मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
समास व त्याचे प्रकार

💠v) कर्मधारय तत्पुरुष समास :

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

🌅उदा.    

🌓नील कमल - नील असे कमल
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
 
🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓महादेव - महान असा देव

💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.

💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓महादेव - महान असा देव
 
🌓लघुपट - लहान असा पट
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन

💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓मुखकमल - मुख हेच कमल
 
🌓वेशांतर - अन्य असा वेश
 
🌓भाषांतर - अन्य अशी भाषा

💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓लालभडक - लाल भडक असा
 
🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
 
🌓काळाभोर - काळा भोर असा

💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.    

🌓वज्रदेह - वज्रासारखे देह
 
🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
 
🌓राधेश्याम - राधेसारखा शाम
 
🌓कमलनयन - कमळासारखे नयन

💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख
 
🌓नरसिंह - सिंहासारखा नर
 
🌓चरणकमल - कमलासारखे चरण
 
🌓हृदयसागर - सागरासारखे चरण

💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.   

🌓सुयोग - सु (चांगला) असा योग
 
🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
 
🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध

💠ए) रूपक कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.  

🌅उदा.    

🌓विद्याधन - विद्या हेच धन
 
🌓यशोधन - यश हेच धन
 
🌓तपोबल - ताप हेच बल
 
🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत
 
क्रमशः ..........
2👏1
मराठी व्याकरण

🔹लिंगविचार

🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप*
*ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग
रुप एकारांत होते
उदा....
मुलगा -- मुलगी - मुलगे

पोरगा -- पोरगी - पोरगे

🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची
स्त्रीलिंगी रुपे होतात.
उदा...
कुंभार -- कुंभारीण
सुतार -- सुतारीण
पाटील -- पाटलीण
वाघ -- वाघीण
माळी -- माळीण

🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*.

उदा...
दास - दासी

वानर -- वानरी

तरुण - तरुणी

🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ*
*वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून
त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा...

लोटा - लोटी

गाडा - गाडी

दांडा -दांडी

🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय
लागून होतात.

उदा....

श्रीमान -- श्रीमती

युवा - युवती

भगवान - भगवती

🏀वरील बाबींचा सराव पाठातील
जितके जास्त शब्द घेवून करता येईल
तितके करावे.

🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर
करता येईल .
From Marathi Mhani app:

खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते.

Meaning:
आपण औदार्य दाखवायचे नाही आणि दुसरा कोणी दाखवीत असला तर त्याच्या आड यावयाचे.
From Marathi Mhani app:

खऱ्याला मरण नाही.

Meaning:
खरे कधी लपत नाही, ते कधीतरी उघड होईल.
From Marathi Mhani app:

खाटकाला शेळी धार्जिणी.

Meaning:
कठोर व्यक्तीला भिऊन सारे त्याच्या इच्छेनुसार काम करीत असतात.
From Marathi Mhani app:

खाण तशी माती.

Meaning:
आई-बापाप्रमाणेच मुले.
From Marathi Mhani app:

खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे.

Meaning:
बोलताना एक प्रकारे बोलणे व कृती करताना दुसऱ्या प्रकारे करणे.
From Marathi Mhani app:

खायला काळ आणि भु‌ईला भार.

Meaning:
निरुपयोगी माणूस.
From Marathi Mhani app:

खायला कोंडा अन् निजायला धोंडा.

Meaning:
भूक लागली की काण्याकोंडाही चालतो, थकल्यावर कोठेही झोप येते.
From Marathi Mhani app:

खा‌ई त्याला खवखवे.

Meaning:
वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते.
From Marathi Mhani app:

खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

Meaning:
मिळाले काही तर ते चांगलेच पाहिजे, नाहीतर काहीच नको.
From Marathi Mhani app:

खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे.

Meaning:
जो मनुष्य धमकीदारीने एखादी गोष्ट करतो तो त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार असतो.
From Marathi Mhani app:

खा‌ऊन माजावे पण टाकून माजू नये.

Meaning:
पैशांचा, संपत्तीचा गैरवापर करु नये.
From Marathi Mhani app:

खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.

Meaning:
लहान गोष्टीची उपेक्षा केल्यास भयानक परिणाम होत असतात.
From Marathi Mhani app:

खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.

Meaning:
आपली कुवत नसताना व्यवहार करणे.
From Marathi Mhani app:

खुंट्याची सोडली नि झाडाला बांधली.

Meaning:
कुठेही शेवटी बंधनातच असणे.
From Marathi Mhani app:

खोट्याच्या कपाळी गोटा.

Meaning:
खोटेपणा किंवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे नुकसान होत असते.
संधी व त्याचे प्रकार

जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.

उदा.
1. विधालय : धा : द + य + आ

2. पश्चिम : श्चि : श + च + इ

3. आम्ही : म्ही : म + ह + ई

4. शत्रू : त्रू : त + र + ऊ


🌀 संधी:

स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.

उदा.

1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा

2. सूर्यास्त = सूर्य + अस्त

3. सज्जन = सत् + जन

4. चिदानंद = चित् + आनंद

🌀 संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.

