा नायक

विठा रेणुकानंदन
🌹विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी

विठ्ठल केरीकर
🌹विठ्ठल नरसिंह साखळकर

विठ्ठलदास
🌹विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर

विंदा करंदीकर
🌹गोविंद विनायक करंदीकर

विनायक/एक मित्र
🌹विनायक जनार्दन करंदीकर

विष्णुदास
🌹कृष्णराव रावजी धांदरफळे

विसोबा खेचर
🌹विसोबा चाटे

विहंगम
🌹बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर

वैशाख
🌹त्र्यं.वि. देशमुख

शारदाश्रमवासी
🌹पुरुषोत्तम गोपाळ काणेकर

श्रीकृष्ण
🌹श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर

श्रीधर
🌹श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे

श्रीराम
🌹श्रीनिवास रामचंद्र बोबडे

संजीव
🌹कृष्ण गंगाधर दीक्षित

संजीवनी
🌹संजीवनी मराठे

सदानंदस्वामी
🌹सदानंद चिंतामणी उपासनी

सरस्वतीकंठाभरण
🌹दिनकर नानाजी शिंदे

साधुदास
🌹गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर

साने गुरुजी
🌹पांडुरंग सदाशिव साने

सामराज
🌹शामभट लक्ष्मण आर्वीकर (राजोपध्ये)

सांवतामाळी
🌹सांवता परसूबा माळी

सुधांशु
🌹हणमंत नरहर जोशी

सुमंत
🌹अप्पाराव धुंडिराज मुरतुले

सुहृद्चंपा
🌹पुरुषोत्तम शिवराम रेगे

सौमित्र
🌹किशोर कदम

स्वरूपानंद
🌹रामचंद्र विष्णू गोडबोले

हरिबुवा
🌹हरिबुवा शिंपी (हरीबोवा केरेश्वर भोंडवे)

हरिहरमहाराज/उदासी
🌹नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

होनाजी
🌹होनाजी सयाजी शेलारखाने

ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/ज्ञानाबाई/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत
🌹ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
___________________________________________
आणखी मराठी व्याकरण विषयक माहिती मिळवण्यासाठी @marathi वर क्लिक करा , नंतर जॉईन वर क्लिक करा , आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास करा.
__________________________________________
Telegram.me/marathi
👍62
अभ्यस्त शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो,अभ्यस्त शब्द म्हणजे एकच शब्द किंवा वाक्य दोनदा उच्चारणे (अर्थ न बदलता).
उदा:बडबड, दगडबिगड, मळमळ इ....
.
आमचे चॅनेल जॉईन करा इथे @marathi
प्रश्नसंच :

1. शब्दाच्या जाती एकूण ----- आहेत?
2
3
5
8
उत्तर :8

2. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला ----- म्हणतात?
अव्यय
सर्वनाम
विशेषण
क्रियाविशेषण
उत्तर :सर्वनाम

3. 'शाळेकडे' या शब्दातील कडे हा शब्द ----- आहे?
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
भाववाचक नाम
उत्तर :शब्दयोगी अव्यय

4. 'शुक्र शुक्र' हा शब्द ----- आहे?
क्रियाविशेषण
भाववाचक नाम
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :केवलप्रयोगी अव्यय

5. ----- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते?
कर्मणी
भावे
केवल
कर्तरी
उत्तर :कर्तरी
______________________________________________

आमचे मराठी व्याकरण हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी प्रथम telegram ऍप डाउनलोड करा आणि नंतर टेलिग्राम ऍप मध्ये @marathi असे सर्च करा, आणि चॅनेल ओपन करून जॉईन करा.
______________________________________________
2👍1