स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना
'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.

दिर्घत्व संधी -
1. अ + अ = आ
2. आ + आ = आ
3. आ + अ = आ
4. इ + ई = ई
5. ई + ई = ई
6. इ + इ = ई
7. उ + ऊ = ऊ
8. उ + उ = ऊ

नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.

उदा.
ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा

गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश

उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश

चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय

महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी

देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी

(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.


उदा.

एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य

सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव

मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य

प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य

जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ

गंगा+औघ (आ+औ=औ)
गंगा+औ+घ= गंगौघ

(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.

उदा.

प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ

इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी

अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम

प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक

मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर

पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा

(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.

उदा.

🗒ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन

🗒गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन

🗒गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर

🗒नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक


🌀व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

उदा.
1. सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)

2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.

उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल

वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती

क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा

(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.



क्रमशः
📖केवल प्रयोगी अव्यय📖


आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.

1. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
📄उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.

2. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे

📄उदा. अरेरे! खूप वाईट झाले.

3. आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या

📄उदा. अबब! केवढा मोठा साप

4. प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी

📄उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.

5. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा

📄उदा. अछा! जा मग

6. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च

📄उदा. छे-छे! असे करू नकोस.

7. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी

📄उदा. छी! ते मला नको

8. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

📄उदा. अहो! एकलत का ?

9. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप

📄उदा. चुप! जास्त बोलू नको
✳️✏️✳️✏️✳️✏️✳️
👌1
*समास*

*4) बहुर्वीही समास:*

*ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.*

या समासाचे चार प्रकार पडतात:

*अ)विभक्ती बहुर्वीही:*

विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात.

१} *सामानाधीकरण:*

विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.

1)लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची
विष्णू (प्रथमा)

2)वक्रतुंड
वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो
गणपती (प्रथमा)

3)नीलकंठ
नील आहे कंठ ज्याचे तो
शंकर (प्रथमा)

4)भक्तप्रिया
भक्त आहे प्रिय जयला तो
देव (प्रथमा)

5)जितेंद्रिय
जीत आहेत इंद्रिय ज्याने तो
मारुती (प्रथमा)

6)लंबोदर
लांब आहे उदार ज्याचे असा तो
गणपती (प्रथमा)

7पांडुरंग
पांडूर आहे रंग ज्याचे असा तो
विठ्ठल (प्रथमा)

२ } *व्याधीकरण:*

विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.

1)सुधाकर
सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी)

2)गजानन
गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)

3)भालचंद्र
भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)

4)चक्रपाणी
चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी)



*आ) नत्र बहुर्वीही समास:*

*ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.*

१)अव्यय
नाही व्यय ज्याला ते

२)अनंत
नाही अंत ज्याला ते

३)निर्धन
गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो

४)निरास
नाही रस ज्यात ते

५)नाक
नाही एक (दु:ख) ज्यात ते

६)अनादी
नाही आदी ज्याला तो

७)अखंड
नाही खंड ज्याला असे ते

८)अनियमित
नियमित नाही असे ते

९)अनाथ
जयला नाथ नाही असा तो

१०)अस्पृश्य
यला स्पर्श करत नाही असे ते

११)निर्बळ
निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो

१२)निर्बुद्ध
ज्याला बुद्धी नाही असा तो

१३)अकर्मक
नाही कर्म जयला असे ते

१४)नास्तिक
नाही आस्तिक असा तो

*इ) सहबहुर्वीही समास:*

*जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.*

१)सदर
आदराने सहित असा तो

२)सफल
फळाने सहित असे ते

३)सवर्ण
वर्णासहित असा तो

४)सहपरिवार
परिवारासहित असा तो

५)सबल
बलाने सहित असा तो

*ई)प्रादि बहुर्वीही समास:*

*ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गानी युक्त असते त्यास प्रादि बहुर्वीही समास म्हणतात.*



१)सुमंगल
पवित्र आहे असे ते

२)दुर्गुणी
गुणापासून दूर असलेला

३)प्रबळ
अधिक बलवान असा तो

४)विख्यात
विशेष ख्याती असलेला तो

५)निर्घुण
निघून गेली आहे घृणा ज्यातून तो
🔹समास व त्याचे प्रकार

बहुव्रीही समास

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.    

नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 
वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 
दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

🔵i) विभक्ती बहुव्रीही समास -

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.
 
अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.    

प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
 
जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
 
जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
 
गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती

🔵ii) नत्र बहुव्रीही समास -

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
 या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदा.    

अनंत - नाही अंत ज्याला तो
 
निर्धन - नाही धन ज्याकडे तो
 
नीरस - नाही रस ज्यात तो

🔵iii) सहबहुव्रीही समास -

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

उदा.    

सहपरिवार - परिवारासहित असा जो
 
सबल - बलासहित आहे असा जो
 
सवर्ण - वर्णासहित असा तो

🔵iv) प्रादिबहुव्रीही समास -

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.    

सुमंगल - पवित्र आहे असे ते
 
सुनयना - सु-नयन असलेली स्त्री
 
दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती